पवित्र शास्त्राभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगति करण्याचे उत्तेजन द्या
१ प्रगति म्हटली की जग याकडे तंत्रज्ञान किंवा भौतिक दृष्टीने बघते. पण यहोवाचे लोक असे नाहीत. उलटपक्षी, आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या सतत प्रगतिशील असण्याच्या प्रयत्नात असतो. येशू ख्रिस्ताचे क्रियाशील व फलदायी शिष्य बनावे यासाठी जे उत्तेजन आम्हाला देण्यात आले होते त्याच्या आठवणीने आम्हाला धन्यता वाटते.—योहान १५:८; २ पेत्र १:५-८.
२ शुभवर्तमानात “शिष्य” ही संज्ञा प्रामुख्यत्वे जे ख्रिस्ताच्या शिक्षणावर विश्वास ठेवतात इतकेच नसून जे त्याचे लक्षपूर्वक अनुकरण करतात अशांना लागू करण्यात आली आहे. (मत्तय २८:१९, २०) आमचे पवित्र शास्त्र विद्यार्थी या गोष्टीची जाणीव राखतात का? तर मग, आम्ही यांना ख्रिस्ताचे शिष्य व्हावे म्हणून प्रगति करण्यासाठी कशा प्रकारचे उत्तेजन देऊ शकतो?
त्यांची आस्था संस्थेकडे निरवा
३ विद्यार्थ्याची प्रगति ही, त्याला यहोवाच्या संस्थेविषयी जी रसिकता वाटत असते त्यासोबत निश्चितपणे जोडलेली असते. याकरताच शिक्षक या नात्याने आमची ही जबाबदारी आहे की, विद्यार्थ्याची आस्था संस्थेकडे निरवावी. बऱ्याच वर्षांपासून आम्हाला याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे की प्रत्येक अभ्यासाच्या शेवटी आम्ही पाच ते दहा मिनिटांचा वेळ काढून संस्थेविषयीची काहीतरी माहिती त्यांना द्यावी. याच्या आराखड्यासाठी यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत हे माहितीपत्रक अगदी उत्तम आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास घेणाऱ्या तुमच्या विद्यार्थ्यापाशी याची एक प्रत आहे का? नसेल तर ती त्याला लगेच मिळते आहे याकडे लक्ष द्या. त्याला ते वाचण्याचे उत्तेजन द्या व सांगा की दर अभ्यासाच्या समाप्तीला याचा थोडा भाग विचारविनिमयासाठी घेतला जाईल.
४ देवाची इच्छा आचरीत आहेत या माहितीपत्रकाच्या पृष्ठ १४ व १५वर विद्यार्थ्याची मंडळीच्या प्रत्येक सभेविषयी रसिकता वाढविण्यासाठी माहिती देण्यात आली आहे. तर दर आठवडी केवळ एक किंवा दोन परिच्छेद का विचारात घेऊ नयेत? प्रत्येक सभा ही विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी कशी तालीम व सूचना देते हे त्याला दाखवून द्या. “आपले एकत्र मिळणे” करीत राहिल्यामुळे आध्यात्मिक वाढ होत असते हे विद्यार्थ्याला पाहण्याची मदत द्या. (इब्री. १०:२४, २५) राज्य सभागृहात आम्हासोबत सहवास ठेवण्याचे उबदार प्रोत्साहन त्याला द्या. तेथे, यहोवाचे संघटित लोक या नात्याने आम्ही ज्या ऐक्याचा व प्रेमाचा आनंद अनुभवीत आहोत ते प्रत्यक्षपणेच त्याला अनुभवण्यास मिळेल.—स्तोत्र. १३३:१; योहान १३:३५.
आध्यात्मिक वाढ करण्याचे उत्तेजन द्या
५ नव्या लोकांनी देवाच्या वचनाचे खरे विद्यार्थी, ज्ञान व समज यात वाढ करणारे आणि त्याच्या तत्वांचा अवलंब करणारे बनले पाहिजे. या कारणास्तव विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला तरी आम्ही त्याच्यासोबत लिव्ह फॉरएव्हर तसेच युनायटेड वर्शिप किंवा ट्रु पीस या पुस्तकांचा अभ्यास, संपला नसल्यास चालू ठेवू. पहिले पुस्तक संपल्यानंतर ज्या दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास केला जाणार त्याला अवधि असला तरीही त्याची प्रत आत्ताच घेऊन ठेवणे बरे ठरेल. यामुळे त्याच्या आध्यात्मिक भूक वाढेल व त्याला अधिक वाचन करण्याची प्रेरणा मिळून प्रगति घडत असल्याचे दिसू लागेल. याखेरीज, वॉचटावर व अवेक! या मासिकांचे वर्गणीदार असण्याचे आणि संस्थेची इतर प्रकाशने स्वतःजवळ बाळगण्याचे महत्त्व आम्ही दाखवू शकू. याकरवी, त्याच्याकडे “योग्य वेळी शिधासामुग्री” उपलब्ध राहील. (लूक १२:४२) असे करणाऱ्यांचा विश्वास मुळावलेला बनेल व तो वाढू लागून भक्कम बनेल.—कलस्सै. २:७.
६ पवित्र शास्त्राभ्यास विद्यार्थ्यांनी वाढून प्रौढ बनायचे आहे तर त्यांची संभाव्य यहोवाचे सहकर्मी साक्षीदार बनण्यात मदत दिली गेली पाहिजे. (इब्री. ५:१४) प्रगतिसाठी उत्तेजन देण्यामध्ये योग्य स्वरुपाची प्रशंसा देखील करण्यास हवी. (फिलिप्पै. ३:१६) तो जे शिकत आहे त्याची सहभागिता आपले कुटुंब व परिचित जण यांजमध्ये करीत आहे का? लायक आहे तर त्याने आपले नाव ईश्वरशासित शाळेत दाखल केले आहे का? सुवार्तेचा प्रचारक बनण्याची त्याची इच्छा आहे का?
७ आम्ही शिक्षक या नात्याने आमचा कार्यभाग पूर्ण केला तर मग, यहोवाकडील आशीर्वादांची प्रतिक्षा करू शकतो. (२ करिंथ ९:६) पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करण्याचे मोल किती मोठे आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. ते जे शिकत आहेत त्यावर प्रतिसाद दाखविण्याकडे निरवले जावे यासाठी यहोवाची विनवणी करा. (१ करिंथ. ३:६, ७) त्यांनी मंडळीसोबत क्रियाशील रितीने सहवास ठेवावा म्हणून निर्णायक कृती आचरावी व त्याद्वारे यहोवाच्या नामास गौरव व स्तुती लाभावी असेच घडो.