वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१ पृ. ४-६
  • काही लोक त्यांचा धर्म का बदलत आहेत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काही लोक त्यांचा धर्म का बदलत आहेत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कठीण प्रश्‍नांची उत्तरे
  • जीवनाचा काय उद्देश आहे?
  • जीवनाच्या समस्यांना तोंड देणे
  • देवासोबत निकटचा नातेसंबंध
  • खरा धर्म लाभदायक!
  • प्रमुख स्वर्गदूत मीखाएल कोण आहे?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • आद्यदेवदूत मीखाएल कोण आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • येशू आद्यदेवदूत मीखाएल आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१ पृ. ४-६

काही लोक त्यांचा धर्म का बदलत आहेत

अनेक लोकांसाठी धर्म निव्वळ नाममात्र राहिला आहे. अमुक व्यक्‍ती रविवारी कोठे जाते, तिचा विवाह कोठे होतो आणि तिला मूठमाती कोठे दिली जाते, धर्म म्हटल्यावर हे विचार कदाचित आपल्या मनात येतील. परंतु त्यामुळे हे स्पष्ट होत नाही, की अमुक व्यक्‍ती कशा प्रकारची आहे किंवा तिला धर्माची कितपत माहिती आहे आणि तिचा विश्‍वास काय आहे. उदाहरणार्थ, एका पाहणीत असे दिसून आले, की ५० टक्के ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍या लोकांना हे देखील माहीत नव्हते, की डोंगरावरील प्रवचन कोणी दिले. परंतु भारतीय प्रसिद्ध नेता मोहनदास गांधी या हिंदू व्यक्‍तीला मात्र हे माहीत होते!

अनेक लोकांना धर्माविषयी इतकी माहिती नाही, मग त्यांचा धर्मावरील विश्‍वास उडतो तेव्हा त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटावे का? नाही, त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तथापि, धर्म सोडलाच पाहिजे असेही नाही. बायबल शिक्षणामुळे आपल्याला किती लाभ होतो हे पाहून बायबल विद्यार्थी बहुतेक वेळा चकित होतात. स्वतः बायबल म्हणते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (तिरपे वळण आमचे.)—यशया ४८:१७.

तर मग, असमाधानी आध्यात्मिकरीत्या भुकेलेल्यांनी काय करण्यास हवे? त्यांनी देवाची सेवा करण्याचे थांबवू नये! उलटपक्षी, त्यांनी बायबलचा अभ्यास करून हे पाहावे, की स्वतः देव त्यांच्यासाठी काय करत आहे.

कठीण प्रश्‍नांची उत्तरे

सात वर्षांच्या बर्न्ड नामक मुलाने त्याच्या आईचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता.a त्याच्या संपूर्ण बालपणात तो याच गोष्टीचा विचार करत होता, की ‘माझी आई नेमकी गेली तरी कोठे? मी माझ्या आईशिवाय कसं जगू शकेन?’ आपल्या किशोरावस्थेत बर्न्ड चर्चचा एक उत्साही सदस्य होता. त्याला वाटत होते, की परदेशात जाऊन, मानवजातीच्या दुःखामुळे चिंताग्रस्त असलेल्या तेथील लोकांना मदत करावी. त्याला अद्यापही, असे प्रश्‍न सतावत होते ज्यांची समाधानकारक उत्तरे चर्चजवळ नव्हती.

त्यानंतर बर्न्ड त्याच्या शाळकरी मित्राबरोबर त्याबद्दल बोलला. हा मुलगा एक यहोवाचा साक्षीदार होता. बर्न्डच्या या मित्राने त्याला बायबलमधून हे दाखवून दिले, की त्याची आई बेशुद्धावस्थेत आहे आणि ती मरणात झोपलेली आहे. या गोष्टीचे वर्णन करणाऱ्‍या बायबलच्या अनेक वचनांतून बर्न्डला शिकायला मिळाले. उदाहरणार्थ, उपदेशक ९:५: “मृतास तर काहीच कळत नाही.” त्यामुळे आपली आई परगेटरी किंवा त्यासारख्या इतर कोणत्याही भयानक ठिकाणी यातना भोगत आहे की काय अशी काळजी करत बसण्याची बर्न्डला आता गरज नव्हती. अनेक धर्मांमध्ये अमर आत्म्याची शिकवण दिली जाते, परंतु बर्न्डला बायबलमधून शिकायला मिळाले, की मनुष्य मरतो तेव्हा त्याच्यामधून अमर राहणारी अशी कोणतीही गोष्ट वेगळी होत नाही.

मृत लोकांसाठी असलेल्या वैभवी आशेविषयी देखील बर्न्ड शिकला. त्याने स्वतः बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात हे वाचले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) देव पुन्हा परादीसची स्थापना करील तेव्हा तो मेलेल्या लोकांचे या पृथ्वीवरच पुनरुत्थान करील, हे समजल्यावर त्याला किती आनंद झाला होता!—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४.

लवकरच बर्न्डची आध्यात्मिक भूक बायबलच्या असली ज्ञानाने भागवण्यात आली. बर्न्डचा धर्मावरील विश्‍वास उडाला नाही. उलटपक्षी, त्याने चर्च सोडून दिले कारण ते त्याची आध्यात्मिक गरज भागवू शकत नव्हते, परंतु पूर्णपणे बायबलवर आधारित असलेल्या खऱ्‍या धर्माचा त्याने स्वीकार केला. तो म्हणतो: “हे पाऊल मी १४ वर्षांपूर्वी उचललं, आणि त्याचा मला कधीही पस्तावा झाला नाही. आता मला समजलं आहे, की देव दुःख देत नाही. सैतान या जगाचा देव आहे आणि आपल्याभोवती असलेल्या वाईट परिस्थितींकरता केवळ तोच दोषी आहे. परंतु, सैतानाच्या जगामुळे झालेल्या हानीला देव लवकरच ठीक करणार आहे. माझ्या आईचं देखील पुनरुत्थान होईल. ती वेळ किती आनंदाची असेल!”

इतरांना मदत करण्यास्तव परदेशात काम करण्याचे ध्येय बर्न्डने अनायासे प्राप्त केले आहे. देवाच्या राज्याविषयी इतरांना शिकवण्यात तो मदत करतो. हे राज्य लोकांच्या दुःखावर एकमात्र उपाय आहे. बर्न्डप्रमाणे लाखो लोकांना हे ठाऊक झाले आहे, की मानवाच्या यातना देव लवकरच काढून टाकील. आपली आध्यात्मिक गरज भागविणारा धर्म पाहून त्यांना फार आनंद होतो.—मत्तय ५:३.

जीवनाचा काय उद्देश आहे?

पाश्‍चिमात्य जग जसजसे अधिकाधिक धर्मनिरपेक्ष होत आहे तसतसे अनेक लोकांपुढे असा प्रश्‍न उभा राहतो की, ‘जीवनाचा काय उद्देश आहे?’ याचे उत्तर बायबलमध्ये आहे. मायकलला देखील या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. सन १९७० च्या दशकाच्या मध्यात मायकलला अतिरेकी गटात सामील व्हावेसे वाटत होते. भांडवलशाही पद्धतीच्या अन्यायास जबाबदार असणाऱ्‍या लोकांना ठार मारणे हाच केवळ त्याच्या जीवनाचा उद्देश होता. तो म्हणतो: “घराबाहेर पडतेवेळी माझ्यासोबत नेहमी बंदूक असायची. शक्य होईल तितक्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि भांडवलदारांना ठार मारण्याची माझी योजना होती. असं करताना माझं काही बरंवाईट झालं तरी त्याची मला पर्वा नव्हती.”

मायकल चर्चला जात असे, पण जीवनाच्या खऱ्‍या उद्देशाविषयी चर्च त्याला काही सांगू शकले नाही. परंतु यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी आले आणि बायबलमधून त्याच्या प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली तेव्हा त्याने त्यांचे लक्षपूर्वक ऐकले. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहामध्ये होणाऱ्‍या सभांना तो जाऊ लागला.

मायकलच्या बायबलमधील या नवीन आस्थेविषयी त्याच्या मित्रांना जाणून घ्यायचे होते. मायकलने त्यांना आर्जवले: “येत्या रविवारी सभेला या. थोडा वेळ थांबा आणि तेथे जे सांगण्यात येतं ते तुम्हाला पटलं नाही तर घरी परत जा.” आणि नेमके तेच घडले बायबलवर आधारित ४५ मिनिटांच्या भाषणानंतर त्याचे बहुतेक मित्र निघून गेले. परंतु सुझन मात्र तेथेच थांबली. सभेमध्ये ऐकलेल्या गोष्टींमुळे ही तरुणी स्तंभित झाली. पुढे मायकल आणि सुझन विवाहबद्ध झाले व बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार बनले. मायकल म्हणतो: “आपण या धरतीवर का आहोत, हे मला आता माहीत आहे. आपल्याला यहोवानं बनवलं आहे. त्याच्याविषयी जाणून घेणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हाच जीवनातील खरा उद्देश आहे. यामुळंच खरं समाधान मिळतं!”

मायकलप्रमाणे लाखो लोक आहेत. हे लोक बायबलच्या पुढील शब्दांवर मन लावतात: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

जीवनाच्या समस्यांना तोंड देणे

आपण सर्वजण २ तीमथ्य ३:१ च्या भविष्यवाणीची पूर्णता पाहात आहोत. तेथे म्हटले आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” कोणीही ‘कठीण दिवसांतील’ या समस्यांपासून बचावू शकत नाही. परंतु त्या समस्यांना तोंड देण्यास बायबल आपली मदत करते.

स्टिवन आणि ओलिव्ह या विवाहित जोडप्याचा विचार करा. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली तेव्हा इतरांप्रमाणे त्यांच्याही काही वैवाहिक समस्या होत्या. स्टिवन सांगतो: “आमच्यामध्ये दुरावा निर्माण होत होता. आमची ध्येयं आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या होत्या.” त्यांच्या विवाहाला टिकण्यास कोणत्या गोष्टीने मदत केली? स्टिवन पुढे म्हणतो: “बायबल तत्त्वांना आम्ही आमच्या जीवनात कशाप्रकारे लागू करू शकतो, हे यहोवाच्या साक्षीदारांनी आम्हाला शिकवलं. निःस्वार्थ होणं आणि दुसऱ्‍याची काळजी करणं म्हणजे काय हे आम्हाला पहिल्यांदा कळालं. बायबल तत्त्वांना लागू केल्यानं आमच्यातील बंध मजबूत झाला. आता आम्ही सुखी, स्थिर विवाहामुळे आनंदी आहोत.”

देवासोबत निकटचा नातेसंबंध

अलीकडील लोकमतांच्या सर्वेक्षणानुसार ९६ टक्के अमेरिकी लोकांचा देवावर विश्‍वास आहे आणि त्यांपैकी बहुतेक लोक त्याला प्रार्थना करतात. तथापि, एका वेगळ्या सर्वेक्षणात दिसून आले, की आज चर्चमध्ये आणि यहुदी सभास्थानांमध्ये उपस्थित राहणाऱ्‍यांची संख्या मागील ५० वर्षांमध्ये सर्वात कमी आहे. जवळजवळ ५८ टक्के अमेरिकी लोक म्हणतात, की ते महिन्यातून केवळ एकदाच चर्चला जातात. धर्माने लोकांना देवाच्या निकट आणले नाही, हे स्पष्ट आहे. ही समस्या केवळ अमेरिकेतच आहे असे नाही.

लिन्डाचे लहानपण बवारियामध्ये गेले. ती कॅथलिक होती आणि नियमितपणे प्रार्थना करत असे. तरी तिला भविष्याची चिंता लागलेली होती. मनुष्याकरता असलेल्या देवाच्या उद्देशाविषयी तिला काहीही माहीत नव्हते. लिन्डा जेव्हा १४ वर्षांची होती तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांसोबत तिची भेट झाली. ती म्हणते: “त्यांनी जे सांगितलं ते मला फार आवडलं आणि म्हणून मी दोन पुस्तकं घेतली आणि लगेच वाचून काढली सुद्धा.” दोन वर्षांनी लिन्डाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. ती म्हणते: “बायबलमधून देवाविषयी मी जे काही शिकले त्यात तथ्य असल्याचं मला दिसून आलं.” लिन्डाने चर्चला राजीनामा दिला आणि वयाच्या १८ व्या वर्षी तिने यहोवाची साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला.

कोणत्या कारणास्तव लिन्डाने स्वतःचा धर्म बदलला? ती म्हणते: “देव आहे असं माझ्या चर्चनं मला शिकवलं आणि मी त्यावर विश्‍वास ठेवला. पण तो भावनारहित आणि माझ्यापासून दूर होता. बायबल अभ्यासामुळे माझा देवावरील विश्‍वास केवळ अढळ झाला नाही, तर त्यामुळे देवाची चांगली ओळख झाली आणि मी त्यावर प्रेम करू लागले. आता देवासोबत माझा मोल्यवान व्यक्‍तिगत नातेसंबंध आहे. इतर कोणत्याही गोष्टीशी त्या नातेसंबंधाची तुलना करणं शक्य नाही.”

खरा धर्म लाभदायक!

तुमचा धर्म तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन देतो का आणि जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी बायबल तुम्हाला कशी मदत करू शकते, हे तो धर्म दाखवून देतो का? बायबलमधील भवितव्याच्या आशेविषयी तुमचा धर्म तुम्हाला शिकवतो का? बायबलच्या अचूक ज्ञानाच्या आधारावर निर्माणकर्त्यासोबत निकटचा, व्यक्‍तिगत नातेसंबंध तुमच्या धर्मामुळे स्थापित होतो का? नसल्यास हार मानू नका. धर्मावरील विश्‍वास डळमळीत होऊ देण्याऐवजी केवळ बायबलवर आधारित असलेल्या धर्माचा शोध घ्या. तेव्हा तुम्ही बायबलमधील यशयाच्या पुस्तकात भविष्यवाणी केलेल्या लोकांपैकी व्हाल: “ह्‍याकरिता प्रभु परमेश्‍वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, . . . माझे सेवक पितील, . . . माझे सेवक आनंद करितील . . . माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील.”—यशया ६५:१३, १४.

[तळटीपा]

a या लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

[४, ५ पानांवरील चित्रं]

देवाविषयी जाणून घेण्यास आणि त्यावर प्रेम करण्यास बायबल आपल्याला मदत करते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा