वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१५ पृ. ३-४
  • तुम्ही क्षमाशील आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही क्षमाशील आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • क्षमा करणे एक आव्हान
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • एकमेकांना मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • क्षमाशील का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१५ पृ. ३-४

तुम्ही क्षमाशील आहात का?

बिल व त्याची १६ वर्षांची मुलगी, लिसा यांचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यांच्यातील क्षुल्लक मतभेद वारंवार शाब्दिक भांडणात वाढत होते. शेवटी, तणाव इतका वाढला की, लिसाला घर सोडण्यास सांगण्यात आले.a

काही काळानंतर, लिसाने हे ओळखले की, ती त्यासाठी जबाबदार होती व तिने तिच्या वडिलांकडे क्षमेची याचना केली. परंतु तिच्या मागील चुकांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्या कटू पित्याने शांती प्रस्थापित करण्याच्या तिच्या प्रयत्नांना नकार दर्शविला. विचार करा! त्याच्या स्वत:च्या मुलीला दया दाखविण्याची त्याची इच्छा नव्हती!

शतकांअगोदर एका निष्पाप मनुष्याला गुन्हा केला नसतानाही मरणदंडास पात्र ठरवले गेले. साक्षीदांरानी खोटी साक्ष दिली व राजकीय अधिकारी यांनी न्यायाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. तो निष्कपट मनुष्य येशू ख्रिस्त होता. त्याच्या मृत्युच्या थोड्या काळा अगोदर त्याने देवाला प्रार्थिले: “हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”—लूक २३:३४.

येशूने आपल्या अंतःकरणापासून मोकळ्या मनाने क्षमा केली व याच बाबतीत शिष्यांनी त्याचे अनुकरण करावे असे उत्तेजन दिले. (इफिसकर ४:३२) तरी देखील, बिलप्रमाणे पुष्कळ असे आहेत ज्यांची अंतःकरणपुर्वक क्षमा करण्याची इच्छा नाही. तुमच्याबाबतीत काय? इतरांनी तुमच्या विरुद्ध पाप केल्यास त्यांना क्षमा करण्याची तुमची इच्छा आहे का? तसेच गंभीर पापांबद्दल काय? ह्‍यांची देखील क्षमा केली जावी का?

क्षमा करणे एक आव्हान

क्षमा करणे नेहमीच सोपे नाही. ह्‍या आणीबाणीच्या काळात, मानवी नातेसंबंध अधिक समस्याग्रस्त झाला आहे. खासकरुन कौटुंबिक जीवन नेहमी त्रास व दबाव यांनी भरलेले आहे. ख्रिस्ती प्रेषित पौल याने फार पूर्वी हे भाकीत केले की, “शेवटच्या काळात” अशाप्रकारची परिस्थिती अस्तित्वात असेल. त्याने म्हटले: “माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, . . . चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वास घातकी, हूड, गर्वाने फुगलेली अशी होतील.”—२ तीमथ्य ३:१-४.

अपरिहार्यतेने, सर्वच बाहेरच्या दबावास तोंड देतात त्यामुळे इतरांना क्षमा करण्याची आमची कुवत याची परीक्षा घेतली जाते. अधिकतेत म्हणजे, आम्ही आतील दबावासही तोंड देतो. पौलाने शोक केला: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करितो तर ते कर्म मीच करितो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करितो.” (रोमकर ७:१९, २०) परिणामत:, आपल्यातील बरेच जण आपल्याला हवे असते त्याप्रमाणात क्षमाशील नसतो. सरतेशेवटी, वारसाने प्राप्त झालेली अपूर्णता व पाप आम्हा सर्वांवर प्रभूत्व राखून आहे जे आपल्याला सहमानवांना दया दाखवण्यापासून दूर नेते.

क्षुल्लक गोष्टींबद्दल दुसऱ्‍यांना क्षमा करण्यास उत्तेजन देताना, एका स्त्रीने प्रतिसाद दिला: “क्षमा करण्यास कोणीही योग्यतेचे नाही.” अशाप्रकारचे उद्‌गार हे वरवर भावनाशून्य, निष्ठुर व उपहास करणारे दिसत असतील. तरी देखील, अधिक खोलवर पाहिल्यास जगामध्ये लोकांना सहज दिसणारा स्वार्थीपणा, निष्काळजीपणा व विरोध ह्‍या गोष्टींना तोंड दिल्याने निराशा दर्शविते. एका मनुष्याने म्हटले की: “जेव्हा तुम्ही लोकांना क्षमा करता तेव्हा ते तुमचा गैरफायदा घेतात. ते एक अपमान करण्यासारखे किंवा नालस्ती करण्यासारखे आहे.”

हे आश्‍चर्याचे नाही की, ह्‍या शेवटच्या काळामध्ये क्षमाशीलतेची प्रवृत्ती विकसित करणे अवघड आहे. तरी देखील, पवित्र शास्त्र दयाळुपणाने क्षमा करण्यास आम्हाला उत्तेजन देते. (पडताळा २ करिंथकर २:७.) आम्ही क्षमाशील का असावे?

[तळटीपा]

a नावे बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा