शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
सप्टेंबर १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३० (११७)
१२ मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. प्रश्न पेटी वाचा व यहोवाच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करताना योग्य पेहराव, केशरचना व सभ्यता राखण्याविषयीच्या महत्त्वावर थोडक्यात विवेचन द्या. या शनिवारच्या मासिक कार्यासाठी प्रोत्साहन द्या.
१८ मि: “राज्य संदेशाचा प्रसार करण्यात आवेशी असा.” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. परिच्छेद ६ चा विचार झाल्यावर तेथे सुचविल्याप्रमाणे माहितीपत्रक कसे सादर करावे याविषयीचे प्रात्यक्षिक दाखवा. संभाषणाच्या विषयाचा उपयोग करा. क्षेत्रात आवेशी असण्याच्या गरजेवर जोर द्या.
१५ मि: “क्षेत्रकार्यात सुधारणा करण्यासाठी शाळेचा वापर करणे.” शाळा देखरेखे उपस्थितांसोबत थिऑक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक पुस्तकातील १९ व्या अध्यायाची चर्चा करतात. शाळा आम्हाला क्षेत्र कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कशी मदत देते ते ठळकपणे समोर मांडा. शाळेत नाव नोंदलेल्यांना आपल्या भाषणाची दृश्यरचना व भाषण स्थानिक क्षेत्राला अनुलक्षून होईल असे व्यावहारिक बनविण्याचे प्रोत्साहन द्या.
गीत ३१ (३) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २११ (१०५)
१० मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. संस्थेच्या जागतिक कामासाठी पाठविलेल्या अनुदानाविषयी पोच मिळालेली असल्यास ती मंडळीला कळवा. अशा अनुदानाविषयी तसेच स्थानिकरित्या मंडळीला पाठबळ दिल्याबद्दल बंधूंची प्रशंसा करा. सर्वांना या सप्ताहाच्या शेवटी क्षेत्रकार्यात भाग घेण्याचे उत्तेजन द्या.
१८ मिः “धीराने फळ देत राहा.” पुरवणीतील लेखावर आधारीत भाषण. साहित्य स्थानिक गरजानुरुप लागू करा व सर्वांना आपल्या व्यक्तीगत परिस्थितीस यहोवाच्या दृष्टीकोणातून बघण्याचे प्रोत्साहन द्या.
१७ मिः “तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची इच्छा का धरली पाहिजे.” प्रश्नोत्तराने हाताळणी. कोणा प्रचारकाने वा पायनियराने एखाद्याला समर्पण व बाप्तिस्मा घेण्यापर्यंत मदत दिली असल्यास त्याची त्रोटक मुलाखत घ्यावी. त्याला किंवा तिला विचारा की त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये आणि अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थी वा विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारचे नाते विकसित झाले; तसेच अभ्यास चालविल्यामुळे कोणकोणते लाभ मिळाले.
गीत १३३ (६८) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २९ (११)
१० मिः स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. तसेच या सप्ताहाच्या शेवटाला क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
२० मिः “तुमची मुले शाळेत दृढनिश्चयी असतात का?” प्रश्नोत्तराकरवी सभागृहासोबत चर्चा. परिच्छेद व शास्त्रवचने वाचावीत. चर्चिल्या जाणाऱ्या मुद्यास अनुलक्षून काही स्थानिक अनुभव असतील तर वेळ मुभा देतो त्याप्रमाणे ते सादर करावेत.
१५ मिः स्थानिक गरजा किंवा वॉचटावर एप्रिल १५, १९९० च्या पृष्ठे २६-८ वरील “‘स्टँड फर्म्—डू नॉट स्टम्बल” या लेखावर आधारीत भाषण. (प्रादेशिक भाषातः जून १, १९९० टेहळणी बुरुज, “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.”)
गीत १९१ (४२) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९२ (५१)
७ मिः स्थानिक घोषणा. भारताच्या मे महिन्याच्या अहवालाची चर्चा करा आणि याच महिन्यात मंडळीने काही उल्लेखनीय कार्य केले असल्यास त्याची माहिती द्या. क्षेत्र कार्याचे अहवाल ताबडतोब देण्याच्या महत्त्वावर भर द्या.
२३ मिः “सुवार्ता सादरता—अनौपचारिक साक्ष देण्यासाठी सुसंध्या काढणे.” प्रश्नोत्तराने हाताळणी. परिच्छेद ३ चा विचार केल्यावर सभागृहाला अनौपचारिक साक्षीसंबंधीचा मार्ग उघडा होऊ शकेल असे काही इतर प्रसंग आहेत का ते सांगण्यास लावा. नवीन शालेय वर्षात युवकांना सत्याविषयी बोलण्याविषयी कशी सुसंधि मिळू शकते ते सांगा. परिच्छेद ६ नंतर, अनौपचारिक साक्षीकार्यात यश मिळवलेल्या एक किंवा दोन प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या. विचाराः ‘ते कोणत्या वेळी प्रचार करतात? प्रचाराचे हे माध्यम त्यांना परिणामकारक असल्याचे का वाटते? त्यांना व्यक्तीशः कोणता लाभ मिळाला?’ सर्वांनीच दर दिवशी सुवार्तेची काही ना काही सहभागिता इतरांसमवेत करावी याचे प्रोत्साहन द्या. लोकांविषयी गाढ काळजी बाळगण्याविषयी जोर देऊन समारोप करा.
१५ मिः ऑक्टोबरमध्ये क्रिएशन पुस्तक सादर करा. भाषण व प्रात्यक्षिक. ऑक्टोबरमध्ये क्रिएशन पुस्तक देतेवेळी कोणते बोलके मुद्दे वापरावेत त्याची चर्चा करा. कदाचित अध्याय १६ व १७ मधील “देव त्रासाला का मुभा देतो?” व “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव ठेवू शकाल का?” हे साहित्य घरमालकाला अपीलकारक ठरू शकेल. एक लायक प्रचारकाला सादरतेचे प्रात्यक्षिक करू द्या. उत्क्रांती शिकवणीचे खंडण करण्यासाठी व मानवाचा निर्माता देव याजवरील विश्वास वाढविण्यासाठी इब्रीयांस ३:४ व प्रकटीकरण ४:११ ही शास्त्रवचने वापरावीत. वेळ मुभा देईल त्याप्रमाणे रिझनिंग पुस्तकाच्या “क्रिएशन” शिर्षकाखाली असणाऱ्या साहित्याचा वापर केला जाऊ शकतो. मंडळीच्या क्षेत्र कार्याच्या योजनांविषयीची माहिती द्या, व सर्वांना सहभागी होण्याचे निमंत्रण द्या.
गीत १२९ (६६) व समाप्तीची प्रार्थना.