वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१५ पृ. २६-२८
  • लुदिया आदरातिथ्य करणारी देवाची उपासक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लुदिया आदरातिथ्य करणारी देवाची उपासक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘जांभळ्या वस्त्रांची विक्रेती’
  • फिलिप्पैमध्ये पौलाचा प्रचार
  • “देवाची भक्‍ति करणारी”
  • “आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली”
  • फिलिप्पैमधील बांधव
  • “मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवाचे वचन प्रबल होते!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • आपल्याला एकमेकांची गरज आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१५ पृ. २६-२८

लुदिया आदरातिथ्य करणारी देवाची उपासक

प्राचीन काळापासून आदरातिथ्याच्या बाबतीत खऱ्‍या देवाच्या सेवकांनी स्वतःला इतरांपासून वेगळे असल्याचे शाबीत केले आहे. (उत्पत्ति १८:१-८; १९:१-३) “आगंतुकासाठी असणारे प्रेम, स्नेहभाव किंवा कृपा,” अशी आदरातिथ्याची व्याखा केली जाते; प्रामाणिक अंतःकरणामुळे आदरातिथ्य उस्फुर्तपणे केले जाते आणि आज देखील ते खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचे चिन्ह आहे. खरे तर, देवाची स्वीकार्हार्यपणे उपासना करणाऱ्‍या सर्वांकडून या गोष्टीची अपेक्षा केली जाते.—इब्री लोकांस १३:२; १ पेत्र ४:९.

ज्या व्यक्‍तीने एका आदर्श पद्धतीने आदरातिथ्य दाखविले ती व्यक्‍ती होती लुदिया. फिलिप्पैला भेट देणाऱ्‍या मिशनऱ्‍यांनी आपल्या घरी राहावे म्हणून तिने त्यांना ‘आग्रहाची विनंती’ केली. (प्रेषितांची कृत्ये १६:१५) लुदियाचा शास्त्रवचनांमध्ये त्रोटकपणे उल्लेख असला तरी तिच्याबद्दल जे काही थोडेफार सांगण्यात आले आहे ते आपल्याला उत्तेजन देणारे ठरू शकते. कोणत्या प्रकारे? लुदिया कोण होती? आपल्याला तिच्याबद्दल काय ठाऊक आहे?

‘जांभळ्या वस्त्रांची विक्रेती’

मासेदोनियातील फिलिप्पै या प्रमुख शहरात लुदिया राहात असे. तथापि, ती पाश्‍चिमात्य आशिया मायनरच्या लुदिया प्रदेशातील थुवतीरा नगराची होती. या कारणास्तव फिलिप्पैमध्ये तिला “लुदिया” हे टोपणनाव दिले होते, असे काहीजण म्हणतात. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, येशू ख्रिस्ताने साक्ष दिलेल्या स्त्रीला ज्याप्रमाणे “शोमरोनी स्त्री” म्हटले जाऊ शकते अगदी त्याचप्रमाणे ती एक “लुदियन” होती. (योहान ४:९) लुदिया “जांभळी वस्त्रे” किंवा त्या रंगाने रंगविलेल्या इतर चीजवस्तू विकत असे. (प्रेषितांची कृत्ये १६:१२, १४) थुवतीरा आणि फिलिप्पै येथे रंग बनविणाऱ्‍यांचे अस्तित्व होते, हे पुराणवस्तू संशोधकांनी उत्खनन केलेल्या कोरीव लेखांवरून स्पष्ट होते. या गोष्टीची शक्यता आहे, की लुदियाने तिच्या नोकरीमुळे, किंबहुना तिच्या व्यवसायामुळे किंवा थुवतीरामधील रंग बनविणाऱ्‍या कंपनीची प्रतिनिधी म्हणून स्थानांतर केले असावे.

जांभळा रंग विभिन्‍न पद्धतीने तयार करणे शक्य होते. सर्वात महागडा जांभळा रंग विशिष्ट प्रकारच्या सागरी शिंपल्यांपासून तयार केला जात असे. पहिल्या शतकातील मार्शल नामक रोमी कवीच्या अनुसार सोर (दुसरे ठिकाण जेथे अशा घटकांचे उत्पादन केले जात होते) जेथे उत्तम जांभळ्या रंगाच्या कपड्यांची किंमत १०,००० सेस्टेअर्सेस किंवा २,५०० दिनारी होऊ शकत होती; ही किंमत नोकराच्या २,५०० दिवसांच्या पगारा इतकी होऊ शकत होती. स्पष्टपणे, ही उंची वस्त्रे असल्यामुळे ती काही जणांनाच घेणे शक्य होते. यास्तव, लुदिया आर्थिकदृष्ट्या कदाचित संपन्‍न असावी. वास्तविकता काहीही असली तरी प्रेषित पौल आणि त्याचे सोबती—लूक, सीला, तीमथ्य आणि कदाचित इतरांचे देखील आदरातिथ्य करणे तिला शक्य झाले.

फिलिप्पैमध्ये पौलाचा प्रचार

सा. यु. ५० वर्षाच्या आसपास पौलाने युरोपमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले आणि फिलिप्पैमध्ये प्रचार करण्यास सुरवात केली.a तो नवीन शहरात जात असे तेव्हा, सभास्थानात जमा होणाऱ्‍या यहुदी आणि यहुदीय मतानुसारी लोकांना प्रचार करण्यासाठी पहिल्यांदा तेथे जाण्याचा पौलाचा प्रघात होता. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १३:४, ५, १३, १४; १४:१.) तथापि, इतर माहितीनुसार, फिलिप्पैच्या “पवित्र मर्यादांमध्ये” यहुद्यांना त्यांच्या स्वतःच्या धर्माचे पालन करण्यास रोमी कायद्याने बंदी घातली होती. यामुळे तेथे “काही दिवस” घालविल्यानंतर शब्बाथाच्या दिवशी मिशनऱ्‍यांना शहराच्या वेशीबाहेर नदीकाठी एक ठिकाण आढळले जेथे ‘प्रार्थनेची जागा असल्याचे त्यांना वाटले.’ (प्रेषितांची कृत्ये १६:१२, १३) स्पष्टपणे ती गॉन्गीटीस नदी होती. मिशनऱ्‍यांना तेथे केवळ स्त्रिया आढळल्या त्यांपैकी लुदिया ही एक होती.

“देवाची भक्‍ति करणारी”

लुदिया “देवाची भक्‍ति करणारी” होती, परंतु धार्मिक सत्याच्या शोधात ती यहुदीय मतानुसारी झाल्याची शक्यता आहे. लुदियाला चांगली नोकरी होती, तरी ती भौतिकवादी नव्हती. उलटपक्षी, आध्यात्मिक बाबींसाठी तिने वेळ राखून ठेवला होता. “तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले,” आणि लुदियाने सत्याचा स्वीकार केला. खरे तर, ‘तिने आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतला.’—प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५.

लुदियाच्या घराण्यातील इतर सदस्य कोण होते, याविषयी बायबल स्पष्टपणे उल्लेख करत नाही. तिच्या पतीचा उल्लेख नसल्यामुळे ती सडी किंवा विधवा असावी. कदाचित ‘तिचे घराणे’ नातेवाईकांचे मिळून बनले असावे, परंतु या संज्ञेमध्ये दासांचा आणि नोकरांचा देखील समावेश होऊ शकतो. वास्तविकता काहीही असली तरी लुदियाने शिकलेल्या गोष्टींची तिच्यासोबत राहणाऱ्‍यांशी आवेशाने सहभागिता केली. त्यांनी विश्‍वास ठेवला आणि खऱ्‍या विश्‍वासास आपलेसे करून घेतले तेव्हा तिला किती आनंद झाला असेल!

“आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली”

लुदियाशी भेट होण्यापूर्वी मिशनऱ्‍यांना कदाचित स्वखर्चाने प्राप्त केलेल्या निवासांवर समाधान मानावे लागत होते. परंतु मिशनऱ्‍यांसाठी पर्यायी निवासांची व्यवस्था करण्यास शक्य झाल्याने ती आनंदित होती. खरे तर तिला असे करण्यासाठी फार आग्रह करावा लागला कारण पौलाने आणि त्याच्या सोबत्यांनी तिच्याकडे राहण्यास काही प्रमाणात नापसंती दाखवली होती. का? पौलाला असे वाटत होते, की ‘त्याने सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की, त्याने सुवार्तेविषयीच्या आपल्या हक्काचा दुरूपयोग करू नये’ आणि इतर कोणावरही भार होऊ नये. (१ करिंथकर ९:१८; २ करिंथकर १२:१४) परंतु लूक पुढे म्हणतो: “मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, मी प्रभूवर विश्‍वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.” (प्रेषितांची कृत्ये १६:१५) यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या बाबतीत लुदिया विशेष जागरूक होती आणि तिने केलेले आदरातिथ्य स्पष्टपणे तिच्या विश्‍वासाचा एक पुरावा होता. (पडताळा १ पेत्र ४:९.) किती उत्तम हे उदाहरण! आपण आपल्या मालमत्तेचा उपयोग सुवार्तेच्या प्रसारास बढती देण्यासाठी करतो का?

फिलिप्पैमधील बांधव

भूत लागलेल्या दासी-मुलीच्या घटनेनंतर पौल व सीला यांची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा ते लुदियाच्या घरी गेले आणि तेथे त्यांना काही बांधव असल्याचे आढळले. (प्रेषितांची कृत्ये १६:४०) नवीनच स्थापन झालेल्या फिलिप्पैमधील मंडळीतील विश्‍वासू जणांनी लुदियाच्या घराचा सभेचे नियमित ठिकाण म्हणून कदाचित उपयोग केला असावा. शहरातील ईश्‍वरशासित कार्यासाठी तिचे घर केंद्र असावे, असा विचार करणे तर्कसंगत आहे.

लुदियाने सुरवातीला दाखविलेल्या सस्नेह आदरातिथ्याने संपूर्ण मंडळीच्या वैशिष्ट्यास सिद्ध केले. फिलिप्पैकरांची नाजूक परिस्थिती असतानाही त्यांनी कित्येक प्रसंगी पौलास आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टी पुरवल्या आणि त्याविषयी तो कृतज्ञ होता.—२ करिंथकर ८:१, २; ११:९; फिलिप्पैकर ४:१०, १५, १६.

पौलाने सुमारे सा. यु ६०-६१ मध्ये फिलिप्पैकरांना जे पत्र लिहिले त्यात लुदियाचा उल्लेख नाही. प्रेषितांची कृत्ये अध्याय १६ मध्ये ज्या घटना सांगितल्या आहेत त्यानंतर लुदियाचे काय झाले याविषयी शास्त्रवचने काही माहिती देत नाहीत. तथापि, या जोरदार स्त्रीचा थोडक्यात केलेला उल्लेख “आतिथ्य करण्यात तत्पर” असण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो. (रोमकर १२:१३) आपल्यामध्ये लुदियाप्रमाणे ख्रिस्ती जण असल्यामुळे आपण किती कृतज्ञ आहोत! त्यांचा आत्मा यहोवा देवाच्या गौरवास्तव मंडळ्यांमध्ये स्नेहभाव आणि मैत्रिपूर्ण वातावरण राखण्यासाठी पुष्कळ काही करतो.

[तळटीपा]

a मासेदोनियाच्या अति महत्त्वपूर्ण शहरांमध्ये, फिलिप्पै हे तुलनात्मकरीत्या यास इटॅलीकम (इटॅलिक लॉ) याद्वारे प्रशासित असून समृद्ध लष्करी वसाहतीचे शहर होते. रोमी नागरिक ज्याप्रमाणे प्राधिकाराच्या शाश्‍वतीचा आनंद घेत होते अगदी त्याचप्रमाणे या कायद्याने फिलिप्पैकरांच्या प्राधिकाराची फिलिप्पैकरांना शाश्‍वती दिली.—प्रेषितांची कृत्ये १६:९, १२, २१.

[२८ पानांवरील चौकट]

फिलिप्पैमधील यहुदी जीवन

यहुदी आणि यहुदीय मतानुसारी यांच्यासाठी फिलिप्पैमधील जीवन निश्‍चितच इतके सोपे नसावे. तेथे कदाचित यहुदी-विरोधी भावना असल्या असतील यामुळेच पौलाच्या भेटीच्या काही काळापूर्वी सम्राट क्लौद्याने यहुद्यांना रोममधून घालवून दिले होते.—पडताळा प्रेषितांची कृत्ये १८:२.

सार्थपणे, नशीब सांगण्याची शक्‍ती असलेल्या दासी-मुलीला बरे केल्यामुळे पौल आणि सीला यांना धरून अंमलदारांकडे नेण्यात आले. तिच्या मालकाने लाभप्रद पैसे मिळविण्याचे साधन आता गमावले होते त्यामुळे त्याने त्याच्या सोबत असणाऱ्‍या नागरिकांच्या पूर्वग्रहाचा असे म्हणून फायदा उठवला: “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.” (तिरपे वळण आमचे.) याचा परिणाम म्हणून पौल आणि सीला यांना छड्या मारण्यात आल्या व बंदिशाळेत टाकण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १६:१६-२४) अशा परिस्थितीत, यहुद्यांच्या देवाची अर्थात यहोवाची मुक्‍तपणे उपासना करण्यासाठी धैर्याची आवश्‍यकता होती. परंतु स्पष्टपणे, लुदियाची वेगळे राहण्यात काहीही हरकत नव्हती.

[२७ पानांवरील चित्रं]

फिलिप्पैमधील भग्नावेशष

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा