वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१ पृ. ८-१२
  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही देवाचा दृष्टिकोन कसा जाणू शकतो?
  • पवित्र शास्त्राचा उपयोग करणारे सर्वच योग्य धर्माचे शिक्षण देत आहेत का?
  • खऱ्‍या धर्माची ओळखचिन्हे
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खरा धर्म ओळखणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१ पृ. ८-१२

योग्य धर्म तुम्हाला सापडला का?

“देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे.”—याकोब १:२७.

१, २. (अ) अनेक लोकांच्या विचारसरणीवरून, त्यांचा धर्म योग्य प्रकारचा असल्याचे काय ठरवते? (ब) धर्माचा निवाडा करण्यामध्ये कोणत्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करण्यास हवा?

आम्ही अशा युगात जगत आहोत जेथे, अनेक लोक धर्माला सापेक्षपणे त्यांच्या जीवनातील एका कोपऱ्‍यात ठेवतात. ते काही धार्मिक कार्यांना उपस्थित राहत असतील, परंतु थोडकेच लोक त्यामध्ये नियमित असतात. अनेक लोक, इतर सर्व धर्म खोटे आहेत व त्यांचाच केवळ योग्य प्रकारचा आहे असा दृष्टिकोन बाळगत नाहीत. त्यांना इतकेच केवळ वाटते की, त्यांचा धर्म त्यांच्यासाठी योग्य आहे.

२ या दृष्टिकोनाला अनुलक्षून, तुम्हाला योग्य प्रकारचा धर्म सापडला का? या प्रश्‍नाचा साधा अर्थ, तुमच्या आवडीचा धर्म तुम्हाला सापडला असा होतो का? तुम्हाला काय आवडते हे कोणती गोष्ट निश्‍चित करते? तुमचे कुटुंब? तुमचे सहकारी? तुमच्या वैयक्‍तिक भावना? या गोष्टीसंबंधाने तुम्ही देवाच्या दृष्टिकोनाचा केवढ्या गंभीरतेने विचार केला आहे?

आम्ही देवाचा दृष्टिकोन कसा जाणू शकतो?

३. (अ) आम्हाला देवाचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा असल्यास, आमच्याजवळ काय उपलब्ध असले पाहिजे? (ब) पवित्र शास्त्र देवाकडून आहे असा आम्ही वैयक्‍तिकपणे विश्‍वास का ठेवतो यासाठी, कोणते प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत?

३ देव स्वतः काय विचार करतो आम्हाला जाणून घ्यावयाचे असल्यास, त्याच्याकडून काही प्रकटीकरणे असलीच पाहिजेत. पवित्र शास्त्र हे अति पुरातन पुस्तक, देवाकडून प्रेरित असल्याचा दावा करते. (२ तीमथ्य ३:१६, १७) परंतु इतर सर्व पुस्तकाच्या तुलनेत, या पुस्तकात सर्व मानवजातीसाठी देवाचा संदेश समाविष्ट आहे असे खरेपणाने म्हटले जाऊ शकते का? त्या प्रश्‍नाला तुम्ही कसे उत्तर द्याल, आणि का बरे? तुमच्या पालकांचा असा दृष्टिकोन होता यामुळे का? तुमच्या सहकाऱ्‍यांच्या प्रवृत्तीमुळे का? तुम्ही स्वतः पुराव्याचे परीक्षण केले का? पुढील चार पुराव्यांच्या क्रमांचा वापर करुन ते आता का करु नये बरे?

४. काय हे दर्शवते की, इतर काही पुस्तके नव्हे तर, पवित्र शास्त्रच देवाकडून उपलब्ध झाले आहे?

४ उपलब्धता: खरोखर देवाकडून असलेला संदेश व तो संपूर्ण मानवी कुटुंबासाठी असल्यास, तो त्यांच्याकरता उपलब्ध असला पाहिजे. पवित्र शास्त्राच्या बाबतीत ते खरे आहे का? याचा विचार करा: पवित्र शास्त्र संपूर्ण किंवा काही भागात, आता २,००० पेक्षा अधिक भाषेत प्रकाशित झाले आहे. अमेरिकन बायबल सोसायटीच्या मते, दशकाआधी पवित्र शास्त्र ज्या भाषांमध्ये छापले होते, ते जगातील लोकसंख्येच्या ९८ टक्के लोकांसाठी उपलब्ध होते. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ या पुस्तकाने, पवित्र शास्त्र हे “जगातील अधिक विस्तृत प्रमाणात वाटप केलेले पुस्तक” आहे, असे निर्विवादपणे दर्शवले. देवाकडील संदेशाबद्दल आम्ही अशीच अपेक्षा केली पाहिजे, कारण तो संदेश, सर्व वंशाचे लोक व रा आणि निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांसाठी आहे. (पडताळा प्रकटीकरण १४:६.) अशाप्रकारचा अहवाल असणारे यासारखे इतर कोणतेही पुस्तक जगात नाही.

५. पवित्र शास्त्राचा ऐतिहासिक पाया अद्‌भुत का आहे?

५ ऐतिहासिकता: पवित्र शास्त्रीय वृत्तांताचे काळजीपूर्वक परीक्षण, पवित्र शास्त्र हे पुस्तक, पवित्र असल्याचा दावा करणाऱ्‍या इतर धार्मिक पुस्तकांपासून वेगळे असण्यावर आणखी एका मार्गाद्वारे प्रकाश पाडते. पवित्र शास्त्रात ऐतिहासिक वास्तविकता समाविष्ट आहेत, त्या शाबीत करता न येणाऱ्‍या दंतकथा नाहीत. अर्वन लिंटन वकील होते व कोर्टात सादर केलेल्या आवश्‍यक पुराव्याचे परीक्षण नेहमीच करत असत. त्यांनी लिहिले: “प्रणयकथा, दंतकथा आणि खोटी साक्ष या संबंधित असलेल्या गोष्टी, दूरवर व अनिश्‍चित काळामध्ये घडतील असे काळजीपूर्वक म्हणत असतील, . . . परंतु पवित्र शास्त्रातील वृत्तांतात आम्हाला तारीख आणि संबंधित असलेल्या गोष्टींचे ठिकाण अधिक अचुकतेत सापडते.” (उदाहरणार्थ, पाहा १ राजे १४:२५; यशया ३६:१; लूक ३:१, २.) वास्तविकतेला टाळण्यासाठी नव्हे तर, सत्यासाठी जे लोक धर्माकडे वळतात, त्यांच्याकरता हा महत्त्वाचा विचार आहे.

६. (अ) पवित्र शास्त्र एखाद्या व्यक्‍तीला जीवनाच्या समस्यांसह खरेपणाने कशी मदत करते? (ब) एखाद्या व्यक्‍तीला खडतर वास्तविकतांचा सामना करण्यासाठी कोणत्या तीन मार्गांनी पवित्र शास्त्र साहाय्य करते?

६ व्यवहार्यता: पवित्र शास्त्राचे गंभीरपणे परीक्षण करणाऱ्‍यांना लवकरच हे कळून येते की, त्याच्या आज्ञा आणि तत्त्वांची रचना त्याचा गैरफायदा घेण्यासाठी केलेली नाही. उलटपक्षी, त्यांना जडून राहतात अशांना लाभ देणाऱ्‍या जीवनाचा मार्ग जे दाखवतात. (यशया ४८:१७, १८) ते, खिन्‍न असणाऱ्‍यांना देत असलेले सांत्वन, निरर्थक तत्त्वज्ञानांवर आधारित असलेल्या पोकळ सांत्वनाप्रमाणे नाही. उलटपक्षी, ते जीवनाच्या कठोर वास्तविकतांसोबत सामना करण्यासाठी लोकांना मदत करते. कशाप्रकारे? तीन मार्गांद्वारे: (१) अडचणीचा कसा सामना करावा, याविषयी उचित सल्ला देण्याद्वारे, (२) देव त्याच्या सेवकांना आता देत असलेला प्रेमळ पाठिंबा कशाप्रकारे प्राप्त करावा हे सांगण्याद्वारे, आणि (३) देवाची सेवा करणाऱ्‍यांकरता राखून ठेवलेले अद्‌भुत भवितव्य प्रकट करण्याद्वारे, त्याच्या अभिवचनांवर त्यांनी भरवसा ठेवण्यासाठी उचित कारणे देण्याद्वारे.

७. (अ) तळटीपेतील उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांचा वापर करुन, लोकांना आज काळजी वाटत असणाऱ्‍या मोठ्या वादविषयासाठी पवित्र शास्त्राचे उत्तर सांगा. (ब) आम्हाला पवित्र शास्त्राचा सल्ला सुरक्षित कसा ठेवतो किंवा तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यास कशी मदत करतो ते दाखवा.

७ पवित्र शास्त्राचा सल्ला जे अधिकाराला नाकारून त्यांच्या जीवनाची वाटचाल चैनबाजीकडे करतात अशा लोकात अनेकदा इतका लोकप्रिय नाही. तरीही, अशाप्रकारच्या जीवनाने त्यांना अस्सल आनंद दिला नसल्याची जाणीव अनेकांना झाली आहे. (गलतीकर ६:७, ८) पवित्र शास्त्र, गर्भपात, घटस्फोट, आणि समलैंगिकता याविषयीच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देते. त्याचा सल्ला, अंमली पदार्थ आणि मद्याचा दुरुपयोग तसेच दुषित रक्‍त किंवा लैंगिक अनिर्बंधाच्या संबंधापासून होणाऱ्‍या एड्‌सपासून संरक्षण करतो. ते आम्हाला आनंदी कुटुंब कसे असू शकते हे दाखवते. ते अशी माहिती पुरवते जी एखाद्या व्यक्‍तीला, जीवनातील अधिक तणावाच्या परिस्थितीमध्ये, ज्यात जवळच्या कौटुंबिक सदस्यांकडून नाकारले जाणे, भयंकर आजारपण, आणि प्रिय जनांचा मृत्यू यांचा समावेश आहे याचा सामना करण्यासाठी मदत करतात. ते आम्हाला आमच्या प्राधान्यतेला ओळखण्यासाठी मदत करते जेणेकडून, आम्हाला पस्तावा होण्याऐवजी आमचे जीवन अर्थपूर्ण असेल.a

८, ९. (अ) पवित्र शास्त्राच्या प्रेरणेचा पुरावा म्हणून त्यातील कोणती भविष्यवाणी वैयक्‍तिकपणे तुम्हावर छाप पाडते? (ब) पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या त्यांच्या उगमासंबंधाने काय शाबीत करतात?

८ भविष्यवाणी: पवित्र शास्त्र हे भविष्यवाणीचे अतुलनीय पुस्तक आहे. भविष्यात काय घडेल याविषयी ते व तेही अगदी सविस्तरपणे. त्याने प्राचीन सोरच्या नाशाचे, बाबेलचे पतन, यरुशलेमेच्या पुनःर्बांधणीचे, मेदी-फारशी व ग्रीसच्या राजांचे उठण्याचे आणि पडण्याचे, तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक घटनांचे भाकीत केले होते. तसेच, या शतकात विकसित झालेल्या जागतिक परिस्थितींचे देखील त्याने सविस्तरपणे भाकीत केले होते, व ते त्यांची अर्थसूचकता देते. ते, मानवी नेत्यांना जेरीस आणणाऱ्‍या समस्या कशा सोडविल्या जातील हे दाखवते. मानवजातीला चिरकालिक शांती आणि सुरक्षितता आणणाऱ्‍या शासकाची ओळख करुन देते.b—यशया ९:६, ७; ११:१-५, ९; ५३:४-६.

९ पवित्र शास्त्र, देवत्वाचे प्रमाण या नात्याने, भविष्याचे अचूकतेत भाकीत करण्याच्या क्षमतेला सार्थपणे सादर करते. (यशया ४१:१–४६:१३) हे करणारा किंवा इतरांनी करण्यासाठी त्यांना प्रेरित करणारी केवळ एक निर्जीव मूर्ती नाही. तो केवळ एक धर्मशील मानव नाही. तो सत्य देव आहे, आणि भविष्यवाण्यांचा समावेश असणारे पुस्तक त्याचे वचन आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३.

पवित्र शास्त्राचा उपयोग करणारे सर्वच योग्य धर्माचे शिक्षण देत आहेत का?

१०, ११. येशूने दाखविल्याप्रमाणे, पाळक पवित्र शास्त्राचा वापर करीत असले तरी, ते सांगत असलेल्या धर्माला कोणती गोष्ट निरर्थक बनवू शकते?

१० पवित्र शास्त्राचा उपयोग करणारे सर्वच धार्मिक गट खरा धर्म शिकवतात हा निष्कर्ष काढणे व्यवहार्य—अधिक महत्त्वाचे म्हणजे, शास्त्रवचनीय आहे का? जो प्रत्येक जण पवित्र शास्त्र बाळगतो किंवा त्यातून सांगतो तो योग्य प्रकारचा धर्म आचरतो का?

११ अनेक पाळकांजवळ पवित्र शास्त्र असले तरी, धर्माचा वापर ते स्वतःच्या गौरवासाठी करतात. त्यांनी शुद्ध सत्यात परंपरा आणि मानवी तत्त्वज्ञानाची भेसळ केली. त्यांची उपासना देवाला स्वीकारार्ह आहे का? यरुशलेमेत पहिल्या शतकातील यहूदी धार्मिक नेते हेच करत होते, यामुळे यशया संदेष्ट्याद्वारे देवाने जे म्हटले होते त्याला येशूने यथायोग्यपणे लागू करून असे म्हटले: “हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात; कारण ते शास्त्र म्हणून शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम.” (मत्तय १५:८, ९; २३:५-१०) नक्कीच मग, त्या प्रकारचा धर्म, खरा धर्म नाही.

१२, १३. (अ) एखाद्या व्यक्‍तीला चर्चमधील सदस्यांचे वर्तन, त्यांचा धर्म योग्य प्रकारचा आहे का हे ठरवण्यास कशी मदत करु शकते? (ब) देव नापसंत करत असलेल्यांसोबत आम्ही संगती ठेवण्याची निवड केल्यास, देव आमच्या उपासनेकडे कोणत्या दृष्टीने पाहील? (२ इतिहास १९:२)

१२ विशिष्ट धर्मांच्या शिकवणींनी उत्पादित केलेली फळे, त्यांच्या चांगल्या स्थानावर असलेल्या सदस्यांच्या जीवनात नासकी दिसत असल्यास, काय? येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात इशारा दिला: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा . . . त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांना ओळखाल. . . . प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.” (मत्तय ७:१५-१७) एकादी व्यक्‍ती चुकीची गोष्ट करु शकते व तिला सुधारण्याची गरज आहे, हे खरे आहे. परंतु चर्चमधील सदस्य तसेच पाळक देखील, जारकर्म आणि व्यभिचार, झगडे, मद्यपी, लोभिष्टपणा, लबाडी, भूतविद्या, मूर्त्यांची उपासना करतात तेव्हा परिस्थिती वेगळी असते. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी किंवा या सर्व गोष्टीत, कोणतीही शिक्षा दिली जात नाही, व अशी कृत्ये करत असलेल्यांना मंडळीतून बाहेर काढले जात नाही. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की, अशी कामे करणाऱ्‍यांना मंडळीतून बाहेर काढून टाकले पाहिजे; देवाच्या राज्यात त्यांना कोणताही वाटा नसणार. (गलतीकर ५:१९-२१) त्यांची उपासना देवाला संतोषकारक नाही, तसेच देव ज्यांना नापसंत करतो त्यांच्याबरोबर सहवास राखण्याची निवड केल्यास आमची उपासना देखील त्याला संतोषकारक वाटणार नाही.—१ करिंथकर ५:११-१३; ६:९, १०; प्रकटीकरण २१:८.

१३ पवित्र शास्त्राचा वापर करण्याचा दावा करणारे सर्वच गट ते वर्णन करते त्या खऱ्‍या धर्माचे आचरण करीत नाहीत हे आता स्पष्ट आहे. तर मग, पवित्र शास्त्र, खऱ्‍या धर्माचे कोणते ओळखचिन्ह देते?

खऱ्‍या धर्माची ओळखचिन्हे

१४. (अ) खऱ्‍या धर्माच्या सर्वच शिकवणी कशावर आधारित आहेत? (ब) देव आणि जीव याबद्दल ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणी या परीक्षेत कशाप्रकारे उभ्या राहतात?

१४ त्याच्या शिकवणी पूर्णपणे प्रेरित वचनावर आधारित आहेत. “प्रत्येक परमेश्‍वर प्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) परंतु पवित्र शास्त्र ख्रिस्ती धर्मजगताच्या त्रैक्याविषयी कोठे सांगते? तसेच पाळक शिकवतात त्याप्रमाणे, मानवांचा जीव त्यांचे दैहिक शरीर मेल्यानंतर जिवंत राहतो, ही शिकवण पवित्र शास्त्र कोठे शिकवते? ह्‍या शिकवणी तुमच्या पवित्र शास्त्रातून दाखवण्यास तुम्ही पाळकांना कधी विचारले आहे का? द न्यू एन्साक्लोपिडीया ब्रिटानिका म्हणतो: “नवीन करारात त्रैक्य हा शब्द किंवा हा स्पष्ट सिद्धांत देखील आढळत नाही.” (१९९२, मायक्रोपिडीया, खंड २, पृष्ठ ९२८) याचप्रमाणे, न्यू कॅथोलिक एन्साक्लोपिडीया कबूल करतो: “अपोस्टलिक फादर्समध्ये अशी ही मानसिक कल्पना किंवा विचारधारा यत्किंचितही उदयास आली नव्हती.” (१९६७, खंड १४, पृष्ठ २९९) मरणानंतर शरीरापासून वेगळा होणारा जीव, ही ख्रिस्ती धर्मजगताची मतप्रणाली, ग्रीक तत्त्वज्ञानातून घेतली आहे असे चर्च विद्वान कबूल करतात. परंतु, खरा धर्म मानवी तत्त्वज्ञानासाठी पवित्र शास्त्राला बाजूला सारत नाही.—उत्पत्ती २:७; अनुवाद ६:४; यहेज्केल १८:४; योहान १४:२८.

१५. (अ) केवळ एकाचीच उपासना करावी, याची ओळख पवित्र शास्त्र कशी देते? (ब) यहोवाच्या जवळ येण्याविषयी खऱ्‍या उपासकांना कसे वाटते?

१५ खरा धर्म केवळ एकच खरा देव, यहोवाच्या उपासनेचे समर्थन करतो. (अनुवाद ४:३५; योहान १७:३) येशू ख्रिस्ताने अनुवाद ५:९ व ६:१३ चा गोषवारा देऊन निर्भिडपणे म्हटले: “परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:१०) यालाच अनुसरून, येशूने त्याच्या शिष्यांना पित्याचे नाव कळवले. (योहान १७:२६) तुमच्या धर्माने तुम्हाला यहोवाची उपासना करण्याविषयी शिकवले आहे का? त्या नावाने—त्याचे उद्देश, त्याचे कार्य, त्याचे गुण याद्वारे ओळख मिळणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही जाणले आहे का की ज्यामुळे त्याच्याजवळ आत्मविश्‍वासाने जाता येईल असे तुम्हाला वाटते? तुमचा धर्म खरा असल्यास याचे उत्तर होय, असे आहे.—लूक १०:२२; १ योहान ५:१४.

१६. खऱ्‍या धर्माचे आचरण करणाऱ्‍यांसाठी ख्रिस्तावरील विश्‍वासाचा काय अर्थ होतो?

१६ देवाला संतोषकारक उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यावर विश्‍वास ठेवणे होय. (योहान ३:३६; प्रे. कृत्ये ४:१२) याचा अर्थ तो जिवंत होता किंवा तो एक उल्लेखनीय व्यक्‍ती होता, हाच केवळ विश्‍वास ठेवणे नव्हे. यामध्ये, पवित्र शास्त्र येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या यज्ञार्पणाच्या मूल्याविषयी काय शिकवते त्याच्या गुणग्राहकतेचा व आज स्वर्गीय राजा या नात्याने त्याचे स्थान ओळखण्याचा समावेश होतो. (स्तोत्रसंहिता २:६-८; योहान ३:१६; प्रकटीकरण १२:१०) खऱ्‍या धर्माचे आचरण करणाऱ्‍यांसोबत तुम्ही संगती राखून असल्यास, तुम्हाला माहीत आहे की, ते दैनंदिन जीवनात येशूचे आज्ञापालन करण्यासाठी, त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा, व त्याने त्याच्या शिष्यांना नेमून दिलेल्या कार्यात व्यक्‍तिगतपणे व आवेशाने भाग घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. (मत्तय २८:१९, २०; योहान १५:१४; १ पेत्र २:२१) ज्यांच्यासोबत तुम्ही उपासना करता त्यांच्याबाबतीत हे खरे नसल्यास, तुम्हाला इतर ठिकाणी पाहण्याची गरज आहे.

१७. खरे उपासक जगाकडील कोणताही कलंक न लागण्याविषयी काळजी कशी घेतात, आणि त्यात कशाचा समावेश होतो?

१७ खरी उपासना, राजकीय व जगिक झगडे यात समाविष्ट होऊन कलंकित झालेली नाही. (याकोब १:२७) का नाही बरे? कारण येशूने त्याच्या अनुयायांबद्दल म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) येशूने राजकारणात हस्तक्षेप केला नाही, व त्याने त्याच्या अनुयायांना दैहिक शस्त्रांचा वापर करण्याला निर्बंध घातला. (मत्तय २६:५२) देवाचे वचन सांगते या गोष्टीला जे अंतःकरणाप्रत घेतात, ‘ते इतःपर युद्धकला शिकत नाहीत.’ (यशया २:२-४) तुमचा केवळ नावापुरता संबंध आहे, असा कोणताही धर्म त्या वर्णनाप्रमाणे नसल्यास, त्याच्यापासून सर्व संबंध तोडण्याची आता ही वेळ आहे.—याकोब ४:४; प्रकटीकरण १८:४, ५.

१८. (अ) योहान १३:३५, खऱ्‍या धर्माचा उल्लेखनीय गुण या नात्याने कोणती ओळख देते? (ब) कोणता गट योहान १३:३५ प्रमाणे आहे, हे ठरविण्यासाठी तुम्ही एखाद्याला कशी मदत देऊ शकता?

१८ खरा धर्म निस्वार्थी प्रीती शिकवतो आणि आचरतो. (योहान १३:३५; १ योहान ३:१०-१२) अशी प्रीती केवळ प्रवचनातच सांगितली जात नाही. ती सर्व जातीच्या लोकांना, सर्व आर्थिक गटांना, सर्व भाषा, सर्व राष्ट्रांना अस्सल बंधूवर्गात खरेपणाने जवळ एकवटते. (प्रकटीकरण ७:९, १०) हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना त्यांच्या सभोवतालच्या जगापासून वेगळे करते. तुम्ही अद्यापि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहातील सभेला तसेच त्यांच्या मोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहिला नसल्यास, जरुर उपस्थित राहा. ते त्यांचे एखादे राज्य सभागृह बांधत असताना त्यांची पाहणी करा. ते वयस्करांना (विधवांसहित) व तरुणांना (एक-पालक असलेल्या किंवा अनाथ असलेल्या) सोबत कसे वागतात त्याचे निरीक्षण करा. (याकोब १:२७) तुम्ही ज्याचे निरीक्षण केले आहे त्याची तुलना इतर धर्मात जे पाहिले आहे त्यासोबत करा. नंतर स्वतःला विचारा, ‘खऱ्‍या धर्माचे आचरण कोण करत आहेत?’

१९. (अ) खरा धर्म, मानवजातीच्या समस्यांवर कोणता उपाय असल्याचे सांगतो? (ब) खरा धर्म प्रतिपादत असलेले सदस्य काय करत असले पाहिजेत?

१९ खरा धर्म, मानवजातीच्या समस्यांवर कायमचा उपाय, देवाचे राज्य असल्याचे समर्थन करतो. (दानीएल २:४४; ७:१३, १४; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:४, ५) ख्रिस्ती धर्मजगतातील कोणती चर्चेस अशी करतात? मागे तुम्ही कधी एखाद्या पाळकाकडून देवाच्या राज्याविषयी व ते काय साध्य करील हे कोणते शास्त्रवचन दाखवते याबद्दल ऐकले होते? ज्या संघटनेसोबत तुम्ही आहात, ती तुम्हाला देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगण्याचे उत्तेजन देते का? देत असल्यास, सदस्य या नात्याने सर्वजण त्यात सहभाग घेतात का? येशूने अशाच रीतीने साक्षकार्य केले; त्याच्या आरंभीच्या शिष्यांनीही तसेच केले. या कार्यात सहभाग घेण्याची तुम्हाला देखील सुसंधी आहे. आज पृथ्वीच्या पाठीवर केले जाणारे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे.—मत्तय २४:१४.

२०. खरा धर्म ओळण्यासोबत, आम्ही काय करण्यास हवे?

२० हजारो धर्म असले तरी, पवित्र शास्त्र आम्हाला खरा धर्म ओळखण्यासाठी, गोंधळाला दूर करण्यास त्वरित मदत करते. परंतु, केवळ ओळखण्यापेक्षा आम्हाला अधिक काही करण्याची गरज आहे. आम्ही त्याचे आचरण करावे हे महत्त्वाचे आहे. यात काय सामील आहे याचा आम्ही पुढील लेखात अधिक विस्तारितपणे विचार करणार आहोत.

[तळटीपा]

a गर्भपात: प्रे. कृत्ये १७:२८; स्तोत्र १३९:१, १६; निर्गम २१:२२, २३. घटस्फोट: मत्तय १९:८, ९; रोमकर ७:२, ३. समलैंगिकता: रोमकर १:२४-२७; १ करिंथकर ६:९-११; अंमली पदार्थ आणि मद्याचा दुरुपयोग: २ करिंथकर ७:१; लूक १०:२५-२७; नीतीसूत्रे २३:२०, २१; गलतीकर ५:१९-२१. रक्‍त आणि अनिर्बंध संबंध: प्रे. कृत्ये १५:२८, २९; नीतीसूत्रे ५:१५-२३; यिर्मया ५:७-९. कुटुंब: इफिसकर ५:२२–६:४; कलस्सैकर ३:१८-२१. नापसंती: स्तोत्र २७:१०; मलाखी २:१३-१६; रोमकर ८:३५-३९. आजारपण: प्रकटीकरण २१:४, ५; २२:१, २; तीतास १:२; स्तोत्र २३:१-४. मृत्यू: यशया २५:८; प्रे. कृत्ये २४:१५. प्राधान्यता: मत्तय ६:१९-३४; लूक १२:१६-२१; १ तीमथ्य ६:६-१२.

b अशाच भविष्यवाण्यांविषयी व त्यांच्या पूर्णतेविषयीच्या उदाहरणासाठी पवित्र शास्त्र—देवाचे वचन की मनुष्याचे?, (इंग्रजी) या पुस्तकाची ११७-६१ पृष्ठे; आणि शास्त्रवचनातून युक्‍तीवाद करणे (इंग्रजी) याची पृष्ठे ६०-२, २२५-३२, २३४-४० पाहा. या दोन्ही प्रकाशनांना वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकॉ.ने प्रकाशित केलेली आहेत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ योग्य प्रकारच्या धर्माला ओळखल्यावर, कोणाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा आहे?

▫ पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे, याला कोणते चार पुरावे दर्शवतात?

▫ पवित्र शास्त्राचा वापर करणारे सर्व धर्म देवाला स्वीकारार्ह का नाहीत?

▫ एका योग्य प्रकारच्या धर्माची कोणती सहा ओळखचिन्हे आहेत?

[१० पानांवरील चौकट]

यहोवाचे साक्षीदार . . .

◆ त्यांच्या सर्व शिकवणी पवित्र शास्त्रावर आधारित असतात.

◆ एकच खरा देव, यहोवाची उपासना करतात.

◆ येशू ख्रिस्तावरील त्यांच्या विश्‍वासानुरूप जगतात.

◆ राजकारणात व जगिक झगड्यात सामील होत नाहीत.

◆ दैनंदिन जीवनात निःस्वार्थी प्रीती दाखविण्याचा प्रयत्न करतात.

◆ मानवजातीच्या समस्यांवर कायमचा उपाय म्हणून देवाच्या राज्याची घोषणा करतात.

[९ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्र—यात सर्व मानवजातीसाठी देवाचा संदेश आहे, हे कशावरून दिसते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा