देवाच्या कळपाचे स्वेच्छेने पालन करा
“तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर स्वेच्छेने करा.”—१ पेत्र ५:२. न्यू.व.
१. ख्रिस्ती वडिलांनी ‘देवाच्या कळपाचे पालन स्वेच्छेने’ करावे असे आम्ही का अपेक्षितो?
यहोवा स्वेच्छेने त्याच्या लोकांचे पालन करतो. (स्तोत्रसंहिता २३:१-४) “उत्तम मेंढपाळ,” येशू ख्रिस्त, याने देखील मेंढरासमान लोकांसाठी आपले पूर्ण मानवी जीवन स्वेच्छेने देऊ केले. (योहान १०:११-१५) म्हणून, प्रेषित पौल ख्रिस्ती वडीलांना आग्रहपूर्वक सांगतो की: “देवाच्या कळपाचे संतोषाने [“स्वेच्छेने,” न्यू.व.] पालन करा.”—१ पेत्र ५:२.
२. ख्रिस्ती वडिलांच्या मेंढपाळकत्वाच्या कार्याबाबतीत कोणते प्रश्न विचारात घ्यावे?
२ स्वेच्छा हे देवाच्या सेवकांचे ओळख चिन्ह आहे. (स्तोत्रसंहिता ११०:३) पण सहमेंढपाळ अथवा पर्यवेक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी एखाद्या ख्रिस्ती पुरुषात स्वेच्छेपेक्षा आणखी काही जास्त गोष्टींची आवश्यकता लागते. असे मेंढपाळ होण्यास कोण पात्र आहेत? त्यांच्या मेंढपाळकत्त्वामध्ये कशाचा समावेश आहे? ते यशस्वीपणे कसे तडीस नेता येईल?
घरची व्यवस्था ठेवणे
३. एखादा ख्रिस्ती पुरुष आपल्या कुटुंबाची काळजी कशाप्रकारे घेतो ह्यावर तो मंडळीचे पालन करावयास पात्र आहे की नाही हे का अवलंबून आहे?
३ एखाद्या पुरुषाची “अध्यक्ष,” म्हणून नियुक्ती होण्याआधी त्याने आध्यात्मिक गरजांची पूर्णता केली पाहिजे. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) यात एक गोष्ट म्हणजे, प्रेषित पौल सांगतो त्याप्रमाणे पर्यवेक्षकाने “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलांबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा” असे असावयास हवे. यामागे एक चांगले कारण आहे, कारण पौल म्हणतो: “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” (१ तीमथ्य ३:४, ५) क्रेत बेटावरील मंडळीमध्ये वडिलांची नियुक्ती करत असता, तीताला असे सांगितले गेले की त्याने “ज्याला नेमावयाचे तो अदूष्य, एका स्त्रीचा पति असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.” (तीत १:६) होय, एखादा ख्रिस्ती पुरुष आपल्या कुटुंबाची कशी देखभाल करतो याचा तो मंडळीची देखभाल करण्याची भारी जबाबदारी उचलण्यास लायक आहे की नाही हे गृहीत धरण्यासाठी विचार केला पाहिजे.
४. नियमितरित्या पवित्र शास्त्र अभ्यास व प्रार्थना यासोबतच आणखी कोणत्या गोष्टी करण्याद्वारे ख्रिस्ती पालक आपल्या कुटुंबावरील प्रेम दर्शवू शकतात?
४ घरची चांगली व्यवस्था ठेवणारे, आपल्या कुटुंबासोबत केवळ नियमितपणे प्रार्थना करणे आणि पवित्र शास्त्र अभ्यास घेणे यापेक्षा अधिक काही करतात. त्यांच्या प्रियजनास ते मदत करण्यास नेहमीच तयार असतात. पालक बनले आहेत अशाच्यांबाबतीत पाहता, बाळ जन्मते तेव्हापासूनच याची सुरुवात होते. ख्रिस्ती पालकांना हे ठाऊक आहे की जेवढे अधिक ते ईश्वरी दर्जांना चिकटून राहतात तेवढ्या लवकर त्यांची मुले दैनंदिन जीवनातील ख्रिस्ती कार्य हालचालींच्या आराखड्याशी जुळवून घेतील. अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती पालक कशाप्रकारे अध्यक्षपद चालवितो त्यावरून त्याची वडील होण्याची पात्रता दिसून येते.—इफिसकर ५:१५, १६; फिलिप्पैकर ३:१६.
५. “प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] शिस्तीत व शिक्षणात,” ख्रिस्ती पिता आपल्या मुलांना कसे वाढवू शकतो?
५ घरची व्यवस्था राखीत असता, सदसद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक असणारा पिता पौलाचा हा सल्ला अनुसरेल: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) कुटुंबासोबत नियमित पवित्र शास्त्र अभ्यास करण्यामुळे, पत्नी आणि मुले या दोघांनाही, प्रेमळ सूचना सादर करण्याची संधी मिळते. मुलांना “शिस्त,” किंवा योग्य मार्गदर्शन मिळते. “बोध” मिळाल्यामुळे प्रत्येक मुलाला एखाद्या गोष्टीबाबतीत यहोवाचा दृष्टिकोन काय आहे हे जाणता येते. (अनुवाद ४:९; ६:६, ७; नीतिसूत्रे ३:११; २२:६) अशा आध्यात्मिक एकत्र मेळाव्यातील आरामदायी वातावरणात, काळजी बाळगणारा पिता त्याची मुले बोलत असता काळजीपूर्वक ऐकतो. त्यांच्या चिंता अथवा त्यांचा दृष्टिकोन याबद्दल असलेली त्यांची प्रामाणिक मते काढून घेण्यासाठी दयाळू पण मार्गदर्शन पुरविणारी प्रश्ने विचारली जातात. त्यांच्या तरुण मनामध्ये जे काही घडत आहे ते सर्व जाणत असल्याचे पिता गृहीत धरत नाही. खरे पाहता, नीतिसूत्रे १८:१३ म्हणते की, “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” आज, अनेक असे पालकांना दिसून आलेले आहे की, त्यांची मुले तोंड देऊन असलेली परिस्थिती ही जेव्हा ते स्वतः लहान होते त्यावेळच्या परिस्थितीपेक्षा खूप भिन्न आहे. त्यामुळे, एखाद्या समस्येची हाताळणी कशी करावी हे सांगण्याच्या अगोदर पिता त्याची सविस्तर पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करील.—याकोब १:१९ पडताळा.
६. ख्रिस्ती पित्याने त्याच्या कुटुंबाला सूचना देत असता देवाच्या वचनाचा सल्ला का घेतला पाहिजे?
६ एखाद्याच्या मुलाच्या समस्या, चिंता आणि दृष्टिकोन कळून आल्यास काय घडते? चांगली व्यवस्था पाहणारा पिता “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, व नीतिशिक्षण” देणाऱ्या शास्त्रवचनाचा सल्ला घेईल. पवित्र शास्त्राचे प्रेरित मार्गदर्शन कसे लागू करावयाचे हे तो आपल्या मुलांना शिकवेल. अशाप्रकारे, जे वयाने तरुण आहेत ते “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होतील.—२ तीमथ्य ३:१६, १७; स्तोत्रसंहिता ७८:१-४.
७. प्रार्थनेच्या बाबतीत ख्रिस्ती पित्यांनी कोणते उदाहरण घालून द्यावे?
७ जगीक शाळासोबत्यांमुळे ईश्वरी तरुणांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. तर मग ख्रिस्ती पालक त्यांच्या मुलांच्या भितीला कसे कमी करू शकतात? एक मार्ग म्हणजे नियमितरित्या त्यांच्यासोबत व त्यांच्याकरिता प्रार्थना करणे. मग, जेव्हा कधी ही तरुण मुले छळदायी परिस्थितीला सामोरे जातील तेव्हा ते आपल्या पालकांप्रमाणे देवावर भरवसा ठेवण्याचे अनुकरण करतील. एक १३-वर्षांची युवती, तिने देवाला केलेल्या समर्पणाचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घेण्यापूर्वी तिच्या मुलाखतीत तिने सांगितले, की तिच्या शाळासोबत्यांकडून चेष्टा, आणि अपशब्द ऐकण्याचा अनुभव आला. जेव्हा तिने रक्ताच्या पावित्र्याबद्दल तिच्या पवित्र शास्त्रावर आधारलेल्या विश्वासाचे समर्थन केले तेव्हा बाकीच्या मुलींनी तिला मारले व त्या तिच्यावर थुंकल्या. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) तिने त्यांचा सूड उगवला का? नाही. “मला शांत ठेवण्यासाठी मी यहोवाकडे प्रार्थना करीत राहिले.” तिने म्हटले, “माझ्या पालकांनी वाईट गोष्टीत स्वतःवर आत्मसंयमन ठेवण्यासंबंधी जे आमच्या कौंटुंबिक अभ्यासात सांगितले होते ते मला आठवले.”—२ तीमथ्य २:२४.
८. ज्या वडिलांना मुले नाहीत ते त्यांच्या घरच्या लोकांचे चांगल्याप्रकारे पालन कसे करू शकतात?
८ ज्या वडिलांना मुले नाहीत त्यांना देखील आपल्या घरातील इतर सदस्यांना पुरेसा आध्यात्मिक व भौतिकतेचा पुरवठा करता येईल. यामध्ये त्याचा विवाह सोबती व त्यांच्यावर अवलंबून असणारे ख्रिस्ती नातलग यांचाही यात समावेश आहे. (१ तीमथ्य ५:८) चांगल्या रितीने व्यवस्था राखणारे, ही, मंडळीमध्ये वडील या नात्याने जबाबदारी पार पाडण्यास ज्या पुरुषाची नियुक्ती केली जाते त्यातील एक गरज आहे. तर मग, नियुक्त केलेल्या वडिलाने मंडळीची जबाबदारी उचलण्याबाबत कोणता दृष्टिकोन राखावा?
“आस्थेने” अध्यक्षता करणे
९. ख्रिस्ती वडिलांनी त्यांच्या सेवेच्या नेमणूकीकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहावे?
९ सामान्य युगाच्या पहिल्या शतकात, ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली ख्रिस्ती मंडळीत प्रेषित पौलाने देवाच्या घरचा कारभारी म्हणून काम केले. (इफिसकर ३:२, ७; ४:१५) त्यामुळेच, पौलाने रोम येथील त्याच्या समविश्वासूंना आर्जविले: “आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा, सेवा करितांना सेवेत तत्पर असावे, शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्यांने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती स्वेच्छेने करावी.”—रोमकर १२:६-८.
१०. देवाच्या कळपाची काळजी घेण्याच्या बाबतीत आजच्या वडिलांकरता पौलाने कोणते उदाहरण घालून दिले?
१० पौलाने थेस्सलनीकरास आठवण करून दिले की: “बाप आपल्या मुलांना करितो तसे आम्ही तुम्हांपैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की, जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.” (१ थेस्सलनीकर १:१; २:११, १२) हे सांगणे इतके कळकळीचे, व प्रेमळपणे होते की पौल असे लिहू शकला: “आपल्या मुलांबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हांमध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हांवरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हांकरीता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:७, ८) पौलाच्या पित्यासमान उदाहरणाच्या एकवाक्यतेत, निष्ठावंत वडील मंडळीतील सर्वांसंबंधी गाढ काळजी बाळगतात.
११. नियुक्त वडील कशाप्रकारे उत्सुकता दाखवू शकतात?
११ तत्परतेसोबत, दयाळूपणा आमच्या विश्वासू ख्रिस्ती मेंढपाळात प्रेमळ देखरेख करताना विशेष लक्षण असले पाहिजे. त्यांचा शिष्टाचार अधिक गोष्टी व्यक्त करतो. पेत्र वडिलांना देवाच्या कळपाचे पालन “करावे लागते म्हणून” किंवा “द्रव्यलोभाने” करू नये असा सल्ला देतो. (१ पेत्र ५:२) याच मुद्यावर, विद्वान विल्यम बार्कले यांनी धोक्याची सूचना व्यक्त केली, त्यांनी लिहिले: “अधिकाराचा दर्जा स्वीकारणे ही एक गोष्ट आहे तर कठोर व मनाजोगे नसणारे, कंटाळवाणे, भाराचे व तिटकारा वाटणारे काम वा सेवा सादर करणे ही वेगळी गोष्ट आहे. एखाद्या माणसाला काही करण्याची विचारणा करणे व ते त्याने नाखुषीने करून सर्व काही बिघडून टाकणे ही शक्यता आहे. . . . तथापि, [पेत्र] म्हणतो की, प्रत्येक ख्रिश्चनाने आपली सेवा, त्याला जरी अपात्रता वाटत असली तरी कंपित होऊन व उत्सुकतेने त्याला होता होईल तितक्या परिणामाने सादर केली पाहीजे.”
स्वेच्छा दर्शवणारे मेंढपाळ
१२. ख्रिस्ती वडील स्वेच्छा कशी प्रकट करू शकतात?
१२ “देवाच्या कळपाचे पालन . . . स्वेच्छेने करा.” असे पेत्र आर्जवितो. ख्रिस्ती पर्यवेक्षक आपल्या मेंढराची प्रेमळपणे, त्याच्या स्वतःच्या इच्छेने, उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली काळजी घेतो. स्वेच्छेने पालन करणे याचा अर्थ हे ख्रिस्ती मेंढपाळ यहोवा जो, ‘आपल्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक’ आहे त्याच्या अधिकाराखाली अधीन असणे असा आहे. (१ पेत्र २:२५) ख्रिस्ती सहमेंढपाळ स्वेच्छेने ईश्वरशासित योजनेला आदर प्रदर्शित करतो. ही गोष्ट, तो त्याकडे सल्ला प्राप्तीसाठी येणाऱ्यांना पवित्र शास्त्र, देवाचे वचन याकडे निर्देश करण्याद्वारे करतो. असा अनुभव, वडिलांना पवित्र शास्त्रावर आधारित सल्ल्यांचा साठा करून ठेवण्यास मदत करतो, पण याचा हा अर्थ नाही की प्रत्येक समस्येचा शास्त्रवचनीय उलगडा त्यांच्या हाताशी आहे. जरी त्यांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असले तरीही वॉचटावर पब्लीकेशन इंडेक्स अथवा अशा समान सूचींचा चौकशीसाठी येणाऱ्यांसोबत विचारविनीमय करावा हे सुज्ञतेचे ठरते. अशाप्रकारे ते दोन मार्गाने शिक्षण देऊ शकतात: साहाय्यकारी माहिती कशी मिळवावी हे ते दाखवू शकतात आणि देवाच्या संस्थेद्वारे जे प्रकाशित केले जाते त्याकडे निर्देशून यहोवाला नम्रतापूर्वक आदर दाखवितात.
१३. सबळ सल्ला देण्यासाठी वडिलांना कोणती पावले साह्यकारी ठरू शकतील?
१३ जर एखाद्या खास हाताळित असलेल्या समस्येसंबंधी संस्थेने काहीही प्रकाशन प्रकाशित केले नसेल तर वडिलाने काय करावे? ते समजबुद्धीसाठी प्रार्थना करतील आणि त्या गोष्टीला लागू पडतील अशा काही पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा शोध घेतील यात काही शंका नाही. त्यांना, मदत हवी असलेल्या व्यक्तीने येशूचे उदाहरण विचारात घ्यावे हे सुचविणे देखील फायदेकारक वाटेल. वडील विचारु शकतात: “जर येशू, थोर शिक्षक, तुमच्यासारख्या परिस्थितीत असता, तर त्याने काय केले असते असे तुम्हाला वाटते?” (१ करिंथकर २:१६) अशा युक्तीवाद माहिती घेणाऱ्याला सुज्ञ निर्णय घेण्यास नक्कीच मदतदायी ठरेल. पण एखाद्या वडिलाने केवळ शास्त्रवचनीय सल्ला असल्याप्रमाणे भासवून स्वतःचे मत सांगणे हे किती असमंजसपणाचे ठरेल! त्याऐवजी, वडिलांनी अशा कठीण समस्येबद्दल एकमेकांशी बोलावे. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर ते वडील वर्गाच्या सभेत चर्चा करण्यासाठी मांडू शकतात. (नीतिसूत्रे ११:१४) परिणामित निर्णय सर्वांना ऐक्याने बोलण्यास मदत करील.—१ करिंथकर १:१०.
सौम्यतेची आवश्यकता
१४, १५. ‘दोषात सापडल्या गेलेल्या’ कोणा ख्रिश्चनाची सुधारणा करण्यासाठी वडिलांना कशाची आवश्यकता आहे?
१४ इतरांना शिकविताना, खासकरून त्यांना बोध करत असता ख्रिस्ती वडिलांनी सौम्यता प्रदर्शित करावी. “बंधुजनहो,” पौल बोध करतो, “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” (गलतीकर ६:१) येथे वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचे भाषांतर “ताळ्यावर आणणे” [“सुधारणे,” पं. रमाबाई मराठी बायबल] हे वैद्यकिय अर्थाच्या शब्दाला सूचित करते ज्याचा वापर जीवनभर अपंगत्व न येण्यासाठी हाडांची रचना तशी करणे यासाठी वापरण्यात येतो. शब्दकोशकार डब्लू. इ. विन याला, “आध्यात्मिक असलेल्यांद्वारे दिली जाणारी, पापात अडकलेल्यांसाठी असणारी, जे जणू आध्यात्मिक शरीरातून निखळलेल्या अंगाप्रमाणे बनले आहेत अशांसाठी असणारी” पुनर्स्थापना म्हणतात. याच्याऐवजी दुसरे भाषातंर असे आहे, “योग्य स्थानी स्थापन करणे; सरळ मांडणीत आणणे.”
१५ एखाद्याचे स्वतःचे विचार पुन्हा नीट जुळवणे हे सोपे नाही, आणि एखाद्या चूक केलेल्या व्यक्तीचे विचार पुन्हा सरळ करणे खूप कठीण आहे. पण सौम्य आत्म्याने सादर केलेली मदत कृतज्ञतेने स्विकारली जाते. या अनुषंगाने, “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा,” या पौलाच्या सल्ल्याकडे ख्रिस्ती वडिलांनी लक्ष द्यावे. (कलस्सैकर ३:१२) पण, ज्याला सुधारण्याची गरज आहे, असा कोणी वाईट दृष्टिकोन बाळगणारा आढळून आल्यास वडिलांनी काय करावे? त्यांनी “. . . सौम्यता ह्याच्या पाठीस लागावे.”—१ तीमथ्य ६:११.
खबरदारीने मेंढपाळकत्व करणे
१६, १७. इतरांना सल्ला देत असता कोणत्या धोक्यापासून वडिलांनी सावधगिरी बाळगावी?
१६ गलतीकर ६:१ मधील पौलाच्या सल्ल्यात आणखी खूप सामावलेले आहे. तो आध्यात्मिकतेत पात्र असलेल्या पुरुषांना आर्जवितोः “अशाला [चुकलेल्या माणसाला] सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूंहि परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.” अशाप्रकारच्या सूचनेकडे लक्ष न दिल्यास किती भयंकर परिणाम होईल! ॲग्लिकन पाळकावर दोन पॅरिश स्त्रीयांसोबत व्यभिचार केल्याचा आरोप आढळून आला, या अहवालाद्वारे उद्युक्त होऊन लंडनचे द टाईमस् सांगते की, “सल्ला देणारा पापात पडतो, वडीलधारी किंवा भावासमान असणारी व्यक्ती, तिजवर भाव ठेवणाऱ्या माणसासोबत पापाला बळी ठरते ही विशिष्ठ वेळेपुरती गोष्ट नव्हे.” त्यानंतर एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखिकेने डॉ. पीटर ऱ्युटर यांनी केलेल्या दाव्याचा संदर्भ घेतला की: “सल्लागार, डॉक्टर, वकील, पाळक व मालक यांचे त्यांच्या ग्राहकासोबतचे पिळवणूकीचे संबंध, हे आमच्या स्वैराचारी समाजात मान्यताहीन, हानीकारक व लाजिरवाणी पीडा बनली आहे.”
१७ अशा दबावांच्या बाबतीत यहोवाचे लोक निर्धास्त राहू शकतात अशी आपण कल्पना करू नये. खूप वर्षे विश्वासाने कार्य केलेले एक आदरणीय वडील, एका विवाहीत बहीणीला ती एकटी असताना मेंढपाळकत्वाची भेट देण्यास गेल्याने अनैतिकतेत गुंतले गेले. पश्चात्ताप दाखविला तरीही, त्या बांधवाने सेवेचे सर्व हक्क गमावले. (१ करिंथकर १०:१२) तर मग, मोहात पडणार नाहीत अशाप्रकारे नियुक्त वडील मेंढपाळकत्वाची भेट कशी घेऊ शकतात? प्रार्थना, आणि देवाच्या वचनाचा व ख्रिस्ती प्रकाशनाचा विचार विनीमय करण्यास थोडासा एकांत ते कसा योजू शकतात?
१८. (अ) धोका उत्पन्न होणाऱ्या परिस्थितींना टाळण्यासाठी वडिलांना मस्तकपदाचे तत्त्व अवलंबणे कसे मदतदायी ठरेल? (ब) बहीणीसोबत मेंढपाळकत्वाच्या भेटीची कशी योजना करता येईल?
१८ मस्तकपदाचे तत्त्व ही एक बाब वडिलांनी विचारात घ्यावी. (१ करिंथकर ११:३) जर कोणा तरुण व्यक्तीला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर, उचित असेल तेव्हा त्याच्या पालकांना चर्चेत सहभागी करण्याचा प्रयत्न करा. जर एका विवाहीत बहीणीने आध्यात्मिक मदतीची विनंती केली तर, भेटीच्या दरम्यान तिच्या पतीला उपस्थितीत राहण्याची तुम्ही योजना करू शकता का? जर हे अशक्य असेल किंवा तो अविश्वासू असून काही बाबतीत तिच्याशी गैरवर्तणूक करणारा असेल तर काय? अशा वेळेस एखाद्या अविवाहीत बहीणीसोबत मेंढपाळकत्वाची भेट घेताना जी योजना आखली जाते त्याचा अवलंब करावा. त्या बहीणीला दोन आध्यात्मिक पात्रतेच्या बांधवांनी सोबत भेट देणे सुज्ञतेचे ठरेल. हे जर योग्य नसेल तर, दोन बांधवांनी योग्य वेळ निवडून राज्य सभागृहातच, एकांत मिळेल अशा ठिकाणी चर्चा करावी. सभागृहामधील इतर बांधव व भगिणींच्या उपस्थितीत, पण अशा ठिकाणी की तेथून दिसू नये आणि चर्चेतील संभाषण इतरांना ऐकायला जाऊ नये, किंवा कोणत्याही प्रकारचे अडखळण होऊ नये अशी व्यवस्था करावी.—फिलिप्पैकर १:९, १०.
१९. देवाच्या कळपाचे स्वेच्छेने पालन करणे कोणता चांगला परिणाम आणते, आणि अशा स्वेच्छेने काम करणाऱ्या मेंढपाळांबद्दल आपण कोणाचे आभार मानतो?
१९ देवाच्या मेंढराचे स्वेच्छेने पालन करण्यामुळे—आध्यात्मिकतेत मजबूत, योग्य दिशा दिलेली मेंढरे असा चांगला परिणाम साधला जातो. प्रेषित पौलाप्रमाणे, सध्याचे ख्रिस्ती वडील सहविश्वासूंची खूप काळजी बाळगतात. (२ करिंथकर ११:२८) खासकरून या कठीण काळात देवाच्या लोकांचे पालन करणे ही खूप भारी जबाबदारी आहे. त्यामुळे, वडील या नात्याने चांगली कामे करणाऱ्या आमच्या बांधवाचे आम्ही खरेच आभारी आहोत. (१ तीमथ्य ५:१७) स्वेच्छेने पालन करणाऱ्या, “माणसांच्या देणग्या”चा आशीर्वाद दिल्याबद्दल, आम्ही “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान,” देणाऱ्या आमच्या प्रेमळ स्वर्गीय मेंढपाळ, यहोवाला स्तुती सादर करतो.—इफिसकर ४:८; याकोब १:१७.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ एखादा पुरुष त्याच्या घरची चांगली व्यवस्था कशी राखू शकतो?
▫ ख्रिस्ती वडिलांच्या देखरेखीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत?
▫ सल्ला देत असता वडिलांनी विनयशीलता व सौम्यता कशी प्रदर्शित करावी?
▫ आध्यात्मिक सुधारणा परिणामकारक होण्यास काय मदत करते?
▫ कळपाची काळजी घेत असता वडील धोक्याच्या परिस्थितींना कसे टाळू शकतात?
[चित्र]
ख्रिस्ती वडीलाने त्याच्या घरची चांगली व्यवस्था राखणारा असावे
[चित्र]
ख्रिस्ती सौम्यतने व चांगले तारतम्य राखून मेंढपाळकत्त्व करण्यास हवे