वाचकांचे प्रश्न
बातमी अहवालांनुसार, काही इस्पितळे बाळाचा जन्म झाल्यावर, अपरा आणि नाळ यांच्यात राहिलेल्या रक्तातून काही गोष्टी काढून घेण्याकरता ते जपून ठेवतात. यात ख्रिश्चनांना काळजी करण्यासारखे काही आहे का?
बहुतेक इस्पितळांमध्ये ही वैद्यकीय पद्धत वापरली जात नसल्यामुळे ख्रिश्चनांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु एखादी ख्रिश्चन ज्या इस्पितळात प्रसवणार आहे तेथे अशी पद्धत आचरली जाते असा विश्वास ठेवण्यास उचित कारण असल्यास, अपरा आणि नाळेचा कोणत्याही प्रकारे उपयोग न करता ते फेकून द्यावे असे वैद्यांना सांगणे उचित ठरेल.
प्राणी असो वा मानव असोत, जैव पदार्थांद्वारे विविध वैद्यकीय पदार्थ मिळवण्यात आले आहेत. जसे की, गर्भवती घोडीच्या लघवीतून विशिष्ट होर्मोन्स काढण्यात आले आहेत. घोड्याचे रक्त धनुर्वाताची लस म्हणून उपयोगात आणले जाते आणि रोगांचा प्रतिकार करण्यासाठी (जन्मानंतर) मानवाच्या अपरेतील रक्तातून गॅमा ग्लोब्युलिन बऱ्याच काळापर्यंत काढले आहे. काही इस्पितळांनी अपरे जपून ठेवून नंतर ती गोठवून ठेवली आणि मग गॅमा ग्लोब्युलिन काढण्यासाठी प्रतिपिंडातील रक्तावर काही प्रक्रिया करणे शक्य व्हावे म्हणून एखाद्या फार्मस्युटिकल प्रयोगशाळेने ते गोळा केले.
अलीकडेच, संशोधकांनी जन्मानंतरचे रक्त एक प्रकारच्या ल्युकेमियाचा उपचार करण्याकरता वापरण्यात यश मिळाल्याचा दावा केला आणि अशा प्रकारचे रक्त काही प्रतिकार यंत्रणाच्या बिघाडावर किंवा अस्थिमज्जा रोपणाऐवजी उपयोगात आणले जाऊ शकते असाही तर्क करण्यात आला आहे. यास्तव, काही प्रमाणात हे लोकप्रिय झाले, की काही पालकांनी मुलाच्या जन्मानंतरचे रक्त काढून घेऊन, गोठवून ठेवले आणि नंतर मग ते साठवून ठेवले जेणेकरून येणाऱ्या वर्षांमध्ये त्याचा उपयोग त्यांच्या मुलाच्या उपचाराकरता केला जाऊ शकेल.
अपरा रक्ताच्या अशा प्रकारच्या व्यापारामुळे, देवाच्या परिपूर्ण नियमाद्वारे आपल्या विचारसरणीने मार्गदर्शित होणारे खरे ख्रिस्ती मोहीत होत नाहीत. आपला निर्माणकर्ता रक्ताला पवित्र समजतो, ते देवाने दिलेल्या जीवनाचे प्रतिनिधीत्व करते. त्याने, बलिदानांच्या संबंधाने केवळ वेदीवरील रक्ताच्या उपयोगाला मान्यता दिली. (लेवीय १७:१०-१२; पडताळा रोमकर ३:२५; ५:८; इफिसकर १:७.) नाहीतर, एखाद्या प्राण्याचे रक्त जमिनीवर ओतले पाहिजे, ते फेकून दिले पाहिजे.—लेवीय १७:१३; अनुवाद १२:१५, १६.
ख्रिस्ती जेव्हा एखाद्या प्राण्याची शिकार करतात अथवा घरात कोंबडी वा बकरा कापतात तेव्हा ते त्यांतील रक्त पूर्णपणे जमिनीवर ओततात. त्यांना अक्षरशः ते जमिनीवर ओतण्याची गरज नाही, कारण येथे मुद्दा, रक्ताचा कोणताही उपयोग करण्याऐवजी ते फेकून देण्याचा आहे.
ज्या ख्रिश्चनांना इस्पितळात दाखल केले जाते त्यांना माहीत आहे, की त्यांच्या शरीरातून काढलेले जैव पदार्थ फेकले पाहिजेत, मग ते शारीरिक मल, रोगट ऊतक अथवा रक्त असो. होय, एखाद्या डॉक्टरला पहिल्यांदा, लघवीची तपासणी, अर्बुदयुक्त ऊतकाची विकृतिचिकित्सा तपासणी किंवा रक्तावरील चाचण्या यांसारख्या विशिष्ट चाचण्या करण्याची इच्छा असेल. पण त्यानंतर स्थानिय कायद्यानुसार ते पदार्थ नंतर फेकले जातात. इस्पितळातील रुग्णाला याविषयी खास विनंती करावी लागत नाही, कारण अशा प्रकारचे जैव पदार्थ फेकून देणे समंजसपणाचे व वैद्यकियरीत्या दूरदर्शीपणाचे आहे. जर एखाद्या रुग्णाकडे ही सामान्य पद्धत आचरली जाणार आहे याचे बळकट कारण आहे तर तो किंवा ती संबंधित डॉक्टरांना सांगू शकते की त्याला किंवा तिला धार्मिक कारणांमुळे हे जैव पदार्थ फेकून द्यायची इच्छा आहे.
परंतु, आधी उल्लेखल्याप्रमाणे, साधारण रुग्णाला याबद्दल चिंता करायची गरज नाही कारण अनेक ठिकांणी अशाप्रकारचे नष्टशेष व जन्मानंतरच्या अपऱ्याचा किंवा इतर जैव पदार्थांचा पुनः वापर करण्याचा विचार केला जात नाही अथवा ही पद्धत नित्याने आचरलीही जात नाही.
जानेवारी १, १९९७ च्या “टेहळणी बुरूज” नियतकालिकातील, “आपण वाईटाचा वीट मानू या,” हा लेख बालकामुकतेवर लक्ष केंद्रित करत होता असे दिसते. या प्रथेचे स्पष्टीकरण कसे करता येईल?
वेबस्टर्स नाईंथ न्यू कॉलेजिएट डिक्शनरी, “बालकामुकता” याची व्याख्या, “लैंगिक विकृती, मुलांना संभोग्य वस्तू म्हणून वापरले जाणे,” अशाप्रकारे करते. अनुवाद २३:१७, १८ मध्ये या प्रथेच्या पैलूंचे, खंडन करण्यात आले आहे. तेथे देव, मंदिर वेश्या (“किंवा, ‘केटामाईट,’ लैंगिक विकृतीच्या उद्देशासाठी ठेवलेला मुलगा,” NW, तळटीप) बनण्याविरुद्ध बोलला. या वचनांनी ‘यहोवाच्या घरात’ ‘कुत्र्याच्या’ प्राप्तीचा पैसा (“बहुधा, मुलाशी अनैतिक संबंध ठेवणारा; गुदमैथुन करणारा, विशेषकरून एखाद्या मुलाशी, NW, तळटीप) आणावयासही बंदी घातली. हे शास्त्रवचनीय व लौकिक संदर्भ सिद्ध करतात, की टेहळणी बुरूज नियतकालिक, एखाद्या प्रौढाने एखाद्या मुलाला लैंगिक गैरवर्तनासाठी उपभोग्य वस्तू बनवण्याविषयी तसेच कुरवाळण्याविषयी चर्चा करत होते.