तुम्हास आठवते का?
तुम्ही टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचा काळजीपूर्वक विचार केला आहे का? असल्यास, पुढील मुद्यांची आठवण करण्यास तुम्हाला आवडेल:
▫ मानव आणि प्राण्यांमध्ये कोणता मुख्य फरक आहे?
मेंदूची घडण, क्षमता आणि त्याच्या कार्यावर प्रमुख फरक केंद्रित आहे. प्राण्यांमध्ये जवळजवळ सर्वच कार्याची रचना, ज्याला उपजत बुद्धी म्हटले आहे त्याप्रमाणे केली आहे. मानवांच्या बाबतीत तसे नाही. देवाने मानवांना इच्छा स्वातंत्र्याची शक्ती बहाल केली आहे. (नीतिसूत्रे ३०:२४-२८)—४/१५, पृष्ठ ५.
▫ इस्त्राएल लोकांच्या मंदिराच्या उपासनेत गायनाने कोणती भूमिका पार पाडली?
उपासनेमध्ये संगीत विशेषपणे गायकांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. ते खासकरून नियमशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टी बिंबवण्याकरता नव्हे तर, उपासनेसाठी योग्य उत्साह पुरवण्याकरता होते. त्याने यहोवाची उत्साही मार्गाने उपासना करण्यासाठी इस्त्राएल लोकांना मदत केली. (१ इतिहास २३:४, ५; २५:७)—५/१, पृष्ठे १०, ११.
▫ मुलांना बालपणापासून कोणत्या प्रकारच्या काळजीची आवश्यकता आहे?
पालकांना नवजात बालकाकडे निरंतर लक्ष द्यावे लागते. पौलाने लिहिले: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, जे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१५) याचाच अर्थ तीमथ्याला बाळपणापासून मिळालेले पालकीय लक्ष आध्यात्मिक प्रकारचे होते.—५/१५, पृष्ठ ११.
▫ पवित्र शास्त्रात सर्व मानवजातीसाठी देवाचा संदेश आहे हे शाबीत करणाऱ्या पुराव्याचे कोणते चार क्रम आहेत?
(१) उपलब्धता. पवित्र शास्त्र, जगातील ९८ टक्के लोकसंख्येसाठी उपलब्ध आहे. (२) ऐतिहासिकता. पवित्र शास्त्रात ऐतिहासिक वास्तविकता समाविष्ट आहेत, त्या शाबीत करता न येणाऱ्या दंतकथा नाहीत. (३) व्यवहार्यता. त्याच्या आज्ञा आणि तत्त्वांची रचना, त्यांना जडून राहणाऱ्यांना लाभ देणाऱ्या जीवनाचा मार्ग दाखवतात. (४) भविष्यवाणी. भविष्यात काय घडेल याविषयी सविस्तर माहिती देणारे ते पुस्तक आहे.—६/१, पृष्ठे ८, ९.
▫ योग्य धर्म ओळखल्यावर कोणती जबाबदारी येते?
एकदा आम्हाला योग्य प्रकारचा धर्म सापडला की, त्याभोवती आम्ही आमचे जीवन उभारले पाहिजे. तो जीवनाचा मार्ग आहे. (स्तोत्र ११९:१०५; यशया २:३)—६/१, पृष्ठ १३.
▫ पवित्र शास्त्राचा व्यक्तिगत अभ्यास इतका महत्त्वपूर्ण का आहे?
देवाच्या सर्व सेवकांना, देवाच्या वचनातील सत्याचे नवनवीन किंवा सखोल पैलू शोधून, त्यांचा आनंद आणि शक्तीचे दिवसेंदिवस नूतनीकरण करण्याची गरज आहे. अशाप्रकारे ते स्वतःला आध्यात्मिकरीत्या उत्तेजनकारक ठेवतात.—६/१५, पृष्ठ ८.
▫ पवित्र शास्त्रात वापरल्यानुसार “पाप” या शब्दाचा अर्थ काय होतो?
पवित्र शास्त्रात सर्वसामान्यपणे वापरलेल्या इब्री आणि ग्रीक क्रियापदांचा अर्थ, “चुकणे,” काही तरी चुकल्याचा, किंवा एखाद्या ध्येयापर्यंत, चिन्हापर्यंत किंवा निशाणापर्यंत न पोंहचणे असे सूचित करतात. पहिले मानवी जोडपे देवाच्या गौरवाला उणे पडले, देवाच्या प्रतिरूपात बनवल्याचा उद्देश त्यांनी चुकवला. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांनी पाप केले. (उत्पत्ती २:१७; ३:६)—६/१५, पृष्ठ १२.
▫ धर्मत्यागी साहित्य वाचणे मूर्खपणाचे का ठरेल?
काही धर्मत्यागी साहित्य, खोटेपणाला “गोड व लाघवी भाषण” व “कपटी शब्द बोलून” सादर करतात. (रोमकर १६:१७, १८; २ पेत्र २:३, पं. र. भाषांतर) सर्व धर्मत्यागी लिखाणे केवळ टीकात्मक आणि बदनामी करणारी असतात. त्यातले काहीच उभारणीकारक नसते.—७/१, पृष्ठ १२.
▫ ग्रीस हे लोकशाहीचे उगमस्थान होते का?
प्राचीन ग्रीसमधील लोकशाही, केवळ काही शहरात होती, व त्यात फक्त पुरूष नागरिकच मतदान देत. याचा अर्थ असा झाला की लोकसंख्येचा चार पंचमांश भाग यात नव्हता. लोकप्रिय प्रभुत्व किंवा लोकशाही ही जवळजवळ नव्हतीच.—७/१, पृष्ठ १६.
▫ कशामुळे एक ख्रिस्ती विवाह उत्कर्ष पावतो?
पती आणि पत्नी विवाहासंबंधी असलेल्या देवाच्या दृष्टिकोनांचा आदर करतात, तसेच त्याच्या वचनातील तत्त्वांनुरूप राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा. (इफिसकर ५:२१-३३)—७/१५, पृष्ठ १०.
▫ तुमचा कौटुंबिक अभ्यास आनंददायक कसा होऊ शकतो?
सर्व मुलांना सहभागी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक आणि उभारणीकारक असा, मुलांनी घेतलेल्या सहभागाबद्दल त्यांची मनःपूर्वक प्रशंसा करा. केवळ साहित्याला पूर्ण करु नका तर, मुलांच्या हृदयांप्रत पोहंचण्याचा प्रयत्न करा.—७/१५, पृष्ठ १८.
▫ “‘शांति आहे, निर्भय आहे,’ असे ते म्हणतात तेव्हा” या अभिव्यक्तीचा काय अर्थ होतो? (१ थेस्सलनीकाकर ५:३)
रा “शांति आणि निर्भय” यामध्ये यश संपादन करतील असे वक्तव्य पवित्र शास्त्र करत नाही याची नोंद घ्या. परंतु, पूर्वीपेक्षा अधिक संघटीतरित्या आशावाद आणि खात्री याविषयी ते बोलतील. शांती आणि सुरक्षितता प्राप्त होणाऱ्या शक्यतेमध्ये पूर्वी कधीही झाली नव्हती एवढी वाढ झालेली दिसेल.—८/१, पृष्ठ ६.
▫ यहोवा ज्याप्रकारे समंजसपणा प्रदर्शित करतो ते तीन मार्ग सांगा.
यहोवा क्षमा करण्यास तत्पर आहे हे प्रदर्शित करतो. (स्तोत्र ८६:५) तो, नवीन परिस्थिती उद्भवतात तेव्हा, आधी ठरवून टाकलेल्या कार्यहालचालीत बदल करण्यास स्वेच्छा दाखवतो. (पहा योना, ३ रा अध्याय) तसेच, यहोवाने अधिकार चालवण्याच्या बाबतीत समंजसपणा दाखवला आहे. (१ राजे २२:१९-२२)—८/१, पृष्ठे १२-१४.