वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१५ पृ. १०-१५
  • सर्वांना देवाला हिशेब द्यावयाचा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वांना देवाला हिशेब द्यावयाचा आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूतांना हिशेब द्यायचा आहे
  • देवाच्या पुत्राला हिशेब द्यायचा आहे
  • राष्ट्र या नात्याने हिशेब द्यायचा आहे
  • व्यक्‍तिगतपणे जबाबदार असलेल्यांची उदाहरणे
  • ख्रिस्ती मंडळीत हिशेब देणे
  • यहोवा तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आपल्याला एकमेकांची गरज आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१५ पृ. १०-१५

सर्वांना देवाला हिशेब द्यावयाचा आहे

“आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.”—रोमकर १४:१२.

१. आदाम आणि हव्वेच्या स्वातंत्र्यावर कोणत्या मर्यादा घातल्या होत्या?

यहोवा देवाने आपल्या पहिल्या मानवी पालकांना, आदाम आणि हव्वेला स्वतंत्र नैतिक प्राणी असे निर्माण केले. ते देवदूतांपेक्षा खालच्या श्रेणीत असले तरी, सुज्ञ निर्णय घेण्याची क्षमता असणारे बुद्धिमान प्राणी होते. (स्तोत्र ८:४, ५) पण, देवाने दिलेले हे स्वातंत्र्य स्वयंनिर्णय घेण्याकरता परवाना नव्हता. ते देवासमोर जबाबदार होते, आणि ही जबाबदारी त्यांच्या सर्व संततीला मिळाली.

२. यहोवा लवकरच कोणता हिशेब घेणार आहे व का?

२ आपण आता या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या कळसाच्या जवळ जात असल्यामुळे यहोवा पृथ्वीवरील सर्वांकडून हिशेब घेणार आहे. (पडताळा रोमकर ९:२८.) लवकरच, अभक्‍त लोकांना पृथ्वीवरील साधनसंपत्तीची नासाडी केल्याबद्दल, मानवी जीवनाचा नाश केल्याबद्दल आणि विशेषकरून यहोवा देवाच्या सेवकांचा छळ केल्याबद्दल त्याला हिशेब द्यावा लागेल.—प्रकटीकरण ६:१०; ११:१८.

३. आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

३ ही विचारशील भावी आशा आपल्या समोर असल्यामुळे यहोवाने गत काळातील त्याच्या प्राण्यांसोबत कसा व्यवहार केला यावर मनन करणे आपल्याकरता फायदेकारक आहे. आपल्या निर्माणकर्त्याला व्यक्‍तिगतपणे स्वीकारयोग्य हिशेब देण्यास शास्त्रवचने आपली कशी मदत करू शकतात? कोणती उदाहरणे मदतदायी असू शकतात व कोणत्या उदाहरणांचे अनुकरण करणे आपण टाळले पाहिजे?

देवदूतांना हिशेब द्यायचा आहे

४. देवदूतांकडून देव त्यांच्या कृत्याचा हिशेब घेतो हे आपल्याला कसे माहीत होते?

४ स्वर्गातील यहोवाच्या देवदूतांना आपल्याप्रमाणेच हिशेब द्यायचा आहे. नोहाच्या दिवसातील प्रलयाआधी, काही देवदूतांनी स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आज्ञाभंजकपणे मानवी शरीरे धारण केली. हे आत्मिक प्राणी स्वतंत्र नैतिक प्राणी असल्यामुळे हा निर्णय घेऊ शकले, पण देवाने त्यांना जबाबदार ठरवले. जेव्हा हे आज्ञाभंजक देवदूत आत्मिक क्षेत्रात परतले तेव्हा यहोवा देवाने त्यांना त्यांची मूळ स्थिती पुन्हा प्राप्त करू दिली नाही. शिष्य यहुदा आपल्याला सांगतो की त्यांना “निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले” आहे.—यहूदा ६.

५. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना कोणता पाडाव सहन करावा लागला आणि त्यांच्या बंडाळीचा हिशेब कसा घेतला जाईल?

५ दियाबल सैतान हा या आज्ञाभंजक देवदूतांचा किंवा दुरात्म्यांचा शासक आहे. (मत्तय १२:२४-२६) या दुष्ट देवदूताने आपला निर्माणकर्ता यहोवा याच्याविरुद्ध बंड केले व त्याच्या सार्वभौमत्वाच्या अधिकाराला आव्हान केले. सैतानाने आपल्या पहिल्या पालकांना पापाकडे नेले ज्यामुळे कालांतराने त्यांचा मृत्यू घडला. (उत्पत्ति ३:१-७, १७-१९) त्यानंतर, काही काळासाठी यहोवा देवाने सैतानाला स्वर्गीय न्यायालयात येण्याची परवानगी दिली असली तरी, बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकाने भाकीत केले, की देवाच्या नियुक्‍त समयी या दुष्टाला पृथ्वीच्या सान्‍निध्यात खाली टाकण्यात येईल. पुरावा शाबीत करतो की हे, येशू ख्रिस्ताला १९१४ मध्ये राज्यसत्ता मिळाल्यानंतर काही काळातच घडले. कालांतराने, दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांचा चिरकालासाठी नाश केला जाईल. सरतेशेवटी सार्वभौमत्वाचा वादविषय सोडवल्यानंतर बंडाळीचा हिशेब न्याय्यपणे घेतला जाईल.—ईयोब १:६-१२; २:१-७; प्रकटीकरण १२:७-९; २०:१०.

देवाच्या पुत्राला हिशेब द्यायचा आहे

६. पित्याला हिशेब देण्याबद्दल येशूचा काय दृष्टिकोन आहे?

६ देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने केवढे उत्तम उदाहरण मांडले! आदामाच्या बरोबरीचा परिपूर्ण मनुष्य या नात्याने, येशूला ईश्‍वरी इच्छा पूर्ण करण्यास आनंद वाटला. तसेच यहोवाच्या नियमांचे अनुपालन केल्याबद्दलचा हिशेब देण्यासही तो खूष होता. त्याच्याविषयी स्तोत्रकर्त्याने अगदी उचितपणे भविष्यवाणी केली: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तोत्र ४०:८; इब्री लोकांस १०:६-९.

७. येशू, आपल्या मृत्यूच्या सायंकाळी प्रार्थना करत असताना योहान १७:४, ५ मधील शब्द का उच्चारू शकला?

७ येशूला द्वेषपूर्ण विरोध अनुभवावा लागला तरी, त्याने देवाच्या इच्छेची पूर्तता केली आणि वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत सचोटी राखली. याद्वारे त्याने आदामाच्या पापामुळे आलेल्या मरणप्राय परिणामांतून मानवजातीला सोडवण्यासाठी खंडणीचे मोल सादर केले. (मत्तय २०:२८) यास्तव, त्याच्या मृत्यूच्या सायंकाळी, येशू पूर्ण आत्मविश्‍वासाने अशी प्रार्थना करू शकला: “जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.” (योहान १७:४, ५) येशू, हिशेब द्यायच्या परिक्षेला यशस्वीरीत्या पार पाडू शकल्यामुळे व देवाला स्वीकारयोग्य असल्यामुळे हे शब्द त्याच्या स्वर्गीय पित्यासमोर बोलू शकला.

८. (अ) आपल्याला यहोवा देवास हिशेब द्यायचा आहे हे पौलाने कसे दाखवले? (ब) देवाची स्वीकृती प्राप्त करण्यास काय आपल्याला मदत करील?

८ येशू ख्रिस्त परिपूर्ण मानव होता; पण आपण अपरिपूर्ण आहोत. तरीदेखील आपल्याला देवाला हिशेब द्यायचा आहे. प्रेषित पौल म्हणाला: “तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, प्रभु म्हणतो, “‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.’” तर मग आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१०-१२) असे करण्याकरता व यहोवाकडून स्वीकृती मिळवण्याकरता त्याने प्रेमळपणे आपल्याला एक विवेक, तसेच आपण जे काही बोलतो व करतो त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शित करण्यासाठी त्याचे प्रेरित वचन, बायबल दिले आहे. (रोमकर २:१४, १५; २ तीमथ्य ३:१६, १७) यहोवाच्या आध्यात्मिक तरतुदींचा पूर्ण लाभ घेतल्याने व आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचे अनुकरण केल्याने आपल्याला देवाची स्वीकृती प्राप्त करण्यास मदत होईल. (मत्तय २४:४५-४७) यहोवाचा पवित्र आत्मा, किंवा त्याची कार्यकारी शक्‍ती, बळ आणि मार्गदर्शन देण्यात आणखी भर घालते. आत्म्याच्या निदेशनाच्या व आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या मार्गदर्शनाच्या एकोप्यात कार्य केल्यास, आपल्या कृत्यांसाठी आपल्याला ज्याला हिशेब द्यायचा आहे त्या ‘देवाचा अव्हेर’ आपण करत नाही हे दाखवून देतो.—१ थेस्सलनीकाकर ४:३-८; १ पेत्र ३:१६, २१.

राष्ट्र या नात्याने हिशेब द्यायचा आहे

९. अदोमी लोक कोण होते आणि इस्राएल लोकांबरोबर त्यांनी केलेल्या व्यवहाराबद्दल त्यांचे काय झाले?

९ यहोवा राष्ट्रांकडूनही हिशेब घेतो. (यिर्मया २५:१२-१४; सफन्या ३:६, ७) मृत समुद्राच्या दक्षिणेस व अक्वाबा आखाताच्या उत्तरेस वसलेल्या प्राचीन अदोम राज्याचा विचार करा. अदोमी लोक शेमचे वंशज, इस्राएल लोकांचे जवळचे नातेवाईक होते. एसाव अदोमी लोकांचा पूर्वज अब्राहामाचा नातू असला तरी, इस्राएल लोकांना अदोममधून “राजमार्गाने” वाग्दत्त देशात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. (गणना २०:१४-२१) अनेक शतकांपासून अदोमचा इस्राएल लोकांबद्दल कट्टा द्वेष वाढत गेला. सरतेशेवटी, सा. यु. पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी लोकांना जेरुसलेमचा नाश करण्यास भाग पाडल्याबद्दल अदोमी लोकांना हिशेब द्यावा लागला. (स्तोत्र १३७:७) सा. यु. पू. सहाव्या शतकात राजा नबोनिडसच्या अधिकाराखाली बॅबिलोनी सैन्याने अदोमवर विजय मिळवला आणि यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे ते निर्जन झाले.—यिर्मया ४९:२०; ओबद्या ९-११.

१०. मोआबी लोकांनी इस्राएल लोकांबरोबर कसा व्यवहार केला व देवाने मोआबी लोकांकडून कसा हिशेब मागितला?

१० मोआबाचे यापेक्षा काही वेगळे घडले नाही. मोआबी राज्य, अदोमच्या उत्तरेस आणि मृत समुद्राच्या पूर्वेस होते. इस्राएली लोक वाग्दत्त देशात प्रवेश करण्याआधी मोआबी लोकांनी त्यांना आदरातिथ्य दाखवले नाही, खरे तर फक्‍त आर्थिक फायद्यासाठी त्यांना भाकर आणि पाणी दिले. (अनुवाद २३:३, ४) मोआबचा राजा बालाकने इस्राएलला शाप देण्यासाठी बलाम या भाडोत्री संदेष्ट्याचा उपयोग केला व इस्राएली पुरुषांना अनैतिकता व मूर्तिपूजा करण्यास भाग पाडण्यासाठी मोआबी स्त्रियांचे आमिष दाखवण्यात आले. (गणना २२:२-८; २५:१-९) परंतु, इस्राएलविषयी मोआबला असलेल्या द्वेषाकडे यहोवाने कानाडोळा केला नाही. भविष्यवाणी केल्याप्रमाणे, बॅबिलोनी सैन्याने मोआबचा पूर्णपणे विध्वंस केला. (यिर्मया ९:२५, २६; सफन्या २:८-११) होय, देवाने मोआबचा हिशेब घेतला.

११. मोआब आणि अम्मोन कोणत्या शहरांप्रमाणे झाले आणि सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाविषयी बायबल भविष्यवाण्या काय सूचित करतात?

११ केवळ मोआबच नव्हे तर अम्मोनला देखील देवाला हिशेब द्यावा लागला. यहोवाने पूर्वीच सांगितले होते: “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोऱ्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील.” (सफन्या २:९) देवाने ज्याप्रमाणे सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश केला होता त्याप्रमाणे मोआब व अम्मोन यांचा नाश करण्यात आला. लंडनच्या भूगर्भशास्त्र संस्थेनुसार, मृत समुद्राच्या पूर्व किनाऱ्‍यावरील नाश पावलेल्या सदोम आणि गमोराच्या ठावठिकाणांचा शोध लागल्याचा दावा संशोधक करतात. याबाबतीत आणखी विश्‍वसनीय पुरावा प्रकाशझोतात येणे बाकी असल्यास तो, सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाला देखील यहोवा देवास हिशेब द्यावा लागेल या गोष्टीला सूचित करणाऱ्‍या बायबल भविष्यवाणींना आधार देऊ शकतो.—२ पेत्र ३:६-१२.

१२. इस्राएलला त्याच्या पातकांसाठी देवाला हिशेब द्यावा लागला तरी यहुदी शेषाविषयी काय भाकीत करण्यात आले होते?

१२ इस्राएलने यहोवाची खूप मर्जी प्राप्त केली असली तरी, त्याला देवाला आपल्या पापांचा हिशेब द्यावा लागला. येशू ख्रिस्त इस्राएल राष्ट्रात आला तेव्हा बहुतेकांनी त्याला नाकारले. केवळ एका शेष वर्गाने त्याच्यावर विश्‍वास प्रदर्शित केला आणि त्याचे अनुयायी बनले. “यशयाहि इस्राएलाविषयी असे पुकारतो की, ‘जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल; कारण प्रभु आपले वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.’ त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले: ‘जर सेनाधीश प्रभुने आम्हासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो,’” असे लिहिताना पौलाने विशिष्ट भविष्यवाण्या या यहुदी शेषास लागू केल्या. (रोमकर ९:२७-२९; यशया १:९; १०:२२, २३) प्रेषिताने एलियाच्या काळातील बआलापुढे गुडघे न टेकवणाऱ्‍या त्या ७,००० लोकांचे उदाहरण उद्धृत केले व मग म्हटले: “तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे.” (रोमकर ११:५) हा शेष व्यक्‍तिगतपणे देवाला जबाबदार असलेल्या व्यक्‍तींचा मिळून बनला होता.

व्यक्‍तिगतपणे जबाबदार असलेल्यांची उदाहरणे

१३. काईनाने आपला भाऊ हाबेल याचा वध केल्यानंतर देवाने त्याच्या कृत्याचा हिशेब मागितला तेव्हा काय घडले?

१३ बायबलमध्ये व्यक्‍तिगतपणे यहोवाला जबाबदार असलेल्यांच्या अनेक घटना आहेत. आदामाचा ज्येष्ठ पुत्र काईन याचे उदाहरण घ्या. तो आणि त्याचा भाऊ हाबेल या दोघांनी यहोवाला अर्पणे वाहिली. देवाला हाबेलाचे अर्पण आवडले, काईनाचे नाही. आपल्या भावाचा निर्घृणपणे खून केल्याबद्दलचा जाब विचारत असताना तो निष्ठुरपणे देवाला म्हणाला: “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” पाप केल्याबद्दल काईनाला “एदेनाच्या पूर्वेस नोद देशात” हद्दपार करण्यात आले. त्याने त्याच्या गुन्ह्याबद्दल कोणताही प्रामाणिक पश्‍चात्ताप व्यक्‍त केला नाही, फक्‍त त्याने पात्र असलेल्या शिक्षेबद्दल खेद व्यक्‍त केला.—उत्पत्ति ४:३-१६.

१४. महायाजक एली आणि त्याच्या पुत्रांच्या उदाहरणांवरून देवाला व्यक्‍तिगतपणे जबाबदार असण्याबद्दल कसे दाखवण्यात आले होते?

१४ एखाद्याने व्यक्‍तिगतपणे देवाला जबाबदार असणे हे, इस्राएलचा महायाजक एलीच्या बाबतीतही दाखवण्यात आले आहे. त्याचे पुत्र हफनी आणि फिनहास याजकांचे काम करत होते पण “लोकांवर अन्याय करण्याबद्दल व देवाची निंदा केल्याबद्दल व कोणत्याही दुष्ट कामापासून दूर न राहण्याबद्दल दोषी होते,” असे इतिवृत्तकार जोसीफस म्हणतात. या ‘निरुपयोगी पुरुषांनी’ देवाला ओळखले नाही, ते पावित्र्यभंग वर्तन आचरत राहिले आणि घोर अनैतिकतेबद्दल दोषी ठरले. (१ शमुवेल १:३; २:१२-१७, २२-२५) त्यांचा पिता आणि इस्राएलचा महायाजक या नात्याने एलीची त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी होती पण त्याने अगदी सौम्यपणे त्यांचा निषेध केला. एली ‘यहोवाऐवजी आपल्या पुत्रांचा अधिक आदर करीत राहिला.’ (१ शमुवेल २:२९) एलीच्या घराण्याविरुद्ध सूड घेण्यात आला. दोन्ही मुले आपल्या बापाच्या मृत्यूच्या दिवशीच मरण पावले आणि त्यांची याजकीय वंशावळ कालांतराने पूर्णपणे लोप पावली. अशाप्रकारे त्यांचा हिशेब घेण्यात आला.—१ शमुवेल ३:१३, १४; ४:११, १७, १८.

१५. राजा शौल याचा पुत्र योनाथानला प्रतिफळ का देण्यात आले?

१५ राजा शौलाचा पुत्र योनाथानाने तर पूर्णपणे वेगळे उदाहरण मांडले. दावीदाने गल्याथाला ठार मारल्यानंतर लगेचच, ‘योनाथानाचे मन दावीदाच्या मनाशी जडले,’ व त्यांनी मैत्रीची आणभाक केली. (१ शमुवेल १८:१, ३) योनाथानाने बहुधा हे ताडले असावे, की देवाचा आत्मा आता शौलावर कार्य करीत नव्हता, परंतु खऱ्‍या उपासनेबद्दल स्वतः योनाथानचा आवेश कमी झाला नाही. (१ शमुवेल १६:१४) दावीदाच्या देव-प्रदत्त अधिकाराबद्दल योनाथानाची गुणग्राहकता केव्हाही कमी झाली नाही. देवाला आपल्याला हिशेब द्यायचा आहे हे योनाथानाने जाणले आणि यहोवाने, त्याची वंशावळ अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहील हे सुनिश्‍चित करून त्याच्या आदरणीय मार्गाक्रमणाबद्दल प्रतिफळ दिले.—१ इतिहास ८:३३-४०.

ख्रिस्ती मंडळीत हिशेब देणे

१६. तीत कोण होता, व त्याने देवासमोर स्वतःचा चांगला हिशेब दिला असे का म्हटले जाऊ शकते?

१६ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये अनेक पुरुष आणि स्त्रियांबद्दलचे अहवाल दिले आहेत ज्यांनी स्वतःचा चांगला हिशेब दिला. उदाहरणार्थ, तीत नावाचा एक ग्रीक ख्रिस्ती होता. सायप्रस येथील पौलाच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान तो एक ख्रिस्ती झाल्याचे सुचवले जाते. सा. यु. ३३ मधील पेन्टेकॉस्टच्या दिवशी सायप्रसमधील यहुदी आणि यहुदीयमतानुसारी कदाचित जेरुसलेममध्ये आले असावेत, त्यानंतर काही काळातच त्या बेटावर ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसार झाला असावा. (प्रेषितांची कृत्ये ११:१९) तरीदेखील, तीत पौलाच्या विश्‍वासू सहकर्मचाऱ्‍यांपैकी एक ठरला. सा. यु. ४९ च्या सुमारास तो पौल आणि बर्णबा या दोघांसोबत जेरुसलेमच्या दौऱ्‍यावर गेला, तेव्हा सुंतेविषयीचा मुख्य वादविषय सोडवण्यात आला होता. तीत हा स्वतः बेसुंती असल्यामुळे, ख्रिस्ती झालेल्या विदेशांना मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन राहण्याची गरज नाही हा पौलाचा युक्‍तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. (गलतीकर २:१-३) तीताची उत्तम सेवा शास्त्रवचनांमध्ये दर्शवली आहे तसेच पौलाने त्याला ईश्‍वरी प्रेरणेने एक पत्रसुद्धा लिहिले. (२ करिंथकर ७:६; तीत १:१-४) खरे पाहता, तीत आपल्या पार्थिव जीवनाच्या शेवटपर्यंत देवाला स्वतःचा उत्तम हिशेब देत राहिला.

१७. तीमथ्याने स्वतःचा कोणता हिशेब दिला व या उदाहरणाचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

१७ तीमथ्य आणखी एक आवेशी मनुष्य होता ज्याने यहोवा देवाला स्वतःचा स्वीकारयोग्य हिशेब दिला. तीमथ्याला आरोग्याच्या काही समस्या होत्या तरी, त्याने “निष्कपट विश्‍वास प्रकट केला” व ‘सुवार्तेच्या प्रचारासाठी पौलासोबत सेवा केली.’ म्हणूनच प्रेषित, फिलिप्पैमधील सहख्रिश्‍चनांना सांगू शकला: “तुमच्या बाबीसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी [तीमथ्या] समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.” (२ तीमथ्य १:५, पंडिता रमाबाई भाषांतर; फिलिप्पैकर २:२०, २२; १ तीमथ्य ५:२३) मानवी दौर्बल्य आणि इतर परीक्षा यांचा सामना करत असताना आपणही निष्कपट विश्‍वास बाळगू शकतो व देवाला स्वतःचा स्वीकारयोग्य हिशेब देऊ शकतो.

१८. लुदिया कोण होती आणि तिने कोणत्या प्रकारचा आत्मा प्रदर्शित केला?

१८ लुदिया नावाच्या एका भक्‍तिमान स्त्रीने स्वतःचा उत्तम हिशेब देवाला दिला. ती आणि तिचे घराणे, सा. यु. ५० च्या सुमारात पौलाने फिलिप्पै येथे केलेल्या कार्यामुळे ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार करणारे अख्ख्या युरोपमध्ये पहिले होते. लुदिया मूळची थुवतीराची असल्यामुळे ती कदाचित एक यहुदीयमतानुसारी असावी, पण फिलिप्पैमध्ये फार तुरळक यहुदी होते व तेथे सभास्थान देखील नव्हते. ती आणि इतर भक्‍तिमान स्त्रिया नदीकाठी एकत्र येत असत, तेथेच पौल त्यांच्यासोबत बोलला. परिणामी, लुदिया एक ख्रिस्ती बनली आणि पौल व त्याच्या सहकर्मचाऱ्‍यांनी तिच्या घरी राहावे असा तिने त्यांच्याजवळ आग्रह केला. (प्रेषितांची कृत्ये १६:१२-१५) लुदियाने दाखवलेले आदरातिथ्य खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे वैशिष्ट्य आहे.

१९. दुर्कसने स्वतःचा उत्तम हिशेब कोणत्या चांगल्या कृत्यांद्वारे देवाला दिला?

१९ दुर्कस नावाची आणखी एक स्त्री यहोवा देवाला स्वतःचा उत्तम हिशेब देणाऱ्‍यांपैकी होती. तिचा मृत्यू झाल्यानंतर, जोप्पा येथील शिष्यांच्या विनंतीखातर पेत्र तेथे गेला. पेत्राला भेटलेल्या दोन पुरुषांनी त्याला “माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली.” दुर्कसला पुन्हा जिवंत करण्यात आले. पण तिच्या औदार्याच्या आत्म्यासाठीच केवळ तिची आठवण केली जावी का? नाही. ती एक “शिष्या” होती आणि स्वतः शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेत होती. आजच्या ख्रिस्ती स्त्रिया तिच्याप्रमाणे “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” आहेत. तसेच राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात सक्रिय भाग घेण्यासही त्यांना आनंद वाटतो.—प्रेषितांची कृत्ये ९:३६-४२; मत्तय २४:१४; २८:१९, २०.

२०. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो?

२० राष्ट्रांना आणि वैयक्‍तिकांना सार्वभौम प्रभू यहोवाला हिशेब द्यायचा आहे हे बायबल स्पष्टपणे दाखवते. (सफन्या १:७) आपण देवास समर्पित आहोत तर स्वतःला विचारले पाहिजे, की ‘देवाने मला दिलेल्या विशेषाधिकारांकडे व जबाबदाऱ्‍यांकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताला मी स्वतःबद्दल कोणत्या प्रकारचा हिशेब देत आहे?’

तुमची उत्तरे काय आहेत?

◻ देवदूत आणि देवाचा पुत्र यहोवासमोर जबाबदार आहेत हे तुम्ही कसे शाबीत कराल?

◻ देव राष्ट्रांनाही जबाबदार ठरवतो हे दाखवण्याकरता कोणती बायबल उदाहरणे आहेत?

◻ देवाला व्यक्‍तिगतपणे जबाबदार असण्याबद्दल बायबल काय म्हणते?

◻ यहोवा देवाला चांगला हिशेब देणाऱ्‍या बायबल अहवालांमधील व्यक्‍ती कोणत्या होत्या?

[१० पानांवरील चित्रं]

येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याला स्वतःचा उत्तम हिशेब दिला

[१५ पानांवरील चित्रं]

दुर्कसप्रमाणे, ख्रिस्ती स्त्रिया आज यहोवा देवाला स्वतःचा चांगला हिशेब देतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा