संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार नायजेरिया
नायजेरिया आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या फुगीर वळणावर वसलेला देश आहे. गिनीच्या आखातावर वसलेला हा देश विषुववृत्ताच्या अगदी उत्तरेकडे आहे. तेथील लोकसंख्या ८ कोटी ८० लाख पेक्षा अधिक आहे.a
मागील दोन सेवा वर्षांदरम्यान, वॉचटावर संस्थेच्या नायजेरिया शाखा दप्तराने तरुणांकडे खास लक्ष दिले आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळींचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले की, १९९२ मध्ये नायजेरिया येथे सुवार्तेची घोषणा करण्यास सुरूवात केलेल्या ८० टक्क्यांतील तरुण, १० ते २० वयोगटातील होते. त्याच वर्षी बाप्तिस्मा झालेल्यांपैकी, ६३ टक्के याच वयोगटातील होते.
युवक पायनियर होण्याप्रत पोहंचत आहेत
अनेक तरुण लोक पायनियर म्हणून पूर्ण वेळेच्या सेवेत प्रवेश करत आहेत. हॅना नावाची एक पायनियर म्हणते: “मी माझे शालेय शिक्षण संपवणार होते तेव्हाच, पायनियर सेवा प्रशालेत उपस्थित राहणाऱ्यांना भेट दिली. तेथे मी दोन वृद्ध भगिणींना भेटले. मी स्वतःशी विचार केला, ‘ह्या दोघी पायनियरींग करू शकतात तर मी का नाही?’
“यास्तव, शालेय शिक्षण संपल्यावर मी एक पायनियर झाले. तीन महिन्यांनंतर मी २६ वर्षांच्या जोसेफाईनला भेटले. ती एक जूजू उपासक होती. ती म्हणाली: ‘तुम्ही यहोवाचे साक्षीदार, वाईट लोक आहात. तुम्ही नाताळ पाळत नाही किंवा ताईतही वापरत नाही.’ मी तिला उत्तर दिले की, जर तिने मला तिच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करू दिला तर आम्ही या गोष्टींमध्ये भाग का घेत नाही हे तिला कळून येईल. तिने मला पुन्हा बोलावले. लगेचच ती सभांना उपस्थित राहू लागली व तिने तिच्या जीवनात पुष्कळ परिवर्तन केले. डिसेंबर १९९० मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला. ऑगस्ट १९९१ पासून जोसेफाईन एक पायनियर आहे. मागच्या वर्षी ती पायनियर सेवा प्रशालेत उपस्थित राहिली, तेव्हा तिने तिच्या वर्गसोबत्यांना माझी ओळख तिची आध्यात्मिक आई अशी करून दिली!”
व्हिडिओ व राज्य सभागृह
संस्थेच्या एका व्हिडिओ फिल्मने, एका लहानशा मंडळीला राज्य सभागृहासाठी जागा मिळवून देण्यास मदत केली. जागा मिळण्याच्या शोधात असताना, चार बांधव त्या क्षेत्रातील परंपरागत पुढारी ओनोजी, याला भेटले. त्याने त्यांना २०,००० नायरा (१,०२५, यु.एस. डॉलर्स) किंमतीची जागा दाखवली. ती मंडळी इतके पैसे देऊ शकत नव्हती, कारण फक्त १७ प्रचारक त्या प्रकल्पासाठी खर्च करणार होते. ओनोज्याने म्हटले की, तो त्यांच्यासाठी एक दुसरी जागा पाहील.
काही महिन्यांनंतर, मंडळीच्या एका वडिलांनी, ओनोजीच्या घरी भेट दिली. तेव्हा तो त्याच्या घरात त्याच्या राज्याभिषेकाची कॅसेट पाहात होता. वडिलांनी त्यास म्हटले: “माझ्याकडे एक व्हिडिओ कॅसेट आहे आणि ती तुम्ही पाहावी अशी माझी इच्छा आहे. तिचे नाव जेहोवाज विटनेसेस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम असे आहे.”
नंतर, वडिलांनी त्या ओनोजीला ती कॅसेट पाहून त्याला कसे वाटले ते विचारले. “मी ती फिल्म पाच वेळा पाहिली,” असे तो ओनोजी म्हणाला. वडिलाने मग त्याला, त्याने व्हिडिओमध्ये पाहिलेल्या राज्य सभागृहांची आठवण करून दिली व म्हटले की त्यांच्या स्थानिक मंडळीला देखील अशाचप्रकारचे सभागृह बांधावयाचे आहे व मंडळीकडे जी लहानशी जागा होती तिलाच लागून असलेली काही जागा ते विकत घेऊ शकतील का असे त्याला विचारले. ओनोजीने उत्तर दिले: “काल रात्री तो व्हिडिओ पाहिल्यावर माझ्याही लक्षात हीच गोष्ट आली.” त्यानंतर लगेचच त्याने मंडळीच्या जागेजवळच्या जागेची ६ मीटरची मापणी केली. त्याने म्हटले, “ही घ्या तुमची जागा, तुम्हाला हवी तितकी तुम्ही जागा घेऊ शकता. तुम्ही कागदपत्रे तयार करा आणि मी त्यावर माझी सही देईन.”
[तळटीपा]
a अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांची १९९४ दिनदर्शिका पहा.
[९ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र १९९३ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: १,७४,५८२
प्रमाण: ५०७ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: ४,७३,२४५
पायनियर प्रचारकांची सरासरी: १९,७७७
पवित्र शास्त्राभ्यासांची सरासरी: २,४२,०२८
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ८,८८८
मंडळ्यांची संख्या: ३,२८९
शाखा दप्तर: बेनिन शहर, इडो प्रांत