वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ४/१५ पृ. २०-२५
  • तो ‘भट्टीसारखा तप्त’ दिवस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो ‘भट्टीसारखा तप्त’ दिवस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा क्रूर देव आहे का?
  • “सूर्य” उदय पावतो
  • महान शैक्षणिक कार्यक्रम
  • यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • यहोवाचा भयप्रद दिवस जवळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ४/१५ पृ. २०-२५

तो ‘भट्टीसारखा तप्त’ दिवस

“पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे.” —मलाखी ४:१.

१. मलाखी ४:१ च्या संबंधात कोणती प्रश्‍ने उद्‌भवतात?

या शेवटल्या काळात, यहोवा आपल्या स्मरण वहीत ज्यांचे नाव लिहिण्याचे निवडतो ते धन्य. परंतु या विशेषाधिकारासाठी पात्र होण्यास उणे पडलेल्यांविषयी काय? ते जरी शासक किंवा सामान्य लोक असले तरी देवाच्या राज्य उद्‌घोषकांना व त्यांच्या संदेशाला त्यांनी तुच्छ लेखल्यास काय होईल? मलाखी जाब घेण्याच्या दिवसाबद्दल बोलतो. चवथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण वाचतो: “पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील, त्याचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.”

२. यहेज्केलने यहोवाच्या न्यायदंडाबद्दलचे कोणते सुस्पष्ट वर्णन केले आहे?

२ इतर संदेष्टे देखील यहोवा राष्ट्रांचा न्याय करण्याची तुलना अतिउष्ण भट्टीसोबत करतात. यहेज्केल २२:१९-२२ हे देव ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मत्यागी पंथाचा न्याय करण्याला किती उचितपणे लागू होते! तेथे म्हटले आहे: “यास्तव, प्रभू परमेश्‍वर म्हणतो, तुम्ही सर्व गाळ झाला आहा; म्हणून पाहा, मी तुम्हास . . . एकत्र करीन. रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालितात व ती वितळण्यासाठी अग्नि फुंकून प्रदीप्त करितात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हास जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन. मी तुम्हास जमा करून माझ्या कोपाग्नीचा फुंकर तुम्हावर घालीन, तेणेकरुन तुम्ही भट्टीत वितळून जाल. रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्‍वराने आपला संताप तुम्हावर ओतिला आहे.”

३, ४. (अ) पाळकांनी कोणता दांभिक दावा केला? (ब) धर्मांचा अत्यंत खराब अहवाल कोणता आहे?

३ खरोखर एक शक्‍तिशाली दाखला! यहोवाच्या नावाचा वापर करण्यापासून ज्या पाळकांनी स्वतःला मुक्‍त केले आहे; इतकेच नव्हे तर ज्यांनी त्या पवित्र नावाची निंदा केली त्यांना जाब देणाऱ्‍या दिवसाचा सामना करावा लागेल. ते व त्यांचे राजकीय मित्र देवाच्या राज्याची स्थापना पृथ्वीवर करतील किंवा पृथ्वीला राज्यासाठी अनुकूल जागा बनवतील, असा गर्विष्ठपणे दावा करतात.

४ भयंकर युद्धे लढण्यासाठी धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगत राजकीय शासकांना जाऊन मिळाले. इतिहास मध्ययुगीन काळातील धर्मयुद्धे, स्पॅनिश इन्क्विझिशनने जबरदस्तीने केलेले मतान्तर, सतराव्या शतकात युरोपचा मोठया प्रमाणात नाश करणारी तीस युद्धांची वर्षे आणि स्पेनमध्ये कॅथलिक चर्चच्या स्थानाची खात्री करण्यासाठी १९३० च्या दशकात स्पॅनिश मुलकी युद्ध यांची नोंद करतो. आपल्या शतकातील दोन जागतिक महायुद्धात कोणीही भाग घ्यावा अशा मारामारीत कॅथलिक व प्रॉटेस्टंट सामील होऊन त्यांनी समविश्‍वासूंची तसेच इतर धर्मियांची तारतम्यहीनपणे कत्तल केली तेव्हा त्यामध्ये अत्याधिक रक्‍तपात घडला. अगदी अलीकडेच आयर्लंडमध्ये कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमध्ये, भारतात धार्मिक दुफळी आणि भूतपूर्व युगोस्लाव्हियातील धार्मिक गटांमध्ये प्राणघातक झगडे चालू आहेत. यहोवाच्या हजारो विश्‍वासू साक्षीदारांचा छळ करुन त्यांना ठार मारण्याव्दारे देखील धार्मिक इतिहासाची पाने रक्‍तलांछित झाली आहेत.—प्रकटीकरण ६:९, १०.

५. खोट्या धर्मासाठी कोणता न्यायदंड राखून ठेवण्यात आला आहे?

५ खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठी बाबेल आणि तिच्या पाठीराख्यांचा जवळ येत असलेला नाश याबद्दल यहोवाच्या न्यायाची गुणग्राहकता आपण तत्परतेने बाळगू शकतो. त्या नाशाचे वर्णन प्रकटीकरण १८:२१, २४ वचनात असे केले आहे: “एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले: ‘अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीही सापडणार नाही. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.’”

६. (अ) धसकटासारखे कोण बनतील आणि का बरे? (ब) यहोवाचे भय बाळगणाऱ्‍यांसाठी कोणती हमी दिली आहे?

६ कालांतराने, धार्मिकतेचे सर्व शत्रू व त्यांना जडून राहणारे ‘धसकटासारखे बनतील.’ त्यांच्यामध्ये यहोवाचा दिवस भट्टीसारखा तप्त होईल. तो “त्याचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही.” जाब देण्याच्या दिवशी, लहान मुले किंवा फांद्यांचा न्याय त्यांच्या मुळांवरून म्हणजे, देखरेख करणाऱ्‍या त्यांच्या पालकांच्याबाबतीत यहोवाच्या मतानुसार योग्यपणे केला जाईल. दुष्ट पालकांना त्यांचे मार्ग चिरस्थायी करण्यासाठी भावी पिढ्या नसतील. पण देवाच्या राज्य अभिवचनांवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना धक्का बसणार नाही. म्हणूनच इब्रीयांस १२:२८, २९ आवर्जून सांगते: “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करु, कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.”

यहोवा क्रूर देव आहे का?

७. यहोवाची प्रीती त्याच्या न्यायदंडात कशी येते?

७ याचा अर्थ, यहोवा क्रूर, खूनशी देव आहे असा होतो का? मूळीच नाही! १ योहान ४:८ मध्ये प्रेषित मूलभूत सत्य सांगतो: “देव प्रीति आहे.” मग १६ व्या वचनात जोर देऊन तो असे म्हणतो: “देव प्रीति आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.” यहोवा मानवजातीसाठी असलेल्या प्रीतीमुळे पृथ्वीवरील सर्व दुष्टता काढून टाकण्याचे उद्देशितो. आपला प्रेमळ, दयाळू देव म्हणतो: “माझ्या जीविताची शपथ कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गांवरून मागे फिरा . . . तुम्ही का मरता?”—यहेज्केल ३३:११.

८. योहानाने प्रीतीवर जोर कसा दिला, तरीही त्याने स्वतःला गर्जनेचा पुत्र देखील कसे प्रदर्शित केले?

८ योहान अ·गाʹपे, तत्त्वावर आधारित असलेल्या प्रीतीचा उल्लेख शुभवर्तमानाच्या इतर तीन लेखकांपेक्षा अधिक वेळा करतो. तरीही, मार्क ३:१७ मध्ये स्वतः योहानाचे वर्णन ‘गर्जनेचा पुत्र’ असे केले आहे. यहोवाकडील प्रेरणेमुळे या गर्जनेच्या पुत्राने बायबलचे शेवटचे पुस्तक, प्रकटीकरणातील अनर्थाच्या संदेशांना लेखबद्ध केले आहे. त्यात यहोवाचे वर्णन, न्यायदंड बजावणारा देव असे केले आहे. हे पुस्तक, ‘देवाच्या क्रोधाचे मोठे द्राक्षकूंड,’ “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या” आणि ‘सर्वसमर्थ देवाचा क्रोध’ या न्यायदंडाच्या अभिव्यक्‍तींनी भरले आहे.—प्रकटीकरण १४:१९; १६:१; १९:१५.

९. यहोवाच्या न्यायदंडाबद्दल येशू कोणते उद्‌गार काढतो आणि त्याच्या भविष्यवाण्यांची पूर्णता कशी झाली?

९ “अदृश्‍य देवाचे प्रतिरूप” असलेल्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना यहोवाचे न्यायदंड धैर्याने घोषित केले. (कलस्सैकर १:१५) उदाहरणार्थ, मत्तयाच्या २३ व्या अध्यायात सात अनर्थ आहेत जे त्याने त्याच्या दिवसातील धार्मिक ढोग्यांविरुद्ध स्पष्टपणे घोषित केले. त्याने दोषी ठरविणाऱ्‍या त्या न्यायदंडाचा समारोप या शब्दांनी केला: “यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुम्हांवर सोडले आहे.” सदतीस वर्षांनंतर सेनापती टायटसच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्याने न्यायदंड बजावला. तो भीतीदायक दिवस होता व मानवी अनुभवामध्ये जो अत्याधिक भयप्रद दिवस ठरणार होता—यहोवाच्या दिवसाचा लवकरच होणारा उद्रेक—याचे तो भविष्यसूचक होता.

“सूर्य” उदय पावतो

१०. देवाच्या लोकांना “न्याय्यत्वाचा सूर्य” आनंद कसा आणतो?

१० यहोवा त्याच्या दिवशी बचावणारे असतील हे प्रकट करतो. यांच्याबद्दल तो मलाखी ४:२ मध्ये उल्लेख करून असे म्हणतो: “तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल.” तो न्याय्यत्वाचा सूर्य, स्वतः येशू ख्रिस्ताशिवाय इतर कोणीही नाही. तो ‘जगाचा आध्यात्मिक प्रकाश आहे.’ (योहान ८:१२) तो उदय कसा पावतो? त्याच्या पंखांच्या ठायी असलेल्या आरोग्यासह—प्रथम आपण ज्याचा अनुभव आज देखील घेऊ शकतो ते आध्यात्मिक आरोग्य देऊन आणि मग येणाऱ्‍या नवीन जगात सर्व राष्ट्रातील लोकांस शारीरिकरित्या बरे करण्याद्वारे उदय पावतो. (मत्तय ४:२३; प्रकटीकरण २२:१, २) अलंकारिकरित्या, मलाखीने म्हटल्याप्रमाणे, बरे झालेले गोठ्यातून सोडल्यावर ‘वासरांप्रमाणे बाहेर पडून बागडतील.’ पुनरुत्थित झालेल्यांना मानवी परिपूर्णता प्राप्त करण्याच्या आशेसह उठविण्यात येईल तेव्हा ते देखील किती आनंद अनुभवतील बरे!

११, १२. (अ) सरतेशेवटी दुष्टांचे काय होईल? (ब) देवाचे लोक ‘दुष्टांना कसे तुडवतील’?

११ तथापि, दुष्टांचे काय होईल? मलाखी ४:३ मध्ये आपण वाचतो: “तुम्ही दुष्टांस तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” आपल्या योद्धा देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्‍यांचे रक्षण करून जुलमी शत्रूंना काढून त्यांचा नाश करण्याद्वारे पृथ्वीला स्वच्छ केलेले असेल. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना बंदिस्त केलेले असेल.—स्तोत्र १४५:२०; प्रकटीकरण २०:१-३.

१२ दुष्टांचा नाश करण्यात देवाचे लोक भाग घेत नाहीत. तर मग, कशाप्रकारे ते ‘दुष्टांस तुडवतील’? ते मोठ्या विजयोत्सवात भाग घेण्याद्वारे लाक्षणिकरित्या असे करतात. निर्गम १५:१-२१ अशा सणाचे वर्णन करते. फारो व त्याच्या सैन्यांचा तांबड्या समुद्रात नाश झाल्यानंतर हे घडले. यशया २५:३-९ च्या पूर्णतेत, ‘निर्दयी लोकांना’ काढून टाकल्यावर देवाच्या अभिवचनाशी संबंध असलेली विजयाची मेजवानी होईल: “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण परमेश्‍वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, ‘पाहा, हा आमचा देव! . . . हाच परमेश्‍वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.’” यामध्ये आनंद आहे, सूडाची भावना किंवा दुष्टतेचे समाधान नाही, तर यहोवाचे नाव पवित्र झाल्याचा आणि संयुक्‍त मानवजातीने शांतीमय वसतिस्थानासाठी स्वच्छ पृथ्वी पाहण्याचा अत्यानंद असेल.

महान शैक्षणिक कार्यक्रम

१३. ‘नव्या पृथ्वीवर’ कोणते शिक्षण दिले जाईल?

१३ मलाखी ४:४ मध्ये यहुद्यांना ‘मोशेचे नियमशास्त्र स्मरणात ठेवण्याचा’ बोध केला होता. तसेच गलतीकर ६:२ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे ‘ख्रिस्ताच्या नियमाचे’ अनुकरण करण्याची आपल्याला गरज आहे. हर्मगिदोनातून बचावलेल्यांना यावर आधारित आणखी मार्गदर्शन दिले जाईल यात काही संशय नाही. तसेच प्रकटीकरण २०:१२ मधील जी “पुस्तके” पुनरुत्थानाच्या समयी उघडण्यात येतील त्यांच्यात कदाचित हे लिहिण्यात येईल. मृतांतून उठलेल्या पुनरुत्थित लोकांना ‘नवीन पृथ्वीवरील’ जीवनशैलीचे अनुकरण करण्याविषयी जसजसे शिक्षण दिले जाईल तसतसा तो काळ किती महान असेल बरे!—प्रकटीकरण २१:१.

१४, १५. (अ) आधुनिक दिवसातील एलीयाला कसे ओळखण्यात येते? (ब) एलीया वर्ग कोणती जबाबदारी पूर्ण करीत आहे?

१४ मलाखी ४:५ मध्ये नोंद केल्याप्रमाणे यहोवाने उल्लेख केल्यानुसार तो शैक्षणिक कार्याचा विस्तार असेल: “पाहा, परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन.” हा आधुनिक दिवसातील एलीया कोण आहे? मत्तय १६:२७, २८ मध्ये दाखवल्यानुसार “त्याच्या राज्यात येताना” असा स्वतःचा उल्लेख करत असताना येशूने म्हटले: “मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.” सहा दिवसानंतर पेत्र, याकोब व योहानासोबत डोंगरावर असताना “त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.” या दृष्टांतात तो एकटाच होता का? नाही, तेव्हा “पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.”—मत्तय १७:२, ३.

१५ याचा काय अर्थ होऊ शकतो? हे न्यायदंडासाठी त्याच्या येण्याच्यावेळी भविष्यवाद केलेला थोर मोशे या नात्याने त्याकडे अंगुली दर्शवते. (अनुवाद १८:१८, १९; प्रेषितांची कृत्ये ३:१९-२३) तो मग यहोवाचा मोठा व भयप्रद दिवस येण्याअगोदर संपूर्ण पृथ्वीवर राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य साध्य करण्यासाठी आधुनिक दिवसातील एलीयासोबत असेल. या ‘एलीयाच्या’ कार्याचे वर्णन करताना मलाखी ४:६ सांगते: “तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो.” अशारितीने पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग म्हणून “एलीया” ओळखला गेला आहे. यावर त्याच्या धन्याने, येशूने आपली सर्व मालमत्ता सोपवली आहे. यामध्ये विश्‍वासू घराण्याला आवश्‍यक ते आध्यात्मिक ‘अन्‍न यथाकाळी’ पुरवण्याचाही समावेश होतो.—मत्तय २४:४५, ४६.

१६. एलीया वर्गाच्या कार्याने कोणते आनंदी परिणाम दाखवले आहेत?

१६ आज संपूर्ण जगभरात आपण त्या पुरवठा करणाऱ्‍या कार्यक्रमाचा आनंदी परिणाम पाहू शकतो. वॉचटावर नियतकालिकाचा प्रत्येक अंक १२० भाषेत प्रकाशित होऊन याच्या १,६१,००,००० प्रतींची छपाई केली जाते. यापैकी ९७ भाषा एककालीन असून ‘राज्याच्या सुवार्तेने’ पृथ्वीला व्यापत आहेत. (मत्तय २४:१४) अनेक भाषांमधील इतर प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचारकार्य व शैक्षणिक कार्याच्या विविध पैलूंमध्ये वापरली जातात. एलीया वर्ग, विश्‍वासू व बुद्धिमान दास ‘आध्यात्मिक गरजेची जाणीव ओळखणाऱ्‍यांना’ भरपूर पुरवण्याविषयी दक्ष असतात. (मत्तय ५:३) शिवाय, राज्याच्या या आशेचा स्वीकार करणारे आणि त्याप्रमाणे वागणारे आश्‍चर्यकारक विश्‍वव्याप्त एकतेत एकवटले जातात. ही एकता ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ मोठ्या लोकसमुदायाचा स्वीकार करते. (प्रकटीकरण ७:९) यहोवाला हे काम जेवढे करावयाचे आहे तेवढे साध्य झाल्यावर त्याच्या मोठ्या व भयप्रद दिवसात अंत येईल.

१७. यहोवाच्या भयप्रद दिवसाची सुरवात कधी होईल?

१७ या भयप्रद दिवसाची अचानक सुरवात केव्हा होईल? प्रेषित पौल याचे उत्तर देतो: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. शांति आहे, निर्भय आहे असे [कदाचित असामान्य रीतीने] ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.

१८, १९. (अ) ‘शांती व निर्भयता’ कशी घोषित करण्यात येते? (ब) यहोवाच्या लोकांना मुक्‍तता कधी मिळेल?

१८ या भविष्यवाणीत सांगितलेले “ते” कोण आहेत? ते म्हणजे तुकडे तुकडे झालेल्या हिंसक जगाला संयुक्‍त नवीन व्यवस्थेत मजबूत करू शकतील असा दावा करणारे राजकीय पुढारी आहेत. त्यांच्या भव्य योजना, लीग ऑफ नेशन्स्‌ आणि संयुक्‍त राष्ट्रे यांना याबाबतीत अपयश आले आहे. यहोवाच्या संदेष्ट्याने भाकीत केल्याप्रमाणे ते आता ‘शांतीचे नाव नसता शांती शांती असे देखील म्हणतात.’—यिर्मया ६:१४; ८:११; १४:१३-१६.

१९ या दरम्यान यहोवाचे लोक भक्‍तिहीन जगाकडील दबाव आणि छळाला सहन करतात. परंतु लवकरच २ थेस्सलनीकाकर १:७, ८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना “प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी . . . तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील,” तेव्हा मुक्‍तता मिळेल.

२०. (अ) ‘भट्टीसारख्या तप्त असणाऱ्‍या’ दिवसाबद्दल सफन्या आणि हबक्कूक काय भविष्यवाणी करतात? (ब) या भविष्यवाण्या कोणता सल्ला आणि उत्तेजन देतात?

२० हे किती लवकर घडेल? आपल्यातील बहुतेक जण दीर्घकाळापासून वाट पाहून आहेत. त्या दरम्यान, बचावणाऱ्‍या नम्र जनांची मोठी संख्या सफन्या २:२, ३ मधील हाकेला प्रत्युत्तर देते: ‘यहोवाचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.’ त्यानंतर सफन्या ३:८ मध्ये बोध दिला आहे: “परमेश्‍वर म्हणतो, मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी; त्यांवर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.” अंत अगदी समीप आहे! तो दिवस व घटिका यहोवाला माहीत आहे आणि तो त्याचा आराखडा बदलविणार नाही. आपण धीराने सहन करीत राहू या. “कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) यहोवाचा भयप्रद दिवस नेटाने जवळ येत आहे. लक्षात ठेवा, त्या दिवसाला विलंब लागावयाचा नाही!

पुनर्विचाराने:

◻ यहोवाच्या भयप्रद दिवसात शासक आणि सामान्य लोकांचे काय होईल?

◻ यहोवा कशाप्रकारचा देव आहे?

◻ देवाच्या लोकांसाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचे वर्णन केले आहे?

◻ अंत समीप आहे हे विचारात घेऊन देवाचे संदेष्टे आपल्याला कसा बोध देतात?

[२१ पानांवरील चित्रं]

स्पॅनिश इन्क्विझिशनच्या दरम्यान अनेकांना जबरदस्तीने कॅथलिक बनविले गेले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा