यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास शिकवलेले
“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.”—स्तोत्र १४३:१०.
१, २. (अ) आपल्याला कधी शिकवले जावे व कोणता वास्तविक दृष्टिकोन मनी बाळगून? (ब) यहोवाकडून शिक्षण प्राप्त करणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?
जिवंत आणि क्रियाशील असलेल्या व्यक्तीला रोज काही तरी योग्य शिकवता येते. हे तुमच्याबाबतीत आणि इतरांच्या बाबतीतही खरे आहे. परंतु, मृत्यूनंतर काय होते? अशा अवस्थेत काहीही शिकवणे अथवा शिकणे शक्य नसते. बायबल स्पष्टपणे म्हणते मृतास, “काहीच कळत नाही.” शिओल अर्थात मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत ज्ञानाचे नाव नाही. (उपदेशक ९:५, १०) मग याचा अर्थ असा होतो का, की आपल्याला शिकवले जाणे, ज्ञान प्राप्त करणे व्यर्थ आहे? ते, आपल्याला काय शिकवले जाते व त्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो यावर अवलंबून आहे.
२ आपल्याला जर केवळ जगिक गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत तर मग आपल्याला चिरकालिक भवितव्य नाही. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे, सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांना सार्वकालिक जीवनाच्या हेतूने ईश्वरी इच्छा शिकवण्यात येत आहे. जीवन-प्रदायक ज्ञानाचा स्रोत यहोवा याजकडून शिकवले जाण्यावर ही आशा आधारित आहे.—स्तोत्र ९४:९-१२.
३. (अ) येशू देवाचा पहिला विद्यार्थी होता असे का म्हणता येते? (ब) मानवांना यहोवा शिकवणार होता याची खातरी आपल्याला कशी मिळते व कोणत्या परिणामासह?
३ देवाच्या ज्येष्ठ पुत्राला त्याचा पहिला विद्यार्थी या नात्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यास शिकवण्यात आले. (नीतिसूत्रे ८:२२-३०; योहान ८:२८) पर्यायाने, येशूने सूचित, केले की अगणित मानव आपल्या पित्याकडून शिकवण प्राप्त करतील. देवाकडून शिकणाऱ्या आपल्या सर्वांसाठी कोणत्या आशा आहेत बरे? येशू म्हणाला: “संदेष्ट्याच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. . . . मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.”—योहान ६:४५-४७.
४. ईश्वरी शिक्षणाचा लाखो लोकांवर कोणता प्रभाव होतो व त्यांच्यासमोर कोणत्या आशा आहेत?
४ येशू यशया ५४:१३ मधून अवतरण घेत होता, जे देवाची लाक्षणिक स्त्री, स्वर्गीय सियोन हिला संबोधण्यात आले होते. ती भविष्यवाणी खासकरून तिच्या पुत्रांना, येशू ख्रिस्ताचे १,४४,००० आत्म्याने अभिषिक्त शिष्य यांना लागू झाली आहे. त्या आध्यात्मिक पुत्रांपैकी शेष आज क्रियाशील आहे, विश्वव्यापी शैक्षणिक कार्यक्रमात अग्रगामी आहेत. परिणामी, लाखोंचा मिळून बनलेला “मोठा लोकसमुदाय” देखील यहोवाकडून शिक्षण प्राप्त करत असल्यामुळे लाभ मिळवत आहे. मृत्यूची आडकाठी न येता त्यांना हे शिक्षण प्राप्त करण्याची अनन्य आशा आहे. ते कसे? जलदगतीने येणाऱ्या “मोठ्या संकटातून” त्यांचा बचाव होणार आहे व परादीस पृथ्वीवरील अनंतकाळच्या जीवनाचा ते उपभोग घेणार आहेत.—प्रकटीकरण ७:९, १०, १३-१७.
देवाची इच्छा पूर्ण करण्यावर अधिक जोर
५. (अ) सन १९९७ चे वार्षिक वचन कोणते आहे? (ब) ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याविषयी आपल्याला कसे वाटले पाहिजे?
५ सन १९९७ दरम्यान, जगभरात ८०,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमधील यहोवाचे साक्षीदार स्तोत्र १४३:१० च्या सुरवातीच्या शब्दांना ध्यानात ठेवतील: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव.” १९९७ करता ते वार्षिक वचन असेल. राज्य सभागृहांमध्ये ठळकपणे लिहिलेले ते शब्द, ईश्वरी शिक्षण प्राप्त करण्याचे ठिकाण मंडळ्यांतील सभा आहेत जेथे आपण प्रशिक्षणाच्या चालत असलेल्या कार्यक्रमात भाग घेऊ शकतो याची उल्लेखनीय स्मरणिका ठरतील. सभांमध्ये आपल्या बांधवांसोबत आपल्या महान शिक्षकाकडून शिक्षण प्राप्त करताना आपल्याला स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटू लागेल ज्याने लिहिले: “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.”—स्तोत्र १२२:१; यशया ३०:२०.
६. दावीदाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण काय कबूल करतो?
६ होय, आपला शत्रू दियाबल याची इच्छा किंवा अपरिपूर्ण मानवांची इच्छा पूर्ण करण्याचे शिक्षण मिळण्याऐवजी देवाची इच्छा पूर्ण करण्याविषयी शिकवण मिळावी असे आपल्याला वाटते. यास्तव, आपण ज्या देवाची उपासना व सेवा करतो त्याला दावीदाप्रमाणे कबूल करतो: “कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.” (स्तोत्र १४३:१०) असत्य लोकांमध्ये मिसळण्याऐवजी, जेथे यहोवाची उपासना केली जाते अशा ठिकाणी राहण्याचे दावीदाने पसंत केले. (स्तोत्र २६:४-६) दावीदाच्या पावलांना देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन असल्यामुळे तो धार्मिकतेच्या मार्गावर चालू शकला.—स्तोत्र १७:५; २३:३.
७. देवाच्या आत्म्याने ख्रिस्ती मंडळीवर कसे कार्य केले आहे?
७ थोर दावीद, येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना याची खात्री दिली, की पवित्र आत्मा त्यांना सर्व गोष्टी शिकवील व त्याने त्यांना सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. (योहान १४:२६) पेन्टेकॉस्टपासून पुढे, यहोवा आपल्या लिखित वचनातील ‘देवाच्या गहन गोष्टींना’ प्रगतीशीलपणे प्रकट करत आहे. (१ करिंथकर २:१०-१३) हे, येशूने ज्याला ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ संबोधलेल्या दृश्य माध्यमाद्वारे केले. हा दास वर्ग, जगभरातील देवाच्या लोकांच्या मंडळ्यांकरता असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात विचारविमर्श होत असलेले आध्यात्मिक अन्न पुरवतो.—मत्तय २४:४५-४७.
आपल्या सभांमध्ये यहोवाची इच्छा शिकवली जाते
८. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या अभ्यासात सहभाग घेणे इतके मूल्याचे का आहे?
८ मंडळीच्या साप्ताहिक टेहळणी बुरूज नियतकालिकातील साहित्य अनेकदा बायबल तत्त्वांचे अनुसरण करण्याविषयी असते. यामुळे, निश्चितच आपल्याला जीवनाच्या चिंतांचा सामना करण्यास मदत मिळते. इतर अभ्यासांमध्ये गहन आध्यात्मिक सत्य अथवा बायबल भविष्यवाण्यांवर विचारविमर्श केला जातो. या अभ्यासांद्वारे आपल्याला किती शिकवले जाते! अनेक देशांमध्ये राज्य सभागृहे या सभांसाठी तुडुंब भरतात. तरीसुद्धा अनेक राष्ट्रांमध्ये सभांची उपस्थिती कमी होत चालली आहे. याचे कारण काय असावे असे तुम्हाला वाटते? कदाचित काही जण “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देण्यासाठी एकत्र येण्यामध्ये सांसारिक कामाला आडकाठी होऊ देत असावेत का? किंवा सामाजिक कार्यांमध्ये अथवा दूरचित्रवाणी पाहण्यात ते इतका वेळ खर्च करतात, की सर्व सभांना उपस्थित राहण्याकरता त्यांच्या वेळापत्रकात जागाच उरत नसावी? इब्री लोकांस १०:२३-२५ मधील प्रेरित आदेशाची आठवण करा. ‘तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपल्याला दिसते’ तसे, ईश्वरी प्रशिक्षणाकरता एकत्र जमणे आणखीनच महत्त्वपूर्ण नाही का?
९. (अ) सेवा सभा आपल्याला सेवेकरता सज्ज कसे करू शकते? (ब) साक्ष देण्याबाबत आपण कोणती मनोवृत्ती बाळगावी?
९ देवाचे सेवक या नात्याने त्याची सेवा करणे ही आपली सर्वात प्रमुख जबाबदारी आहे. हे आपण प्रभावीपणे कसे साध्य करू शकतो ते शिकवण्याकरता सेवा सभेची रचना करण्यात आली आहे. लोकांशी संभाषण कसे चालू करावे, काय बोलावे, अनुकूल प्रतिसाद मिळतो तेव्हा प्रतिक्रिया दाखवण्याची पद्धत, शिवाय लोक आपला संदेश नाकारतात तेव्हा काय करावे हे आपण शिकतो. (लूक १०:१-११) या साप्ताहिक सभांमध्ये प्रभावकारी पद्धतींची चर्चा व प्रात्यक्षिक केल्यामुळे आपण केवळ घरोघरीच नव्हे तर रस्त्यावर प्रचार करताना, वाहन तळावर, सार्वजनिक परिवहनात, विमानतळावर, व्यापारक्षेत्रांत किंवा शाळेत लोकांपर्यंत कसे पोहंचावे त्यासाठी उत्तमरीत्या तयार होतो. “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव,” या आपल्या विनवणीनुसार, आपल्या शिक्षकाने आर्जवले त्याप्रमाणे प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास आपल्याला आवडेल: “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी . . . तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.”—मत्तय ५:१६.
१०. ‘योग्य जणांना’ आपण खरोखरच कशी मदत करू शकतो?
१० मंडळीच्या या सभांमध्ये आपल्याला इतरांना शिष्य बनवण्यासही शिकवले जाते. आस्था आढळल्यास किंवा जेथे साहित्य देण्यात येते तेथे पुनर्भेट देण्यामागे गृह बायबल अभ्यास चालू करणे हा आपला हेतू आहे. एका अर्थाने हे, येशूने आज्ञापिलेल्या गोष्टी ‘योग्य जणांना’ शिकवण्यासाठी शिष्यांनी त्यांच्याच ‘येथे राहण्यासारखे’ आहे. (मत्तय १०:११; २८:१९, २०) सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाप्रमाणे इतर सर्वोत्तम साहाय्य आपल्याजवळ असल्यामुळे आपली सेवा पूर्णपणे साध्य करण्यासाठी आपण खरोखरच सुसज्ज आहोत. (२ तीमथ्य ४:५) तुम्ही प्रत्येक आठवडी, सेवा सभा आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेला उपस्थित राहता तेव्हा, फायदेकारक मुद्द्यांचे आकलन करून त्यांना उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे देवाची इच्छा पूर्ण करणारा योग्यता प्राप्त सेवक या नात्याने तुमची शिफारस होईल.—२ करिंथकर ३:३, ५; ४:१, २.
११. मत्तय ६:३३ मधील शब्दांवर काहींनी कशाप्रकारे विश्वास प्रदर्शित केला आहे?
११ देवाची इच्छा आहे, की आपण ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटावे.’ (मत्तय ६:३३) स्वतःस विचारा, ‘माझी [अथवा माझ्या सोबत्याची] प्रापंचिक नोकरी सभांना उपस्थित न राहण्याच्या आड येत असेल तर मला हे तत्त्व कसे लागू करता येईल?’ आध्यात्मिकरीत्या प्रौढ असलेले अनेक जण या बाबीविषयी आपल्या मालकांसोबत बोलण्याची पावले उचलतील. एका पूर्ण वेळेच्या सेविकेने तिच्या मालकाला सांगितले, की मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी तिला दर आठवडी सुटी हवी आहे. त्याने तिची विनंती मान्य केली. पण सभांमध्ये काय चालते याची त्याला उत्सुकता लागल्यामुळे त्याने त्या सभांना उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. तेथे त्याने येणाऱ्या प्रांतीय अधिवेशनाविषयीची एक घोषणा ऐकली. परिणामतः, त्या मालकाने अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस उपस्थित राहण्याची व्यवस्था केली. या उदाहरणावरून तुम्ही कोणता धडा घेऊ शकता?
ईश्वरी पालकांकडून यहोवाची इच्छा शिकलेले
१२. मुलांना यहोवाची इच्छा शिकवण्याकरता पालकांनी सहनशीलतेने व दृढपणे काय करावे?
१२ पण मंडळीच्या सभा व अधिवेशनेच केवळ ईश्वरी इच्छा पूर्ण करण्यास शिकवण्याची एकमात्र तरतूद नाही. ईश्वरी पालकांना आपल्या मुलांना यहोवाची स्तुती करण्यासाठी व त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तालीम, शिक्षा व त्यांचे संगोपन करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (स्तोत्र १४८:१२, १३; नीतिसूत्रे २२:६, १५) असे करण्यासाठी आपल्याला आपल्या ‘बालकांस’ सभांना घेऊन जाणे आवश्यक आहे जेथे ते “ऐकून शिकतील,” पण घरी त्यांना पवित्र लिखाणांतून शिकवण्याविषयी काय? (अनुवाद ३१:१२; २ तीमथ्य ३:१५) अनेक कुटुंबांनी नित्य कौटुंबिक बायबल अभ्यास सत्र अगदी निष्ठेने सुरू केले खरे, पण काही काळातच ते अनियमित झाले अथवा बंद पडले. तुमचाही असाच अनुभव आहे का? नियमित अभ्यासाची शिफारस अयोग्य होती किंवा तुमचे कुटुंब इतके आगळे आहे, की ती शिफारस तुमच्या कुटुंबात चालणारच नाही असा तुम्ही निष्कर्ष काढाल का? परिस्थिती कोणतीही असो, तुम्ही पालकांनो कृपया, ऑगस्ट १, १९९५ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील “आमचा समृद्ध आध्यात्मिक वारसा” आणि “चिकाटीची प्रतिफळे” या उत्तम लेखांची उजळणी करावी.
१३. दैनिक वचनावर विचारविमर्श केल्याने कुटुंबांना कसा लाभ होऊ शकतो?
१३ शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातील दैनिक वचनावर विचार करण्याची सवय लावून घेण्याचे उत्तेजन कुटुंबांना दिले जाते. केवळ वचन आणि त्याखालील विवेचने वाचणे चांगले आहे पण वचनाची चर्चा करणे व त्याचे अनुसरण करणे अधिक फायदेकारक आहे. उदाहरणार्थ, इफिसकर ५:१५-१७ वर विचार करताना कौटुंबिक सदस्य, व्यक्तिगत अभ्यासासाठी, पूर्ण वेळेच्या सेवेच्या एखाद्या प्रकारात भाग घेण्यासाठी व इतर ईश्वरशासित नेमणुकींना सांभाळण्यासाठी ‘वेळ कसा काढावा’ यावर तर्क करू शकतील. होय, दैनिक वचनाची कौटुंबिक चर्चा केल्याने एखाद्यास किंवा अनेकांना ‘यहोवाची इच्छा काय आहे हे [पूर्णपणे] समजून’ घेता येऊ शकते.
१४. पालकांनी कोणत्या प्रकारचे शिक्षक असावे असे अनुवाद ६:६, ७ सांगते व त्यासाठी काय करावे लागते?
१४ पालकांनी आपल्या मुलांचे दक्ष शिक्षक असले पाहिजे. (अनुवाद ६:६, ७) पण ही केवळ त्यांनी आपल्या मुलांना भाषण झाडत राहण्याची किंवा आज्ञा देत राहण्याची बाब नव्हे. आईवडिलांनी ऐकूनही घेतले पाहिजे अशारीतीने, की कशाचे विवरण केले पाहिजे, स्पष्टीकरण दिले पाहिजे, उदाहरण दिले पाहिजे किंवा वारंवार सांगितले पाहिजे याची त्यांना चांगली माहिती असली पाहिजे. एका ख्रिस्ती कुटुंबात पालक आपल्या मुलांना, त्यांना ज्या गोष्टी समजल्या नाहीत किंवा ज्याची त्यांना चिंता वाटते अशा गोष्टींबाबत प्रश्न विचारण्याचे उत्तेजन देण्याद्वारे मोकळ्या दळणवळणास उत्तेजित करतात. अशाप्रकारे त्यांना उमगले, की त्यांच्या एका किशोरवयीन मुलाला, यहोवाला सुरवात नाही हे समजण्यास कठीण जात होते. ते पालक, वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांतून वेळ आणि अंतराळाला सीमा नाहीत हे स्वीकारण्यात आल्याचे दाखवण्यासाठी त्या माहितीचा उपयोग करू शकले. ही माहिती उदाहरणादाखल वापरता आली आणि त्यांच्या मुलाचे समाधान झाले. तेव्हा, आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टरीतीने व शास्त्रवचनांतून देण्यासाठी वेळ काढा, देवाची इच्छा पूर्ण करण्याचे शिकल्याने समाधान मिळू शकते हे पाहण्यासाठी त्यांना मदत करा. आज देवाच्या लोकांना—तरुण व वृद्धांना—आणखी काय शिकवले जात आहे?
प्रीती करण्यास व झगडण्यास शिकवले जाते
१५. आपल्या बंधूप्रीतीच्या खरेपणाची परीक्षा केव्हा होऊ शकते?
१५ येशूच्या नवीन आज्ञेच्या एकवाक्यतेत आपल्याला ‘एकमेकांवर प्रीति करावी असे देवाने शिकवले आहे.’ (१ थेस्सलनीकाकर ४:९) सर्वकाही शांतीत व सुरळीत चाललेले असते तेव्हा आपल्याला वाटेल, की आपण आपल्या सर्व बांधवांवर प्रीती करतो. पण जेव्हा व्यक्तिगत मतभेद उद्भवतात किंवा दुसऱ्या एका ख्रिश्चनाने आपल्या बोलण्याद्वारे वा कृतीद्वारे आपल्याला दुःख दिल्यावर काय? अशा वेळी आपल्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा होऊ शकते. (पडताळा २ करिंथकर ८:८.) अशा प्रसंगी आपण काय करावे असे बायबल आपल्याला शिकवते? एक गोष्ट म्हणजे पूर्ण अर्थाने प्रीती दाखवण्यास झटणे. (१ पेत्र ४:८) आपलेच हित साधण्याऐवजी, लहानसहान गोष्टींवर प्रक्षोभित होण्याऐवजी, किंवा अपकार स्मरत राहण्याऐवजी सर्व पापांना प्रीतीने झाकू देण्यासाठी कार्य केले पाहिजे. (१ करिंथकर १३:५) हीच देवाची इच्छा आहे हे आपल्याला ठाऊक आहे कारण त्याचे वचन आपल्याला हेच शिकवते.
१६. (अ) ख्रिश्चनांना कोणत्या प्रकारच्या झगड्यात भाग घेण्यास शिकवले जाते? (ब) आपण सुसज्जित कसे आहोत?
१६ पुष्कळ जण प्रीती आणि झगडणे यांना जोडणार नाहीत, तरी दुसरी गोष्ट म्हणजे झगडण्याविषयी आपल्याला शिकवण्यात येते, पण हे वेगळ्या प्रकारचे झगडणे आहे. दावीदाच्या काळातील झगड्यात प्रत्यक्षात इस्राएलांच्या शत्रूंविरुद्ध झगडणे समाविष्ट होते तरी, आपले झगडणे कसे चालू ठेवावे याबद्दल शिकवावे म्हणून दावीदाने यहोवावर अवलंबून राहण्याचे जाणले. (१ शमुवेल १७:४५-५१; १९:८; १ राजे ५:३; स्तोत्र १४४:१) पण आज आपल्या झगडण्याबद्दल काय? आपली शस्त्रे दैहिक नाहीत. (२ करिंथकर १०:४) आपले झगडणे आध्यात्मिक आहे ज्याच्यासाठी आपण आध्यात्मिक शस्त्रसामग्रीने सुसज्ज असले पाहिजे. (इफिसकर ६:१०-१३) यहोवा, आपल्या वचनाद्वारे आणि एकत्रित केलेल्या आपल्या लोकांद्वारे यशस्वी आध्यात्मिक लढाई करण्यास शिकवतो.
१७. (अ) आपल्याला परावृत्त करण्यासाठी दियाबल कोणत्या युक्त्यांचा वापर करतो? (ब) आपण सुज्ञपणे काय टाळावे?
१७ फसव्या, धूर्त मार्गांनी दियाबल नेहमी आपले लक्ष वळवण्याच्या प्रयत्नात जगिक गोष्टी, धर्मत्यागी आणि सत्याच्या इतर विरोधकांचा उपयोग करतो. (१ तीमथ्य ६:३-५, ११; तीत ३:९-११) जणू काय आपल्यावर थेट, समोरून हल्ला करून मात करण्याची कमी शक्यता त्याला दिसत असल्यामुळे तो, आपल्याला, काहीही आध्यात्मिक मूल्य नसलेली गाऱ्हाणी व मूर्ख शंका व्यक्त करण्यास लावून अडखळविण्याचा प्रयत्न करतो. जागृत योद्ध्यांप्रमाणे समोरून होणाऱ्या हल्ल्याच्या वेळी आपण जसे जागृत असतो त्याचप्रकारे अशा धोक्यांच्या वेळीही जागृत असले पाहिजे.—१ तीमथ्य १:३, ४.
१८. येथूनपुढे स्वतःकरता न जगण्यात वास्तविकपणे काय गोवले आहे?
१८ मनुष्यांच्या मनोकामनांना किंवा राष्ट्रांच्या इच्छांना आपण बढावा देत नाही. यहोवाने येशूच्या उदाहरणाद्वारे आपल्याला शिकवले, की येथूनपुढे आपण स्वतःसाठी नव्हे तर देवाच्या इच्छेकरता जगावे; उलट, ख्रिस्त येशूने जी मनोवृत्ती धारण केली तीच मनोवृत्ती आपण धारण करावी. (२ करिंथकर ५:१४, १५) गत काळात आपली कदाचित अतिशय असभ्य, बदफैली जीवनशैली असेल, आपण मौल्यवान वेळ फुकट घालवला असेल. मौजमजा, मद्यासक्ती व अनैतिकता या दुष्ट जगाची गुणलक्षणे आहेत. आता देवाची इच्छा करण्यास आपल्याला शिकवल्यामुळे या भ्रष्ट जगापासून आपल्याला वेगळे करण्यात आले याबद्दल आपण कृतज्ञ नाही का? मलिन करणाऱ्या जगिक रूढींमध्ये गुरफटण्याचे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिकरीत्या जोरदारपणे झगडू या.—१ पेत्र ४:१-३.
लाभ प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःला शिकवणे
१९. यहोवाची इच्छा शिकवल्यानंतर त्यानुसार वागल्याने कोणते फायदे मिळू शकतात?
१९ यहोवाची इच्छा करण्यास शिकवल्याने आपला मोठा लाभ होतो हे जाणणे आवश्यक आहे. त्याचा पुत्र तसेच त्याचे वचन आणि एकत्रित लोक यांद्वारे तो ज्या सूचना देतो त्या आधी शिकून त्यांचे अनुसरण करण्यासाठी आपण होता होईल तितके लक्ष दिले पाहिजे हे समजण्याजोगे आहे. (यशया ४८:१७, १८; इब्री लोकांस २:१) असे केल्याने या संकटमय काळात दृढ उभे राहण्यास आपण बळकट होऊ व पुढे येणाऱ्या वादळांचा सामना करू शकू. (मत्तय ७:२४-२७) आताही आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करून त्याला संतुष्ट करता येईल व आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात याची खातरी करता येईल. (योहान ९:३१; १ योहान ३:२२) आणि आपण अस्सल आनंदाचा उपभोग घेऊ शकू.—योहान १३:१७.
२०. १९९७ च्या संपूर्ण वर्षभर वार्षिक वचन पाहिल्यावर कशावर मनन करणे बरे होईल?
२० १९९७ वर्षादरम्यान आपल्याला, “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव” हे स्तोत्र १४३:१० चे वार्षिक वचन वाचण्याची व त्यावर विचार करण्याची संधी अनेकदा मिळेल. असे करत असताना, वर सांगितल्याप्रमाणे, आपल्याला शिकवण्याकरता देवाने पुरवलेल्या तरतुदींवर मनन करण्यासाठी आपण काही प्रसंगांचा उपयोग करू या. आणि त्या शब्दांवरील मनन, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो,” हे ध्यानात ठेवून त्या विनवणीशी सुसंगतपणे कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करणारे ठरो.—१ योहान २:१७.
तुमचे काय उत्तर आहे?
◻ यहोवाची इच्छा करण्यास आज कोणाला शिकवले जात आहे?
◻ १९९७ दरम्यान स्तोत्र १४३:१० चा आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?
◻ यहोवाची इच्छा करण्यास आपल्याला कसे शिकवले जाते?
◻ ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना शिकवताना काय करण्याची अपेक्षा केली जाते?