एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे
“सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२४.
१. आपण यहोवा देवाला एकनिष्ठा दाखवण्यास बाध्य का आहोत?
एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्याचे अनेक पैलू आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यहोवा देवाशी एकनिष्ठ राहण्याच्या आव्हानाला तोंड देणे. खरोखरच, यहोवा कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केले आहे व त्याला केलेले आपले समर्पण या सर्व गोष्टींना ध्यानात ठेवून आपण त्याला एकनिष्ठा दाखवण्यास बाध्य आहोत. आपण यहोवा देवाला एकनिष्ठा कशी प्रदर्शित करतो? यहोवाच्या धार्मिक तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे, हा एक प्रमुख मार्ग आहे.
२, ३. एकनिष्ठा आणि धार्मिकता यांच्यामध्ये काय संबंध आहे?
२ त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण १ पेत्र १:१५, १६ मधील शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे; तेथे असे म्हटले आहे: “तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” यहोवा देवाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आपण सदोदित त्याच्या आज्ञेत राहू, आपले विचार, आपले बोलणे आणि आपल्या कृती त्याच्या पवित्र इच्छेच्या सुसंगतेत ठेवू. त्याचा अर्थ एक चांगला विवेक जतन करणे. १ तीमथ्य १:३-५ मध्ये आपल्याला आज्ञा दिली आहे: “ताकीद देण्याचा हेतु हा आहे की, [वेगळी शिकवण शिकवणे नव्हे किंवा खोट्या कथांकडे लक्ष देणे नव्हे] शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी.” हे खरे, की आपल्यातील कोणीच परिपूर्ण नाही, पण आपण होता होईल तितके करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का?
३ यहोवाशी एकनिष्ठ राहिल्याने आपण धार्मिक तत्त्वांसंबंधाने स्वार्थीपणे हातमिळवणी करण्याचे टाळू. वास्तविकतेत, एकनिष्ठा आपल्याला दुरंगी न होण्यास मदत करील. “हे परमेश्वरा, [यहोवा] तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” असे स्तोत्रकर्त्याने गायिले तेव्हा त्याच्या मनामध्ये एकनिष्ठेचाच विचार होता. (स्तोत्र ८६:११) मानवांकडून “अमलात आणता न येण्याजोग्या नियमांना . . . आज्ञाधारक” असण्याची एकनिष्ठा अपेक्षा करते.
४, ५. कोणते चुकीचे कृत्य करण्यापासून एकनिष्ठा आपल्याला सावध राहण्यास मदत करील?
४ यहोवा देवाशी एकनिष्ठा, त्याच्या नावावर किंवा राज्यावर कलंक आणणारी कोणतीही गोष्ट करण्यापासून दूर राहण्यास मदत करील. उदाहरणार्थ, एकदा दोन ख्रिश्चनांमध्ये अशी एक समस्या आली की त्यांनी अयोग्यपणे एका जगिक न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायाधीशाने विचारले, ‘तुम्ही दोघेही यहोवाचे साक्षीदार आहात का?’ हे दोघे न्यायालयात का आले होते हे त्याला उगमले नाही. किती मोठा कलंक होता तो! या दोन्ही बांधवांनी यहोवा देवाशी एकनिष्ठा राखली असती तर त्यांनी प्रेषित पौलाच्या या सल्ल्याचे अनुकरण केले असते: “तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यांत सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?” (१ करिंथकर ६:७) निश्चितच, यहोवाचे नाव आणि त्याची संघटना यांच्यावर कलंक आणण्यापेक्षा व्यक्तिगत हानी सहन करणे हा त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा मार्ग होय.
५ यहोवा देवाशी एकनिष्ठ असण्यामध्ये, मानवाच्या भीतीला बळी न पडणे समाविष्ट आहे. “मनुष्याची भीति पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर [यहोवावर] भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” (नीतिसूत्रे २९:२५) अशा प्रकारे, छळाची लाट उसळते तेव्हा आपण हातमिळवणी करत नाही तर भूतपूर्व सोव्हियत संघराज्य, मलावी, इथियोपिया आणि पुष्कळ इतर राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांनी मांडलेले उदाहरण अनुसरतो.
६. कोणाबरोबर संगत न ठेवण्यास एकनिष्ठा आपल्याला मदत करील?
६ यहोवा देवाशी आपण एकनिष्ठ असल्यास, जे त्याचे शत्रू आहेत अशा सर्वांसोबत मैत्री करण्याचे आपण टाळू. म्हणूनच शिष्य याकोबाने लिहिले: “अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) राजा दावीदाने, “तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करितो; मी त्यांना आपले शत्रू मानितो,” असे म्हणून त्याच्या एकनिष्ठेचा पुरावा दिला त्याप्रमाणे आपणही एकनिष्ठा प्रदर्शित केली पाहिजे. (स्तोत्र १३९:२१, २२) जाणूनबुजून पाप करणाऱ्यांबरोबर आपण नातेसंबंध ठेवू इच्छित नाही कारण आपल्या आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीत साम्य नसते. व्यक्तीच्या रूपाने असो किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून असो, यहोवाच्या अशा कोणत्याही शत्रूंसोबत नातेसंबंध ठेवण्यापासून देवासोबतची एकनिष्ठा आपल्याला दूर ठेवणार नाही का?
यहोवाच्या बाजूने येणे
७. एकनिष्ठा यहोवाविषयी आपल्याला काय करण्यास मदत करील आणि अलीहूने हे कसे केले?
७ एकनिष्ठा आपल्याला यहोवा देवाच्या बाजूला येण्यास प्रवृत्त करील. अलीहूचे किती चांगले उदाहरण आपल्यापुढे आहे! ईयोब ३२:२, ३ आपल्याला सांगते: “अलीहू याचा राग भडकला; ईयोबाने देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले म्हणून त्याजवर त्याचा राग भडकला. आपल्या तिघा मित्रांस ईयोबाला उत्तर द्यावयास सापडले नसताहि त्यांनी त्यास दोषी ठरविले म्हणून त्यांजवरहि त्याचा राग भडकला.” ईयोबाच्या ३२ अध्यायापासून ३७ पर्यंत आपल्याला वाचावयास मिळते, की अलीहू यहोवाच्या बाजूने आला. उदाहरणार्थ, तो म्हणाला: “अमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे असे मी तुला दाखवितो. . . . आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन. . . . तो धार्मिकांवरील आपली दृष्टि काढीत नाही.”—ईयोब ३६:२-७.
८. आपण यहोवाच्या बाजूने येण्याची गरज का आहे?
८ यहोवाच्या बाजूने येण्याची काय गरज आहे? आज, आपला देव यहोवा याची किती तरी मार्गांनी निंदा केली जाते. तो अस्तित्वातच नाही, तो त्रैक्याचा एक भाग आहे, जळजळत्या नरकात तो लोकांना चिरकाल यातना देतो, जगाचे रूपांतर करण्याचा तो व्यर्थ प्रयत्न करत आहे, त्याला मानवजातीची काळजी नाही आणि अशा प्रकारचे अनेक दावे त्याच्याविरूद्ध केले जातात. परंतु, आपण त्याच्या बाजूने येऊन त्याच्यासाठी आपली एकनिष्ठा व्यक्त करतो व यहोवा अस्तित्वात आहे; तो बुद्धिमान, न्यायी, सर्वसमर्थ आणि प्रेमळ देव आहे; सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ आहे; त्याच्या नियुक्त वेळी तो सर्व दुष्टाईचा अंत करील व पृथ्वीला परादीस करील हे शाबीत करतो. (उपदेशक ३:१) असे करण्यासाठी आपण यहोवाचे नाव आणि त्याचे राज्य यांची साक्ष देण्याकरता प्रत्येक संधीचा उपयोग केला पाहिजे.
यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठा
९. कोणकोणत्या बाबतीत काहींनी त्यांच्या एकनिष्ठेची उणीव प्रकट केली आहे?
९ आता आपण यहोवाच्या दृश्य संघटनेशी एकनिष्ठ राहण्याच्या बाबीकडे लक्ष देऊ या. आपण तिला एकनिष्ठ असलेच पाहिजे; तसेच ख्रिस्ती मंडळीला आध्यात्मिक अन्न पुरवणाऱ्या “विश्वासू आणि बुद्धिमान दासाला” देखील एकनिष्ठ राहिले पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) समजा, वॉच टावर प्रकाशनांमध्ये जे आपल्याला समजले नाही असे काही लिहिले आहे किंवा आपण त्या क्षणी तरी त्याजशी सहमत नाही. तेव्हा आपण काय करू? वाईट वाटून घेऊन संघटना सोडून देऊ? हजार वर्षांच्या राजवटीत राहणाऱ्या लोकांना नवा करार लागू होईल असे अनेक वर्षांआधी टेहळणी बुरूज नियतकालिकाने प्रकाशित केले तेव्हा काहींनी असेच केले. इतरांना, टेहळणी बुरूज नियतकालिकाने एकेकाळी, तटस्थतेच्या वादविषयाबद्दल जे म्हटले त्याबद्दल वाईट वाटले. या बाबींमुळे जे अडखळलेले जर संघटनेशी आणि त्यांच्या बांधवांशी एकनिष्ठ राहिले असते तर ते याच्या स्पष्टीकरणासाठी यहोवावर अवलंबून राहिले असते; आणि हे त्याने त्याच्या नियुक्त समयी केले. अशा प्रकारे, एकनिष्ठ राहण्यामध्ये, विश्वासू आणि बुद्धिमान दास पुढील समज प्रकाशित करेपर्यंत थांबून राहणे समाविष्ट आहे.
१०. एकनिष्ठा आपल्याला कोणत्या गोष्टींची उत्सुकता न बाळगण्यास मदत करील?
१० यहोवाच्या दृश्य संघटनेशी एकनिष्ठ राहण्याचा अर्थ, धर्मत्यागी लोकांचा नकार करणे असा देखील होतो. अशा लोकांना काय म्हणावयाचे आहे ते ऐकून घेण्याची उत्सुकता निष्ठावान ख्रिश्चनांना नसेल. पृथ्वीवर यहोवा देवाचे कार्य करण्यासाठी तो ज्यांचा उपयोग करतो ते परिपूर्ण नाहीत हे खरे. पण देवाचे वचन आपल्याला काय करण्यास सांगते? देवाची संघटना सोडून जाण्यास सांगते? नाही. बंधुत्वाच्या प्रीतीने आपल्याला तिच्याशी एकनिष्ठ राहण्यास मदत केली पाहिजे आणि आपण निरंतर “एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति” करत राहिले पाहिजे.—१ पेत्र १:२२.
एकनिष्ठ वडिलांसोबत एकनिष्ठा
११. एकनिष्ठा आपल्याला कोणत्या नकारात्मक विचारांपासून सांभाळून ठेवील?
११ आपल्याला समजत नाही अशी गोष्ट जेव्हा मंडळीमध्ये बोलली जाते किंवा केली जाते तेव्हा एकनिष्ठा आपल्याला संदेह करण्यापासून दूर ठेवील आणि कदाचित ती प्रत्येकाची आपआपली विचार करण्याची पद्धत आहे असा विचार करण्यास आपल्याला मदत मिळेल. नियुक्त वडील आणि इतर सहविश्वासूंच्या चुकांवर विचार करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांचा विचार करणे अधिक उत्तम नाही का? होय, आपण अशा सर्व नकारात्मक विचारांपासून जागृत असले पाहिजे कारण त्यांचा संबंध बेइमानीशी आहे! एकनिष्ठा आपल्याला, “कोणाची निंदा करू नये,” या पौलाच्या आदेशाचे पालन करण्यास देखील मदत करील.—तीत ३:१, २.
१२, १३. वडिलांना कोणत्या विशिष्ट आव्हानांना तोंड द्यावे लागते?
१२ एकनिष्ठा वडिलांसमोर विशिष्ट आव्हान मांडते. या आव्हानांतील एक, गोपनीयतेची बाब होय. मंडळीतील एखादा सदस्य एका वडिलांजवळ त्याच्या गुपित गोष्टी सांगेल. त्या सदस्याशी एकनिष्ठा वडिलांना, गोपनीयतेच्या तत्त्वाचा भंग करण्यापासून परावृत्त करील. ते नीतिसूत्रे २५:९ येथील सल्ल्याचे अनुकरण करतील, जेथे म्हटले आहे: “इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.” त्याचा अर्थ असा होतो, की स्वतःच्या पत्नीलासुद्धा त्या गुप्त गोष्टी सांगू नयेत!
१३ वडिलांना एकनिष्ठेच्या इतरही परीक्षांना तोंड द्यावे लागते. ते मानवांना खूष करणारे असतील का, किंवा ज्यांना सुधारणुकीची आवश्यकता आहे, मग ते रक्ताचे नातेवाईक असोत किंवा जवळचे मित्र असोत, अशांना धैर्याने व सौम्यतेने साहाय्य करतील का? यहोवाच्या संघटनेशी असलेल्या एकनिष्ठेमुळे ज्यांना आध्यात्मिक साहाय्याची आवश्यकता आहे अशांना मदत करण्याचा प्रयत्न आपल्यातील वडील करतील. (गलतीकर ६:१, २) आपण नम्र असलो तरी प्रेषित पौल ज्याप्रमाणे प्रेषित पेत्राला स्पष्ट आणि सरळ शब्दात बोलला त्याचप्रमाणे एकनिष्ठा आपल्याला सह वडिलांबरोबर स्पष्ट राहण्यास मदत करील. (गलतीकर २:११-१४) दुसऱ्या बाजूला पाहता पर्यवेक्षकांनी दक्ष असले पाहिजे, नाहीतर मूर्खपणे कृती करण्याद्वारे, पक्षपातीपणा करण्याद्वारे, किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करण्याद्वारे ते, त्यांच्या देखरेखीखाली असलेल्यांना देवाच्या संघटनेशी एकनिष्ठ राहणे कठीण बनवतात.—फिलिप्पैकर ४:५.
१४, १५. कोणत्या गोष्टी मंडळीतील सदस्यांच्या एकनिष्ठेची परीक्षा घेऊ शकतील?
१४ मंडळी आणि तिच्या वडिलांना एकनिष्ठा दाखवण्याच्या आव्हानाला तोंड देण्याच्या बाबीचे इतरही पैलू आहेत. मंडळीमध्ये काहीसे तंग वातावरण असल्यास, यहोवा आणि त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांशी एकनिष्ठ राहण्याची हीच एक संधी असते. (टेहळणी बुरूज जून १५, १९८७, पृष्ठे १५-१७, पहा.) जेव्हा एखाद्याला बहिष्कृत केले जाते तेव्हा, घेतलेल्या कारवाईसाठी पुरेशी कारणे होती की नव्हती यासाठी दुसरा पर्याय मांडण्याचा प्रयत्न न करता आपण वडिलांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा एकनिष्ठा आपल्याकडून करते.
१५ मंडळीची एकनिष्ठा आपल्याकडून, आपली परिस्थिती आणि क्षमता आपल्याला जेवढ्या प्रमाणावर वाव देतात त्यानुसार मंडळीच्या पाचही साप्ताहिक सभांना पाठबळ द्यावा अशी अपेक्षा करते. त्या सभांना नियमाने उपस्थित राहणे इतकेच नव्हे तर त्यांची तयारी करणे आणि संधी मिळेल तेव्हा उभारणीकारक विवेचने देण्याची अपेक्षा एकनिष्ठा आपल्याकडून करते.—इब्रीयांस १०:२४, २५.
वैवाहिक एकनिष्ठा
१६, १७. विवाहित ख्रिश्चनांना एकनिष्ठेच्या कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?
१६ आपण आणखी कोणास एकनिष्ठ राहिले पाहिजे? आपण विवाहित असल्यास आपल्या विवाह शपथांना लक्षात ठेवून आपल्याला आपल्या वैवाहिक सोबत्याशी एकनिष्ठ राहण्याच्या आव्हानाला तोंड दिले पाहिजे. आपल्या सोबत्याशी एकनिष्ठा, स्वतःच्या पत्नीला किंवा पतीला संतुष्ट करण्यापेक्षा दुसऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला अधिक संतुष्ट करण्याची घोडचूक करण्यापासून आपला बचाव करील. आपल्या सोबत्याशी एकनिष्ठा, सोबत्याच्या कमतरता किंवा चूका बाहेरच्यांना सांगू नयेत अशी देखील अपेक्षा आपल्याकडून करते. इतरांकडे कुरकूर करणे जेवढे सोपे आहे तेवढेच आपल्या सोबत्याबरोबर मोकळेपणे दळणवळण ठेवणे कठीण आहे, पण सुवर्ण नियमाच्या सुसंगतेत आपण ते केले पाहिजे. (मत्तय ७:१२) खरे पाहता, वैवाहिक स्थितीमुळे आपल्या ख्रिस्ती एकनिष्ठेला खरोखर एक आव्हान आहे.
१७ एकनिष्ठेच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण नुसतेच घोर दुवर्तन टाळणे पुरेसे नाही तर आपले विचार आणि भावना यांच्याविषयीही दक्ष असले पाहिजे. (स्तोत्र १९:१४) उदाहरणार्थ, आपल्या कपटी अंतःकरणांना सुखविलास आणि मौजमजा यांचा हव्यास असल्यास, स्वार्थीपणे प्रशंसा करण्यापासून हाव धरण्याइतपत जाणे किती सोपे आहे. वैवाहिक निष्ठा आर्जवताना शलमोन राजा लाक्षणिकपणे, ‘आपल्याच टाक्यातले पाणी पिण्याचा’ सल्ला पतींना देतो. (नीतिसूत्रे ५:१५) शिवाय येशूने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) संभोगवर्णनाच्या साहित्याचे वाचन करणाऱ्या पतींना व्यभिचार करण्यास प्रवृत्त केले जाण्याचा धोका असतो व अशा प्रकारे ते आपल्या पत्नींना फसवत असतात व त्यांच्याशी अप्रामाणिक होतात. एखादी पत्नी देखील याच कारणासाठी दूरदर्शनवर दाखविण्यात येणाऱ्या व्यभिचारी मालिका म्हणजेच, सोप ओपेरा पाहण्यात गर्क झाल्यास तिला तिच्या पतीसोबत अप्रामाणिक होण्याचा मोह होऊ शकतो. परंतु, आपल्या सोबत्यासोबत खरोखर प्रामाणिक राहिल्याने आपण वैवाहिक बंधन दृढ करतो व एकमेकांना यहोवा देवाला आनंदविण्याच्या आपल्या प्रयत्नात मदत करतो.
एकनिष्ठ राहण्यासाठी साहाय्यकारी साधने
१८. कोणत्या गोष्टींची गुणग्राहकता आपल्याला एकनिष्ठ राहण्यास मदत करील?
१८ यहोवा, त्याची संघटना, मंडळी आणि आपला वैवाहिक सोबती या सर्वांशी एकनिष्ठा, या चार क्षेत्रांमध्ये एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला काय मदत करील? एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्याचा यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनाशी जवळचा संबंध आहे हे समजून घेणे एक साहाय्यकारी साधन होय. होय, एकनिष्ठ राहिल्याने आपण दाखवून देतो, की आपण यहोवा विश्वाचा सार्वभौम आहे हे मानतो. अशा प्रकारे, आपण स्वाभिमानी होऊ शकतो व आपल्याला यहोवाच्या नवीन जगामध्ये सार्वकालिक जीवनाची आशा देखील मिळू शकते. आपण एकनिष्ठ राहण्यासाठी यहोवाच्या उदाहरणाचा, बायबल आणि आपली वॉच टावर प्रकाशने ज्यांमध्ये वार्षिक पुस्तक अहवालांचा देखील समावेश होतो, यांतील एकनिष्ठेच्या सर्व उत्तम उदाहरणांचा विचार करून स्वतःची मदत करू शकतो.
१९. विश्वास, आपल्या एकनिष्ठ राहण्यामध्ये कोणती भूमिका पार पाडतो?
१९ यहोवा देवावर दृढ विश्वास आणि त्याला नाखूष करण्याचे भय, आपल्याला एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी मदत करील. देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याने व ख्रिस्ती सेवा कार्यात भाग घेतल्याने आपण यहोवावरील आपला विश्वास आणि त्याच्याबद्दलचे भय दृढ करतो. “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे; आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव-सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा,” या इफिसकर ४:२३, २४ मधील पौलाच्या सल्ल्याच्या सुसंगतेत वागण्यासाठी हे आपल्याला मदत करील.
२०. सर्वांहून अधिक म्हणजे, कोणता गुण आपल्याला यहोवाशी आणि आपण ज्यांना एकनिष्ठा दाखवली पाहिजे अशांसोबत एकनिष्ठ राहण्यास मदत करील?
२० यहोवाच्या गुणांची गुणग्राहकता आपल्याला एकनिष्ठ राहण्यास मदत करते. सर्वांहून अधिक म्हणजे, आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल निःस्वार्थ प्रीती आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता, आणि पूर्ण हृदय, जीव, मन व शक्तीने त्याच्यावरील प्रीती आपल्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यास मदत करील. शिवाय, येशूच्या शिष्यांची ओळख करून देणारी प्रीती, मंडळीतील सर्व ख्रिस्ती आणि आपले कुटुंब यांसोबत एकनिष्ठ राहण्यास साहाय्य करील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वास्तविक पाहता ही, स्वार्थी किंवा निःस्वार्थी होण्याची बाब आहे. अप्रामाणिकतेचा अर्थ स्वार्थी असणे असा होतो. एकनिष्ठ राहण्याचा अर्थ निःस्वार्थी असणे असा होतो.—मार्क १२:३०, ३१; योहान १३:३४, ३५.
२१. एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्याच्या बाबीचा कशाप्रकारे सारांश दिला जाऊ शकतो?
२१ सारांशात: एकनिष्ठा हा उत्तम प्रतीचा गुण यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि यहोवाचे सर्व खरे उपासक प्रदर्शित करतात. यहोवा देवाबरोबर चांगला नातेसंबंध ठेवण्यासाठी, त्याच्या धार्मिक गरजांनुरूप जीवन व्यतीत करण्याद्वारे, त्याच्या शत्रूंशी काही घेणे देणे न ठेवण्याद्वारे व औपचारिक आणि अनौपचारिकरीत्या साक्ष देऊन यहोवाची बाजू घेण्याद्वारे त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. त्याशिवाय, आपण यहोवाच्या दृश्य संघटनेशी एकनिष्ठ राहण्याच्या आव्हानाला देखील तोंड दिले पाहिजे. आपण आपल्या मंडळीशी आणि आपल्या वैवाहिक सोबत्यांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. यशस्वीपणे एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड दिल्याने आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनामध्ये भाग घेत असू व त्याची बाजू घेत असू. अशा प्रकारे, आपण त्याची कृपापसंती मिळवू आणि सार्वकालिक जीवनाचे बक्षीस प्राप्त करू. ईश्वरी भक्तीबद्दल प्रेषित पौलाने जे म्हटले ते आपल्या एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यालाही लागू होऊ शकते. ते आत्ताच्या आणि येणाऱ्या जीवनाकरता लाभदायक आहे.—स्तोत्र १८:२५; १ तीमथ्य ४:८.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ कोणत्या मार्गांनी आपण देवासोबतच्या एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देऊ शकतो?
◻ यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठ राहण्यामध्ये आपल्याकडून काय अपेक्षा केली जाते?
◻ कशाप्रकारे वडील जन एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देऊ शकतात?
◻ एकनिष्ठेचा समावेश असणाऱ्या कोणत्या आव्हानाला विवाहित ख्रिश्चनांनी तोंड दिले पाहिजे?
◻ एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणते गुण आपल्याला मदत करतील?
[१७ पानांवरील चित्रं]
मंडळीच्या सदस्यांशी एकनिष्ठा, वडिलांना गुप्त गोष्टींना प्रकट नकरण्यास मदत करील
[१८ पानांवरील चित्रं]
स्वतःच्या सोबत्याशी एकनिष्ठा विवाह बंधनाला दृढ करते