संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार ब्राझील
ब्राझील अनेक बाबतीत एक विशाल देश आहे. आकार व लोकसंख्या या दोन्हींमध्ये, ते जगातील पाचवे मोठे राष्ट्र आहे. ते दक्षिण अमेरिकेच्या प्रदेशाचा जवळजवळ अर्धा भाग व्यापते व त्या खंडातील इतर सर्व राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक लोक तेथे आहेत. ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठी आर्द्र जंगले देखील आहेत. त्या जंगलातून ॲमेझॉन—ही पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी वाहते.
ब्राझील आणखी एका दृष्टीने विशाल आहे. त्या राष्ट्रातील देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारकांची संख्या ४,००,००० इतकी होत आहे आणि मागील वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला १०,००,००० पेक्षा अधिक जण उपस्थित राहिले होते. राज्य प्रचाराच्या कार्याबाबतीत हा देश उल्लेखनीय आहे. अलीकडील अनुभव हा मुद्दा स्पष्ट करतात.
अधिक गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणे
ऑन्टोन्यो व त्याच्या पत्नीने, राज्य प्रचारकांची अधिक गरज असणाऱ्या मिनास गेरायसच्या राज्यात सेवा करण्यासाठी साउं पाउलु येथील नातेवाईक त्याचप्रमाणे एक विश्वसनीय व चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. त्यांच्या क्षेत्रामध्ये साखर कारखान्यातील कामगारांची एक वसाहत होती. पहिल्या दिवशीच तेथे साक्ष दिल्यावर, त्यांनी नऊ बायबल अभ्यास सुरू केले. ते १८ महिन्यांमध्ये ४० पेक्षा अधिक बायबल अभ्यास चालवत होते.
सुरवातीला, कारखान्यातच सभा भरवल्या जात होत्या. तथापि, नवीन प्रचारकांना वास्तविक राज्य सभागृह पाहायचे होते. यास्तव, ७५ व्यक्तींना जवळच्या मंडळीकडे नेण्यासाठी एक बस भाड्याने घेण्यात आली. त्यानंतर अधिवेशन आले; नवीन बायबल विद्यार्थ्यांपैकी ४५ जण अधिवेशनाला उपस्थित राहिले व त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्या प्रसंगी यांच्यापैकी पंधरा जणांचा बाप्तिस्मा झाला. साहजिकच, आनंदाश्रू वाहत होते!
त्या बस कंपनीला अशाच प्रकारच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी सवलतीचे दर घेतले. आभार प्रदर्शित करण्यासाठी ऑन्टोन्योने त्या कंपनीच्या मालकाला एक बायबल अभ्यासाचे प्रकाशन दिले. त्याच सायंकाळी तो बायबल अभ्यास करण्यास तयार झाला आणि अनेक महिने परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. प्रथम त्याच्या पत्नीचा अभ्यासासाठी विरोध होता परंतु, कालांतराने तिची मनोवृत्ती बदलली. आज ती देखील यहोवाची बाप्तिस्मा घेतलेली एक साक्षीदार आहे.
फेब्रुवारी १९९२ मध्ये, २२ सक्रिय प्रचारकांची एक मंडळी स्थापन करण्यात आली. सन १९९४ पर्यंत ही संख्या ४२ इतकी वाढली, त्यामध्ये ४ नियमित पायनियर किंवा सुवार्तेचे पूर्ण वेळेचे प्रचारक होते. परिणामतः, ऑन्टोन्योने निष्कर्ष काढला: “माझ्या पत्नीने व मी हे पाहिले की, मलाकी ३:१० म्हणते त्याप्रमाणे आपण ‘यहोवाची प्रतीती पाहिली’ तर तो ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद आपल्याकरता वर्षील.’”
बायबल साहित्य सादर करणे
ब्राझीलमध्ये प्रचार कार्यात इतकी मोठी प्रगती का होत आहे याचे आणखी एक कारण म्हणजे, साक्षीदार प्रत्येक संधीला बायबल साहित्य सादर करतात. उदाहरणार्थ, एका मंडळीने वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराकडे तरुण लोक विचारत असलेले प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकाच्या २५० प्रती मागितल्या. इतकी मोठी मागणी का बरे?
त्या पत्राने स्पष्टीकरण दिले: ‘शहरातील एका शाळेने वर्गामध्ये शिकवण्याचे साहित्य म्हणून या पुस्तकाचा वापर करण्याचे ठरवले आहे. यहोवाचे साक्षीदार असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शाळेतील एका देखरेख्यांनी अनौपचारिक साक्षकार्य केल्यामुळे शाळेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यहोवाचे सेवक या पुस्तकातून सूचना पुरवतील तसे तो त्यांना आशीर्वादित करो.’ होय, त्याचप्रमाणे ब्राझीलच्या विशाल देशात राज्य प्रचार कार्याच्या उत्तम प्रगतीला यहोवा आशीर्वादित करो.
[८ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र
१९९४ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: ३,८५,०९९
प्रमाण: ४०४ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: १०,१८,२१०
पायनियर प्रचारकांची सरासरी: ३८,३४८
बायबल अभ्यासांची सरासरी: ४,६१,३४३
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: २४,६३४
मंडळ्यांची संख्या: ५,९२८
शाखा दप्तर: सिझॉरियो लॉन्झे
[९ पानांवरील चित्रं]
सन १९४० च्या सुमारास साउं पाउलु येथे वापरण्यात येणारी साऊंड कार
रीउ दे झानेइरु येथे वनस्पती-शास्त्रोद्यानामध्ये साक्षकार्य करत असताना
सिझॉरियो लॉन्झे येथील शाखा दप्तर