वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९१ पृ. ८
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सादर करणे
  • तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास सादर करता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • बायबल अभ्यास सादर करण्याकरता एक खास दिवस
    आमची राज्य सेवा—२००८
  • लावणे व पाणी घालणे—शिष्य बनविण्यातील पावले
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km १२/९१ पृ. ८

सुवार्ता सादरता

घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सादर करणे

१ ख्रिस्ताचे शिष्य करण्याच्या कामात बी लावणे व पाणी घालणे याबद्दलच्या आमच्या जबाबदारीबद्दल आमची राज्य सेवा याच्या सप्टेंबर १९९१ अंकात आम्हाला स्मरण देण्यात आले होते. तेथे आम्हाला सांगण्यात आले होते की, जे राज्याचा संदेश ऐकून घेतात अशांवरील प्रेमाखातर आम्ही त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पुढे आले पाहिजे. यास्तव, पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची सादरता करण्यामुळे आपल्याला आपले शिष्य बनवण्याचे काम पूर्ण करता येईल.—मत्तय २८:१९, २०.

२ दिलेल्या उत्तेजनास अनुसरुन पुष्कळ जण या गोष्टींचा अवलंब करीत आहेत हे खरोखरी चांगले आहे. अधिक पवित्र शास्त्र अभ्यास चालविले जात आहेत असे अहवाल कळवितात. भारतात चालविल्या जाणाऱ्‍या पवित्र शास्त्र अभ्यासाबाबत पाहू जाता १९९० च्या कार्यवर्षापेक्षा १७ टक्क्यांनी अधिक अभ्यास १९९१ कार्यवषात चालविले जात आहेत. पहिल्यानेच पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यासाठी ज्यांनी सुरवात केली आहे अशांना शिष्य बनविण्याच्या कामात आनंद मिळत आहे. पण सेवकपणाच्या या प्रकारात अधिकांना कसा सहभाग घेता येऊ शकेल?

३ महिना सादरतेस उपयोगात आणा: डिसेंबर हा महिना खासपणे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी योग्य महिना आहे. आपण या महिन्यात न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? ही सादरता करणार आहोत. घरमालकामध्ये आस्था उभारण्यासाठी रिझनिंग पुस्तकातील प्रस्तावांचा वापर करणे चांगले ठरेल.

४ या रिझनिंग पुस्तकातील १० व्या पानावर आढळणाऱ्‍या प्रस्तावनांचा उपयोग करून आपल्याला पवित्र शास्त्र सादर करता येईल. पवित्र शास्त्राकडे लक्ष आकर्षित करण्याचे पाच मार्ग तेथे दाखवण्यात आले आहेत. जीवनातील प्रश्‍नांवर पवित्र शास्त्राचा तोडगा सुचविण्यामुळे पवित्र शास्त्र अभ्यासाचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

५ रिझनिंग पुस्तकातील १२ व्या पानावरील “होम बायबल स्टडीज्‌” या उपशिर्षकाखाली असे दोन प्रस्ताव आहेत, जे गॉडस्‌ वर्ड पुस्तकाकडे लक्ष आकर्षित करू शकतील. दोन्ही प्रस्ताव पद्धतशीर अभ्यास करण्याकडे उत्तेजन देतात. तुम्ही अभ्यास करण्याचा थेटपणे प्रस्ताव मांडत असल्यास आमची राज्य सेवा ऑक्टोबर १९९१ अंकातील सुंदर प्रस्तावांचा उपयोग करू शकाल.

६ यहोवावर भाव ठेवा: आपल्या पवित्र शास्त्राभ्यासाच्या कामात यशस्वी व्हावयाचे आहे तर पवित्र शास्त्र अभ्यास सादर करण्यातील यश केवळ यहोवाच्या मदतीनेच साध्य होऊ शकते. आपण लोकांना मदत देण्याचा जो प्रयत्न करतो त्यामध्ये त्याची भूमिका प्रमुख आहे. (१ करिंथ. ३:६) या कारणास्तव, अभ्यास करण्यासाठी कोणीतरी मिळावा यासाठीच केवळ नव्हे तर ज्यांना आपण शोधून काढले आहे त्या आस्थेवाईकांनी प्रगती करावी यासाठीही यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे. (योहान १६:२३) आपण “देवाचे सहकारी” आहोत हे ध्यानात ठेवले पाहिजे.—१ करिंथ. ३:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा