शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
ऑगस्ट ६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७४ (१३)
१० मि: स्थानिक घोषणा तसेच आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. या शनिवारी ज्या मासिकांचे वितरण करावयाचे आहे त्यातील लेखांना ठळकपणे समोर मांडा. एका मासिकातील एक लेख ठळकपणे मांडला जाईल अशी दोन प्रात्यक्षिके.
२५ मि: “पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा.” प्रश्नोत्तराने हाताळणी. दहा मिनिटांचे सध्याच्या संभाषणाच्या विषयाचे व “पहा!” माहितीपत्रक देण्याचे प्रात्यक्षिक दाखवा. यात परिच्छेद ७ मध्ये, माहितीपत्रकाचा कसा उपयोग करावा त्या मुद्याचे प्रात्यक्षिकीकरण दाखवा. पुनर्भेटीच्या निश्चित योजनांचा समावेश करावा.
१० मि: माहितीपत्रकातील बोलके मुद्दे. क्षेत्रकार्यासाठी मंडळीत जी माहितीपत्रके उपलब्ध आहेत त्यात असणारी ठळक वैशिष्ट्ये सभागृहाकडून काढून घ्या. कदाचित लायक प्रचारकाला या कामाची आधीच नियुक्ती दिली जावी.
गीत २० (१०३) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १५६ (१०)
५ मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. एखाद्या देणगीची पोच मिळालेली असल्यास तिचा समावेश करावा. जागतिक राज्य-कार्यासाठी तसेच स्थानिक गरजांच्या अनुषंगाने मंडळीने केलेल्या आर्थिक सहकार्याच्या बाबतीत तिची प्रशंसा करा.
२० मि: “पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगति करण्याचे उत्तेजन द्या.” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. चवथ्या परिच्छेदाचा विचार करताना एक अनुभवी प्रचारक एका विद्यार्थ्याला देवाची इच्छा आचरणे या माहितीपत्रकाच्या पान १४ व परिच्छेद ३ ची हाताळणी करताना प्रगति करण्याचे कसे उत्तेजन देत आहे हे दाखविणारे चांगल्या तयारीचे प्रात्यक्षिक.
१५ मि: पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या कोणा विद्यार्थ्याला जाहीर प्रचारकार्यात केव्हा सहभाग घेता येईल? वॉचटावर च्या डिसेंबर १, १९८९ अंकाच्या पृष्ठ ३१ वरील “वाचकांचे प्रश्न” सदरातील साहित्यावर आधारीत वडीलाकरवी भाषण. आमच्या मुलांव्यतिरिक्त नव्या जणांना, दोन वडील त्यांच्याशी बोलणी करून ते पात्र आहेत हे निश्चित करेपर्यंत आमच्या सोबत क्षेत्रकार्याला निमंत्रित करू नये याविषयी जोर द्या.
गीत २१७ (२४) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २० ने सुरु होणारा सप्ताह
गीत २२० (१९)
१० मिः स्थानिक घोषणा. एप्रिलच्या अहवालातील काही लक्षवेधक मुद्दे सांगा. जे स्थानिकरित्या साध्य करण्यात आले आहे त्याविषयी मंडळीची प्रशंसा करा. या सप्ताहाच्या शेवटाला क्षेत्रकार्याला येण्याचे प्रोत्साहन द्या.
२० मिः “सभा लाभदायक बनविण्यामध्ये तुमचा सहभाग.” वडील प्रश्नोत्तराने हाताळणी करतात. स्थानिकरित्या कशाकडे लक्ष देण्याची गरज आहे ते जोर देऊन सांगा. योग्य आहे तेथे प्रशंसा करा.
१५ मिः पायनियर बनण्याच्या संभाव्यतेविषयी विचार करणे. प्रोत्साहनदायक भाषण व मुलाखती. आज भारतात, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे व विविध परिस्थितीचे ४०० पेक्षा अधिक नियमित पायनियर्स आहेत. यांना पायनियर होण्यासाठी कशामुळे चालना मिळाली? यहोवा व शेजाऱ्याविषयीच्या प्रेमामुळे. (मत्तय २२:३७-३९); लोकांविषयी गाढ आस्था आणि अधिक जणांचा बचाव व्हावा याविषयी मदत देण्याची इच्छा (१ तीमथ्य २:४); राज्य आस्थेसाठी बाळगलेला निस्वार्थ स्वरुपाचा आत्मा. (१ करिंथ. ९:२३) इच्छेची जोपासना केली पाहिजे. हे तुम्ही करीत आहात का? पायनियर होण्याची इच्छा आहे तर ही पावले घेतील पाहिजेतः (१) यहोवाला प्रार्थना करताना ही गोष्ट मांडा (मत्तय ७:७, ८; फिलिप्पै. ४:६); (२) पायनियर व वडीलांसोबत याविषयी चर्चा करा (नीती. १५:२२); (३) आधी एक कच्चा आराखडा तयार करा व तो इतर ख्रिस्ती जबाबदारींवर कसा परिणाम करतो ते पहा (लूक १४:२८); (४) सुरु करण्याची तारीख निश्चित करा, सगळे काही ठीकठाक होण्याच्या वेळेपर्यंत थांबू नका. (उप. ११:४) सप्टेंबर महिना सुरु करण्यास चांगला आहे. कदाचित पुढल्या वर्षी पायनियर शाळेसाठी पात्र व्हाल. एका किंवा दोघा पायनियरांची, त्यांनी पायनियरींगसाठी येणाऱ्या अडखळणांवर कशी मात केली त्याविषयी मुलाखत घ्या. सरळ मनोदयाचे असा.
गीत १२८ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३९ (१६)
१० मिः स्थानिक घोषणा.
२० मिः “सुवार्ता सादरता—दूरध्वनीने.” सेवा देखरेख्यांमार्फत प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. दूरध्वनीचे साक्षीकार्य कसे करता येते व सर्वसाधारण आक्षेपांवर कशी मात करता येते हे दाखविणारी दोन प्रात्यक्षिके दाखवा. हे सेवा देखरेख्यांच्या देखरेखीखालील संघटित असणारे कार्य आहे व याची चांगली नोंद ठेवली पाहिजे यावर जोर द्या.
१५ मिः स्थानिक गरजा, किंवा “वील यू बेनीफिट फ्रॉम द अनडिझर्व्हड काइण्डनेस?” या वॉचटावर च्या फेब्रुवारी १५, १९९० चा अंक, पृष्ठे २१-३ वर भाषण. (प्रादेशिक भाषांतः “इतरांना देवाची भक्ती करण्याची मदत देणे.” ऑगस्ट १९८९ चा टेहळणी बुरुज.)
गीत ८ (८४) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १० (८८)
१० मिः स्थानिक घोषणा. प्रस्तुत सादरतेची दोन प्रात्यक्षिके. दोन्ही मध्ये प्रत्येक मासिकातील एक लेख शनिवारच्या मासिक कार्यासाठी ठळकपणे समोर मांडणे असावे.
१५ मिः “पायनियरींग करण्याद्वारे यहोवावरील भाव व्यक्त करणे.” आमची राज्य सेवा याच्या मार्च १९९० मधील लेखाची वडील व एक उपाध्य सेवक चर्चा करतात. मंडळीला स्थानिकरित्या साहाय्यक ठरणारे व्यावहारिक प्रस्ताव मांडा.
१५ मिः “तुमच्या नातेवाईकांना सत्याच्या पाण्याने टवटवीत करा.” फेब्रुवारी १५, १९९० च्या वॉचटावर अंकातील पृष्ठे २५-७ वर आधारीत भाषण. (प्रादेशिक भाषेतः “यहोवाची मर्जी कोणाला संपादता येईल?” ऑगस्ट १९८९ चा टेहळणी बुरुज.)
५ मिः माहितीपत्रकाच्या उपयोगाने पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याविषयीचे अनुभव. (जर स्थानिकरित्या नसेल तर माहितीपत्रके देण्यातील अनुभव घ्यावेत.)
गीत १६९ (३२) व समाप्तीची प्रार्थना.