“हालणारा” पर्वत
पश्चिम आयर्लंडमध्ये असामान्य शंक्वाकृती आकाराचा क्रॉ पॅट्रीक पर्वत आहे आणि भोवतालच्या इतर पर्वतांपेक्षा विशेष लक्षणीय आहे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्याच्या शेवटल्या रविवारी जेव्हा सुमारे ३०,००० पेक्षा अधिक वृद्ध आणि तरुण लोक वार्षिक यात्रेसाठी या पर्वताच्या शिखरावर (७६५ मीटर) चढतात तेव्हा या पर्वताचे शिखर हलल्याचा भास होतो.
या दिवशी यात्रेकरू या पर्वताच्या अरुंद, खडबडीत आणि अनेक धोक्याची ठिकाणे असणाऱ्या मार्गावरुन खाली आणि वर ये-जा करतात. वास्तविकपणे शेवटचे (सुमारे ३०० मीटर) उंचीचे चढण फारच अवघड आहे. हा शेवटचा चढ ठिसूळ खडकांनी बनलेला आहे त्यामुळे हे शेवटचे चढण धोक्याचे शिवाय दमछाक करुन टाकणारे देखील आहे.
काहीजन हा पर्वत अनवाणी चढतील आणि काहीतर त्यांच्या गुडघ्यावर काही भाग चालून जातील. गतकाळात रात्रीच्या गडद अंधारामध्ये या यात्रेची सुरुवात होत असे.
अनेकांसाठी क्रॉ पॅट्रीक पर्वत एवढ्या महत्त्वाचा अनुभव का आहे?
फार पूर्वी यात्रेचे स्थान म्हणून प्रस्थापना झाली
सा.यु. पाचव्या शतकाच्या आरंभीच्या काळामध्ये कॅथलिक चर्चने सेंट पॅट्रीक याला मिशनरी बिशप म्हणून आयर्लंडमध्ये पाठवले. आयरिश लोकांना ख्रिस्ती विश्वासामध्ये मतांतर करणे हे त्याचे प्रमुख ध्येय होते. या लोकांमध्ये प्रचार आणि कार्य करण्याच्या वर्षांमध्ये कॅथलिक चर्चची प्रतिष्ठापणा करण्याचा बहुमान त्याला प्राप्त झाला.
त्याच्या कार्यामुळे देशातील अनेक ठिकाणी त्याला फिरावे लागले. त्यापैकीचे एक ठिकाण पश्चिम आयर्लंड हे होते. माहिती केंद्रानुसार तो या पर्वताच्या माथ्यावर ४० दिवस आणि रात्र राहिला व याच पर्वताला त्याच्या मृत्यूनंतर—क्रॉ पॅट्रीक (म्हणजे “पॅट्रीकची टेकडी”) असे म्हणण्यात येऊ लागले. त्या ठिकाणी त्याच्या मिशनच्या यशस्वीतेसाठी त्याने उपवास आणि प्रार्थना केल्या.
आजपर्यंत त्याच्या कार्यांबद्दल अनेक दंतकथा उदयास आल्या. तो पर्वतावर असताना त्याने सर्व सर्पांना आयर्लंडमधून घालवून लावले, ही त्यापैकीची एक प्रसिद्ध दंतकथा होय.
शिखरावर त्याने एक चर्च बांधले होते, असे परंपरेने सांगण्यात येते. ही इमारत केव्हाच अस्तित्वहीन झाली आहे तरीदेखील तिच्या मूळच्या पायाचे काही अवशेष अजूनही बाकी आहेत आणि अशाप्रकारे ही जागा त्याचप्रमाणे हा पर्वत वार्षिक यात्रेचे एक ठिकाण झाले आहे.
यात्रेची आकर्षणे
वयस्कर किंवा सहसा गिर्यारोहण न करणारे लोकही टेकडीवरचा किमान पाच किलोमीटरचा प्रवास करतात आणि पुन्हा सुरक्षितपणे खाली उतरतात असे केल्याने काहीतरी साध्य केल्याचे त्यांना वाटते.
मार्गावर विविध जखमांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी तातडीच्या मदतीसाठी पथके तयार असतात.
मार्गावर तीन थांबण्याच्या जागा किंवा ठिकाणे आहेत. या ठिकाणी यात्रेकरू पश्चात्तापासंबंधाने विविध कार्यक्रम करतात. पर्वत चढण्याची सुरुवात होते तेथे सूचना फलकावर याचे सविस्तर वर्णन केले आहे.—चौकोन पाहा.
ते पर्वतावर कशासाठी चढतात?
अनेकजन, चढायला अवघड असणारी ही यात्रा का करतात? ते पर्वतावर चढत असताना अशाप्रकारची अतिशयोक्ती का करतात?
काहीजन असा विश्वास बाळगतात की, यात्रेच्या दरम्यान प्रार्थना केल्यामुळे त्यांनी स्वतःच्या लाभासाठी केलेल्या विनंत्या ऐकल्या जाऊ शकतात. इतरजन एखाद्या पातकाची क्षमा मिळावी म्हणून हा पर्वत चढतात. काहींसाठी आभार प्रदर्शन करण्याचा हा एक मार्ग आहे. अर्थातच, सामाजिक पैलू असल्याचे वाटत असल्यामुळे अनेकजन या पर्वतावर चढतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते ‘सामाजिकतेचा आत्मा आणि प्रेमाची अभिव्यक्ती आहे.’ तो असेही म्हणतो की, क्रॉ पॅट्रीक पर्वत चढणे हा “सेंट पॅट्रीकच्या पदचिन्हावर चालण्याचा आणि त्यांच्याठायी असणाऱ्या विश्वासासाठी ते क्रॉ पॅट्रीकचे ऋणी आहेत, याची जाणीव देत राहण्याचा हा एक मार्ग आहे.” तो पुढे म्हणतो की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्वत चढणे “हा प्रायश्चित्त करण्याचा एक प्रकार आहे कारण त्यामध्ये गोवलेला शारीरिक परिश्रम जणू वास्तविक पश्चात्ताप आहे. पर्वताच्या टोकापर्यंत संथ गतीने जाणे हे पश्चात्तापाचे दीर्घ कार्य आहे.”
एका मनुष्याने अगदी गर्वाने सांगितले की त्याने हा पर्वत २५ वेळा चढला! त्याने म्हटले, “प्रायश्चित्तासाठी काहीतरी करावे,” म्हणून मी ते केले! दुसऱ्या मनुष्याने केवळ असे म्हटले, “कष्ट नाही तर प्राप्ती नाही!”
अनेकांनी हा पर्वत अनवाणी चढावा याची काहीएक आवश्यकता नव्हती. तरीदेखील ते असे का करतात? याचे पहिले कारण म्हणजे, त्या भूमीला पवित्र मानतात आणि त्यामुळे त्यांचे बूट काढून ठेवतात. याचे दुसरे कारण म्हणजे, ‘प्रायश्चित्त म्हणून काहीतरी करावे,’ हे त्यांच्या उद्देशाच्या एकवाक्यतेत आहे. काहीजन प्रायश्चित्त करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःच्या गुडघ्यावर का उभे राहतात हे सुद्धा यावरुन स्पष्ट होते.
निर्माणकर्त्याची गुणग्राहकता बाळगण्यासाठी प्रवृत्त
खास दिवशी पर्वत चढणाऱ्या यात्रेकरुंच्या धार्मिक मतांशी एखादी व्यक्ती सहमत झाली नाही तर काय? उत्तम हवामान असताना आणि मजबूत बुटांच्या साहाय्याने पर्वतावर कोणत्याही वेळेस चढता येऊ शकते. यात्रेकरुंचा समुह पर्वतावर चढत होता त्या दिवशी आम्ही पर्वतावर चढलो नाही. आम्ही पर्वत चढत असताना पुष्कळवेळा विश्रांतीसाठी थांबलो त्यावेळी या चढाबद्दल आणि त्याचा अनेकांवर झालेल्या परिणामाबद्दल विचार केला. हजारो यात्रेकरू चढण्यास अतिशय कठीण असणारा पर्वत चढत असल्याची आणि प्रायश्चित्त म्हणून विविध कार्य करत असल्याची कल्पना केल्यानंतर ‘देव याचीच अपेक्षा करतो का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये आला. पर्वत चढण्याचा धार्मिक विधी किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मारकाच्या भोवती प्रदक्षिणा घालत प्रार्थनांची पुनरुक्ती केल्याने एखादी व्यक्ती खरोखरच देवाच्या जवळ येऊ शकते का?’ येशूने मत्तय ६:६, ७ मध्ये प्रार्थनांच्या पुनरुक्तीविषयी दिलेल्या सल्ल्याबद्दल काय?
निश्चितच, धार्मिक अनुभव घेण्यासाठी आम्ही या पर्वतावर चढलो नाही. तरीदेखील आपल्या निर्माणकर्त्याच्या निकट असल्याचे आम्हाला वाटते कारण आम्ही त्याच्या निर्मितीची प्रशंसा करतो आणि यामध्ये पृथ्वीवरील आश्चर्यकारक गोष्टींचा म्हणजे सर्व पर्वतांचा देखील समावेश आहे. पर्वताच्या माथ्यावरुन स्पष्ट दिसणाऱ्या सुंदर भूप्रदेशाचे दृश्य आम्ही पाहिले आणि अटलांटिक महासागराची किनारपट्टी सुद्धा आम्ही पाहिली. एका बाजूला आमच्या खालील बाजूस उप-सागरात चमकणारी लहान बेटे आणि दुसऱ्या बाजूस ओबड-धोबड उजाड डोंगर यातील फरक स्पष्ट जाणवत होता.
आम्ही तीन ठिकाणांचा विचार केला. येशूचे स्वतःचे त्याच्या खऱ्या अनुयायांना उद्देशून म्हटलेले शब्द आम्हाला आठवले, “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.”—मत्तय ६:७.
पर्वत, हजारो लोकांना कष्टमय विधीमध्ये जखडून ठेवणाऱ्या परंपरेचा एक भाग झाल्याचे आम्हाला कळून चुकले. आम्ही असा विचार केला की, प्रेषित पौलाने म्हटलेल्या स्वातंत्र्याच्या हे किती विरोधात आहे, त्याने म्हटले: ‘आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.’—१ योहान ५:३.
आम्ही या सहलीमध्ये आनंदाची लयलुट केली. या सहलीत क्रॉ पॅट्रीक या पर्वतावर चढण्याचा देखील समावेश होता. अखिल मानवजात जेव्हा बायबलमध्ये नसलेल्या शिकवणींपासून मुक्त होऊन पृथ्वीच्या प्रेमळ निर्माणकर्त्याची सेवा “आत्म्याने आणि खरेपणाने” करेल अशा भवितव्याकडे पाहण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली.—योहान ४:२४.
[२७ पानांवरील चौकट]
यात्रेची प्रमुख आकर्षणे
प्रत्येक यात्रेकरू सेंट पॅट्रीक याच्या यात्रेच्या दिवशी किंवा सणाच्या आठ दिवसांच्या कालावधीत वा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोणत्याही घटकेस पर्वतावर चढतो आणि देवळामध्ये किंवा त्याच्या शेजारी पोपच्या उद्देशास्तव प्रार्थना करतो आणि पातकांची कबुली आणि येशू ख्रिस्त भोजनोत्सव याकरता तो एका आठवड्याच्या आत शिखरावर गेला तरच त्याच्या पातकांची क्षमा होऊ शकते.
पारंपारिक ठिकाणे
तीन “ठिकाणे” आहेत (१) शंकू किंवा ल्याक्ट बेनॉनच्या पायथ्याशी, (२) पर्वताच्या शिखरावर, (३) रोलिग म्वेरे यावर, जे पर्वताच्या लिकॅन्वेच्या [शहराच्या] दिशेकडील खालील बाजूस आहे.
पहिले ठिकाण - ल्याक्ट बेनॉन
या दगडी टेकडीच्या भोवती यात्रेकरू सात वेळा प्रदक्षिणा घालतो आणि त्यावेळेस ७ वेळा हे आमच्या पित्या, ७ वेळा हेल मेरी आणि एक वेळा प्रेषितांचे संप्रदाय म्हणतो.
दुसरे ठिकाण - शिखर
(अ) यात्रेकरू गुडघे टेकतो आणि हे आमच्या पित्या ७ वेळा, हेल मेरी ७ वेळा व प्रेषितांचे संप्रदाय एक वेळा म्हणतो
(ब) यात्रेकरू पोपच्या उद्देशास्तव देवळामध्ये प्रार्थना करतो
(क) यात्रेकरू देवळाभोवती १५ वेळा प्रदक्षिणा घालतो आणि असे करताना हे आमच्या पित्या १५ वेळा, हेल मेरी १५ वेळा आणि प्रेषितांचा संप्रदाय एक वेळा म्हणतो
(ड) यात्रेकरू लिआबे फॉरेग, [पॅट्रीकचा पलंग] या भोवती ७ वेळा प्रदक्षिणा घालतो आणि त्यावेळेस हे आमच्या पित्या ७ वेळा, हेल मेरी सात वेळा आणि प्रेषितांचा संप्रदाय एक वेळा म्हणतो
तिसरे ठिकाण - रोलिग म्वेरे
यात्रेकरू प्रत्येक दगडी टेकडीच्या भोवती [तेथे तीन टेकड्या आहेत] ७ वेळा प्रदक्षिणा घालतो आणि त्यावेळी हे आमच्या पित्या ७ वेळा, हेल मेरी सात ७ वेळा आणि प्रेषितांचा संप्रदाय एक वेळा म्हणतो व शेवटी प्रार्थना करत रोलिग म्वेरेच्या संपूर्ण घेरावाला सात वेळ प्रदक्षिणा घालतो.