वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. ३२
  • “मी आश्‍चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी आश्‍चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. ३२

“मी आश्‍चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे”

“मी कोठून आलो?” बहुतेक तरुण मुले हा प्रश्‍न कधी तरी विचारतातच. मुले मोठी होतात तेव्हा त्यांचा प्रश्‍न अधिकच गहन होतो: “जीवन कोठून आले?” या प्रश्‍नाची चर्चा हजारो वर्षांपासून करण्यात आली आहे आणि सध्या अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे की उत्क्रांती हे, जीवनाच्या उगमाच्या कोड्याचे सर्वात योग्य उत्तर आहे. मूलतः, जीवन योगायोगाने आले आहे असे उत्क्रांतीवाद्यांचे मत आहे.

“मी भयपूर्ण आणि आश्‍चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे,” असे दाविद राजाने ३,००० वर्षांच्या आधी लिहिले. (स्तोत्र १३९:१४, पं. र. भाषांतर) जीवनाविषयी आम्ही जितके अधिक शिकतो तितके अधिक सत्य आम्हाला त्या शब्दात आढळते. खरेच, भौतिकशास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांनी लिहिले: “जीवनाच्या भयजनक जटिलतेचे जितके अधिक संशोधन जीवरसायनशास्त्रज्ञ करतात, तितकेच हे स्पष्ट होते की जीवनाची सुरवात अपघाताने होण्याचे योग, इतके कमी आहेत की त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाऊ शकते. जीवन हे योगायोगाने मुळीच आले नसावे.”

तर मग जीवनाचा उगम काय आहे? या नियतकालिकाच्या सुरवातीचे दोन लेख या प्रश्‍नाची चर्चा करतात. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा