वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ७/१ पृ. १६-२१
  • निष्ठा कोणत्या किंमतीवर?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निष्ठा कोणत्या किंमतीवर?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निष्ठेचे विवेचन
  • कुलपित्यांनी निष्ठा दाखवली
  • ख्रिस्ती निष्ठावंतपणा
  • निष्ठा—कोणत्या किंमतीवर?
  • ज्याला किंमत द्यावी लागत नाही अशी निष्ठा
  • ते एकनिष्ठ जन पहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तुम्ही कोणाला एकनिष्ठ असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठेने सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ७/१ पृ. १६-२१

निष्ठा कोणत्या किंमतीवर?

“निष्ठावानांशी तू निष्ठावंतपणे वागतोस.”—स्तोत्रसंहिता १८:२५, न्यू. व.

१, २. (अ) निष्ठा म्हणजे काय, आणि याचे पैलू आमच्या जीवनावर कसे परिणाम करतात? (ब) यहोवाकडे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणून जाणे का चांगले आहे?

विश्‍वासूपणा, कर्तव्य, प्रेम, बंधन, राजनिष्ठा. या सर्वांमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सर्वसाधारण असल्याचे दिसते? हे निष्ठावंतपणाचे वेगवेगळे पैलू आहेत. तथापि, आज पुष्कळ लोकांना निष्ठेचा तितका अर्थ वाटत नाही. वैवाहिक सोबत्यास निष्ठावंतपणा, कुटुंबातील वयस्करांविषयीचे कर्तव्य, कर्मचाऱ्‍याची आपल्या मालकासंबंधाने राजनिष्ठा—या सर्व गोष्टी साधारण समजल्या जातात व त्यात हातमिळवणीही होते. जेव्हा निष्ठेविषयी चकमकी उडतात तेव्हा काय घडते बरे? अलिकडेच इंग्लंडमध्ये एका हिशेबनीसाने कर-अधिकाऱ्‍याला आपल्या कंपनीच्या मालमत्तेची खरी स्थिती सांगितली तेव्हा त्याला आपली नोकरी गमवावी लागली.

२ निष्ठेविषयी बोलणे हे सोपे वाटते, पण खऱ्‍या निष्ठेला भीतीदायकरित्या हातमिळवणी करण्याचे भय नसणाऱ्‍या कृतीची जोड जरूरीची आहे. आपण अपूर्ण मानव असल्यामुळे यात सहसा अपयशी ठरत असतो. यासाठीच, ज्याच्या निष्ठेविषयी कधीही प्रश्‍न विचारला जाऊ शकणार नाही अशा व्यक्‍तीविषयीचे, म्हणजे खुद्द यहोवा देवाचे उदाहरण विचारात घेणे चांगले आहे.

निष्ठेचे विवेचन

३. उत्पत्ती ३:१५ मध्ये विदित केलेल्या आपल्या उद्देशाच्या बाबतीत यहोवा कसा निष्ठावंत ठरला?

३ आदामाने पाप केल्यावर त्याच्या अद्याप न जन्मलेल्या संततीची मुक्‍तता करण्याची योजना यहोवा देवाने स्पष्टरित्या बोलून दाखवली. ही कृती त्याने, मानवी निर्मितीविषयी त्याला वाटणाऱ्‍या प्रेमामुळे आचरली. (योहान ३:१६) त्यामुळे अगदी योग्य वेळात, येशू ख्रिस्त हा उत्पत्ती ३:१५ मधील वचनयुक्‍त संतान व खंडणी यज्ञार्पण देणारा असल्याचे सिद्ध झाले. शिवाय यहोवा देवाने आपला व्यक्‍त केलेला उद्देश पूर्ण करण्यात माघार घेतली नाही. यामुळे येशूचे खंडणी यज्ञार्पण स्वीकारण्यामुळे आमच्या विश्‍वासाला निराशा मिळणार नाही.—रोम ९:३३.

४. यहोवा आपल्या पुत्राच्या बाबतीत कसा निष्ठावंत ठरला, आणि याचा काय परिणाम झाला?

४ यहोवाने आपल्या पुत्राविषयी व्यक्‍त केलेली निष्ठा पृथ्वीवरील त्याच्या उपाध्यपणात मोठा आधार देणारी ठरली. आपल्याला मरावे लागणार हे येशूला ठाऊक होते व येथपर्यंत त्याचा देवाला निष्ठावंत राहण्याचा निर्धार होता. त्याच्या मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान, त्याला बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला तेव्हा मिळाले. त्याचा विश्‍वासघात झाला तेव्हा त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला अशी विनंती केली की, ‘जग होण्याआधी जे त्याचे गौरव यहोवापाशी होते ते त्याला परत द्यावे.’ (योहान १७:५) पण हे कसे शक्य होणार होते? आपल्या निष्ठावंत पुत्राला मरणानंतर कबरेत कुजू न देता, यहोवाला ते साध्य करता येणार होते. या कारणास्तव, यहोवाने त्याला मृतातून पुनरुत्थान करून अमरत्व बहाल केले आणि स्तोत्रसंहिता १६:१० मध्ये जे भविष्यवादित अभिवचन लिखित आहे त्याची निष्ठावंतपणे पूर्णता केली. त्या वचनात म्हटले आहेः “तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस.”—प्रे. कृत्ये २:२४-३१; १३:३५; प्रकटीकरण १:१८.

५. यहोवाची आणखी कोणती इतर कृत्ये, त्याने येशूला दिलेल्या अभिवचनांशी संबंध दाखवतात?

५ आपले पुनरुत्थान झाल्यावर येशूला हे माहीत होते की, ‘त्याचे वैरी त्याच्या पायाखालचे आसन होणार’ हे यहोवाने दिलेले अभिवचन पूर्ण होण्याची त्याला आशा धरता येईल. (स्तोत्रसंहिता ११०:१) तो काळ, “विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती” व देवाच्या राज्याची स्वर्गात प्रस्थापना झाली तेव्हा १९१४ मध्ये आला. येशूचे आपल्या शत्रूवर पूर्वभाकित असणारे प्राबल्य, त्याने सैतान व दुरात्मे यांना स्वर्गातून हाकून लावण्याद्वारे सुरु झाले. याची पूर्तता यांचा हजार वर्षांसाठी अगाधकूपात टाकले जाणे तसेच “पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये” यांचा नाश होईपर्यंत होत राहणार.—लूक २१:२४; प्रकटीकरण १२:७-१२; १९:१९; २०:१-३.

६. देव आपल्याला कोणती खात्रीलायक आशा देतो, आणि याविषयीची कदर आपल्याला कशी दाखवता येईल?

६ स्तोत्रकर्त्याने आर्जविलेः “यहोवाची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर. म्हणजे तो तुझी उन्‍नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल.” (स्तोत्रसंहिता ३७:३४) यहोवा आपले वचन पाळील व तेही या दुष्ट जगाच्या अंतापर्यंत पाळील, तसेच तो ‘त्याच्या मार्गाचे अवलंबन करणाऱ्‍या’ सर्व पुरुष, स्त्रिया व मुलांचे रक्षण करील याचा आम्हाला आत्मविश्‍वास राखता येईल. मूळ इब्री भाषेतील ती संज्ञा यहोवाची सेवा परिश्रमाने व विश्‍वासूपणाने करण्याचा भावार्थ देते. त्यामुळे, सध्याचा काळ हा थकून जाण्याचा तसेच आम्हास दिलेल्या सेवेचा हक्क टाकून देण्याचा काळ नाही. हा काळ आमचा देव व त्याचे राज्य याची निष्ठावंत सेवा सादर करण्यामध्ये परिश्रम घेण्याचा आहे. (यशया ३५:३, ४) याविषयीची सुंदर अशी स्फूर्तिदायक उदाहरणे आहेत. त्यापैकी काहींचा आपण विचार करू या.

कुलपित्यांनी निष्ठा दाखवली

७, ८. (अ) यहोवाने नोहा व त्याच्या कुटुंबाला कामाची कोणती नियुक्‍ती दिली? (ब) जगव्याप्त प्रलयामध्ये नोहाच्या घराण्याने यहोवाकडील संरक्षण कसे अनुभवले?

७ दुष्ट मानवी समाजाचा प्रलयाने नाश करावा असे यहोवाने ठरविले तेव्हा त्याने कुलपिता नोहा याजशी त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचा करार केला, म्हणजे त्यांना या पृथ्वीवर त्यानंतर जिवंत राहता येऊ शकेल. (उत्पत्ती ६:१८) नोहाने त्या ईश्‍वरी संरक्षणाविषयी आपली कृतज्ञता दर्शविली, पण त्याला व त्याच्या कुटुंबाला या संरक्षणाच्या योग्य आहोत असे सिद्ध करून दाखवायचे होते. ते कसे? यहोवाने जे आज्ञापिले ते करून. त्यांना प्रथम एक प्रचंड तारू बांधण्याचे काम आले. ते संपवल्यावर नोहाने प्राण्यांच्या सर्व प्रातिनिधिक जोड्यांना त्यात जागा करून द्यायची होती व बऱ्‍याच काळासाठी टिकणारा अन्‍नसाठा जमवून ठेवायचा होता. पण एवढेच नव्हते. या सर्व तयारीच्या काळात नोहाला जितके साध्य करता येते होते ते अपूर्व असे प्रचाराचे कार्य त्याने केले ज्यात येणाऱ्‍या ईश्‍वरी न्यायदंडाविषयीचा इशारा घोषित करणे समाविष्ट होते.—उत्पत्ती अध्याय ६ व ७; २ पेत्र २:५.

८ पवित्र शास्त्र सांगते की, “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ती ६:२२; ७:५) नोहा व त्याच्या कुटुंबाने त्यांना मिळालेल्या नेमणूकीत निष्ठावंतपणा दाखवला. त्यांच्या स्वार्थत्यागी आत्म्याने त्यांना त्यांचा वेळ हितकारी मार्गाने खर्च करू दिला. त्यांना देण्यात आलेले काम कठीण होते व प्रचार अवघड होता. नोहाच्या मुलांनी जलप्रलयाआधी आपल्या मुलांना जन्म न दिल्यामुळे त्यांना व त्यांच्या बायकांना नियुक्‍त कामात एकाग्र होण्यात व त्यानुसार आपली हालचाल ठेवण्यास मदत दिली. त्या विनाशकारी प्रलयाने एका दुष्ट जगाचा अंत केला. यातून नोहा, त्याची बायको, त्याची तीन मुले व तीन सुना वाचल्या. त्यांनी देवाला निष्ठावंतपणा दाखवून त्याच्या मार्गाचे अवलंबन केले याची आज आपल्याला धन्यता वाटली पाहिजे, कारण आपण प्रत्येक जण नोहाचे शेम, हाम किंवा याफेथ याजकडून थेट वंशज बनलो आहोत.—उत्पत्ती ५:३२; १ पेत्र ३:२०.

९. (अ) यहोवाने अब्राहामाची जी परिक्षा घेतली ती त्याच्या निष्ठावंतपणाची कसोटी कशी होती? (ब) इसहाकाने यात आपला निष्ठावंतपणा कसा दाखविला?

९ अब्राहामाने आपला पुत्र इसहाक याला यज्ञार्पणासाठी सिद्ध केले तेव्हा तो यहोवाच्या आज्ञेचे पालन विश्‍वासूपणे करीत होता. ती निष्ठावंतपणाची खरीच केवढी परिक्षा होती! तथापि, यहोवाने अब्राहामाचा उगारलेला हात रोखून धरला व म्हटलेः “तू आपल्या मुलास, आपल्या एकुलल्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, यावरून तू देवाला भिऊन वागणारा आहेस हे मला कळले.” या घटनेआधी जे काही घडले त्याचे आपण मनन करणे हे चांगले आहे. मोराय डोंगरापर्यंत केलेल्या तीन दिवसांच्या प्रवासात अब्राहामाला एकंदर गोष्टीविषयी विचारविनिमय, पडताळा करण्यास आणि आपला विचार बदलण्यास पुरेसा वेळ निश्‍चितच मिळाला होता. आता ज्याने यज्ञार्पणाची लाकडे वाहून नेली होती व नंतर ज्याने स्वतःचे हातपाय बांधू देण्यास कसलाही प्रतिकार दाखवला नाही, त्या इसहाकाविषयी काय? त्याने आपला बाप अब्राहाम याजविषयीच्या निष्ठेला अडखळण उपस्थित होऊ दिले नाही की, आपल्याला या कार्यक्रमात काय करावे लागेल याबद्दल कोणतीही शंका घेतली नाही; वस्तुतः त्याच्या निष्ठावंतपणाच्या मार्गाक्रमणामुळे तर त्याचे जीवन जाणार होते!—उत्पत्ती २२:१-१८; इब्रीयांस ११:१७.

ख्रिस्ती निष्ठावंतपणा

१०, ११. आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे निष्ठावंतपणाचे कोणते उदाहरण आहे?

१० यहोवा नेहमीच निष्ठावंतपणे वागत आला आहे. “देवाचे अनुकारी व्हा,” असे प्रेषित पौल आर्जवितो. (इफिसकर ५:१, २) कुलपित्यांनी याबद्दल जसा प्रतिसाद दाखवला होता तसेच आता ख्रिश्‍चनांनाही दाखवणे होते. निष्ठावंत भक्‍तीच्या बाबतीत आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी सुंदर उदाहरण अनुसरले, हे पुढील अनुभव दाखवितात.

११ कॉन्स्टंटाईन या रोमी बादशहाचा बाप, कॉन्स्टान्टीयस १ला याला येशू ख्रिस्ताच्या अनुयायांबद्दल मोठी आत्मीयता वाटत होती. ख्रिश्‍चनांच्या निष्ठावंतपणाची परिक्षा घ्यावी या उद्देशाने त्याने आपल्या राजवाड्यात कामास असलेल्या ख्रिश्‍चनांना सांगितले की, त्यांनी मूर्तीस धूप दाखविले तरच ते त्याच्या सेवेस राहू शकतात. त्यांनी नकार दर्शविल्यास त्यांची नोकरी जाणार व त्याच्या हातून सूड घेतला जाणार असे त्यांना सांगण्यात आले. या लहानशा युक्‍तीने कॉन्स्टान्टीयस कोण आपली निष्ठा कधीही भंगवू इच्छिणार नव्हता ते जाणू इच्छित होता. ज्यांनी देव व त्याच्या तत्त्वाला आपली निष्ठा दाखवली, त्यांना बादशहाच्या सेवेत रूजू करण्यात आले; यापैकी काहींना तर विश्‍वस्त सल्लागाराची जागाही मिळाली. देवाच्या आज्ञेचा ज्यांनी अवमान केला अशांना लज्जास्पदरितीने हाकलून देण्यात आले.

१२. ख्रिस्ती देखरेख्यांनी निष्ठा कशी दाखवावी, आणि हे मंडळीच्या कल्याणाच्या दृष्टीने का हिताचे आहे?

१२ निष्ठावंतपणा हा सर्व ख्रिश्‍चनांच्या जीवनाचे गुणलक्षण असण्यास हवा तरीही तो तीतास पत्र १:८ मध्ये ख्रिस्ती देखरेख्यांसाठी एक अत्यावश्‍क गुण म्हणून देण्यात आला आहे. ज्याचा “निष्ठा” असा अनुवाद करण्यात आला आहे त्या होʹसिओस या ग्रीक शब्दाबद्दलचे वर्णन करताना विल्यम बर्कले म्हणतातः “मानवी कायद्यांपूर्वी अस्तित्वात राहिलेल्या व सध्या अस्तित्वात असणाऱ्‍या चिरकालिक नियमांचे आज्ञापालन करणारा माणूस.” देवाच्या नियमांच्या बाबतीत वडीलांनी असा निष्ठावंत पवित्रा घ्यावा हे जरुरीचे आहे. हे बरोबरचे उदाहरण मंडळीला एक गट किंवा वैयक्‍तीक सदस्यांच्या अनुषंगाने जे दबाव वा परिक्षा सामोऱ्‍या येतील त्यामध्ये दृढ राहून बळकट होत राहण्यासाठी मदतगार ठरेल. (१ पेत्र ५:३) नियुक्‍त वडीलांची कळपासंबंधाने ही मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी यहोवास दाखवीत असलेल्या निष्ठावंतपणाच्या बाबतीत कधीही हातमिळवणी होऊ देऊ नये; कारण मंडळीला त्यांच्या “विश्‍वासाचे अनुकरण करा” असा सल्ला देण्यात आला आहे.—इब्रीयांस १३:७.

निष्ठा—कोणत्या किंमतीवर?

१३. “सर्व लोकांना आपापली किंमत मिळते,” या तत्त्वाचा काय अर्थ होतो, आणि कोणती उदाहरणे याची सत्यता वदवितात?

१३ अठराव्या शतकातील ब्रिटीश प्रधान मंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांनी “सर्व लोकांना आपापली किंमत मिळते,” हे स्वयंसिद्ध तत्त्व म्हटल्याचे सांगण्यात येते. हे तत्त्व स्पष्ट करते की, स्वार्थी कारणास्तव निष्ठेचा वापर करण्यात आला याविषयी इतिहासात प्रचिती मिळते. उदाहरणार्थ, विल्यम टिंडेल या पवित्र शास्त्र भाषांतरकाराचा विचार करा, ज्यांनी हेन्री फिलिप याला चुकीने आपला मित्र मानले होते. १५३५ मध्ये फिलिपने विश्‍वासघात करून टिंडेल यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात दिले. याचा परिणाम टिंडेल यांना लगेच तुरुंगवास व अकाली मृत्यु मिळाला. एक इतिहासकार म्हणतो की, फिलिप हा एकतर इंग्लिश राजा किंवा इंग्लिश कॅथोलिकांचा प्रतिनिधी होता व “त्याला त्याच्या यहुदाच्या कामासाठी भरपूर पैसा मिळाला.” त्या इतिहासकाराने येथे यहुदा इस्कर्योतची समांतरता घेतली होती, कारण यहुदा इस्कर्योतने देखील येशू ख्रिस्ताचा विश्‍वासघात करण्यासाठी ३० चांदीचे तुकडे इतकी किंमत घेतली होती. तथापि, यावरुन आम्ही हा निर्वाळा घेऊ नये की, कोणा व्यक्‍तीच्या निष्ठेची “किंमत” केवळ पैशातच होत असते. ते तसे नसते.

१४. योसेफाची यहोवासंबंधाने असलेली निष्ठा कशी पणाला लावली गेली, आणि याचा काय परिणाम दिसला?

१४ पोटीफरच्या बायकोने योसेफाला “मजपाशी नीज,” अशी लोंचटपणे मागणी केली तेव्हा त्याची यहोवाशी असणारी निष्ठा पारखली गेली. तो काय करणार होता? यात जे तत्त्व गोवलेले आहे ते त्याच्या मनात स्पष्ट असल्यामुळे योसेफाने त्या घरातून पळ काढला. असे “घोर कर्म करून . . . देवाविरुद्ध अपराध” मुळीच करता येणार नाही हे त्याने आधीच ठरवले होते. लैंगिक समागमाचा उपभोग, योसेफाने आपला देव यहोवा याविषयी राखलेल्या निष्ठेवर मात करू शकला नाही.—उत्पत्ती ३९:७-९.

१५. अबशालोमाने कशी बेईमानी दाखवली, आणि याचा काय परिणाम झाला?

१५ तथापि, आणखी काही धोके आहेत. एक म्हणजे महत्त्वाकांक्षा निष्ठेची पायमल्ली करू शकते. दावीद राजाचा मुलगा अबशालोम याने त्याच्याविरुद्ध उठाव करण्यामागे हेच कारण होते. धूर्त योजना व गुप्त कारस्थान याद्वारे अबशालोमाने लोकांना आपल्या बाजूकडे केले; आणि मग त्याने लोकांचे सैन्य उभारून आपल्या बापाच्या निष्ठावंत साथीदारांशी सामना करण्याची तयारी केली. अबशालोम यवाबाच्या हाती ठार झाला व याद्वारे आपला बाप दावीदाशी केलेल्या बेईमानीचे त्याला फळ मिळाले. खरेच, ईश्‍वरशासित व्यवस्थेस उलथून पाडण्याच्या प्रयत्नाखातर ही केवढी किंमत द्यावी लागली!—२ शमुवेल १५:१-१२; १८:६-१७.

ज्याला किंमत द्यावी लागत नाही अशी निष्ठा

१६. करिंथकरांस दुसरे पत्र ११:३ सैतानाच्या हेतूंविषयी काय प्रकट करते?

१६ प्रत्येकाला आपली किंमत द्यावी लागते असा सैतानाचा दावा असला, आणि हे अबशालोमाच्या बाबतीत खरे घडले तरी ते योसेफाच्या बाबतीत खरे नव्हते, तसेच ते यहोवाच्या खऱ्‍या निष्ठावंत भक्‍तांविषयीही कधीच खरे नव्हते. तरीपण, निर्माणकर्त्यास आम्ही दाखवीत असलेली निष्ठा तोडावी यासाठी सैतान आम्हाला काहीही देण्यास तयार असतो. प्रेषित पौलाने ही भीती व्यक्‍त करून म्हटले की, “सापाने आपल्या कपटाने हव्वेला ठकविले तसे . . . कशाने तरी” तो आमची विचारशक्‍ती भ्रष्ट करून आम्हाला यहोवा व त्याच्या भक्‍तीविषयी राखलेल्या आमच्या निष्ठेसंबंधाने हातमिळवणी करायला लावू शकतो.—२ करिंथकर ११:३.

१७. सेवेच्या अमूल्य विशेषाधिकाराची हातमिळवणी काहींनी कशामध्ये पत्करली?

१७ यास्तव आम्ही स्वतःला विचारणे हे योग्य आहेः ‘मी माझ्या निर्माणकर्त्याला निष्ठावंतपणे भक्‍ती करण्याचा माझा हक्क कोणत्याही किमतीवर गमावू इच्छितो का?’ योसेफासारखे यहोवास समर्पित असणाऱ्‍या काही सेवकांनी अल्प किंमतीत हा मोबदला स्वीकारला हे दुःखाचे आहे. काही वडिलांनी देखील अनैतिक विलासाचा तात्कालिक सुखोपभोग घेता यावा यासाठी आपल्या पवित्र सेवेच्या हक्कासंबंधाने हातमिळवणी पत्करली. अशी गोष्ट करणारा वडील असो की कोणी, त्याला कौटुंबिक ऐक्य भंगल्याचा, मंडळीचे प्रेम व आदर गमावल्याचा व सर्वात अधिक म्हणजे, जो निष्ठावंतपणा टिकविण्याची मदत देतो तसेच सैतानाच्या कोणत्याही मोहाचा प्रतिकार करण्यास साहाय्य करतो त्या यहोवा देवाची संमती गमावल्याचे अनुभवण्यास मिळते.—यशया १२:२; फिलिप्पैकर ४:१३.

१८. १ ले तीमथ्य ६:९, १० मध्ये दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?

१८ पवित्र शास्त्राचे स्पष्ट इशारे असताना देखील, काहींनी जागतिक ध्येये मिळविण्याची आकांक्षा धरल्यामुळे “स्वतःस खेदांनी फार भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) या कारणामुळेच, देमास या पौलाने उल्लेखिलेल्या ख्रिस्ती माणसास तात्कालिकपणे वा कायमचे सगळे गमावावे लागले. (२ तीमथ्य ४:१०) यहोवाच्या निष्ठेची हातमिळवणी केलीच तर तिचे घातक परिणाम मिळाल्यावाचून राहात नाहीत. “देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण मनुष्य जे काही पेरितो, त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.

१९, २०. (अ) दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिरेकीपणाने पाहण्यात कोणते धोके संभवतात? (ब) एका साक्षीदार कुटुंबाने याबद्दल आपले कोणते उदाहरण मांडले?

१९ कधी कधी तडजोडीची किंमत मोठ्या चतुरपणे सामोरी येते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील अहवाल असा आहे की, कित्येक कुटुंबे घरी आपला दिवसाचा अर्धावेळ दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात घालवीत आहेत व खासपणे युवकांना याची तर सवयच जडली आहे. कोणी ख्रिश्‍चन आपले मन दूरदर्शनवर सादर होणाऱ्‍या लैंगिक व हिंसाचारी कार्यक्रमांनी भरवू लागला तर तो निश्‍चये ख्रिस्ती तत्त्वांची पायमल्ली कधीतरी करणार. यामुळे तो सहजासहजी बेईमान होऊन यहोवापासून दुरावला जाऊ शकतो. अशी ही वाईट संगत निश्‍चितपणाने नीती बिघडवते. (१ करिंथकर १५:३३) आपण वेळ काढून यहोवाच्या वचनाचा अभ्यास व मनन केले पाहिजे याचा कधीही विसर पडू देऊ नये. तर मग, यहोवाचा निष्ठावंत उपासक या नात्याने सार्वकालिक जीवन मिळवून देणाऱ्‍या ज्ञानाचा मोबदला, दूरदर्शन पडद्यासमोर आरामशीर बसून अवास्तव वेळ खर्च करण्यात घालविणे हे सूज्ञपणाचे आहे का? आज सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचणाऱ्‍या कित्येकांना या बाबतीत आमुलाग्र बदल करावा लागला आहे.—१ तीमथ्य ४:१५, १६; २ तीमथ्य २:१५.

२० ताकासी हा जपानी व्यापारी इंग्लंडमध्ये राहात होता. तो दर दिवशी सायंकाळचे तीन-चार तास आपल्या कुटुंबासमवेत दूरदर्शनवर कार्यक्रम बघण्यात घालवीत असे. सुमारे चार वर्षांआधी त्याचा व त्याच्या बायकोचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याने ठरविले की, व्यक्‍तीगत व कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यासाने त्यांच्या जीवनात प्राधान्य घेतले पाहिजे. तेव्हा त्याने दूरदर्शनचे कार्यक्रम दरदिवशी केवळ १५ ते ३० मिनिटापर्यंतच पाहण्याचा निर्धार करून आपल्या कुटुंबात चांगले नेतृत्व केले. ताकासीला इंग्लिश व जपानी असे दोन पवित्र शास्त्र घेऊन अभ्यास करावा लागला तरी त्याने जलदपणे आध्यात्मिक प्रगती घडवून आणली, आणि आता तो इंग्लिश भाषेच्या एका मंडळीत उपाध्य सेवक या अर्थी सेवा करीत आहे. त्याची बायको साहाय्यक पायनियरींग करते. “आमच्या दोन तरुण मुलांची आध्यात्मिकता सांभाळावी यासाठी,” तो म्हणतो, “मी व माझी बायको दर दिवशी त्यांना दूरदर्शनवरील जे कार्यक्रम बघण्याची मुभा देत असतो त्यावर मी काळजीपूर्वक नियंत्रण ठेवत असतो.” अशी ही शिस्त प्रतिफळदायक ठरते.

२१. सैतानाच्या कुयुक्त्यांविषयी आपण काय जाणतो, आणि आम्ही त्यापासून आपल्याला कसे सुरक्षित ठेवू शकतो?

२१ आम्हाला याची खात्री बाळगता येईलः सैतानाला आमचा अशक्‍तपणा माहीत आहे, व तो कदाचित आमच्यापेक्षाही चांगला त्याला ठाऊक आहे. यहोवास आपण दाखवीत असलेली निष्ठा दुबळी करावी किंवा त्यासाठी हातमिळवणी करावी याबद्दल तो जे प्रयत्न करतो त्यामध्ये तो कधीच शांत बसणार नाही. (पडताळा मत्तय ४:८, ९.) तर मग, आपण आपल्याला कसे सुरक्षित ठेवू शकतो? आपल्यापुढे आपले समर्पण नित्य ठेवून, आणि इतरांच्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी सेवा करताना आपले कौशल्य वाढवीत राहून. यहोवाचे निष्ठावंत सेवक या अर्थी आपल्याला त्याच्या सेवेत मग्न राहिले पाहिजे व सर्वदा त्याच्या पवित्र वचनाचे मार्गदर्शन पत्करले पाहिजे. यामुळे आमचा हा दृढ निश्‍चय टिकवून ठेवण्यात मदत होईल की, देवाची निष्ठा भंगविण्यासाठी सैतानाला कोणतीही किंमत प्रस्तुत करता येऊ शकणार नाही.—स्तोत्रसंहिता ११९:१४-१६.

तुम्ही काय उत्तर देणार?

◻ यहोवा व येशू यांनी आपली निष्ठा कशी दाखवली आहे?

◻ निष्ठेविषयीची पवित्र शास्त्रातील काही उदाहरणे कोणती आहेत?

◻ आम्हास सैतान काय देऊ करील किंवा काय करण्यास प्रलोभित करील?

◻ आम्ही यहोवास देत असलेल्या खऱ्‍या भक्‍तीमध्ये निष्ठावंतपणे टिकून राहण्यासाठी आपल्याला बळकटी कशी आणता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा