वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१ पृ. ७
  • मागील चुकांपासून शिकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मागील चुकांपासून शिकणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • कबुलीजबाबामुळे होते आध्यात्मिक सुधारणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाची करुणा आम्हास निराशेपासून वाचवते
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • भग्न हृदयास यहोवा तुच्छ लेखत नाही
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१ पृ. ७

मागील चुकांपासून शिकणे

आपल्या निर्माणकर्त्याचे नैतिक नियम सनातन आणि स्थिर आहेत. या कारणास्तव, गलतीकर ६:७ येथील तत्त्व आज लागू होते: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” हे खरे आहे, की एखादी व्यक्‍ती देवाप्रती असलेल्या जबाबदारीला नाकारेल, परंतु ईश्‍वरी नियम मात्र तसाच राहतो. शेवटी, कोणताही मनुष्य स्वतःच्या कर्मांच्या परिणामांपासून वाचू शकत नाही.

अशा मनुष्याविषयी काय, जो स्वच्छंदी जीवन जगतो आणि नंतर परिवर्तन करून देवाचा सेवक बनतो? त्याच्या मागील जीवनशैलीचे परिणाम त्याला अद्यापही भोगावे लागतील. तथापि, देवाने त्याला क्षमा केली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. बथशेबासोबतच्या दावीद राजाच्या अनैतिक नातेसंबंधामुळे त्याच्या जीवनात अनेक समस्या आल्या. त्यापासून तो वाचू शकला नाही. परंतु, त्याने पश्‍चात्ताप केला आणि देवाने त्याला क्षमा देखील केली.—२ शमुवेल १२:१३-१९; १३:१-३१.

स्वतःच्या चुकांचे परिणाम भोगताना तुम्हाला कधी नाउमेद झाल्याचे वाटले का? योग्य प्रकारचा दृष्टिकोन बाळगल्यास, पस्ताव्याची भावना ‘संभाळा, दुष्टतेकडे वळू नका,’ या गोष्टीचे स्मरण देऊ शकते. (ईयोब ३६:२१) होय, पस्ताव्याच्या भावनेमुळे पुन्हा तीच चूक न करण्यास आपल्याला मदत मिळेल. त्याही पेक्षा अधिक म्हणजे, दावीदाने पापामुळे मिळालेल्या अनुभवापासून स्वतः शिकून घेतले आणि इतरांना देखील लाभ करून दिला. त्याने म्हटले: “मी अपराध्यांस तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.”—स्तोत्र ५१:१३.

[७ पानांवरील चित्रं]

बथशेबासोबतच्या पातकापासून दावीद शिकला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा