वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९० पृ. १
  • पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अधिवेशनांपासून लाभ मिळविणे
  • क्षेत्रकार्यातील सहभाग
  • अभ्यास चालविण्याचा प्रयत्न करा
  • सुट्टीच्या स्मरणिका
    आमची राज्य सेवा—१९९३
  • उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • साक्ष देण्याच्या संधी साधा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ८/९० पृ. १

पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा

१ शाळेतील मुलांना, सुटी कशी घालवणार हे सहसा विचारले जाते आणि सुटीवरुन परतल्यावर सुटीत काय काय केले ते सांगा असेही विचारले जाते. तर मग, आम्ही, तरुण असो वा वृद्ध, स्वतःला हे विचारुन पाहणे बरे ठरेल की, ‘पावसाळी महिन्यात आम्ही काय करायचे ठरवले आहे? आणि पावसाळा सरला म्हणजे आम्ही तो योग्यपणे व उभारणीकारक रितीने घालवला असा अहवाल आम्हाला देता येऊ शकेल का?’ होय, जरुर देता येईल पण यासाठी “संधि साधून घ्या,” हा सल्ला आम्ही लक्षात घेणे जरुरीचे आहे.—इफिस. ५:१५, १६.

अधिवेशनांपासून लाभ मिळविणे

२ आमच्या योजनेत ज्या एका गोष्टीचा समावेश केला जाण्यास हवा, ती आहे “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहणे. नंतर आम्ही घेतलेल्या नोंदी चाळल्या पाहिजेत व यहोवाचे स्तुतीपाठक या नात्याने शिकलेल्या गोष्टींचे आमच्या जीवनात अवलंबन केले पाहिजे. इफिसकर ४:२५ मध्ये आम्हाला उत्तेजन दिले आहे की, “प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्‍याबरोबर सत्य बोलावे.” आमचे सर्वात जवळचे शेजारी म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य होत. आम्ही घरातील सदस्यांबरोबर किंवा आध्यात्मिक कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून अधिवेशन कार्यक्रमात जे आध्यात्मिक अन्‍न देण्यात आले त्याचा विचारविनिमय करू शकतो. असे केल्यामुळे आम्हाला एकमेकांना “यहोवाची सेवा घडावी म्हणून . . . त्याच्या नावाचा धावा खांद्याला खांदा लावून” करण्याची मदत देता येईल.—सफन्या ३:९.

क्षेत्रकार्यातील सहभाग

३ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान आपण स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही माहितीपत्रक सादर करणार आहोत. तर या दोन्ही महिन्यात, प्रत्येक संधिचा वापर करून माहितीपत्रके देण्यासाठी होता होईल तितका सहभाग घेण्याची योजना आखली आहे का? आम्ही या महिन्यांदरम्यान आपल्या मंडळीतच असलो तर मंडळीने ठरवून दिलेल्या नियमित प्रचार कार्याच्या योजनेला हातभार लावू शकू. सध्या दिवसाचा कालावधी मोठा असल्या कारणामुळे आम्ही सायंकाळच्या साक्षीकार्यात सहभागी होण्याची योजना करू. बहुतेक लोक सायंकाळी घरी आरामात असतात व यामुळे आम्हाला शिकवल्या गेलेल्या राज्याच्या सुवार्तेची सहभागी त्यांच्याशी करण्याचे सोपे जाते.—यशया ५०:४.

४ आम्ही अधिवेशनाला किंवा सुटीला निघण्याच्या प्रवासाची योजना आखू तेव्हा सोबत काही माहितीपत्रके देखील घेऊन जाण्याचे ठरवू. जेव्हा अनौपचारिक साक्षीकार्य करण्याची संधि प्रस्तुत होते तेव्हा आम्हाला लोकांचे लक्ष एका माहितीपत्रकाकडे वेधता येईल. आम्ही घरापासून दूरवर गेलो असताना तेथील राज्य सभागृह शोधून काढू, तेथील सभांना उपस्थित राहू व तेथील स्थानिक बंधू-भगिनींसोबत क्षेत्रकार्य करू. यामुळे आम्हाला व ज्यांच्यासोबत आम्ही सहवास राखून आहोत त्या बंधूजनांना उत्तेजनाचा काही आधार मिळाला पाहिजे.—रोमकर १:१२.

५ महिन्याच्या शेवटाला आम्ही काही कामानिमित्त आमच्या मंडळीपासून दूर जात असलो तर आम्ही आमच्या क्षेत्रकार्याचा अहवाल आमच्या मंडळीतील सचिवांना लवकर मिळू शकेल अशा रितीने पाठवावा, म्हणजे तो ते दर महिन्याच्या सहापर्यंत संस्थेला जो अहवाल पाठवत असतात त्यात समाविष्ट करता येईल.

अभ्यास चालविण्याचा प्रयत्न करा

६ पावसाळी महिन्यात पवित्र शास्त्राभ्यास घेणारे काही लोक सुटीवर जात असतात, त्यामुळे या काळात कमी अभ्यास चालविले जातात. अभ्यास घेणारा देखील कदाचित दुसऱ्‍या एखाद्या वेळी सुटीवर जात असेल. तर अशावेळी काही आठवडे विना अभ्यास होण्यात जाऊ देण्यापेक्षा आमच्या अनुपस्थितीत मंडळीतील कोणीतरी तो अभ्यास चालवू शकेल अशी व्यवस्था करता येईल का? शक्य आहे तितक्या अधिकपणे हा अभ्यास नियमित रुपाने घेणे बरे आहे, ज्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर नियमित रुपाने आध्यात्मिक स्वरुपाची भरवणूक होण्याचे महत्त्व बिंबवण्यात येईल.

७ आम्हाला क्षेत्रात कोणी आस्थेवाईक आढळतो अशा वेळी त्या आस्थेचा पाठलाग शक्य आहे तितक्या लवकर केला जाण्यास हवा. कोणा घरमालकाने माहितीपत्रक घेतले तर त्याचा कसा उपयोग केला जावा यासाठी काही परिच्छेदांचा एकत्र विचारविनिमय तेथे प्रस्तुत करता येईल. मग परत भेटण्याची निश्‍चित योजना करून तो अभ्यास चालू ठेवावा.

८ आम्हा सर्वांना १९९० च्या पावसाळी महिन्यांकडे परत पाहता आले पाहिजे आणि यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने हे वाटले पाहिजे की, हा काळ आम्ही “सुवचनांचा योग्य नमुना धरुन ठेवण्यास” आणि यहोवाच्या वचनातील आरोग्यदायी वचने इतरांना शिकवण्यासाठी मदत देण्यामध्ये घालविला.—२ तीम. १:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा