वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. २९
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • जागृत राहण्याचा काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. २९

वाचकांचे प्रश्‍न

मत्तय २४:३४ मधील “पिढी” या शब्दाच्या अलीकडील अद्ययावत समजेतून हे स्पष्ट होते का, की या व्यवस्थीकरणाचा अंत होण्यास भवितव्यात फार काळ लागू शकतो?

निश्‍चितच नाही. उलटपक्षी, या पैलूवर अलीकडील सुधारित समजेने आपल्याला अंताची सतत अपेक्षा करण्यास मदत केली पाहिजे. ते कसे बरे?

नोव्हेंबर १, १९९५ च्या टेहळणी बुरूज अंकाने हे स्पष्ट केले, की येशूने “ही पिढी” या संज्ञेचा उपयोग समकालीन दुष्ट लोकांकरता केला होता. (मत्तय ११:७, १६-१९; १२:३९, ४५; १७:१४-१७; प्रेषितांची कृत्ये २:५, ६, १४, ४०) विशिष्ट तारखेने सुरू होणाऱ्‍या काळाच्या निश्‍चित लांबीचे वर्णन असा याचा अर्थ नव्हता.

खरे तर, टेहळणी बुरूजच्या त्याच अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” या सदराने दोन प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले: “लोकांची पिढी, ठराविक वर्षे असणारी कालमर्यादा असू शकत नाही” आणि “पिढीचे लोक सापेक्षपणे थोड्या कालावधीपर्यंत जिवंत राहतात.”

आपण बहुतेक वेळा “पिढी” या शब्दाचा अशा प्रकारे उपयोग करतो. उदाहरणार्थ, आपण कदाचित असे म्हणू, ‘नेपोलियनच्या पिढीतील सैनिकांना विमानं आणि ॲटम बॉम्ब माहीत नव्हते.’ नेपोलियनचा ज्या वर्षी जन्म झाला अगदी त्याच वर्षी जन्म झालेल्या सैनिकांना उद्देशून आपण असे म्हणू का? नेपोलियनच्या मरणाआधी मरण पावलेल्या फ्रेंच सैनिकांनाच उद्देशून आपण असे म्हणू का? अर्थातच नाही आणि “पिढी” या शब्दाचा उपयोग आपण अनेक वर्षांची निश्‍चित संख्या ठरविण्यासाठी सुद्धा करणार नाही. उलटपक्षी, आपण सापेक्षपणे लहान कालावधीचा उल्लेख करण्यासाठी असे म्हणू; नेपोलियनच्या काळापासून शेकडो वर्षांचा काळ असे आपण म्हणणार नाही.

आपल्या समजेप्रमाणे येशूने जैतुनांच्या डोंगरावर भविष्यवाणीत जे म्हटले त्याजशी हे जुळते. त्या भविष्यवाणीच्या विविध पैलूंची पूर्णता हे शाबीत करते, की या व्यवस्थीकरणाचा शेवट जवळ आला आहे. (मत्तय २४:३२, ३३) हे लक्षात ठेवा, की प्रकटीकरण १२:९, १० नुसार, १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याची प्रस्थापना होताच सैतानाला या पृथ्वीच्या सान्‍निध्यात टाकण्यात आले होते. प्रकटीकरण पुढे असे म्हणते, की सैतान आता अधिक क्रोधित झाला आहे. का? कारण “आपला काळ थोडा आहे हे तो ओळखून” आहे. (तिरपे वळण आमचे.)—प्रकटीकरण १२:१२

हे अगदी उचित होते, की नोव्हेंबर १ च्या टेहळणी बुरूजच्या अंकात “जागृत राहा!” हे उपशीर्षक होते. त्याच्या सुरवातीच्या परिच्छेदाने यथायोग्यपणे असे म्हटले: “आपल्याला घटना अचूक काळ माहीत असण्याची आवश्‍यकता नाही. आपण तारखेची गणती न करता उलटपक्षी, जागृत राहण्यावर, दृढ विश्‍वास वाढवण्यावर व यहोवाच्या सेवेत व्यग्र असण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे.” त्यानंतर याच परिच्छेदात येशूचे शब्द उद्धृत करण्यात आले होते: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:३३, ३७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा