वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१५ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे
    सावध राहा!—१९९९
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१५ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

या कठीण आर्थिक काळात, बहुतांश लोक व कारखाने दिवाळखोरीचा अवलंब करतात. एखाद्या ख्रिश्‍चनाने दिवाळखोर अर्ज दाखल करणे शास्त्रवचनीयरीत्या योग्य आहे का?

या प्रश्‍नाचे उत्तर, देवाचे वचन सुस्पष्टपणे आधुनिक बाबींवर आम्हाला व्याहारिक मार्गदर्शन कसे देते याचे एक उत्तम उदाहरण मांडते. अनेक राष्ट्रांमध्ये दिवाळखोरीचे विनियामक नियम आहेत. प्रत्येक राष्ट्रांमध्ये हे नियम वेगवेगळे आहेत व यावर कायदेशीर सूचना देण्याचे ख्रिस्ती मंडळीचे काम नाही. परंतु आपण दिवाळखोरीच्या कायदेशीर प्रयोजनावर एक दृष्टी टाकूया.

सरकार लोकांना व व्यापाऱ्‍यांना दिवाळखोर झाल्याचे घोषित करण्यासाठी परवानगी देते याचे एक कारण आहे की, ज्या लोकांनी पैसे उसने दिले आहेत किंवा जमा (धनको) केले आहेत अशांचे संरक्षण, जे लोक पैसे घेतात किंवा ऋण आहेत (ऋणको) परंतु ते फेडत नाही असे सांगणाऱ्‍यांपासून होते. ऋणकोला कर्जबाजारी असे जाहीर करून त्याची सर्व मालमत्ता कर्जाचे आंशिक वेतन म्हणून वाटता येईल असे कोर्टाला अपील करणे हाच एकमात्र आधार आहे असे धनकोला वाटत असेल.

जे प्रामाणिकपणे त्यांच्या धनकोंना कर्जाची फेड करू शकत नाही अशा ऋणकोंसाठी दिवाळखोरी आणखी एका दुसऱ्‍या मार्गाने संरक्षण योजना म्हणून कार्य करते. ऋणकोला दिवाळखोरी दाखल करण्यास अनुमती दिल्यास, तर त्याचा धनको त्याची काही मालमत्ता घेऊ शकतो. तरीही, कायदा त्याला त्याचे घर किंवा काही विशिष्ट लहानसहान गोष्टी ठेवून घेण्यास परवानगी देईल व नंतर त्या गमावण्याच्या किंवा त्याच्या पूर्वीच्या धनकोंच्या हडप करण्यापासून मुक्‍त होऊन जीवन व्यतीत करता येईल.

मग, हे कायदे आर्थिक किंवा व्यापारी व्यवहारातील दोन्ही बाजूंना काही प्रमाणात संरक्षण देण्याच्या उद्देशाने बनवलेले असतात हे स्पष्ट आहे. परंतु, पवित्र शास्त्र कोणते मदतदायी सल्ले देते ते आपण पाहूया.

पवित्र शास्त्र कर्जबाजारी होण्याचे उत्तेजन देत नाही याची जाणीव न राखता त्याचे वाचन एखाद्याला अथपासून इतिपर्यंत करणे अतिशय कठीण जाईल. आम्हाला अशाप्रकारची ताकीद नीतीसूत्रे २२:७ मध्ये मिळते जेथे म्हटले आहे: “धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो.”

शिवाय, मत्तय १८:२३-३४ मधील येशूच्या दाखल्याची देखील आठवण करा ज्यामध्ये एक दास एका मोठ्या कर्जात गोवलेला होता. “त्याच्या धन्याने हुकूम केला की, तो त्याची बायको आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.” परंतु मग त्याचा धनी, एक राजा, त्याला त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याला दया दाखवली. नंतर जेव्हा तो दास कठोर ठरला, तेव्हा राजाने ‘तो ते देणे फेडीपर्यंत त्याला तुरूंगात टाकले.’ स्पष्टतः, सर्वात उत्तम मार्ग, शिफारशीवजा मार्ग म्हणजे, पैसे उसने घेण्याचे टाळणे होय.

प्राचीन इस्त्राएलातील देवाच्या सेवकांचे व्यापारी व्यवहार होते. काही वेळा तर पैशाची देवाणघेवाणही होत असे. यहोवाने त्यांना काय करण्याची सूचना दिली? जर एखाद्याला व्यापार करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी पैसे उसने घ्यावयाचे असल्यास एखाद्या इब्री व्यक्‍तीने त्यावर व्याज लावणे कायदेशीर आणि सर्वसामान्य होते. परंतु, गरजू इस्त्राएली व्यक्‍तीला उसने पैसे देताना निःस्वार्थ असले पाहिजे असे देवाने त्याच्या लोकांना आर्जविले; व्याज आकारून ते अनिष्ट परिस्थितीतून फायदा करू शकत नव्हते. (निर्गम २२:२५) अनुवाद १५:७, ८ म्हणते: “एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर . . . तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्‍य उसने दे.”

याचप्रकारची दया किंवा विचारीपणा विनियमात प्रतिबिंबित होत होते, जे धनकोवर अशा अटी घालत होते की ते ऋणकोकडून जीवनाच्या आवश्‍यकता जसे की, कुटुंबाच्या जात्याची तळी किंवा एखाद्याला रात्रीच्या वेळी गरम ठेवणारे वस्त्र, हे मुळीच हिरावून घेऊ शकत नव्हते.—अनुवाद २४:६, १०-१३; यहेज्केल १८:५-९.

हे निश्‍चित की, सर्वच यहुद्यांनी त्यांचा महान न्यायाधीश आणि नियंता याच्याकडून आलेल्या प्रेमळ नियमाच्या आत्म्याचा स्वीकार करून त्याचा अवलंब केला नाही. (यशया ३३:२२) काही लोभी यहुद्यांनी त्यांच्या बांधवांना अतिशय कठोरतेने वागवले. आजही, काही धनको त्यांच्या मागण्यांमध्ये कठोर व असमंजस असतील. कदाचित एक प्रामाणिक ख्रिस्ती जो त्या वेळेला काही आकस्मिक घटनेमुळे पैसे फेडू शकला नाही त्याच्यासोबतही त्यांनी असाच व्यवहार केला असेल. (उपदेशक ९:११) त्यांच्या ताठ, हक्काने मागणी करण्याच्या दबावाने, जगिक धनको ऋणकोला अशा स्थितीत टाकतील जेथे तो स्वतःचे संरक्षण करू शकत होता असे त्याला वाटत होते. ते कसे? काही बाबतीत धनकोला वाटेल की आता एकमात्र पाऊल म्हणजे दिवाळखोरीचे कायदेशीर पाऊल उचलणे होय. यास्तव, एखादा ख्रिस्ती जो लोभी नव्हता किंवा त्याने दिलेल्या कर्जाविषयी निष्काळजी नव्हता तो दिवाळखोरीचा अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करील.

परंतु आम्ही त्याच्या विरूद्ध बाजूविषयी देखील जागृत असले पाहिजे. एखादा ख्रिस्ती व्यक्‍ती, त्याने कशात वा किती पैसे खर्च केले यावर ताबा न ठेवल्यामुळे किंवा त्याच्या व्यापारी निर्णयांमध्ये समंजस दूरदृष्टी न वापरल्यामुळे कर्जात बुडाला असेल. तेव्हा त्याने कर्जाविषयी बेफिकीर राहून, त्याच्या अयोग्य निर्णयामुळे इतरांना इजा करून लगेचच दिवाळखोरीद्वारे त्यातून मुक्‍तता मिळवण्याचा प्रयत्न करावा का? पवित्र शास्त्र अशाप्रकारच्या आर्थिक बेजबाबदारपणाला स्विकृती देत नाही. ते देवाच्या सेवकाला त्याचे होय म्हणजे होय असे राहण्यास आर्जविते. (मत्तय ५:३७) शिवाय, बुरूज बांधण्याआधी खर्चाचा अंदाज करण्याबद्दल येशूच्या विवेचनाची देखील आठवण करा. (लूक १४:२८-३०) याच्याच सुसंगतीत, एखाद्या ख्रिश्‍चनाने आर्थिक कर्ज घेण्याआधी कदाचित इच्छा नसताना पुढे येऊ शकणाऱ्‍या परिणामांचा मनपूर्वक विचार केला पाहिजे. एकदा का त्याने कर्ज घेतले तर, ज्या व्यक्‍तीला किंवा कंपनीला त्याला ते फेडायचे आहे ते फेडण्याची त्याची जबाबदारी त्याने ओळखली पाहिजे. जर पुष्कळांनी एखाद्या ख्रिश्‍चनाला बेजबाबदार किंवा अविश्‍वासू असल्याचे पाहिल्यास, त्याने कष्टाने मिळवलेल्या चांगल्या नावाला कलंक लावला जातो व अशाप्रकारे त्याला पुन्हा कधीही बाहेरच्याकडून चांगली साक्ष मिळणार नाही.—१ तीमथ्य ३:२, ७.

यहोवा कोणत्या प्रकारच्या व्यक्‍तीचा स्वीकार करतो त्याबद्दल स्तोत्र १५:४ काय म्हणते याची आठवण करा. आम्ही वाचतो: “आपण [देवाला स्वीकृत असा] वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही.” होय, धनकोला ज्याप्रकारे वागवले पाहिजे त्यानुसारचीच वागवणूक त्याला दिली जावी अशी देव ख्रिश्‍चनांकडून अपेक्षा करतो.—मत्तय ७:१२.

तर मग, सारांश असा की, एखादा ख्रिस्ती अगदीच हालाखीच्या परिस्थितीत असताना, दिवाळखोरीच्या कैसराच्या नियमांतून मिळणाऱ्‍या संरक्षणातून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या शक्यतेला पवित्र शास्त्र वगळत नाही. परंतु, ख्रिश्‍चनांनी प्रामाणिकपणा व विश्‍वसनीयतेच्या बाबतीत अपवादात्मक असले पाहिजे. अशाप्रकारे त्यांनी आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रामाणिक इच्छेच्या बाबतीत उदाहरणीय असले पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा