आपल्या महान शिक्षकाकडून तुम्ही शिकत आहात का?
“मीस्पेनमधील उत्तम विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात पाच वर्षापर्यंत कायदेविषयक अभ्यास केला; पण जेव्हा मी पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला तेव्हा जे काही मी शिकलो ते फार सर्वोत्तम होते. विद्यापीठाने मला कशाप्रकारे अभ्यास करावा हे शिकवले; पण पवित्र शास्त्राने मला जीवन कसे जगावे हे शिकवले.” अशाप्रकारचे स्पष्टीकरण ज्युलियोने केले.
पवित्र शास्त्राद्वारे आम्हाला देवाचे विचार, त्याची तत्त्वे व सूचनांकडे पोहंचता येते. यहोवा हा “महान शिक्षक” आहे असे वर्णन पवित्र शास्त्र करते कारण तो विश्वातील सर्वोत्तम शिक्षक आहे. (यशया ३०:२० NW) शब्दशः, “शिक्षक” हे अनेकवचन वापरुन इब्री शास्त्रवचन त्याची श्रेष्ठता प्रगट करते. यामुळे इतर कोणत्याही शिक्षकाकडून शिकण्यापेक्षा यहोवाकडून शिकणे हे फार श्रेष्ठ आहे; याचे स्मरण आपल्याला झाले पाहिजे.
यहोवाकडून व्यावहारिक बुद्धी
ईश्वरी शिक्षण इतके लाभदायक का आहे? सर्वप्रथम, त्यात समाविष्ट असलेल्या अमूल्य गोष्टीमुळे. यहोवाचे शिक्षण आम्हास ‘व्यावहारिक बुद्धी’ प्रदान करते. त्याहून अधिक म्हणजे देवाने दिलेल्या बुद्धीचा जे वापर करतात त्यामुळे त्यांच्या ‘जीवनाचे रक्षण’ होते.—नीतीसूत्रे ३:२१ ,२२; उपदेशक ७:१२.
स्तोत्र ११९ च्या रचनाकाराला याची जाणीव झाली की, यहोवाच्या बुद्धीने त्याच्या संपूर्ण जीवनकाळात त्याला संरक्षण दिले. उदाहरणार्थ, त्याने गायिले: “सोन्यारूप्याच्या लक्षावधि नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान् आहे. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यापेक्षा अधिक सूज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:७२, ९२, ९८, ९९.
यहोवाचे नियम नसते तर ज्यांचा ‘दुःखात अंत झाला असता’ त्यामध्ये स्तोत्रकर्ता एकटा नाही. स्पेन मधील रोजा या युवतीला याची खात्री पटली की, ईश्वरी तत्त्वांचा वापर केल्याने तिचे जीवन बचावले गेले. ती म्हणते, “वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.”
रोजा वेश्या व्यवसाय त्याचप्रमाणे मद्यार्क आणि मादक पदार्थांचा दुरुपयोग करण्यात गोवलेली होती. ती म्हणते, “एके दिवशी, जेव्हा मी घोर निराशेमध्ये होते तेव्हा यहोवाचे साक्षीदार असलेल्या एका विवाहीत जोडप्याने पवित्र शास्त्र आपल्या समस्या सोडविण्यास कसे मदत करु शकते याविषयी बोलणी केली. मी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि मला ते मोहक देखील वाटले. एका महिन्यामध्येच जीवनाची निर्मळ आणि नवीन सुरुवात करण्यास मला सामर्थ्य मिळाले. आता माझे जीवन उद्देशपूर्ण होते; लवकरच मद्यार्क आणि मादक पदार्थांच्या आधाराची मला गरज राहिली नाही. यहोवाबरोबर मैत्री करण्याची माझी खूप इच्छा होती; मी त्याच्या तत्त्वांप्रमाणे चालण्याचा निर्धार केला. देवाच्या वचनामध्ये व्यावहारिक बुद्धी नसती तर मी माझ्या जीवनाचा केव्हाच अंत केला असता.”
खरोखर, यहोवाकडून मिळणारी बुद्धिमत्ता जीवन रक्षक आहे. यास्तव, आपल्याला अमूल्य ईश्वरी तत्वप्रणालीमुळेच नव्हे, तर यहोवा त्याच्या सेवकांना सूचना देण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करतो; यामुळे सुद्धा लाभ मिळू शकतो. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने आपल्याला शिक्षक आणि शिष्य बनविण्याची आज्ञा दिली आहे; त्यामुळे सूचना देण्याच्या अधिक प्रभावशाली पद्धती शिकण्याची आपल्याला आवश्यकता आहे.—मत्तय २८:१९, २०.
यहोवाने वापरलेले दाखले
मार्कचे शुभवर्तमान म्हणते, “दाखल्यावाचून [येशू] त्यांच्याबरोबर बोलत नसे.” (मार्क ४:३४) येशूच्या शिकवणीचा हा गुणविशेष काही आश्चर्यकारक नव्हता. यहोवाचे भविष्यवादीत संदेश इस्त्राएल राष्ट्राला सांगण्याच्या मार्गांपैकी त्याने केवळ एकाचे अनुकरण केले. यामध्ये अनेक सचित्र दाखल्यांचा समावेश आहे.—यशया ५:१-७; यिर्मया १८:१-११; यहेज्केल १५:२-७; होशेय ११:१-४.
मूर्त्या या निरर्थक आहेत हे शिकविण्यासाठी यहोवा प्रबळ दाखल्याचा कसा वापर करतो याकडे लक्ष द्या. यशया ४४:१४-१७ म्हणते: “कोणी आपणासाठी गंधसरू तोडितो; तो सुरू व अल्लोन झाडे घेतो . . . तो देवदारूचे झाड लावतो . . . ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते; त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो; ते पेटवून त्यावर भाकरी भाजितो; तो त्याचा देवहि बनवितो व त्याच्या पाया पडतो; तो त्याची कोरीव मूर्ति करितो व तिचे भजनपूजन करितो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळितो; त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो; . . . तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडितो, म्हणजे कोरीव मूर्ति आपल्यासाठी बनवितो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करितो; तिची प्रार्थना करितो; तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस.” अशाप्रकारचे दाखले प्रामाणिक लोकांना मूर्तिपूजेला आणि खोट्या तत्त्वांना नाकारण्यासाठी प्रबल साधने आहेत.
आत्म-परिक्षणार्थ प्रश्न
विचारांना जागृत करणाऱ्या प्रश्नांनी यहोवाने त्याच्या काही सेवकांच्या विचारशैलीत कसा बदल केला याची सुद्धा उदाहरणे पवित्र शास्त्रात आहेत. कुलपिता ईयोब हा यापैकी एक होता. देवाने त्याला, त्याची देवासमोर केवढी क्षुद्रता आहे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी धीराने मदत देऊ केली. गंभीर प्रश्नांनी हे केले गेले; ज्यांची उत्तरे देण्यास तो अक्षम आणि असमर्थ असा होता.
यहोवाने ईयोबाला विचारले, “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? . . . त्याला [समुद्राला] कवाडे लावून कोणी आडविले? . . . कृत्तिकांचा गुच्छ तुला गुंफता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडिता येतील काय? . . . देवाच्यासारखा तुझा भुज आहे का?” या केलेल्या चौकशीत एक अतिमहत्त्वाचा प्रश्न होता: “आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय?”—ईयोब ३८: ४, ८, ३१; ४०:८, ९.
आपण असंमजसपणे बोललो याची जाणीव ईयोबाला या शोधक प्रश्नांमुळे झाली. यामुळे त्याने माघार घेतली आणि पश्चात्ताप केला. (ईयोब ४२:६) याप्रमाणेच, आपल्या मुलांचे आणि पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचे अयोग्य विचार बदलण्यासाठी निवडक प्रश्न मदतदायी ठरु शकतील.
आत्मविश्वासाची उभारणी करणे
स्वतःस अक्षम आणि अयोग्य समजणाऱ्या एखाद्याला आम्ही मदत दयावयाची आहे तर काय? यहोवा आणि त्याचा संदेष्टा मोशे यांच्यातील संभाषण याबाबतीत साह्यकारी आहे. मोशेला यहोवाने फारो आणि इस्त्राएलांपुढे त्याचा प्रवक्ता नियुक्त केले तेव्हा त्यास ही कामगीरी अक्षम वाटली. तो म्हणाला, “मी तर मुखाचा जड व जिभेचाहि जड आहे.” तथापि देवाने प्रत्यूत्तर दिले, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? . . मी परमेश्वरच [यहोवा, NW] की नाही? तर आता जा मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला मी शिकवीन.”—निर्गम ४:१०-१२.
यहोवाने मोशेचा भाऊ अहरोन याची प्रवक्ता म्हणून नियूक्ती केली होती आणि त्यांनी इजिप्तमधील त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण केले. (निर्गम ४:१४-१६) अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी घरोघरची सेवा किंवा मार्ग साक्षकार्य करताना मोशेप्रमाणेच अपुरेपणाच्या भावनेचा अनुभव घेतला. आपल्याला याची जाणीव आहे की, मोशेप्रमाणेच आपल्याला यहोवाचे पाठबळ आहे आणि अनुभवी सेवकांच्या संगतीमुळे अनिश्चिततेवर विजय मिळविण्यास आपल्याला शक्य होते. वाक्चातुर्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मोशेला सुद्धा आत्मविश्वास वाढविण्यास शक्य झाले होते; ज्याचा अंतर्भाव पवित्र शास्त्रातील अनुवादाच्या संपूर्ण भागात आहे. यहोवाच्या मदतीने आपण सुद्धा बोलण्याच्या क्षमतेमेध्ये वाढ करु शकतो.
व्यावहारिक धडा
इतरांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा देखील अत्यावश्यक आहे. संदेष्टा योनामध्ये या गुणाची कमतरता होती. यहोवाने योनास निनवे शहरातील लोकांस शहरावर येणाऱ्या नाशाची चेतावणी देण्याचे काम दिले होते. आश्चर्य म्हणजे, निनवेतील लोकांनी पश्चात्ताप केला. (योना ३:५) याचा परिणाम, यहोवाने येणारी विपत्ती पुढे ढकलली. प्रचार मोहीमेतील यशाने आनंदी होण्याएवजी त्याची भविष्यवाणी पूर्ण होणार नाही म्हणून योना क्रोधित झाला. योग्य प्रमाणबद्धता समजाविण्यासाठी यहोवाने त्याला कशी मदत केली?
योनाला इतरांबद्दल काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यहोवाने तुंबीच्या वेलाचा वापर केला. हा वेल एका रात्रीत अद्भुतरीत्या वाढला आणि त्याने निनवे शहराच्या बाहेर मांडव घातलेल्या योनास शीतल छाया दिली. या उपयुक्त वेलामुळे योनास “फार आनंद” झाला. परंतु यहोवाने एक किडा उत्त्पन्न केला; तो त्या वेलाला लागला तेव्हा तो सुकून गेला. सूर्यामुळे आणि झळईच्या वाऱ्यामुळे योना संतप्त झाला आणि म्हणाला: “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!” (योना ४:५-८) या सर्वाचा मथितार्थ काय होता?
यहोवा योनाला म्हणाला: “या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढविले नाही, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस! तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यास कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”—योना ४:९-११.
किती प्रभावी व्यावहारिक धडा! योना हजारो लोकांपेक्षा तुंबीच्या वेलीमध्ये जास्त आस्था बाळगून होता. यहोवाच्या सृष्टीसंबंधाने काळजी घेणे हे प्रशंसनीय असले तरी, लोकांचे जीवन वाचविण्यात त्यांची मदत करणे ही आपली अति महत्त्वाची कामगिरी आहे.
धीराने बोध करणे
योनाला आढळले त्याप्रमाणे, आपल्याला देखील याची प्रचिती येते की, आपली सेवा पूर्ण करणे नेहमीच सोपे नसते. (२ तीमथ्य ४:५) तथापि, इतरांच्या बाबतीत धीराची मनोवृत्ती मदत करु शकेल.
तुमचा पवित्र शास्त्र विद्यार्थी मंद किंवा काहीसा असंयुक्तिक असल्यास तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखविता? आपला महान शिक्षक अशाप्रकारच्या समस्यांना कसे सामोरे जायचे हे शिकवतो. अब्राहामाने सदोम व गमोरा यावर येणाऱ्या नाशाच्या संदर्भात एकसारखे प्रश्न विचारले तेव्हा यहोवाने असामान्य धीर प्रगट केला. अब्राहामाने विचारले: “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाहि संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?” यहोवाच्या उत्तरामुळे ही संख्या दहापर्यंत कमी करण्यासाठी अब्राहाम आर्जव करीत राहण्यास उद्युक्त झाला. यहोवाला हे ज्ञात होते की केवळ लोटाचे कुटुंब बचावण्याच्या पात्रतेचे आहे आणि त्यासाठी तरतूद करण्यात आली. परंतु अब्राहामाला यहोवाची विशाल दया समजेपर्यंत त्याने त्याला प्रश्न करीत राहण्यास धीराने परवानगी दिली.—उत्त्पति १८:२०-३२.
यहोवाने अब्राहामाची मर्यादीत आकलनशक्ती आणि चिंतेची भावना यांचा विचार केला. आपण सुद्धा विद्यार्थांच्या मर्यादा समजावून घेतल्या तर विद्यार्थी एका खास शिकवणीचे आकलन करण्यासाठी प्रयत्न करताना किंवा मुळावलेल्या सवयीवर विजय मिळवताना; धीर प्रगट करण्यासाठी आपणास मदत होईल.
यहोवाकडून सतत शिकत राहा
निर्विवादपणे यहोवा हा महान शिक्षक आहे. दाखले, प्रश्न आणि व्यावहारिक धडे यांच्याद्वारे तो धीराने समज देतो. आपण त्याच्या शिक्षण पद्धतींचे जितके हुबेहूब अनुकरण करु तितके आपण स्वतः अधिक उत्तम शिक्षक होऊ.
जे इतरांना शिक्षण देतात; त्यांना स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करावयाचे नसल्यामुळे आपण नियमितपणे “परमेश्वरापासून [यहोवा, NW] शिक्षण” घेतले पाहिजे. (यशया ५४:१३) यशया लिहितो: “तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२०, २१) यहोवाच्या मार्गावर अविरत मार्गाक्रमण आणि इतरांनाही तसेच करण्यास मदत केल्याने; महान शिक्षक याकडून शिकविले जाण्याचा असाधारण विशेषाधिकार आपण मिळवू शकतो.
[२८ पानांवरील चित्रं]
यहोवाने ईयोबाला विचारले: “गरुड तुझ्या ज्ञानाने भरारी मारितो व उंच ठिकाणी घरटे करितो काय?”
[२८ पानांवरील चित्रं]
लोकांची अधिक चिंता करावी हे यहोवाने योनाला तुंबीच्या वेलाद्वारे शिकवले