वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ६/१ पृ. २८-३२
  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रता काय आहे?
  • ती स्वाभाविक असलीच पाहिजे
  • यहोवाचा दृष्टीकोण
  • परमेश्‍वर व ख्रिस्त यांनी ती प्रदर्शित केली
  • नम्रतेचे फायदे
  • नम्रता आणि देवाची संस्था
  • नम्रता व शिस्त
  • नम्रतेचे लेणे परिधान केलेले असा
  • खरी नम्रता आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • अनुकरण करण्यासाठी लीनतेची उदाहरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ६/१ पृ. २८-३२

नम्रतेचे लेणे का परिधान करावे?

एडगर ॲलन पो या अमेरिकन लेखकांनी, त्यांच्या मित्रांना त्याची नवी कथा नुकतीच वाचून दाखविली होती. मित्रांनी थट्टेने म्हटले की, त्याने नायकाचे नाव वारंवार उपयोगात आणले आहे. पो यांची काय प्रतिक्रिया होती? एका मित्रास आठवले की, “अशा उघड दटावणीस त्याचा गर्विष्ठ स्वभाव सहन करू शकला नाही; आणि म्हणूनच त्याचे मित्र ते टाळू शकण्यापूर्वीच, त्याने रागाच्या भरात प्रत्येक पान जळणाऱ्‍या आगीत फेकून दिले.” एका अशा कथेचा नाश झाला जी, “फारच मजेशीर, त्याच्या नेहमीच्या खिन्‍नतेपेक्षा, अगदी पूर्णपणे वेगळी अशी होती.” नम्रतेमुळे कदाचित ते टाळले गेले असते.

गर्व जरी लोकांकडून असमंजसपणाच्या गोष्टी करतो, तरी देखील तो जगात वाढत आहे. परंतु यहोवाच्या सेवकांनी वेगळे असले पाहिजे. नम्रतेचे सुंदर वस्त्र त्यांनी धारण केलेच पाहिजे.

नम्रता काय आहे?

पुरातन शहर कलस्सै येथील विश्‍वासू बांधवांना लिहिताना, प्रेषित पौलाने नम्रतेच्या सुंदर ख्रिस्ती वस्त्रांचा उल्लेख केला. त्याने आर्जविले की, “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्‍त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता सहनशीलता ही अंगी ल्या.”—कलस्सैकर ३:१२.

होय, नम्रता, मनाची लीनता, गर्वाची उणीव, नम्रभाव आहे. एक नम्र व्यक्‍ति, आत्म्यात गर्विष्ठ नसून लीन असते. ती फारच आदरणीय असते. (द वर्ल्ड बुक डिक्शनरी, खंड १, पृष्ठ १०३०) नम्रता म्हणजे भ्याडपणा किंवा अशक्‍तपणा नव्हे. प्रत्यक्षात गर्व हा अशक्‍तपणा दाखवून देतो. परंतु नम्रतेचे प्रदर्शन करण्यात धैर्य व सामर्थ्याची हाक असते.

शास्त्र वचनात एक इब्री शब्दाचा अर्थ असा केला की, “स्वतःस नम्र करा.” त्याचा शब्दशः अर्थ होतो की, “स्वतःठायी हलकेपणा घ्या.” अशाप्रकारे नीतीसूत्राच्या सूज्ञ लेखकाने सल्ला दिला की, “माझ्या मुला . . . जर तू आपल्या तोंडच्या वचनाला गुंतला आहेस, . . . तर आपणाला मुक्‍त करून घे. कारण तू आपल्या शेजाऱ्‍याच्या हाती सापडला आहेस. तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्‍याला अत्याग्रहाने गळ घाल.” (नीतीसूत्रे ६:१-३) त्याचा अर्थ, गर्व बाजूस ठेव, स्वतःची चूक मान्य कर, प्रकरण सुरळीत कर.

ती स्वाभाविक असलीच पाहिजे

सर्वच लोक जे नम्र दिसतात, त्यांच्याठायी स्वाभाविक नम्रता नसते. नम्र वाटणारे काही वैयक्‍तिक, कदाचित गर्विष्ठ असतील, आणि स्वतःच्या मार्गाने जाण्यास काहीही करतील. काही जण असे असतात की, दुसऱ्‍यांना प्रभावीत करण्यासाठी खोट्या नम्रतेचा अंगरखा परिधान करतात. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाला अशा काही लोकांना तोंड द्यावे लागले ज्यांनी दीनभाव प्रदर्शित केला होता, आणि त्याने हे सूचित केले की, जो कोणी असे करतो, तो प्रत्यक्षात देहबुद्धिने व्यर्थ फुगतो. अशा वैयक्‍तिकाने असा चुकीचा विचार केलेला असतो की, त्याचे खाणे किंवा पिणे किंवा विशिष्ट गोष्टींना स्पर्श करणे, किंवा धार्मिक दिवस पाळणे किंवा न पाळणे यावर देवाची कृपा अवलंबून असते. हे खरे की, तो कदाचित धर्मनिष्ठ व नम्र दिसला असेल, परंतु त्याची खोटी नम्रता कवडीमोल होती. (कलस्सैकर २:१८, २३) वस्तुतः त्याला असा विचार करण्याप्रत निरविले गेले की, ज्या भौतिक गोष्टींची घृणा करीत असल्याचे ती दाखविते त्याच भौतिक गोष्टींवर ती तपोनिष्ठ (बैरागी) मनाई लक्ष केंद्रित करते.

दुसऱ्‍या बाजूस पाहता, स्वाभाविक नम्रता एखाद्या व्यक्‍तीस वेशभूषा, केशभूषा व जीवनपद्धत याबाबत स्वतःचे महत्त्व प्रदर्शित करण्यापासून आवरुन धरते. (१ योहान २:१५-१७) नम्रतेची वस्त्रे धारण केलेली एखादी व्यक्‍ति, स्वतःकडे किंवा तिच्या क्षमतेकडे (कर्तृत्त्वाकडे) फाजील लक्ष आकर्षित करून घेत नाही. त्याऐवजी, इतरांशी विचारपूर्वक वागण्यास, व देव ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने स्वतःस पाहण्यास नम्रता त्यास साहाय्य करते. आणि ते कसे?

यहोवाचा दृष्टीकोण

संदेष्टा शमुवेल, इस्राएल राष्ट्रांकरिता जेव्हा एका नवीन राजास अभिषेक करणार होता, तेव्हा त्याला वाटले की, इशायाचा पुत्र अलियाब हाच यहोवाची पसंद असेल. परंतु देवाने शमुवेलास म्हटलेः “तू त्याच्या स्वरुपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे, मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरुप पाहतो, पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” इशायाच्या सात पुत्रांना नापसंत करण्यात आले होते. दावीद हा परमेश्‍वराची पसंत होता, कारण विश्‍वासूपणा व नम्रता त्याच्याठायी असल्याचे त्याने सिद्ध केले होते.—१ शमुवेल १३:१४; १६:४-१३.

गर्विष्ठ, ताठ व परमेश्‍वराकरवी नापसंत होण्यापसून नम्रतेची वस्त्रे आम्हास सुरक्षित ठेवतात. “तो गर्विष्ठांचा विरोध करतो, आणि लीनांस कृपादान देतो.” (याकोब ४:६) स्तोत्रकर्त्याच्या शब्दात त्याचा दृष्टीकोण दाखविला आहे; जसे की: “परमेश्‍वर परमथोर आहे, तरी तो दिनांकडे लक्ष देतो. पण गर्विष्ठाला दुरुन ओळखतो.” (स्तोत्रसंहिता १३८:६; १ पेत्र ५:५, ६) मीखा ६:८ मध्ये जो प्रश्‍न उपस्थित केला आहे, तो हे उघड करतो की, देव त्याच्या सेवकांपासून काय अपेक्षितोः “नीतीने वागणे, आवडीने दया करणे, व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”

परमेश्‍वर व ख्रिस्त यांनी ती प्रदर्शित केली

आम्ही नम्रता प्रदर्शित करावी हे यहोवा अपेक्षून आहे यात आश्‍चर्य नाही, तो त्याचा एक गुण आहे. परमेश्‍वराने त्याच्या शत्रूंपासून त्यास मुक्‍त केल्यानंतर दावीदाने गीत गाईलेः “तू [यहोवा] मला आपली तारणरुप ढाल दिली आहे, . . . तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (स्तोत्रसंहिता १८:३५; २ शमु. २२:१, ३६) “यहोवा जरी परमउच्च स्वर्गात आहे, तरी तो स्वर्ग व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो. तो दिनांस धुळीतून उठवितो आणि त्यांस अधिपतींच्या पंक्‍तीस बसवितो.” (स्तोत्रसंहिता ११३:५-८) पापी मानवावर दया दाखवून परमेश्‍वर नम्रता प्रदर्शित करतो. पापी जनांकडे लक्ष देणे, पापाप्रित्यर्थ अर्पण या नाते त्याच्या पुत्राला देणे, ह्‍या गोष्टी त्याची नम्रता, प्रीती व इतर गुण प्रकटवितात.—रोमकर ५:८; ८:२०, २१.

येशू ख्रिस्त जो सौम्य मनाचा व लीन अंतःकरणाचा होता, त्याने मानवी नम्रतेचे सर्वथोर उदाहरण स्थापित केले. (मत्तय ११:२९) त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले की, “जो कोणी स्वतःला उच्च करतो तो नीच केला जाईल व जो कोणी स्वतःला नीच करतो तो उच्च केला जाईल.” (मत्तय २३:१२) ती केवळ अलंकारिक भाषा नव्हती. त्याच्या मृत्युपूर्वीच्या सायंकाळी येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. सांप्रदायानुसार दासाने करायची असलेली सेवा त्याने पार पाडली. (योहान १३:२-५, १२-१७) पृथ्वीवर येण्याअगोदर येशूने नम्रतेने परमेश्‍वराची सेवा केली, आणि स्वर्गीय उच्च स्थानाकरिता त्याचे पुनरुत्थान झाल्यापासूनही त्याने नम्रता प्रदर्शित केली आहे. म्हणून पौलाने विश्‍वासू सहकाऱ्‍यांना बोध केला की, “एकमेकांस आपणापेक्षा श्रेष्ठ माना, व येशू ख्रिस्ताठायी जी नम्र चित्तवृत्ती होती, ती बाळगा.”—फिलिप्पैकर २:३, ५-११.

परमेश्‍वर व ख्रिस्त जर नम्रतेचे प्रदर्शन करतात, तर जे परमेश्‍वराची संमति अपेक्षून आहेत त्यांनी तो गुण प्रदर्शित केलाच पाहिजे. आजपर्यंत जर आम्ही ताठ मानेचे असू तर तुम्ही स्वतःला नम्र करणे, व परमेश्‍वराकडे क्षमायाचनासाठी प्रार्थना करणे सूज्ञपणाचे ठरेल. (पडताळा २ इतिहास ३२:२४-२६) आणि स्वतःविषयी थोर कल्पना बाळगण्याऐवजी, पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करण्याची आम्हास गरज आहे. तो म्हणतोः “मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा.” (रोमकर १२:१६) तथापि, नम्रता ही आम्हास व इतरांस कशाप्रकारे फायदेकारक ठरु शकते?

नम्रतेचे फायदे

नम्रतेचा एक फायदा हा आहे की, ती आम्हास स्वतःविषयीचा अभिमान बाळगण्यापासून आवरुन धरते. अशा प्रकारे इतरांच्या क्रोधास आम्ही दया दाखवितो व आमच्या प्रगतिमुळे जर ते मुग्ध झाले नाहीत तर व्यक्‍तिगत संकोचितपणा टाळतो. आम्ही स्वतःविषयी नव्हे तर यहोवाविषयी अभिमान बाळगावा.—१ करिंथ १:३१.

ईश्‍वरीय मार्गदर्शन मिळविण्यास नम्रता आम्हास मदत करते. यहोवाने एका दृष्टांतासह एक दूतास दानीएलाकडे पाठविले, कारण त्या संदेष्ट्याने मार्गदर्शन व समज यांचा शोध घेताना स्वतःला देवापुढे लीन केले. (दानीएल १०:१२) यरुशलेमेतील मंदिर शोभायमान करण्यासाठी भरपूर सोने व चांदी यासह बाबेलमधून इस्राएलांना काढतेवेळी एज्राने एक उपास घोषित केला, ज्यामुळे परमेश्‍वरापुढे ते स्वतःला नम्र करु शकत होते. त्याचा परिणाम काय झाला? त्या धोकादायक प्रवासात शत्रूच्या हल्ल्यापासून यहोवाने त्यांना सुरक्षित ठेवले. (एज्रा ८:१-१४, २१-३२) देवाने दिलेली नेमणूक पार पाडण्यात, स्वतःचे ज्ञान व सामर्थ्य याद्वारे प्रयत्नशील असण्याऐवजी, दानीएल व एज्रा यांच्यासारखी नम्रता प्रदर्शित करावी व यहोवाचे मार्गदर्शन स्विकारावे.

नम्रतेची वस्त्रे जर आम्ही परिधान केलेली असतील तर आम्ही इतरांचा सन्मान करु. उदाहरणार्थ, ज्या मुलांठायी नम्रता आहे ते आपल्या पालकांच्या आज्ञेत राहतात व त्यांना सन्मान देतात. नम्र ख्रिस्तीजन इतर राष्ट्रीयत्वाच्या, जातीच्या व पार्श्‍वभूमीच्या त्यांच्या विश्‍वासू सोबत्यांचा सन्मान करतात, कारण नम्रता आम्हास निपक्षपाती बनवते.—प्रे. कार्ये १०:३४, ३५; १७:२६.

नम्रता प्रीती व शांती वाढीस लावते. एखादी नम्र व्यक्‍ती, त्याचा कल्पित हक्क स्थापीत करण्याच्या प्रयत्नात विश्‍वासू सोबत्यासह झगडा करत नाही. पौलाने केवळ उभारणीकारक गोष्टी केल्या; परंतु बांधवांच्या विवेकास धक्का बसेल असे काहीही करीत नसे. (रोमकर १४:१९-२१; १ करिंथकर ८:९-१३; १०:२३-३३) आम्हाविरुद्ध इतरांनी केलेल्या पातकांची क्षमा करुन प्रीती व शांती यांची वाढ करण्यास नम्रता आम्हास साहाय्य करते. (मत्तय ५:२३, २४; लूक १९:८) जर एखादी अपराधी व्यक्‍ती आम्हाकडे येते, तेव्हा ते प्रकरण प्रीतीच्या आत्म्याने शांतीपूर्वक व्यवस्थित करण्यास नम्रता आम्हास उद्युक्‍त करते.—मत्तय १८:१५; लूक १७:३.

नम्रतेचे प्रदर्शन करणे यावर तारण अवलंबून असते. उदाहरणार्थ, परमेश्‍वरासंबंधी असे म्हटले आहेः “दीन जनांस तू तारितोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अधःपात करतो.” (२ शमुवेल २२:२८) जेव्हा राजा येशू ख्रिस्त सत्य, नम्रता व न्यायपरायणता यांच्याप्रीत्यर्थ स्वारी करेल, तेव्हा जे स्वतःला त्याच्यापुढे व त्याच्या पित्यापुढे नम्र करतात अशांचा तो बचाव करील. (स्तोत्रसंहिता ४५:४) जे नम्रता दाखवितात अशांना वचनाद्वारे सांत्वन मिळतेः “देशातील सर्व नम्रजनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा; धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा. म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:३.

नम्रता आणि देवाची संस्था

देवाच्या लोकांना, त्याच्या संस्थेविषयी गुणग्राहकता बाळगण्यास व तिच्यासोबत सचोटी राखण्यात नम्रता मार्गदर्शित करते. (पडताळा योहान ६:६६-६९.) जी नेमणूक मिळण्याची किंवा सेवेचा हक्क मिळण्याची आशा आम्ही बाळगली होती, ती जर आम्हास दिली गेली नाही, तर मंडळीत जे लोक ती सेवा पार पाडतात अशांना हातभार लावण्यास नम्रता आम्हास मदत करील. आणि आमचे नम्र सहकार्य एक उत्तम उदाहरण स्थापित करते.

दुसऱ्‍या बाजूस पाहता, यहोवाच्या लोकात सेवा करण्याच्या हक्काबाबत व्यर्थता प्रदर्शित करण्याचे टाळण्यास नम्रता मदत करते. देवाच्या संस्थेत काम करण्याच्या हक्काबाबत स्तुती प्राप्त करून घेण्याचे टाळण्यास ती मदत करते. याशिवाय, वडील या नात्याने आम्ही जर सेवा करीत आहोत तर देवाच्या कळपाची प्रेमळपणे काळजी घेण्यात नम्रता आम्हास साहाय्य करेल.—प्रे. कृत्ये २०:२८, २९; १ पेत्र ३:८.

नम्रता व शिस्त

नम्रतेची वस्त्रे शिस्त स्वीकारण्यास आम्हास साहाय्य करते. यहूदाचा राजा उज्जीया, ज्याचे हृदय इतके उन्मत्त झाले होते की, त्याने याजकाची कर्तव्ये बळकावून घेतली, त्यासारखे नम्र लोक नसतात. यहोवाविरुद्ध तो अविश्‍वासाने वागला, आणि धूपवेदीवर धूप जाळण्याकरिता मंदिरात आला. याजकाने जेव्हा त्याची चूक दाखविली तेव्हा उज्जीया भयंकर क्रोधाविष्ट झाला, त्याच्या अंगावर कोड फुटले. नम्रतेच्या उणीवेची केवढी किंमत मोजावी लागली! (२ इतिहास २६:१६-२१; नीतीसूत्रे १६:१८) उज्जीयासारखे केव्हाही होऊ नका, आणि देव त्याचे वचन व संस्था याद्वारे जी शिस्त देतो तिचा स्वीकार करण्यासाठी गर्वाला अडथळा होऊ देऊ नका.

या संबंधी पौलाने अभिषिक्‍त इब्री ख्रिश्‍चनांना सांगितले की, “जो बोध पुत्राला करायचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला. ‘माझ्या मुला प्रभुच्या शिक्षेचा अवमान करू नको आणि त्याजकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको. कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो.’ कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यांस तिचा अभ्यास झाला त्यांस ती पुढे धार्मिकता हे शांतीकारक फळ देते.” (इब्रीयांस १२:५-११) हे लक्षात असू द्या की, शिस्तीचा दोष पदरी पडणे हा जीवनाचा मार्ग आहे.—नीती ६:२३.

नम्रतेचे लेणे परिधान केलेले असा

नम्रतेची वस्त्रे ख्रिश्‍चनांनी सदैव पांघरावी हे किती महत्त्वाचे आहे. राज्याचे घोषक या नात्याने टिकून राहण्यास सार्वकालिक जीवनासाठी जितके नेमलेले आहेत त्यांचा शोध घेण्यास नम्रतेने घरोघरचे साक्षीकार्य करण्यास ती आम्हास चालना देते. (प्रे. कृत्ये १३:४८; २०:२०) गर्विष्ठ विरोधक जरी आमच्या धार्मिक मार्गाचा द्वेष करतात तरी प्रत्येक बाबतीत देवाच्या आज्ञा पाळत राहण्यात खरोखरी नम्रता आमची मदत करते.—स्तोत्रसंहिता ३४:२१.

पूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेवण्यास नम्रता आम्हास प्रेरित करते, तो आमचे मार्ग सुरळीत करतो. (नीतीसूत्रे ३:५, ६) वस्तुतः जर आम्ही हा उत्तम गुण परिधान केलेला असेल तरच आम्ही देवासोबत खरोखरी चालू शकू व त्याच्या संमतीचा व आशीर्वादांचा आनंद लुटू शकू. जसे शिष्य याकोबाने लिहिले की, “प्रभुसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उच्च करील.” (याकोब ४:१०) यहोवा देवाने ज्या वस्त्रांची सुंदर रचना केली ते नम्रतेचे लेणे आपण परिधान करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा