आधुनिक उपासनेतील संगीताचे स्थान
गायन देवापासून मिळालेली एक देणगी आहे. गाण्यात आपला स्वर उंचावल्यामुळे आपल्याला तसेच आपल्या निर्माणकर्त्याला आनंद होऊ शकतो. याद्वारे आपण आपल्या दुःखाच्या तसेच आनंदाच्या भावना व्यक्त करू शकतो. याहून अधिक म्हणजे, गाण्याचा निर्माता, यहोवाविषयी आपले प्रेम, आपली आराधना व्यक्त करू शकतो आणि त्याची स्तुती करू शकतो.
बायबलमधील सुमारे तीनशे संगीताच्या संदर्भांपैकी बहुतेक संदर्भ यहोवाच्या उपासनेशी संबंधित आहेत. गायनाचा संबंध आनंदाशी देखील आहे—यामुळे केवळ गायकांनाच आनंद होत नाही, तर यहोवाला देखील आनंद होतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “त्याला स्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.”—स्तोत्र १४९:३, ४.
परंतु आधुनिक उपासनेत गायनाला किती महत्त्व आहे? यहोवाचे लोक गीतामध्ये आपला स्वर उंचावण्याद्वारे त्याला कशा प्रकारे आनंदित करू शकतात? खऱ्या उपासनेत संगीताला कोणते स्थान असण्यास हवे? उपासनेतील संगीताच्या इतिहासाविषयी जाणून घेतल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल.
उपासनेतील संगीताचे ऐतिहासिक स्थान
बायबलमध्ये संगीताविषयी उल्लेखित पहिला संदर्भ विशेषतः यहोवाच्या उपासनेबद्दल नाही. उत्पत्ति ४:२१ नुसार पहिले संगीत साहित्य निर्माण करण्याचे किंवा अशा प्रकारच्या संगीत पेशेच्या साध्यतेचे श्रेय युबाल याला दिले जाते. तथापि, मानवाची निर्मिती करण्याआधीपासून यहोवाच्या उपासनेत संगीताचा भाग होता. अनेक बायबल भाषांतरे, देवदूत गायन करत असल्याचे वर्णन करतात. ईयोब ३८:७ देवदूतांनी आनंदाने केलेला गजर आणि “जयजयकार” यांविषयी सांगते. अशा प्रकारे, मानवाच्या निर्मितीच्या फार आधीपासून यहोवाच्या उपासनेत गायन होते, असा विश्वास करण्याचे शास्त्रवचनीय कारण आहे.
काही इतिहासकारांनी असा युक्तिवाद केला आहे, की प्राचीन हिब्रू संगीत केवळ स्वर होते, त्यात सुसंगतपणा नव्हता. तथापि, बायबलमध्ये विशेषतः उल्लेख केलेल्या संगीत साहित्यावर अर्थात तंतुवाद्यावर एका वेळेस एकापेक्षा अधिक स्वर निर्माण करता येऊ शकत होते. वाद्याच्या स्वरांमध्ये मिसळल्याने निर्माण होणारा सुसंगतपणा तंतुवाद्य वाजविण्याऱ्यांनी ओळखला असावा. त्यांचे संगीत जुने पुराने नव्हते, ते फारच प्रगत होते. हिब्रू शास्त्रवचनांच्या पद्य आणि गद्य काव्याकडे पाहून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की इस्राएली संगीत उच्च दर्जाचे होते. निश्चितपणे, आसपासच्या राष्ट्रांपेक्षा या संगीताच्या रचनेची प्रेरणा थोर होती.
मंदिर उपासनेतील वाजंत्र्यांची आणि गायकांची सुव्यवस्थित व्यवस्था प्राचीन मंदिराच्या संघटनामुळे शक्य झाली. (२ इतिहास २९:२७, २८) तेथे “दिग्दर्शक,” “तरबेज” ‘शिष्य’ आणि “मुख्य गायक” होते. (१ इतिहास १५:२१ NW; २५:७, ८; नहेम्या १२:४६) त्यांच्या संगीताच्या प्रगत कौशल्यांवर टिपणी करताना इतिहासकार कर्ट सक्स यांनी लिहिले: “जेरुसलेमेच्या मंदिराशी संबंधित असलेली गायक मंडळी आणि वृंदवादक संगीत शिक्षणाचा उच्च दर्जा, कौशल्य आणि ज्ञान यांस सूचित करतात. . . . ते प्राचीन संगीत कसे ध्वनित होत होते हे आपल्याला ठाऊक नसले तरी, त्याच्या शक्तीचा, मोठेपणाचा आणि प्रविणतेचा आपल्याकडे पुरेसा पुरावा आहे.” (प्राचीन जगात संगीताचा उगम: पूर्व आणि पश्चिम, [इंग्रजी] १९४३, पृष्ठे ४८, १०१-२) गीतरत्न, हिब्रू रचनांच्या सर्जनशीलतेचे आणि दर्जाचे उदाहरण आहे. ते गाण्याच्या स्वरूपात सांगितलेली गोष्ट आहे जसे, की संगीतिकेचे पुस्तक किंवा पाठ्यपुस्तक. हे गीत फार उत्कृष्ट असल्यामुळे या गीताला “गाण्यांचे गाणे” असे हिब्रू शास्त्रवचनात संबोधनण्यात आले आहे. प्राचीन हिब्रू लोकांसाठी, गायन हा उपासनेचा एक अविभाज्य भाग होता. यहोवाप्रती त्यांच्या स्तुतीमध्ये गायनाने सकारात्मक भावनिक अभिव्यक्तींस अनुमती दिली.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांद्वारे गायन
आरंभीच्या ख्रिश्चनांमध्येही संगीत उपासनेचा नियमित भाग राहिला होता. प्रेरित स्तोत्रे असण्याखेरीज, त्यांनी पहिल्यांदा उपासनेसाठी संगीताची आणि काव्याची रचना केली असावी असे दिसते, असे करण्याद्वारे त्यांनी ख्रिस्ती गीतांच्या आधुनिक दिवसातील रचनेसाठी शिरस्ता ठेवला आहे. (इफिसकर ५:१९) वाल्डो सेल्डेन प्रेट, यांचे पुस्तक संगीताचा इतिहास, (इंग्रजी) म्हणते: “सुरवातीच्या ख्रिश्चनांसाठी गायन जाहीर आणि खासगी उपासनेतील एक प्रघात होता. यहुदी धर्मांतरित लोकांसाठी हे सभास्थानाच्या प्रघाताला चालू ठेवण्यासारखे होते . . . हिब्रू स्तोत्रांशिवाय . . . नवीन विश्वासाची एकसारखी नवीन स्तोत्रे तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, सुरवातीला असंबद्ध काव्याच्या स्वरूपात.”a
गायनाच्या महत्त्वाविषयी सांगताना, येशूने, प्रभूच्या सांज भोजनाचा आरंभ केला तेव्हा त्याने आणि त्याच्या प्रेषितांनी हालेल गायली असावीत. (मत्तय २६:२६-३०) ती यहोवाची स्तुतीप्रीत्यर्थ गीते होती जी स्तोत्रसंहितेत लेखबद्ध आहेत आणि ती वल्हांडणाच्या सणाच्यावेळी गायली जात असत.—स्तोत्रसंहिता ११३-११८.
खोट्या उपासनेचा प्रभाव
तथाकथित अंधःकार युगापर्यंत, धार्मिक संगीत निव्वळ दुःखमय जप होऊन बसले. सुमारे सा. यु. २०० मध्ये क्लेमेंट ऑफ अलेक्सझांड्रियाने म्हटले: “आम्हाला एका वाद्याची गरज आहे: उपासनेचे शांतिमय स्वर, तंतुवाद्य किंवा ढोल किंवा पावा अथवा तुतारी यांची आवश्यकता नाही.” चर्च संगीत तोंडी म्हटले पाहिजे, अशा प्रकारचे निर्बंध लादण्यात आले. या पद्धतीला जप किंवा निव्वळ गीत असे ओळखण्यात येऊ लागले. आपला संगीत वारसा, (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “कॉन्स्टँटिनोपलच्या स्थापनेनंतर चाळीस वर्षांच्या आताच लाओडेशियाच्या विधिमंडळाने (इ. स. ३६७) सार्वजनिक वाद्यांवर आणि मंडळीतील सभांवर बंदी घातली. आर्थोडोक्स संगीत पूर्णपणे तोंडी राहिले आहे.” (तिरपे वळण आमचे.) सुरवातीच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये या निर्बंधांना कोणत्याही प्रकारचा आधार नव्हता.
अंधःकार युगादरम्यान, सामान्य लोकांसाठी बायबल हे बंद पुस्तक होते. बायबल प्राप्त करण्याचे आणि वाचण्याचे ज्यांनी धाडस केले अशा ख्रिश्चनांना छळण्यात आले आणि ठार देखील मारण्यात आले. यास्तव हे आश्चर्याचे नाही, की अंधःकाराच्या युगादरम्यान देवाच्या स्तुती गायनाचा प्रघात जवळजवळ नामशेष झाला होता. म्हणूनच, सामान्य लोकांना शास्त्रवचनांचा काही गंधच नसेल तर संपूर्ण बायबलचा एक दशांश भाग म्हणजे गीत आहे, हे त्यांना कसे कळेल? “नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा,” असे देवाने आपल्या उपासकांना आज्ञापिले असल्याचे त्यांना कोण सांगणार?—स्तोत्र १४९:१.
उपासनेतील संगीताच्या योग्य स्थानाची पुनर्स्थापना करणे
उपासनेतील संगीताच्या आणि गायनाच्या योग्य स्थानाची पुनर्स्थापना करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने पुष्कळ काही केले आहे. उदाहरणार्थ, झायन्स वॉच टावर फेब्रुवारी १, १८९६ या अंकात केवळ गीतांचा समावेश होता. “सुरवातीची सीयोनाची आनंदी गीते.” हे त्याचे शीर्षक होते.
सन १९३८ मध्ये मंडळीच्या सभांतील गायन जवळजवळ बंद करण्यात आले. तथापि, प्रेषितांच्या उदाहरणाचे आणि मार्गदर्शनाचे अनुकरण करण्यातील बुद्धीला लवकरच प्रेरणा मिळाली. सन १९४४ च्या प्रांतीय अधिवेशनात एफ. डब्लू. फ्रान्झ यांनी “राज्य सेवेचे गीत” हे भाषण दिले. त्यांनी हे दाखवून दिले, की मानवाची निर्मिती करण्याच्या फार आधी देवाच्या स्वर्गीय प्राण्यांनी यहोवाचे स्तुतीगान गायले होते आणि त्यांनी म्हटले: “पृथ्वीवरील आपल्या सेवकांनी वास्तविक गाण्यात आपला स्वर लावणे हे योग्य तसेच देवाला आनंदविणारे देखील आहे.” उपासनेतील गायन यावर युक्तिवाद केल्यानंतर त्यांनी साप्ताहिक सेवा सभांमध्ये वापरण्यासाठी राज्य सेवा संगीत पुस्तक (इंग्रजी) प्रसिद्ध केले.b त्यानंतर सन १९४४ मध्ये इन्फोमॅन्ट (आता आमची राज्य सेवा असे म्हटले जाते) याने घोषणा केली, की इतर सभांमध्येही सुरवातीच्या आणि समाप्तीच्या गीतांचा समावेश करण्यात येईल. गायन पुन्हा एकदा यहोवाच्या उपासनेचा एक भाग बनले.
‘यहोवासाठी आपल्या अंतःकरणात गाणे’
अंतःकरणात गायनाचे महत्त्व पौर्वात्य युरोप आणि आफ्रिकेमधील आपल्या बांधवांनी दाखवून दिले आहे, ज्यांनी अनेक वर्षे छळाला आणि विरोधाला तोंड दिले. लोथर वॅग्नर यांनी सात वर्षे अंधारकोठडीत काढली. त्यांनी हा वेळ कसा घालवला? “राज्य गीतांसंबंधी माझी स्मरणशक्ती सुधारण्यावर मी कित्येक आठवडे लक्ष केंद्रित केलं होतं. मला नक्की शब्द आठवत नसत तेव्हा मी एखादं दुसरं कडवं रचत असे. . . . आपल्या राज्य गीतांमध्ये उत्तेजनात्मक आणि उभारणीकारक विचारांचा किती मोठा भरणा आहे!”—१९७४ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे २२६-८.
अंधारकोठडीतील पाच वर्षांच्या शिक्षेच्या दरम्यान आपल्या विश्वासू भूमिकेमुळे, हेरल्ड किंग यांना यहोवाच्या स्तुतीगीतांची रचना करण्यात आणि ही स्तुतीगीते गाण्यात सांत्वन मिळाले. त्यांच्या अनेक रचनांचा उपयोग यहोवाचे साक्षीदार आपल्या उपासनेत करतात. गायनाशी संबंधित असणारा आनंद शक्ती प्रदान करणारा आहे. परंतु देवाच्या स्तुतीगायनाच्या महत्त्वाची खात्री पटण्यासाठी आपण छळाचा अनुभव घेतलाच पाहिजे असे काही नाही.
यहोवाचे सर्व लोक गाण्याचा आस्वाद घेऊ शकतात. बोलण्याद्वारे आपले मत स्पष्ट करत असताना आपल्यामध्ये काही प्रतिबंधनात्मक गोष्टी असल्या, तरी गीतामध्ये आपण आपला स्वर लावतो तेव्हा यहोवाप्रती असणाऱ्या आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त केल्या जाऊ शकतात. “स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा,” असा ख्रिश्चनांना बोध देण्याद्वारे प्रेषित पौलाने हे दाखवून दिले, की आपण देखील स्तुतीगान करण्यात कशा प्रकारे आनंद प्राप्त करू शकतो. (इफिसकर ५:१९) आपली अंतःकरणे आध्यात्मिक गोष्टींनी भरेलेली असतात तेव्हा गीतामध्ये आपल्याला प्रबळ भाव दिसून येतो. म्हणूनच हृदयाची योग्य प्रवृत्ती सुधारित गायनाची गुरूकिल्ली आहे.
यहोवासोबतचा चांगला नातेसंबंध, आनंदी चैतन्यास हातभार लावतो तसेच यहोवाविषयी बोलण्याकरता, त्याचे गुनगान आणि स्तुतीगान करण्याकरता आपल्याला प्रेरित करतो. (स्तोत्र १४६:२, ५) आपण आनंद घेत असलेल्या गोष्टींविषयी आपण अंतःकरणपूर्वक गातो. आपल्याला गीत किंवा गीतातील भावना आवडल्यास आपण कदाचित ते गीत खऱ्या भावनेसह गाऊ.
भावनेसह गाण्यासाठी एखाद्याला मोठ्याने गाण्याची गरज नाही. मोठ्या आवाजातील गायन म्हणजे चांगले गायन नव्हे; तसेच ऐकू न येणारे गाणे देखील चांगले गायन ठरू शकणार नाही. गायन सौम्य असले तरी काही लोकांचा आवाज स्वाभाविक अनुनादामुळे ऐकण्यास वेगळा वाटेल. एका गटात चांगल्या प्रकारे गाणे हा आव्हानाचा एक भाग आहे. तुम्हाला सुसंगत किंवा एका तालात गाता येत असले, तरी तुमच्या शेजारी असणाऱ्यांसोबत तुमच्या जुळणाऱ्या आवाजाचा परिणाम आनंददायक आणि तादात्म्य गीतामध्ये होतो. गाण्यातील आवेशात संतुलितपणा राखण्यासाठी आणि दुसऱ्याच्या आवाजापेक्षा मोठ्याने गाण्याचे टाळण्यासाठी एखाद्याला ख्रिस्ती विनयशीलतेमुळे आणि ऐकण्यातील तत्परतेमुळे मदत होऊ शकते. तथापि, कौशल्याने गाणाऱ्यांनी किंवा ज्यांचा आवाज कमालीचा चांगला आहे अशांना मोकळेपणाने गाण्यात केव्हाही निराश होता कामा नये. मंडळीमध्ये यहोवाचे स्तुतीगान करण्यासाठी मधूर आवाजामुळे चांगली मदत होऊ शकते.
आपल्या सभांतील गायन गीतांचे समस्वर भाग गाण्यासाठी देखील एक चांगली संधी मिळते. कोणत्याही स्वर लिपीशिवाय ज्यांना गाता येते किंवा गीत-पुस्तकातील लिपी ज्यांना वाचता येऊ शकते किंवा जे त्यांस स्वर लावू शकतात अशांना उत्तेजन देण्यात येते, की त्यांनी गायनात समरस व्हावे आणि संगीताच्या सुंदरतेत भर घालावी.c
काही लोक कदाचित म्हणतील, ‘मी एकसुरात गाऊ शकत नाही’ किंवा ‘माझा आवाज अगदी भसाडा आहे; तो वरच्या पातळीवर गाताना फुटतो.’ म्हणून असे लोक राज्य सभागृहात सुद्धा कांकू करतात. सत्य हे आहे, की यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ उंचावण्यात येणारा आवाज त्याच्या दृष्टीने कधीही “भसाडा” नसतो. ज्याप्रकारे एखाद्याच्या बोलण्याचा आवाज वारंवार प्रयत्न करण्याद्वारे आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेतील सहायक सूचनांचे पालन करण्याद्वारे सुधारला जाऊ शकतो त्याच प्रमाणे एखाद्याचे गायन देखील सुधारले जाऊ शकते. काही लोकांनी आपला आवाज काम करतेवेळी गुणगुणण्याद्वारे सुधारला आहे. गुणगुणल्यामुळे योग्य स्वर निघण्यास मदत होते. आपण एकांतात असतो किंवा काम करतो अशा ठिकाणी जेथे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा योग्य ठिकाणी राज्यगीते गाणे, आवाजासाठी एक उत्तम व्यायाम होऊ शकतो आणि एखाद्यास आनंदी, आरामदायक मानसिक स्थितीत आणण्याचे ते एक माध्यम आहे.
काही राज्यगीते समूहगानात गाण्याचे आम्ही तुम्हाला उत्तेजन देऊ शकतो. असे गायन एखाद्या वाद्याबरोबर जसे गिटार किंवा पियानो अथवा संस्थेचे पियानो ध्वनिमुद्रणांवर वाजविल्यास आपल्या एकत्रिकरणांस आध्यात्मिक वातावरण प्राप्त होऊ शकते. गायन, अशा गीतांना शिकण्यासाठी आणि मंडळीतील सभांमध्ये चांगल्या प्रकारे गाण्यास मदत करते.
सभांमध्ये आवेशाने गाण्यास मंडळीला मदत व्हावी म्हणून संस्थेने गीतांच्या संगीताचे ध्वनिमुद्रण पुरवले आहे. ते वाजविले जाते तेव्हा साऊंड सिस्टम हाताळणाऱ्याने आवाजावर लक्ष ठेवण्यास हवे. संगीत फारच कमी आवाजात असल्यास मुक्तकंठाने गाण्यास मंडळी मागेपुढे पाहील. सांऊड सिस्टमवर नियंत्रण ठेवणारा बांधव मंडळीसोबत गातो तेव्हा या गोष्टीची खात्री करील, की संगीतामुळे गाण्यास मदत होत आहे किंवा नाही.
यहोवासाठी गीत गा
आपल्या निर्माणकर्त्याविषयी असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला गायनामुळे मिळते. (स्तोत्र १४९:१, ३) गायन म्हणजे भावनांचा उद्रेक नव्हे, परंतु आपल्या स्तुतीची नियंत्रित, वाजवी आणि आनंदमय अभिव्यक्ती आहे. मंडळीच्या गायनात अंतःकरणपूर्वक गायल्यामुळे त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपले मन आणि हृदय योग्य स्थितीत येऊ शकते तसेच यहोवाच्या उपासनेत अधिक भाग घेण्यासाठी आपण प्रेरित होऊ शकतो. गायनाचा भावनात्मक प्रभाव असला तरी त्याचे शब्द आपल्याला शिकविण्यासाठी मदत करू शकतात. अशा प्रकारे एकसुरात आणि सुसंगतेत आपल्या स्वतःला व्यक्त करण्याद्वारे एकत्रित लोक या नात्याने आपल्या सर्वांना एकत्रपणे शिकता यावे म्हणून आपण दीनपणे आणि नम्रपणे आपले हृदय तयार करत असतो.—पडताळा स्तोत्र १०:१७.
गायन यहोवाच्या उपासनेचा नेहमी एक भाग राहील. यास्तव आपल्याकडे स्तोत्रकर्त्याच्या भावनांमध्ये निरंतर सहभागी होण्याचे भवितव्य आहे: “माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.”—स्तोत्र १४६:२.
[तळटीपा]
a असंबद्ध काव्य एक संगीत रचना असून ती कोणत्याही निर्बंधाशिवाय अनेक भागांत विभागलेली असते. बहुतेक वेळा असंबद्ध काव्यात साहसी लोकांची किंवा पात्रांची स्तुती करण्यात येते.
b पहिले करिंथकर १४:१५ असे सूचित करत असल्याचे भासते, की पहिल्या शतकातील ख्रिस्ती उपासनेत गायन ही एक नेहमीची गोष्ट होती.
c यहोवाचे गुणगान करा, (इंग्रजी) या आपल्या सध्याच्या गीत-पुस्तकातील काही गीतांमध्ये चार-पदरी सुसंगत पद्धत वापरण्यात आली आहे जेणेकरून सुसंगत भागांचे गायन आवडणाऱ्यांना त्यापासून लाभ व्हावा. तथापि, अनेक गीते पियानोवर वाजवता येतील अशा प्रकारे रचण्यात आली आहेत आणि तालांचे आंतरराष्ट्रीय उगम कायम ठेवण्याच्या प्रयत्नार्थ त्यांना सांगीतिक पद्धत देण्यात आली. काटेकोर चार-पदरी सुसंगततेशिवाय लिहिलेल्या गीतांसाठी असलेल्या सुसंगत टिपा तयार करण्याद्वारे सभांमधील आपल्या गायनास आनंदी उत्तेजन मिळू शकते.
[२७ पानांवरील चौकट]
चांगल्या गायनासाठी काही सूचना
१. गाताना गीत-पुस्तक पुढे धरा. यामुळे एखाद्यास सहजपणे श्वास घेण्यास मदत होईल.
२. प्रत्येक कडव्याआधी पुरेसा श्वास घ्या.
३. तोंड नेहमीपेक्षा जरा अधिक उघडा यामुळे आवाज मोठा येईल आणि स्वराचा प्रतिध्वनी देखील वाढेल.
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गात असलेल्या गाण्यातील भावनेकडे लक्ष द्या.