वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१५ पृ. २४-२७
  • ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कशापासून संरक्षण?
  • मेंढपाळकत्वाची भेट म्हणजे काय?
  • मेंढपाळ तुम्हाला भेट का देतात?
  • निरोगी मेंढरांस काळजीची गरज आहे
  • मेंढपाळकत्वाच्या भेटीसाठी वेळ नियोजित करणे
  • मेंढपाळकत्वाच्या भेटींचे आशीर्वाद
  • ख्रिस्ती मेंढपाळांनो, ‘आपले अंतःकरण विशाल करा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • वडीलांनों, तुमच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्‍या गंभीरतेने पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • देवाच्या कळपाचे स्वेच्छेने पालन करा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१५ पृ. २४-२७

ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात

अनेक ठिकाणी ख्रिस्ती मेंढपाळ कळपाची काळजी कशी घेतात, याचे अवलोकन करणे शक्य आहे. ते मार्गदर्शन करतात, संरक्षण देतात आणि मेंढरांचे पालनपोषण करतात. ख्रिस्ती वडिलांच्या कार्यामध्ये, मेंढपाळकत्वाच्या कार्यहालचालींचा समावेश असल्यामुळे, ही बाब त्यांच्याकरता आस्थेची आहे. वस्तुतः, ‘देवाच्या मंडळीचे पालन करणे’ आणि ‘संपूर्ण कळपाकडे लक्ष देणे,’ ही त्यांची जबाबदारीच आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

तुम्ही ख्रिस्ती मंडळीचे एक सदस्य असल्यास आध्यात्मिक मेंढपाळ तुमची सेवा कशी करू शकतात? आणि त्यांनी तुमच्याकरता केलेल्या प्रयत्नांप्रती तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवावी? मंडळीला त्यांच्या मदतीची का गरज आहे?

कशापासून संरक्षण?

प्राचीन काळी सिंह आणि इतर वनपशू, कळपांकरता धोकादायक होते आणि प्रत्येक मेंढरावर ते तुटून पडत. अशावेळी मेंढपाळांनी संरक्षण देणे भाग होते. (१ शमुवेल १७:३४, ३५) तथापि, दियाबल सैतान हा “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरत आहे.” (१ पेत्र ५:८) तो केवळ यहोवाच्या समग्र पार्थिव संस्थेच्या विरुद्धच नाही, तर देवाच्या प्रत्येक सेवकाच्या विरुद्धही क्रोधाविष्टपणे युद्ध लढत आहे. सैतानाचा उद्देश काय आहे बरे? त्याला यहोवाच्या लोकांना निरुत्साही करायचे आहे आणि ‘देवाची आज्ञा पाळण्यास व येशूविषयीची साक्ष देण्याचे कार्य करण्यास,’ त्यांना प्रतिबंध घालायचा आहे.—प्रकटीकरण १२:१७.

यहोवाने प्राचीन इस्राएलाच्या शासकीय मेंढपाळांवर हयगय केल्याचा दोषारोप लावला कारण त्याची मेंढरे “सर्व वनपशूंस भक्ष्य झाली” होती. (यहेज्केल ३४:८) तथापि, ख्रिस्ती वडिलांना मंडळीत असणाऱ्‍यांचे संरक्षण करण्याची मनःपूर्वक इच्छा असते, ती अशासाठी की दुर्लक्ष केल्यामुळे किंवा सैतान, जग अथवा धर्मत्यागी ‘लांडग्यांच्या’ प्रभावामुळे कोणीही हरवून जाऊ नये. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) मेंढपाळ, कळपातील सर्व सदस्यांस सावध व जागे राहण्यास कशा प्रकारे मदत करतात? एक मार्ग म्हणजे, राज्य सभागृहाच्या व्यासपिठावरून उत्तम तयारी केलेली शास्त्रवचनांवर आधारित भाषणे देण्याद्वारे. दुसरा म्हणजे, सभांच्या आधी आणि सभांच्या नंतर सकारात्मक व उत्तेजनात्मक संभाषण केल्याद्वारे. आणखी एक प्रभावकारी मार्ग म्हणजे, ‘मेंढरांना’ व्यक्‍तिशः घरी भेट देण्याद्वारे. (पडताळा स्तोत्र ९५:७.) परंतु, मेंढपाळकत्वाची भेट म्हणजे काय? अशाप्रकारची भेट कशी दिली जावी? तसेच कोणाला भेट देणे आवश्‍यक आहे?

मेंढपाळकत्वाची भेट म्हणजे काय?

मेंढपाळकत्वाची भेट ही केवळ क्षुल्लक गोष्टींचे संभाषण करण्यासाठी असणारी स्नेहभेट नव्हे. एका वडिलाने निरीक्षिले: “बहुतेक प्रचारकांस एखादे शास्त्रवचन वाचणे किंवा बायबलच्या एका विशिष्ट पात्राची चर्चा करणे अत्यंत आवडते. अर्थात, बोलण्याचे काम केवळ वडीलच करत नाहीत. भेट दिल्या जाणाऱ्‍या राज्य प्रचारकाला आपले बायबलवरील विचार व्यक्‍त करण्यास सर्वसाधारणपणे आवडते व असे केल्याने त्याचा स्वतःचा विश्‍वास बळकट होतो. एखाद्या उभारणीकारक लेखाची चर्चा करण्यासाठी वडील एखादे टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! नियतकालिक आपल्यासोबत घेऊ शकतात. कदाचित, ही आध्यात्मिक चर्चा एका मेंढपाळकत्वाच्या भेटीला स्नेहभेटीपासून भिन्‍न करते.”

दुसऱ्‍या एका अनुभवी वडिलांनी अशाप्रकारे विवेचन केले: “भेट देण्यापूर्वी, ज्याची भेट घ्यायची आहे त्या प्रचारकाच्या गरजांबद्दल विचार करण्यासाठी वडील काही वेळ खर्च करतात. प्रचारकाची उभारणी कशामुळे होऊ शकेल? प्रांजळ प्रशंसा, मेंढपाळकत्वाच्या भेटीतील एक अति महत्त्वाचा भाग आहे, कारण एखाद्या व्यक्‍तीला सहन करण्याचे ती सामर्थ्य देते.” होय, मेंढपाळकत्वाची भेट, मंडळीतील इतर कोणतीही व्यक्‍ती देऊ शकेल अशा निव्वळ मित्रत्त्वाच्या भेटीपेक्षा अधिक काही आहे.

मेंढपाळ तुम्हाला भेट का देतात?

एक वडील ज्यावेळी एखाद्या घरी भेट देतात तेव्हा, ते सहविश्‍वासूंना उत्तेजन देण्याच्या व त्यांना विश्‍वासात स्थिर राहण्यास मदत करण्याच्या तयारीत असतात. (रोमकर १:११) तर मग, एक किंवा दोन वडील तुमची भेट घेऊ इच्छितात, तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दर्शविता? एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे म्हटले: “केवळ एखादी समस्या उद्‌भवल्यावरच मात्र मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्या, तर भेट दिल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीची योजलेल्या भेटीप्रती, ‘मी काय चूक केली आहे?’ अशी प्रारंभिक प्रतिक्रिया असेल.” प्रेमळ आध्यात्मिक मेंढपाळ, यहोवाचे अनुकरण करतात ज्याने स्तोत्रकर्त्याची काळजी घेतली व मुख्यतः विपत्तीच्या आणि खास गरजेच्या काळात सतत ‘त्याचा जीव ताजातवाना केला.’—स्तोत्र २३:१-४.

मेंढपाळकत्वाच्या भेटीचा उद्देश, ‘पाडणे नव्हे तर उभारणे’ हा आहे. (२ करिंथकर १३:१०) भेट दिल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीसाठी त्याची सहनशीलता, त्याचा आवेश व त्याच्या विश्‍वासू कार्याबद्दल व्यक्‍त केलेले कौतुकाचे बोल खरोखर उत्तेजनात्मक असतात. एका वडिलांनी असे निरीक्षण केले: “मेंढपाळकत्वाची भेट समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्याकरिता आयोजण्यात आल्याचे भासवणे योग्य नाही. अर्थात, प्रचारकाला स्वतः काही विशिष्ट अडचणीविषयी बोलण्याची इच्छा असेल. जर एखादे मेंढरु लंगडत असेल किंवा स्वतःला कळपापासून दूर करत असेल तर वडिलांना त्याची मदत करण्यासाठी काहीतरी करायला हवे.”

“मी [यहोवा, NW] हरवलेल्यांस शोधीन, हाकून दिलेल्यांस परत आणीन, घायाळांस पट्टी बांधीन, रोग्यांस बळ देईन,” या शब्दांत वर्णन केलेल्यांसारखे जे कोणी आहेत अशांची ख्रिस्ती मेंढपाळ, निःसंशये खास काळजी घेतील. (यहेज्केल ३४:१६) होय, मेंढरांना कदाचित शोधण्याची, परत आणण्याची, पट्टी बांधण्याची किंवा बळ देण्याची गरज भासेल. इस्राएलाच्या मेंढपाळांनी या जबाबदाऱ्‍यांकडे कानाडोळा केला. हे कार्य करण्यासाठी मेंढपाळाने एका विशिष्ट मेंढराच्या अगदी समीप येऊन त्याच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. मूलतः हाच आजच्या काळातील प्रत्येक मेंढपाळकत्वाच्या भेटीचा उल्लेखनीय भाग असण्यास हवा.

निरोगी मेंढरांस काळजीची गरज आहे

विद्यमान काळातील आध्यात्मिक मेंढपाळांना, निरोगी मेंढरांकडे विशेष अवधान दाखवण्याची गरज नाही, असे अनुमान आपण काढावे का? एखादे खरोखरचे मेंढरु संकटात सापडते तेव्हा त्याला आपल्या मेंढपाळावर आत्मविश्‍वास असल्यास त्याची मदत करणे त्यांना अधिक सोपे असते. एका पुस्तिकेने असे निरीक्षण केले आहे की, “मेंढरे स्वाभाविकपणे मानवांपासून दूरच राहतात आणि त्यांचा भरवसा मिळवणे नेहमीच सोपे नसते.” इतर गोष्टींव्यतिरिक्‍त, मेंढरांचा भरवसा मिळवण्यासाठी हीच पुस्तिका अशा प्रकारचा मूलभूत सल्ला देते: “नियमितपणे मेंढरांशी बोला. ते तुमच्या आवाजाशी परिचित होतात व त्यांची भीती नाहीशी होते. वारंवार कुरणात जाऊन त्यांना भेटा.”—ऑलेस फ्यूर डॉस शॉफ. हॉनटबुख फ्यूर डी ऑरटगेरेखटे हॉल्टुंग (मेंढरांबद्दलची सर्व माहिती. त्यांची योग्यपणे कशी काळजी घ्यावी यावरील पुस्तिका).

याकारणास्तव, मेंढपाळ आणि मेंढरे यांच्यात विश्‍वसनीय नातेसंबंध असण्याकरता व्यक्‍तिगत संपर्काची गरज आहे. ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीतही हीच गोष्ट सत्य आहे. एका वडिलांनी असे निरिक्षिले: “नियमितपणे मेंढरांना भेट देणारे वडील या नात्याने ख्रिस्ती मंडळीत परिचित असल्यामुळे समस्या असलेल्या एखाद्यास भेट देणे अधिक सुलभ होते.” त्यामुळे, आध्यात्मिक मेंढपाळांनी केवळ राज्य सभागृहातच मेंढरांचे पालनपोषण करू नये. परिस्थितीप्रमाणे होता होईल तितके वडिलांनी मेंढरांच्या घरी मेंढपाळकत्वाच्या भेटी देऊन मेंढरांशी परिचित व्हावे. एका ख्रिश्‍चनाला आठवते, की त्याची नव्यानेच वडील म्हणून नेमणूक झाली होती तेव्हा अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी त्यांना दूरध्वनीद्वारे, मोटारीच्या भयंकर अपघातात ज्या बांधवाच्या मुलीचा मृत्यू झाला होता, त्या बांधवास भेट देऊन त्याचे सांत्वन करण्यास सांगितले. ते वडील कबूल करतात: “मी त्या बांधवाला कधीच भेट दिली नव्हती व तो कोठे राहत होता हे देखील मला ठाऊक नव्हते त्यामुळे मला किती वाईट वाटले! एका प्रौढ वडिलांनी माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शविली तेव्हा मात्र मला दिलासा मिळाला.” होय, मेंढपाळकत्वाच्या भेटी घेण्याकरता वडील एकमेकांची मदत करतात.

मेंढपाळकत्वाच्या भेटींसाठी तयारी करत असताना किंवा भेट देत असताना, अध्यक्षाचे ‘चांगले काम’ करू इच्छिणारा सेवा-सेवक वडिलांना साथ देऊ शकतो. (१ तीमथ्य ३:१, १३) मेंढपाळकत्वाच्या भेटीदरम्यान एक वडील मेंढरांची सेवा कशाप्रकारे करतात हे पाहून सेवा-सेवकाला त्यांचे किती महत्त्व जाणवेल! अशाप्रकारे वडील व सेवा-सेवक मंडळीतील सर्वांच्या घनिष्ठतेत येऊन ख्रिस्ती प्रीतीची व ऐक्याची बंधने दृढ करतात.—कलस्सैकर ३:१४.

मेंढपाळकत्वाच्या भेटीसाठी वेळ नियोजित करणे

जेव्हा वडीलवर्गाने मेंढपाळकत्वाच्या भेटी घेण्याची जबाबदारी, मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकांवर सोपवली तेव्हा काही गटांतील सर्व प्रचारकांना सहा महिन्यातच भेटी देण्यात आल्या तर इतर गटांतील कोणालाही भेटी देण्यात आल्या नाहीत. याने प्रवृत्त होऊन एक वडील असे म्हणाले: “असे दिसून येते की काही वडील पुढाकार घेऊन मेंढपाळकत्वाचे पुष्कळ काम करतात पण इतरांना असे करण्यास सहवडिलांच्या मदतीची गरज आहे.” यास्तव, काही वडील वर्ग, मेंढपाळांकरवी सर्व प्रचारकांना एका निश्‍चित कालावधीत भेट देण्याची योजना करतात.

अर्थात, एक वडील किंवा कोणताही प्रचारक, खास योजना आखण्याची वाट न पाहता मंडळीतील एखाद्याची भेट घेऊ शकतात. मेंढपाळकत्वाची भेट घेण्यापूर्वी, एक वडील फोन करून असे म्हणतात की, “मी दर महिन्याला एका कुटुंबास भेट देत असतो. पुढील महिन्यात केव्हातरी एका तासाभरासाठी मी तुम्हालाही भेट देऊ शकतो का? तुम्हाला हे केव्हा सोईस्कर असेल?”

मेंढपाळकत्वाच्या भेटींचे आशीर्वाद

या दुष्ट व्यवस्थीकरणाचे दबाव जसजसे वाढतात तसतसे समजूतदार मेंढपाळांकरवी दिल्या जाणाऱ्‍या उत्तेजनात्मक भेटी अधिक हितकारक ठरतात. जेव्हा कळपातील सर्वांना मेंढपाळकत्वाच्या भेटींद्वारे उत्तेजन व मदत दिली जाते तेव्हा प्रत्येक मेंढराला सुरक्षित व निर्भय वाटते.

मेंढपाळांकरवी सर्व राज्य प्रचारकांना नियमितपणे भेट देण्यात आलेल्या एका मंडळीसंबंधाने असा अहवाल देण्यात आला: “मेंढपाळकत्वाच्या भेटींबाबत प्रचारकांचा दृष्टिकोन सकारात्मक बनला. प्रचारकाने वडिलांना भेटणे व पुढील भेट ते केव्हा घेणार याबद्दल विचारणे सामान्य बनले होते कारण असे विचारणाऱ्‍याला आधीच्या भेटीतील उभारणीकारक चर्चा आवडली होती. मेंढपाळकत्वाच्या भेटी, मंडळीच्या मनोवृत्तीत सुधार करण्यास मदत करणारे एक कारण होते.” जेव्हा मेंढपाळ अशा प्रकारे प्रेमळपणे सेवा करतात तेव्हा मंडळीतील प्रीती, ऐक्य व उबदारपणा वाढतो, असे इतर अहवाल सूचित करतात. काय हा आशीर्वाद!

ख्रिस्ती मेंढपाळ मेंढरांचे आध्यात्मिक हित साधण्यासाठी भेटी देत असतात. वडिलांना त्यांच्या सहविश्‍वासूंना उत्तेजन देण्याची व त्यांना बळकट करण्याची इच्छा असते. भेटीच्या दरम्यान सल्ला देण्याजोगी एखादी गंभीर समस्या जर उघडकीस आली व खासकरून वडिलांबरोबर सेवा-सेवक असेल तर दुसऱ्‍या खेपेला त्या समस्यावर चर्चा करणे उत्तम असेल. कोणत्याही परिस्थितीत मेंढपाळकत्वाच्या भेटीचा समारोप प्रार्थनेने करणे यथायोग्य आहे.

येणाऱ्‍या काही दिवसांत आध्यात्मिक मेंढपाळाला तुमच्या घरी भेट घ्यायची इच्छा आहे का? असल्यास, तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या उत्तेजनाची आनंदाने वाट पाहात राहा. ते तुमची सेवा करावयास व सार्वकालिक जीवनाप्रत नेणाऱ्‍या मार्गावर टिकून राहण्याच्या तुमच्या निश्‍चयास बळकट करण्याकरता येत आहेत.—मत्तय ७:१३, १४.

[२६ पानांवरील चौकट]

मेंढपाळकत्वाच्या भेटींसाठी सल्ले

◻ भेटीसाठी आधी वेळ निश्‍चित करणे: भेटीची नियुक्‍ती करणे बहुधा उत्तम असते. वडिलांनी गंभीर समस्या हाताळण्याचे ठरवले असल्यास अशा वेळेस प्रचारकाला आगाऊ माहिती देणे योग्य असेल.

◻ तयारी: व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्त्व व तिची परिस्थिती विचारात घ्या. मनःपूर्वक प्रशंसा करा. एक उत्तेजनात्मक, विश्‍वास बळकट करणारे “आध्यात्मिक कृपादान” देण्याचे ध्येय ठेवा. —रोमकर १:११, १२.

◻ कोणाला सोबत न्यावे: आणखी एका वडिलांना किंवा योग्यता असणाऱ्‍या सेवा-सेवकाला.

◻ भेटीदरम्यान: वडिलांनी अनौपचारिक, प्रेमळ, सकारात्मक, आणि लवचीक असावे. कुटुंबाबद्दल, त्यांच्या ख्याली खुशालीबद्दल, इत्यादि गोष्टींविषयी चौकशी करा. लक्षपूर्वक ऐका. एखादी गंभीर समस्या जर उघडकीस आली तर आणखी एका खास मेंढपाळकत्वाच्या भेटीची योजना करणे सर्वोत्तम असेल.

◻ भेटीचा कालावधी: ठरलेल्या वेळेशी जडून राहा, व तुमचे यजमान भेटीचा आनंद लुटत असतानाच त्यांचा निरोप घ्या.

◻ भेटीचा समारोप करणे: प्रार्थना उचित आहे व तिची खरोखर कदर केली जाते.—फिलिप्पैकर ४:६, ७.

[२४ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ती मेंढपाळ आध्यात्मिक संरक्षण प्रदान करतात

[२६ पानांवरील चित्रं]

मेंढपाळकत्वाच्या भेटी आध्यात्मिक उत्तेजनासाठी उत्तम सुसंधी पुरवतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा