वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. २५-२७
  • गिलियड पदवीधर सुवार्ता पसरविण्यास आवेशी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गिलियड पदवीधर सुवार्ता पसरविण्यास आवेशी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रमुख भाषण
  • गिलियड पदवीधर कापणीचे आवेशी कामगार म्हणून सज्ज!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • सेवा करण्याची प्रेरणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • गिलियड पदवीधर—“वास्तविक मिशनरी!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. २५-२७

गिलियड पदवीधर सुवार्ता पसरविण्यास आवेशी

“आम्ही कधीही कल्पना करु शकत नाही अशी आश्‍चर्याची गोष्ट.” ॲण्डर्स व ऑमालिया ग्रॉथ यांना आपल्या मिशनरी प्रशिक्षणाबद्दल असे वाटले. त्यांनी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ९७ व्या वर्गातील सर्व ४८ पदवीधरांच्या भावना अशी भर टाकत व्यक्‍त केल्या: “गिलियड प्रशिक्षणाने आम्हाला प्रवृत्त आणि तयार केले, जेणेकडून आम्ही आमच्या नव्या नेमणूकीत जाण्यास आवेशी आहोत.”

सप्टेंबर ४, १९९४ रोजी या समारंभास ६,४२० जण उपस्थित होते; पदवीदान समारंभाच्या वेळी विद्यार्थी आपले मत मांडत असताना या आनंदाची कल्पना आपण करू शकतो.

“नियमन मंडळाचे सदस्य थिओडोर झरॅक्‌ यांनी ‘यहोवाकडून शिकवले जात असलेले,’ या विषयावर बोलून कार्यक्रमाची सुरवात केली,” असे डेविड ॲबल आणि त्यांची पत्नी केल्ली यांनी सांगितले. “आम्ही कधीही विसरणार नाही असा मुद्दा बंधू झरॅक्‌ यांनी सांगितला: ‘यहोवाच्या तुलनेत आपला क्षुद्रपणा आपण मान्य केला पाहिजे,’ व त्यांनी या गोष्टीला ईयोब ३८ व ३९ अध्यायातील जोरदार धड्याद्वारे स्पष्ट केले. आम्ही गिलियड प्रशालेद्वारे ज्ञानात वाढ केली असली, तरी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर आम्हाला माहीत नाही, असा मार्मिक उल्लेख बंधू झरॅक्‌ यांनी केला. आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास कायम करीत राहिले पाहिजे.”

आता क्रिश्‍चन आणि ॲन्झेल कॉफी यांनी सांगितले: “मॅक्स लारसन यांनी, ‘चांगला पाया घालण्याचे मोल काय आहे?’ या विषयावर दिलेल्या भाषणाने आमच्यावर छाप पडली. त्यांनी आमची तुलना, भूकंपातही तग धरुन राहण्याकरता खडकाळ जमिनीत खोलवर पाया घेण्याची गरज असणाऱ्‍या इमारतीसोबत केल्याचे आम्हाला आवडले. परिश्रमपूर्वक अभ्यास केल्याने, आपण यहोवासोबत जवळचा नातेसंबंध विकसित करु शकतो आणि आपला विश्‍वास सखोल ज्ञानावर आधारु शकतो, जेणेकडून त्रासाच्या काळात आपण स्थिर राहू शकतो.”

“प्रशालेचे अध्यक्ष, मिल्टन हेन्चल यांनी, ‘कापणीसाठी शेते तयार आहेत’ या विषयावर जे भाषण दिले, ते नेहमीच आमच्या लक्षात राहील,” असे गॅरी व लिन एलफर्स यांनी म्हटले. “योहान ४:३५-३८ या मुख्य शास्त्रवचनाने आधीच्या कामकऱ्‍यांनी पेरणी केलेल्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आमच्या सुसंधीला स्पष्ट केले. ही गोष्ट आपल्याला निकडीची जाणीव ठेवून कार्य करण्यास प्रोत्साहन देईल.” याला सहमती देत यॉन आणि सर्पा वॉटोलॉ यांनी निरिक्षले: “बंधू हेन्चल यांनी भविष्यातील कापणीविषयी बाल्टिक राष्ट्रांतील अगदी अलीकडील अहवाल देऊन आमची अपेक्षा वाढवली. एस्टोनियात ५१ टक्के, लॅतिवियात १०६ टक्के आणि लिथुआनियात ५१ टक्के वाढ झाली होती. किती हर्षदायक! तेथील बांधव, अधिक कामकरी पाठविण्याची विनवणी स्वामीकडे करीत आहेत. आमची नेमणूक एस्टोनियात केल्यामुळे खासपणे हे ऐकण्यास आम्ही आनंदी होतो!”

“यानंतर जोएल ॲडम्स यांनी ‘यहोवावर भाव ठेवा,’ या विषयावर भाषण दिले,” असे केव्हीन आणि ईव्हलिन कॉर्टीना यांना आठवले. “कधी कधी आपण यहोवावर भाव ठेवू शकतो, तर कधी कधी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू शकतो, असा विचार आपण कधीही करु नये असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. आमच्या नेमणूकीत आम्हाला—आरोग्य, अन्‍न, भाषा, रितीरिवाज अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. या सर्व गोष्टी यहोवावर भाव ठेवत असण्याच्या गरजेची मागणी करतील.”

पुढील वक्‍ते नियमन मंडळाचे सदस्य गेरीट लॉश होते, त्यांनी “यहोवाच्या दयेला प्रदर्शित करीत राहा” या विषयावर आपले भाषण विकसित केले. ॲलन आणि ॲन मेरी गोकावी यांनी म्हटले: “आमच्या सह मिशनऱ्‍यांना तसेच ज्यांच्यासोबत आम्ही सुवार्तेची सहभागिता करतो अशांना दया दाखवणे हे ख्रिस्ती प्रौढतेचे चिन्ह आहे, असे त्यांनी सांगितले. परदेशातील नेमणूका त्याग करण्यास भाग पाडतात, पण हे करण्यामध्ये दया नसली तर आपल्या त्यागाला मूल्य राहणार नाही.” (मत्तय ९:१३) पीटर आणि फ्लर हपस्टन यांनी भर टाकली: “आपण आपल्या बंधू आणि बहिणींच्या बाबतीत देखील दयाळू असले पाहिजे. त्यांच्याकडे जणू काही जोड दुर्बीणीच्या दर्शनी बाजूने पाहावे जेणेकडून त्यांच्या चूका मोठ्या दिसण्याऐवजी लहान दिसतील.”

“आमचे गिलियड प्रशिक्षक, जॅक रेडफोर्ड यांनी ‘तुम्ही वाग्दंड ऐकता का?’ या विषयावर भाषण दिले,” असे मिकी आणि शेरी मिन्स्की यांना आठवले. “वाग्दंडाचा स्वीकार करण्यास गर्व कठीण बनवतो आणि सल्ल्याच्या बाबतीत आपण अधिक हळवे असलो तर त्याचा फायदा होणार नाही, या गोष्टीला त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी विलापगीत ३:२७-३१ वर आधारित वाग्दंडाचा स्वीकार करण्याबद्दल काही व्यावहारिक सूचना दिल्या.” चार्ल्स आणि जोन हेल्ड यांनी पुढे म्हटले: “अनेक वेळा आपण आपल्या कमतरतांविषयी अंध असतो; म्हणून वाग्दंडाकडे आपण जाणीव नसलेल्या गोष्टींबद्दल आपले डोळे उघडण्याचा एक मार्ग असे समजून पाहण्यास हवे. यहोवाकडील वाग्दंड किंवा सल्ला आमच्यासाठी असलेल्या त्याच्या प्रेमाचा पुरावा आहे.”

केनेथ आणि लिस्बेथ ऑर्डशेल यांनी सांगितले की, “आणखी एक प्रशिक्षक, उलीसेस ग्लास हे ‘जीवनाप्रत नेणारी व्यावहारिक बुद्धी प्राप्त करा,’ या विषयावर बोलले. त्यांनी विचारले: ‘तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा अवलंब कसा कराल?’” “त्यानंतर त्यांनी नीतीसूत्रे ३०:२४-२६ वर आधारित, शाफान प्राण्याविषयी एक दाखला दिला व यहोवाने जगण्यासाठी त्याला कसे सुसज्ज केले आहे ते सांगितले. दुसऱ्‍या बाजूला पाहता आपल्याला उपजत बुद्धी नसल्यामुळे, बुद्धी प्राप्त करण्यासाठी स्वतः यत्न करण्याची गरज आहे. ते करण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट देऊन यहोवाने आपल्याला सुसज्ज केले आहे. आपण यहोवाच्या व एकदुसऱ्‍यांच्या निकट येत राहू तोवर आपण पुष्कळ साध्य करु.”

प्रमुख भाषण

“नियमन मंडळाचे सदस्य बंधू कार्ल एफ. केलिन यांनी ‘रत्नांतील रत्न,’ या आपल्या भाषणात आमच्यासोबत १९ व्या स्तोत्राची उत्साहाने चर्चा केली,” असे जय आणि ग्वेन ऑब्रॉसिनस्कॉस यांनी म्हटले. “त्यांनी स्तोत्रकर्त्या दाविदाची यहोवासाठी असलेली गुणग्राहकता आणि देवाच्या वचनाबद्दल त्याला असलेली आवड या गोष्टींना ठळकपणे मांडले.” बंधू केलिन यांनी स्तोत्राची तीन भागात विभागणी केली,” असे केथ आणि डोना हॉर्नबॅक यांनी निरीक्षले. “भाग १ (वचने १-६) देवाच्या निर्मितीबद्दल दाविदाच्या गुणग्राहकतेला दाखवतो, भाग २ (वचने ७-१०) देवाच्या नियमांबद्दल त्याच्या रसिकतेला व्यक्‍त करतो आणि भाग ३ (वचने ११-१४), दाविदाप्रमाणे यहोवासोबत चांगला नातेसंबंध असण्याची आपली इच्छा असली पाहिजे, याची आठवण आपल्याला करुन देतो.”

“वाईट गोष्टी टाळावयाच्या असल्यास यहोवाचे भय आवश्‍यक आहे, हा मुद्दा आम्हाला आवडला. ही गोष्ट आपल्याला त्याच्या नजरेत जे पवित्र आहे ते करण्याप्रत निरवते,” असे डेवीड आणि रालिन लाँग यांनी सांगितले. फ्रँक आणि बेके मासन यांनी दुजोरा दिलाः “यहोवाचे निर्बंध, नियम आणि आज्ञा किती लाभदायक आहेत, यावरील बंधू केलिन यांच्या विवेचनांनी आम्ही गिलियडमध्ये जे शिकलो त्यास योग्यपणे सारांशात मांडले. यामुळे आम्ही भविष्यात देवाच्या वचनाला जडून राहण्यास अधिक निश्‍चयी बनलो तसेच रत्नांचा खजिना असलेल्या पेटीप्रमाणे त्याकडे पाहण्याचे उत्तेजन मिळाले,” असे त्यांनी म्हटले.

प्रमुख भाषणानंतर, विद्यार्थ्यांना डिप्लोमा मिळाला व परदेशातील त्यांच्या नेमणुकींची घोषणा करण्यात आली. अल्पोपहाराच्या मध्यांतरानंतर, सर्व जण दुपारच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकत्र आले. टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या संक्षिप्त केलेल्या अभ्यासात पुढे मांडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन पदवीधरांनी सहभाग घेतला.

“त्यानंतर, ‘सर्व पृथ्वीवर राज्य उद्‌घोषक बनण्यासाठी प्रशिक्षित झालेले,’” हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाल्याचे, बॉब व शनन लाकटॉस यांनी आठवून सांगितले. “कार्यक्रमाच्या पहिल्या भागात, विद्यार्थ्यांच्या पाच महिन्याच्या कोर्समधील क्षेत्र सेवेतील अनुभव प्रस्तुत केले गेले. त्याने आमच्या सेवेत प्रश्‍नांचा कुशल वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुलाखतीच्या भागात, आमच्या मिशनरी जीवनातील आव्हाने आणि बदलणाऱ्‍या परिस्थितींचा सामना करण्याचे सकारात्मक मार्ग दाखविण्यात आले. कॉस्टा रिका, भारत आणि मलावी यांच्या तीन स्लाईड प्रदर्शनाने यहोवाच्या जगव्याप्त संघटनेची झलक आम्हाला दिली.”

नंतर “जगीक नव्हे, ईश्‍वरशासित व्हा; सादर केलेल्या या नाटकाने काही जगीक, स्वतंत्र वृत्तीच्या नातेवाईकांचा जो वाईट परिणाम होऊ शकतो ते स्पष्ट केले” असे जेसी आणि मिशल डंकन यांनी दिली. “त्यात दाखविले गेले की, ख्रिश्‍चनांनी ईश्‍वरकृत मार्गदर्शन आणि निर्देशन आवश्‍यक आणि लाभदायक असल्याचे ओळखले पाहिजे,” असे वेन्सल आणि केली कोलॉ पुढे म्हणाले.

समारोपाचे गीत आणि प्रार्थनेने या हर्षदायक कार्यक्रमाची सांगता केली. पदवीधर, १८ देशांमधील परदेशीय नेमणुकींसाठी प्रस्थान करण्याच्या अपेक्षेने निघत असताना, त्यांचे विचार टॉमी आणि याएल काऊको यांच्या निरोपाच्या बोलण्यावरुन चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यात आले: “आमच्या नेमणुकींसाठी जाण्यास आणि शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. आम्हाला पुष्कळ प्राप्त झाले आहे—आता ते इतरांना देण्याची आमची पाळी आहे.”

[२६ पानांवरील चित्रं]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधरांचा ९७ वा वर्ग

खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक दिले आहे, व प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडील नावांची यादी दिली आहे. (१) हाँग, जे; हाँग, डी.; ग्रॉथ, ए.; कॉर्टीना, ई.; लकाटोस, एस.; हॉर्नबॅक, डी.; असेवेडो, एल.; कॉफे, ए. (२) एल्फर्स, एल.; गोकावी, ए.; आर्डकॉल, एल.; ॲब्रात्सींकस, जी.; नॉट, के.; लीझर, टी.; एबल, के.; एबल, डी. (३) डंकन, एम.; गोकावी, ए.; हेल्ड, जे.; हपस्टन, एफ.; लकाटोस, बी.; लाँग, आर.; मिन्स्की, एस.; असेवेडो, ई. (४) आर्डकॉल, के.; काऊको, जे.; वाहतोला, एस.; कॉर्टीना, के.; कार्सन, एन.; मिन्स्की, एम.; लीझर, जी.; कोलॉ, के. (५) डंकन, जे.; ॲब्रात्सींकस, जे.; वाहतोला, जे.; मासन, एफ.; मासन, व्ही.; लाँग, डी.; कार्सन, सी.; एल्फर्स, जी. (६) काऊको, टी.; हपस्टन, पी.; हेल्ड, सी.; ग्रॉथ, ए.; हॉर्नबॅक, के.; कोलॉ, डब्ल्यू.; नॉट, डी.; कॉफी, सी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा