वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१५ पृ. ४-७
  • क्षमाशील का असावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षमाशील का असावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अक्षमाशील आत्म्याची इजा
  • क्षमा करण्यास शिका
  • समतोलपणा राखणे
  • क्षमाशीलतेचे फायदे
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • एकमेकांना मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१५ पृ. ४-७

क्षमाशील का असावे?

यहुदी विद्वान व लेखक जोसेफ जेक यांनी एकदा क्षमेचे वर्णन अशाप्रकारे केले, “सर्व नैतिक बोधांमध्ये ते अति उंच पण अधिक अवघड आहे.” खरोखर, पुष्कळांना “मी तुम्हाला क्षमा केली” हे शब्द उच्चारण्यास अवघड वाटतात.

क्षमाशीलता, ही पैशाप्रमाणेच दिसते. ती इतरांवर उदारतेने व दयेने दिली जाऊ शकते किंवा स्वत:साठी कंजूषपणाने साठवून ठेवली जाते. अगोदरचा उल्लेख हा ईश्‍वरी मार्ग आहे. क्षमाशीलतेसंबंधी विचार आल्यास आम्ही उदारतेने क्षमा करण्याचा सराव केला पाहीजे. का बरे? कारण देव तसे उत्तेजन देतो व अक्षमाशीलपणाचा खुनशी आत्मा केवळ परिस्थिती बिघडवितो.

नेहमी एकण्यात येणारे शब्द: “मला राग येत नाही; पण मजमध्ये सूडभावना जागृत होते!” खेदाने, आज अनेक लोकांच्या जीवनाचे हे विधान मार्गदर्शक तत्त्व बनले आहे. एका स्त्रीने तिच्या वहिनीशी सात वर्षांपेक्षा अधिक काळ बोलण्याचा नकार दर्शविला कारण ती म्हणते: “तिने माझे खूपच वाईट केले व त्यामुळे मी तिला कधीच क्षमा करु शकले नाही.” तथापि, दोषी व्यक्‍तीला क्षमा मागण्यासाठी उचकावे म्हणून किंवा तीला शिक्षा करावी म्हणून अबोला वापरला जातो तेव्हा ते सहसा सूड घेण्याची इच्छा तृप्त करत नाही. तर उलट, वादविवाद लांबविला जाऊन, द्वेष पूर्णपणे वाढण्यास वाव दिला जातो. अशाप्रकारे यातनांचे हे चक्र तोडले नाही तर सूडाची पकड एखाद्याचे नातेसंबंध व आरोग्य बिघडविते.

अक्षमाशील आत्म्याची इजा

एखादी व्यक्‍ती क्षमाशील नसल्यास, स्पर्धात्मक वृत्तीचा परिणाम दबावात होतो. हाच दबाव गंभीर आजाराकडे निरवू शकतो. डॉ. विल्यम एस. साडर्लर यांनी लिहिले: “मानवाच्या आजार व दु:खाची आश्‍चर्यकारक टक्केवारी ही थेटपणे काळजी, भय, विरोध . . . अहितकारी विचार व अशुद्ध जीवनमान याच्याशी संबंधित आहे ही गोष्ट डॉक्टराप्रमाणे कोणीही पूर्णपणे ओळखू शकणार नाही.” खरोखर, भावनिक गोंधळ इजेस किती करणीभूत होतो? एक वैद्यकीय प्रकाशन उत्तर देते: “आकडेवारीनुसार . . . वैद्याकडे जाणाऱ्‍या दोन तृतीयांश रोग्यांना मानसिक दबावामुळे निर्माण होणारी किंवा जडणारी लक्षणे दिसून येत होती.”

होय, कटूपणा, संताप व मत्सर हे निरुपद्रवी निश्‍चितच नाहीत. अशाप्रकारच्या कटू भावना ह्‍या मोटारीला हळूहळू जसा गंज चढतो त्याप्रमाणेच आहेत. ती गाडी बाहेरुन सुंदर दिसत असेल; पण तिच्या रंगाच्या खाली विध्वंसक क्रिया चालू असते.

त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, दया दाखवण्याचा आधार असतानाही क्षमा करण्यास नकार देणे हे आमच्या आध्यात्मिकतेतही इजा करु शकते. यहोवाच्या नजरेत आम्ही येशूच्या दाखल्यातील दासाप्रमाणे होऊ. दासाला त्याच्या मालकाद्वारे मोठे कर्ज माफ केले होते. तरी देखील, जेव्हा सह-दासाने त्याचे क्षुल्लक कर्ज माफ करण्याची विनंती केली तेव्हा तो कठोर व अक्षमाशील होता. येशूने हे स्पष्ट केले की, आम्हीही त्याप्रमाणे क्षमा करण्याची इच्छा दाखविली नाही तर यहोवा आपल्या पापाची क्षमा करण्यास नकार देईल. (मत्तय १८:२१-३५) आम्ही अक्षमाशील असलो तर देवासमोरील आपला शुद्ध विवेक व भवितव्याची आशा देखील गमावू शकतो! (पडताळा २ तीमथ्य १:३.) तर मग, आम्ही काय करु शकतो?

क्षमा करण्यास शिका

खरी क्षमाशीलता ही अंतःकरणातून येते. त्यामध्ये गुन्हेगाराच्या चुकांबद्दल क्षमा करणे व सूड उगविण्याच्या कुठल्याही इच्छेस सोडून देणे गोवलेले आहे. अशाप्रकारे शेवटचा न्याय व शक्यतो योग्य शिक्षा ही यहोवाच्या हातामध्ये सोपवलेली आहे.—रोमकर १२:१९.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, “हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे” त्यामुळे जरूर असताना देखील ते क्षमेकडे नेहमी झुकत नाही. (यिर्मया १७:९) येशूने स्वत: म्हटले: “कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.”—मत्तय १५:१९.

आमच्या अंतःकरणाला योग्य ते करण्यास तालीम दिली जाऊ शकते, हे कृतज्ञतेचे आहे. तथापि, ज्या तालीमेची आवश्‍यकता आहे ती उच्च उगमापासून आली पाहिजे. आम्ही ते एकटेच करु शकणार नाही. (यिर्मया १०:२३) ईश्‍वर प्रेरित स्तोत्रकर्त्याने याची ओळख बाळगली व देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली. त्याने यहोवाला प्रार्थनेत याचना केली: “तू आपले नियम मला शिकीव, तुझ्या विधिंचा मार्ग मला समजावून दे.”—स्तोत्र ११९:२६, २७.

दुसऱ्‍या एका स्तोत्राप्रमाणे, प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याला “यहोवाच्या मार्गाची समज” प्राप्त झाली. त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्याद्वारे शिकून घेतले. यासाठीच तो म्हणू शकला: “परमेश्‍वर [यहोवा, NW] दयाळू व कृपाळू आहे. तो मंदक्रोध व दयामय आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्‍वर [यहोवा, NW] आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो.”—स्तोत्र १०३:८, १३.

दाविदाने केले त्याप्रमाणे आम्हाला शिकण्याची गरज आहे. क्षमाशीलतेचे परिपूर्ण उदाहरण यहोवा व येशू यांचे प्रार्थनापुर्वक अभ्यास करा. याप्रमाणे आम्ही अंतःकरणपुर्वक क्षमा करण्यास शिकू.

तरी देखील, काही विचारतील: “गंभीर पापाबद्दल काय? सर्वच पापांची क्षमा केली जावी का?

समतोलपणा राखणे

एखादी व्यक्‍ती जेव्हा गंभीर चूक करते तेव्हा दु:ख हे मोठे असू शकते. हे खासकरुन गंभीर पापाला बळी पडणाऱ्‍या निष्पाप व्यक्‍तीबद्दल सत्य आहे. काही असेही विचार करतील, ‘ज्यांनी मला दुष्टतेने फसविले व दु:खी केले अशा काहींना मी कशी क्षमा करु?’ अशा परिस्थितीमध्ये गंभीर पापामुळे बहिष्कृत करण्याची गरज असल्यास बळी पडणाऱ्‍याला मत्तय १८:१५-१७ तील सल्ला लागू करावा लागेल.

कोणत्याही परिस्थितीत, गुन्हेगारावरच पुष्कळसे अवलंबून आहे. चूक करणाऱ्‍याठायी खऱ्‍या पश्‍चात्तापाचे कोणत्याही प्रकारचे चिन्ह दिसत आहे का? पाप करणाऱ्‍याने परिवर्तन केले आहे का व खरी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे का? भयंकर पापाच्या परिस्थितीतही अशाप्रकारचा पश्‍चात्ताप यहोवाच्या दृष्टीने क्षमेची गुरुकिल्ली आहे. उदाहरणार्थ, इस्राएलाच्या इतिहासातील सर्वात वाईट राजा मनश्‍शे याला यहोवाने क्षमा केली. कोणत्या आधारावर? शेवटी मनश्‍शेने स्वत:ला नम्र केले व त्यांच्या दुष्ट मार्गांचा पश्‍चात्ताप केला, म्हणून यहोवाने असे केले.—२ इतिहास ३३:१२, १३.

पवित्र शास्त्रात खऱ्‍या पश्‍चात्तापामध्ये प्रवृत्तीत प्रामाणिक बदल, कोणत्याही प्रकारच्या चुकीबद्दल अंतःकरणपुर्वक द्वेष या गोष्टींचा समावेश आहे. योग्य व शक्य आहे त्या ठिकाणी, पश्‍चात्तापासोबत पापास बळी पडलेल्याची भरपाई करण्याचे प्रयत्न देखील येतात. (लूक १९:७-१०; २ करिंथकर ७:११) जेथे अशाप्रकारचा पश्‍चात्ताप नाही, यहोवा क्षमा करत नाही.a शिवाय, ज्यांनी सत्याचे ज्ञान प्राप्त केले पण आता हेतुपुरस्पर व अपश्‍चात्तापी वृत्तीने चुका करतात अशा लोकांना, ख्रिश्‍चनांनी क्षमा करु नये अशी देवाची इच्छा आहे. (इब्रीयांस १०:२६-३१) अतिरेकी प्रकरणात, क्षमा करणे अयोग्य असेल.—स्तोत्र १३९:२१, २२; यहेज्केल १८:३०-३२.

क्षमाशीलता शक्य असो अगर नसो, गंभीर पापाला बळी पडलेल्या व्यक्‍तीने दुसरा प्रश्‍न विचारात घ्यावा: सर्व परिस्थितीचा निकाल लागेपर्यंत अधिक दु:खित व रागिष्ठ स्थितीत मी राहावे का? एका उदाहरणाचा विचार करा. राजा दावीद याला त्याचा सेनापती यवाब याने, अबनेर व अमासा “हे दोघेही (यवाब) याच्या पेक्षा अधिक धार्मिक व भले होते” यांचा वध केल्याने अतिशय दु:ख झाले. (१ राजे २:३२) दाविदाने आपला राग व चीड शाब्दिक रीतीने व निःसंशये यहोवाला प्रार्थनेद्वारे व्यक्‍त केली असावी. काही काळातच दाविदाच्या भावनांची तीव्रता पूर्ण कमी झाली. त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये चिडखोर कृत्यांनी त्याच्यावर अधिकार चालविला नाही. दाविदाने यवाबाबरोबर काम करण्याचेही चालू ठेवले, परंतु या अपश्‍चात्तापी गुन्हेगाराला त्याने सहजासहजी क्षमा केली नाही. न्याय शेवटी केला जाईल याकडे दाविदाने पाहिले.—२ शमुवेल ३:२८-३९; १ राजे २:५, ६.

एखाद्याच्या गंभीर पापामुळे दु:खी झाल्याने सुरवातीचा राग काढून टाकण्यास वेळ व प्रयत्न लागू शकेल. गुन्हेगाराने आपली चूक कबूल करुन पश्‍चात्ताप केला तर सुधारणा करण्याची क्रिया सोपी होऊ शकेल. परंतु पापाला बळी पडलेल्या व्यक्‍तीने, कोणतेही पाप केले असले तरी, यांच्याद्वारे तसेच मंडळीतून सांत्वन प्राप्त केले पाहिजे.

पाप करणाऱ्‍याला क्षमा केल्याने तुम्ही दोषाकडे दुर्लक्ष करत आहात असा अर्थ होत नाही, हे ओळखा. ख्रिश्‍चनांसाठी क्षमाशीलता म्हणजे, विश्‍वासाने ती गोष्ट यहोवाच्या हातात सोडणे. तो विश्‍वाचा नीतिमान न्यायाधीश आहे व योग्य वेळी न्याय तडीस नेईल. यामध्ये फसवे “जारकर्मी व व्यभिचारी” यांचा न्याय गोवलेला आहे.—इब्रीयांस १३:४.

क्षमाशीलतेचे फायदे

स्तोत्रकर्ता दाविदाने गायिले: “हे प्रभू, [यहोवा, NW] तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.” (स्तोत्र ८६:५) तुम्ही यहोवासारखे “क्षमा करण्यास तयार आहात का”? त्याचे पुष्कळ फायदे आहेत.

पहिल्याने, इतरांना क्षमा केल्याने चांगले नातेसंबंध प्रस्थापित होते. पवित्र शास्त्र ख्रिश्‍चनांना उत्तेजन देते: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:३२.

दुसरे, क्षमाशीलता शांती आणते. ही शांती सहमानवांबरोबरचीच नाही तर आंतरिकही शांती आणते.—रोमकर १४:१९; कलस्सैकर ३:१३-१५.

तिसरे, इतरांना क्षमा केल्याने आम्हास आठवण होते की आपल्या स्वत:लाही क्षमेची गरज आहे. होय, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.”—रोमकर ३:२३.

शेवटी, इतरांना क्षमा केल्याने, देवाने आमच्या पापाची क्षमा करण्याचा मार्ग मोकळा होतो. येशूने म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करील.”—मत्तय ६:१४.

येशूच्या मृत्यूदिनाच्या दुपारी त्याचे मन किती गोष्टींनी भरलेले असेल याची कल्पना करा. त्याला शिष्यांची, प्रचारकार्य व खासकरुन त्याची यहोवाला सचोटी या गोष्टींची काळजी होती. तरी वधस्तंभावर यातना होत असतानाही त्याने कशाची बोलणी केली? त्याचे शेवटचे शब्द होते, “हे बापा, त्यांना क्षमा कर.” (लूक २३:३४) अंतःकरणाने एक दुसऱ्‍यांना क्षमा केल्याने आम्ही येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करु शकतो.

[तळटीपा]

a तथापि, क्षमाशीलतेचा विचार करताना यहोवा इतरही गोष्टी लक्षात घेतो. उदाहरणार्थ, चूक करणारा यहोवाच्या दर्जांबद्दल अज्ञानी असल्यास, अशाप्रकारचा अज्ञानीपणा दोषीपणाचा भार कमी करील. येशूने त्याच्या पित्याला, त्याचा छळ करणाऱ्‍यांना क्षमा करण्याची विनंती केली त्यावेळेस ज्यांनी त्याचा घात केला त्या रोमी सैनिकांबद्दल तो बोलत होता हे उघडपणे दिसते. तो कोण आहे याबद्दल अज्ञानी असल्याने ते ‘काय करत आहेत हे त्यांना माहीत नव्हते.’ तथापि, त्या देहदंडाच्या मागे जे धार्मिक पुढारी होते त्यांचाच अधिक दोष होता व त्यांच्यातील अनेकांना क्षमेची शक्यता नव्हती.—योहान ११:४५-५३; पडताळा प्रेषितांची कृत्ये १७:३०.

[५ पानांवरील चित्रं]

अपश्‍चात्तापी दास ह्‍या येशूच्या दाखल्यातील मुद्दा तुमच्या लक्षात आला का?

[७ पानांवरील चित्रं]

इतरांना क्षमा केल्याने चांगले नातेसंबंध वाढतात व आनंद मिळविला जातो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा