राज्य संदेशाचा प्रसार करण्यात आवेशी असा
१ यहोवा हा चांगली कामे करणारा देव आहे व तो त्यांची पूर्ति आवेशाने करतो. तो करणाऱ्या सर्व गोष्टी त्याची सेवा करणाऱ्यांचे भले करतात. येशूने आपल्या पित्याच्या आवेशाचे अनुकरण करण्यात सुंदर उदाहरण राखले. एके प्रसंगी, यहोवाच्या मंदिराविषयी वाटणाऱ्या आवेशामुळे त्याने मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना बाहेर हाकलून लावले. (योहान २:१४-१७) आम्हालाही जर आम्ही “चांगल्या कामात आवेशी” असणारे लोक अशी आपली ओळख देण्याची इच्छा आहे तर मग, यहोवा देवाच्या करीत असलेल्या सेवेत आवेश प्रदर्शित केला पाहिजे.—तीत. २:१४.
२ ख्रिश्चनांची चांगली कामे इतरांना लाभ देतात. आम्हाला दुसऱ्यासांठी जी अत्यंत लाभदायक गोष्ट करता येईल ती, त्यांना यहोवा देवाची माहिती देऊन त्याची सेवा करण्यासाठी मदत देणे ही आहे. (योहान १७:३) अशी ही मदत आम्ही आमच्या आवेशी राज्य-प्रचाराच्या आणि शिष्य बनविण्याच्या कामाकरवी देत असतो.
३ आवेश हा काय आहे? ती उत्कंठा आहे. जे बरोबर व योग्य आहे ते करण्याच्या इच्छेमधून ख्रिस्ती आवेश निर्माण होत असतो. “आवेश” यासाठी असणाऱ्या ग्रीक शब्दाचा अर्थ “उकळणे” असा आहे. देवाचे उपाध्याय या नात्याने राज्य संदेशाचा प्रसार करतेवेळी आम्ही हा गुण प्रदर्शित केला पाहिजे. आम्ही आमच्या कार्यात खरेच आवेशी आहोत का? इतरांनी यहोवाच्या उद्देशाविषयी शिकून घ्यावे म्हणून आम्ही आपल्यापरिने होता होईल तितके करतो का?
माहितीपत्रके सादर करताना आवेश प्रदर्शित करा
४ सप्टेंबर महिन्यात आपण पुन्हा एकदा स्कूल ॲण्ड जेहोवाज् विटनेसेस याखेरीज इतर ३२-पानी माहितीपत्रके सादर करणार आहोत. आम्हाला पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्युअर फॉरएव्हर, किंवा नंदनवन आणविणारे सरकार हे माहितीपत्रक सादर करता येईल. आपल्या क्षेत्रासाठी त्याचप्रमाणे दरवाज्यावर जी व्यक्ती भेटेल तिला देण्यास कोणती माहितीपत्रके उपयुक्त ठरतील त्याची आधी तयारी करा.
५ राज्य संदेशाचा प्रसार आवेशाने करण्यासाठी आम्ही उत्तम तयारी करण्याची जरुरी आहे. आम्ही सध्याच्या संभाषणाच्या विषयाशी परिचित आहोत का? आम्हाला संभाषणाच्या विषयाची आणि जे माहितीपत्रक आम्ही सादर करीत आहोत त्याची कशी सांगड घालता येईल? माहितीपत्रकातील कोणते विशिष्ट मुद्दे आम्हाला दाखविता येतील? या पाच माहितीपत्रकाशी आम्ही चांगला परिचय करून घेतला आणि यांजविषयी आम्ही आपल्या मनात उत्साह उभारला तर मग, आमच्या क्षेत्रावर त्यांचे आवेशाने वितरण करण्याची आमची तयारी होईल.
माहितीपत्रके सादर करण्यासाठी प्रस्ताव
६ आपली ओळख करून दिल्यावर तुम्हाला असे म्हणता येईलः “जगात सध्या जी दुष्टाई पसरलेली आहे तिजविषयी देवाला काही काळजी वाटते याविषयी तुम्ही कधी आश्चर्य केले आहे का? [प्रतिसादास वाव द्या.] पवित्र शास्त्र सांगते की, लवकरच दुष्टांचा नाश केला जाईल. [वाचा स्तोत्र. ९२:७.] असे आहे तर मग, खऱ्या मार्गदर्शनासाठी व संरक्षणासाठी आम्हाला कोठे जाता येईल? [वाचा स्तोत्र. १४५:२०.] अशाप्रकारे आमचे तारण हे निर्माणकर्त्या यहोवा देवासोबतच्या आमच्या नातेसंबंधावर अवलंबून आहे. आज्ञाधारक मानवजातीला तो जे आशीर्वाद देणार आहे त्याचा आम्ही विचार केला पाहिजे.” मग, तुम्हाला पृथ्वीवरील जीवन या माहितीपत्रकातील चित्र क्रमांक ४९ कडे वळता येईल आणि त्याचे शीर्षक वाचून चित्रात दाखविण्यात आलेल्या आशीर्वादांची ठळकपणे माहिती देता येईल. किंवा सरकार या माहितीपत्रकाचे पृष्ठ २९ काढून तेथे विवेचीत करण्यात आलेल्या आशीर्वादांची चर्चा करा. देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करील याविषयी माहिती सांगताना काहींना “पहा!” माहितीपत्रकातील परिच्छेद ४९ व ५० वापरावेसे वाटतील.
७ सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे आम्ही देत असलेला संदेश हा निकडीचा आहे. आम्ही राज्याचा संदेश आवेशाने देऊन इतरांना देव व त्याचे वचन याजशी परिचित होण्याचे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे जीवनदायी ज्ञान आवेशाने प्रसारीत करण्यामुळे आम्ही आपल्या ईश्वरी भक्तीचा तसेच यहोवाबद्दल आपणास वाटणाऱ्या प्रेमाचा पुरावा देत असतो. स्वतःला विचाराः ‘मी चांगल्या कामासाठी आवेशी आहे का? मी प्रचार कार्यास देत असलेला पाठिंबा उत्कंठित व पूर्ण जिवाचा आहे असे म्हणता येईल का?’ याला आम्ही दिलेली उत्तरे आमच्या आवेशाविषयी बरेच काही सांगेल. राज्य संदेशाचा प्रसार करण्यामध्ये जितक्या अधिकपणे आम्ही सहभागी होतो तितका अधिक आमचा आवेश वाढेल. यामुळे, आम्ही चांगल्या कामात आवेशी असणारे लोक खरेच आहोत हे इतरांना दिसून येईल.