वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१ पृ. ६-७
  • तुम्ही खरी नम्रता कशी दाखवू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही खरी नम्रता कशी दाखवू शकता?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रतेविषयी ख्रिस्ताचे उदाहरण
  • नम्र व्यक्‍तीचे वागणे
  • प्रेमळ आणि क्षमाशील नम्रता
  • खरी नम्रता आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • अनुकरण करण्यासाठी लीनतेची उदाहरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवा नम्र लोकांना आपले वैभव प्रकट करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१ पृ. ६-७

तुम्ही खरी नम्रता कशी दाखवू शकता?

देवाच्या नजरेत खरी नम्रता फार मोलाची आहे. याकोबाने लिहिले: “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:६) हिब्रू शास्त्रवचनांत उल्लेख करण्यात आलेल्या अनेक विचारांना याकोब या ठिकाणी अप्रत्यक्षपणे स्पष्ट करत असावा. “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो.” “लोकांची उन्मत दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल, व परमेश्‍वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.” “उपहास करणाऱ्‍यांचा तो [देव] अवश्‍य उपहास करितो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करितो.”—स्तोत्र १३८:६; यशया २:११; नीतिसूत्रे ३:३४.

प्रेषित पेत्राने सुद्धा नम्रता दाखवण्याचे आवाहन दिले. त्याने लिहिले: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.

नम्रतेविषयी ख्रिस्ताचे उदाहरण

तुम्ही कदाचित विचाराल, नम्र होण्यात चांगले किंवा लाभाचे ते काय? खरा ख्रिस्ती होण्यास झटणाऱ्‍या मनुष्याकरता या प्रश्‍नाचे उत्तर फार महत्त्वाचे आहे—नम्र होणे म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे होणे. स्वर्गीय क्षेत्रातून या पृथ्वीवर येण्याची अनन्य नेमणूक स्वीकारण्याद्वारे आणि देवदूतांपेक्षा कमी अर्थात सविनय मनुष्य होण्याद्वारे येशूने नम्रता दाखवली. (इब्री लोकांस २:७) तो देवाचा पुत्र असतानाही, त्याच्या धार्मिक शत्रूंनी केलेली त्याची मानखंडना येशूने सहन केली. देवदूतांच्या सैन्यांची मदत मागण्याचे त्याच्याकडे सामर्थ्य असतानाही तो परीक्षांमध्ये शांत राहिला.—मत्तय २६:५३.

अखेरीस, त्याला बदनाम करून वधस्तंभावर लटकावण्यात आले, तरीसुद्धा तो आपल्या पित्याशी विश्‍वासू राहिला. यामुळेच पौल येशूविषयी असे लिहू शकला: “अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:५-८.

तर मग, आपण खरी नम्रता कशी दाखवू शकतो? एकमेकांशी गर्वाने वागण्याऐवजी आपण व्यावहारिकपणे नम्रतेने कसे वागू शकतो?

नम्र व्यक्‍तीचे वागणे

आपण प्रत्येक वेळी, प्रापंचिक नोकरी करताना अथवा ख्रिस्ती सेवाकार्य करताना नम्रता कशी दाखवली जाते ते पाहू. काम चांगल्याप्रकारे पार पाडण्याकरता पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि देखरेखा यांची कदाचित गरज भासेल. कोणाला ना कोणाला तरी निर्णय हा घ्यावाच लागतो. तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? तुम्ही असे म्हणता, “मला काय करायचे आणि काय नाही हे मला सांगणारा तो कोण? या कामात मला त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे.” होय, तुमच्यात गर्व असल्यास तुम्हाला एखाद्याच्या अधीन काम करण्यास जड जाईल. पण, त्याचवेळी नम्र व्यक्‍ती ‘तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करत नाही, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानते.’—फिलिप्पैकर २:३.

तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्‍तीकडून किंवा एखाद्या स्त्रीकडून एखादी सूचना मिळाल्यास तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? तुम्ही नम्र असल्यास, तुम्ही कमीत-कमी त्या सूचनेचा विचार तरी कराल. पण तुम्ही गर्विष्ठ असल्यास तुम्हाला राग येईल किंवा तुम्ही ती सूचना लगेच झिडकरून लावाल. तुम्ही तोंडघशी पडाल अशी स्तुती आणि खुशामत तुम्हाला आवडेल की तुमची उभारणी करणारा सल्ला?—नीतिसूत्रे २७:९; २९:५.

प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही तोंड देऊ शकता का? ईयोबाप्रमाणे कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याकरता आणि तग धरण्याकरता नम्रता तुम्हाला मदत करू शकेल. तुम्ही गर्विष्ठ असल्यास तुम्ही निराश व्हाल आणि त्रासदायक परिस्थितीत आणि क्षुल्लक गोष्टींवरून बंड कराल.—ईयोब १:२२; २:१०; २७:२-५.

प्रेमळ आणि क्षमाशील नम्रता

काही लोकांना असे म्हणण्यास फार जड जाते, “मला क्षमा कर. मी चुकलो. तुझंच बरोबर होतं.” का? कारण फक्‍त गर्व! पण कित्येक वेळा मनःपूर्वक खेद व्यक्‍त केल्याने पती-पत्नीमधील वाद सहजासहजी थांबवता येऊ शकतात.

एखादी व्यक्‍ती तुमचे मन दुखवते तेव्हा तुम्ही तिला क्षमा करण्यास तयार असता का? किंवा तुमच्यातील गर्वामुळे, मनात द्वेष बाळगून कदाचित कित्येक दिवस आणि महिने त्या व्यक्‍तीशी बोलण्याचे थांबवता? त्याला अद्दल घडविण्यासाठी तुम्ही त्याचे वैरी होता का? अशाप्रकारचा शत्रुभाव बाळगल्याने काही लोकांनी खून देखील केले आहेत. त्या व्यक्‍तीला लोकांच्या मनातून उतरवण्याची काही लोकांची पद्धत आहे. पण नम्र व्यक्‍ती मात्र प्रेमळ आणि क्षमाशील असते. का? कारण प्रेम अपकारांचे स्मरण ठेवत नाही. यहोवा इस्राएल लोकांना क्षमा करण्यास तयार होता फक्‍त त्यांनी त्यांच्यातील गर्वाचा बिमोड केला तरच. येशूचा नम्र अनुयायी क्षमा करण्यास तयार असतो आणि तेही वारंवार!—योएल २:१२-१४; मत्तय १८:२१, २२; १ करिंथकर १३:५.

नम्र व्यक्‍ती “एकमेकांविषयी आदरभाव दाखविण्यात तत्पर” असते. (रोमकर १२:१०, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.) द होली बायबल मराठी आर व्ही असे म्हणते: “दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” तुम्ही दुसऱ्‍यांची वाहवा आणि त्यांच्या क्षमतांची आणि कौशल्यांची प्रशंसा करता का? की त्यांचे नाव खराब करण्यासाठी त्यांच्यातील उणिवाच नेहमी शोधत बसता? होय, तुम्हाला दुसऱ्‍या लोकांची मनःपूर्वक स्तुती करता येते का? तुम्हाला तसे करणे जमत नसेल, तर व्यक्‍तिगत अनिश्‍चितता आणि गर्व ही कदाचित तुमची खरी समस्या असेल.

गर्विष्ठ मनुष्य उतावीळ असतो. नम्र मनुष्य धीर धरणारा आणि सहनशील असतो. तुम्ही कसे आहात? कोणी तुमच्याशी तुसडेपणाने वागल्यास तुम्ही अगदी अस्वस्थ होता का? असे वागणे सहनशीलतेच्या अगदी विरोधात आहे. तुम्ही नम्र असल्यास, तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही. लक्षात असू द्या, की येशूच्या शिष्यांनी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजले तेव्हा काय झाले—आपल्यांमध्ये मोठा कोण या विषयावर त्यांचा गरमागरम वादविवाद झाला. आपण “निरुपयोगी दास” आहोत, या गोष्टीचे त्यांना विस्मरण झाले!—लूक १७:१०; २२:२४; मार्क १०:३५-३७, ४१.

नम्रता म्हणजे “जिवाची विनयशीलता . . . गर्वावरचे औषध,” असे वॉल्टेअर या फ्रेंच लेखकाने नम्रतेविषयी म्हटले. होय, नम्रता म्हणजे मनाची लीनता. नम्र मनुष्य आपल्या वागण्यात विनयशील असतो, गर्विष्ठ नव्हे. तो खूप आदरणीय आणि सभ्य असतो.

तर मग, नम्र होण्याचा प्रयत्न का करावा? नम्र व्यक्‍ती देवाला आवडते आणि ईश्‍वरी मार्गदर्शन प्राप्त करण्याकरता तो आपली मदत करतो. थोडक्यात, दानीएलाच्या नम्रतेमुळे यहोवाने या संदेष्ट्याला “परमप्रिय” असे समजले आणि दृष्टान्त घेऊन एका देवदूताला त्याच्याकडे पाठवले. (दानीएल ९:२३; १०:११, १९) नम्रतेमुळे अनेक प्रतिफळे मिळतात. तुमच्यावर प्रेम करणारे खरे मित्र तुम्हाला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे यहोवाचा आशीर्वाद मिळतो. “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४.

[७ पानांवरील चित्र]

खेद व्यक्‍त करणाऱ्‍या नम्रतेच्या एका शब्दामुळे जीवन सुरळित होऊ शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा