वडील आणि सेवा-सेवकांमध्ये सुसंगतता टिकवून ठेवणे
पेन्टेकॉस्ट ३३ सा. युगाच्या काही काळानंतर, नव्याने स्थापिलेल्या ख्रिस्ती मंडळीत आकस्मिक निकड उद्भवली. गरजू विधवांची काळजी घेण्यासाठी एका व्यवस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु काही काळानंतर “हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरूद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.”—प्रेषितांचे कृत्ये ६:१.
या तक्रारी प्रेषितांच्या कानी पडल्या. “तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, ‘आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरूष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.’”—प्रेषितांचे कृत्ये ६:२, ३.
हे, ख्रिस्ती मंडळीतील संस्थेविषयीच्या महत्त्वाच्या तत्वाचे उदाहरण देते. काही जबाबदार पुरूषांना नित्याच्या कामांची तर, इतर जणांना गहन आध्यात्मिक गोष्टींची काळजी घेण्यासाठी वापरले जाते. हे पूर्वदाखल्याविना नाही. प्राचीन इस्राएलमध्ये, अहरोन आणि त्याच्या वंशजाला, देवाला यज्ञार्पण करण्यासाठी याजक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु, यहोवाने असे निदर्शिले की लेव्यांनी ‘दर्शनमंडपातील सर्व सामान ताब्यात घेऊन’ त्यांना मदत करावी. (गणना ३:५-१०) त्याचप्रकारे, आजही पर्यवेक्षकांना सेवा-सेवकांची मदत मिळते.
वडील आणि सेवा-सेवकांची भूमिका
शास्त्रवचने, वडील आणि सेवा-सेवकांसाठी उच्च योग्यतांची रूपरेषा देतात. (१ तीमथ्य ३:१-१०, १२, १३; तीत १:६-९) ते स्पर्धक नव्हेत तर एकाच ध्येयासाठी काम करतात—मंडळीची उभारणी. (पडताळा इफिसकर ४:११-१३.) तरीसुद्धा, मंडळीत ते जे काम करतात त्यामध्ये काही फरक जरूर आहे. १ पेत्र ५:२, येथे पर्यवेक्षकांना सांगितले आहे की: “तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा.” हा पवित्र भरवसा ते कशारीतीने पूर्ण करतात त्याबद्दल त्यांना देवाला हिशोब द्यावयाचा आहे.—इब्रीकर १३:१७.
सेवा-सेवकांबद्दल काय? त्यांना शिकवण्यात तरबेज असले पाहिजे अशी मागणी शास्त्रवचने त्यांच्याकडून करत नाहीत. त्यांचे कार्य वडिलांच्या कार्यापासून काहीसे वेगळे आहे. सा. युगाच्या पहिल्या शतकात, लक्ष देण्याजोगा भौतिक, नित्याच्या किंवा तांत्रिक गोष्टी असतील यात काही शंका नाही. यामध्ये कदाचित शास्त्रवचनांची नक्कल करण्यासाठी लागणारे साहित्य विकत घेणे किंवा नक्कल करणे यासारख्या गोष्टी देखील असू शकतात.
आज, सेवा-सेवक मंडळीतील विविध नेमून दिलेली महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण करतात. जसे की, मंडळीचा जमाखर्च आणि क्षेत्राचा सांभाळ करणे, नियतकालिके आणि पुस्तकांचे वाटप करणे, शिवाय राज्य सभागृहाची निगा राखणे. ज्यांची योग्यता आहे अशा सेवा-सेवकांना शिकवण्यासाठी वापरण्यात येते, काही वेळा मंडळीचा पुस्तक अभ्यास चालवण्यासाठी, सेवा सभेतील भाग हाताळण्यासाठी आणि जाहीर भाषण देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो.
जेव्हा वडील आणि सेवा-सेवक सुसंगतीत एकत्र मिळून काम करतात तेव्हा, मंडळीच्या आध्यात्मिक आणि संघटनात्मक गरजा समतोलपणे सांभाळल्या जातात. तेव्हा मंडळीचे सदस्य आनंदी, दृढ आणि आध्यात्मिकरीत्या फलदायी बनतात. पौलाने इफिसमधील अभिषिक्तांना काय लिहिले याची आठवण करा: “त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.”—इफिसकर ४:१६.
वडील आणि सेवा-सेवकांना संमती, एकमत, सहकार्य आणि ऐक्यता याप्रकारची सुसंगतता, निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. परंतु, अशी सुसंगतता आपोआप येत नाही. तिला वाढवले पाहिजे आणि काळजीपूर्वकतेने सांभाळले पाहिजे.
वडीलजन काय करू शकतात
वडील आणि सेवा-सेवकांमधील नातेसंबंध, एखादा धनी आणि नोकर, किंवा मालक आणि कामगार यांच्याप्रमाणे नाही हे ओळखून घेणे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. यथार्थ सुसंगतता जेथे आहे तेथे, वडीलजन सेवा-सेवकांकडे देवाचे सहसेवक या नात्याने पाहतील. (पडताळा १ करिंथकर ३:६-९.) रोमकर १२:१० म्हणते, ‘एकमेकांना आदर दाखवण्यात पुढाकार घ्या.’ यास्तव, वडीलजन सेवा-सेवकांना, कमीपणा आणणारी किंवा मानहानी करणारी वागणूक टाळतात. ते हितकारक पुढाकाराला चुरघळून टाकण्याऐवजी उत्तेजन देतात. सेवा-सेवकांना आदराने वागवल्याने, स्वतःमध्ये सर्वात उत्तम गुण विकसित करण्याकडे त्यांचा कल होतो व मंडळीतील त्यांचे काम आनंदाने करण्यास मदत होते.
वडिलांनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे की, त्यांना ज्या देवाच्या कळपाचे पालन करावयाचे आहे त्यामध्ये सेवा-सेवक म्हणून काम करणारे बांधव देखील आहेत. हे खरे की अशा जबाबदार पुरूषांनी म्हणजेच, सेवा-सेवकांनी प्रौढ ख्रिस्ती असण्याची अपेक्षा केली जाते. तरीदेखील, कळपातील इतरांप्रमाणे, त्यांनाही वेळोवेळी व्यक्तिगत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वडिलांनी त्यांच्या आध्यात्मिक वाढीत उत्सुकतेने आस्था घेतली पाहिजे.
उदाहरणार्थ, प्रेषित पौल जेव्हा तरुण तीमथ्याला भेटला, तेव्हा त्याने लगेचच तीमथ्याची संभवता ग्रहण केली व ‘त्याने आपल्याबरोबर यावे अशी इच्छा व्यक्त केली.’ (प्रेषितांची कृत्ये १६:३) तीमथ्याने पौलाचा प्रवासी सोबती म्हणून कार्य केले; परिणामी, अमूल्य प्रशिक्षण प्राप्त केले. होय, त्यामुळेच तर पौल काही वर्षांनी करिंथमधील ख्रिस्ती लोकांना लिहू शकला की: “ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांस देईल”!—१ करिंथकर ४:१७.
वडिलांनो, तुम्ही तुमच्या मंडळीतील सेवा-सेवकातील पूर्ण संभाव्यतेचा वापर करण्यास सुरवात केली आहे का? तुम्ही त्यांना प्रगती करण्यासाठी जाहीरपणे बोलण्याचे व पवित्र शास्त्राचे संशोधन करण्याचे व्यक्तिगत प्रशिक्षण देत आहात का? तुम्ही कधी मेंढपाळकत्वाच्या भेटीला जाताना योग्यता असणाऱ्यांना तुमच्यासोबत येण्यासाठी आमंत्रण दिले आहे का? तुम्ही क्षेत्रकार्या दरम्यान त्यांच्यासोबत काम करता का? येशूच्या नाण्यांच्या दाखल्यात, त्या धन्याने त्याच्या विश्वासू सेवकांना: “शाबास भल्या व विश्वासू दासा!” अशी शाबासकी दिली. (मत्तय २५:२३) तुम्ही देखील याचप्रमाणे, जे सेवा-सेवक त्यांची नेमणूक सभ्यपणे व उत्तम मार्गाने पार पाडतात अशांची स्तुती व प्रशंसा उदारपणे करता का? (पडताळा नीतिसूत्रे ३:२७) जर नाही तर, त्यांच्या कामाची गुणग्राहकता केली जात नाही असे त्यांना वाटणार नाही का?
त्याचप्रकारे, सुसंगत कार्यकारी नातेसंबंधासाठी दळणवळण महत्त्वपूर्ण आहे. (पडताळा नीतिसूत्रे १५:२२.) कामाची नेमणूक देणे वा ती काढून घेणे लहरीप्रमाणे किंवा अचानकपणे करू नये. वडिलांनी, एखाद्या बांधवाच्या क्षमता उत्तमप्रकारे मंडळीत कशा उपयोगात आणता येतील याची प्रार्थनापूर्वक चर्चा करावी. (पडताळा मत्तय २५:१५.) एखाद्या बांधवाची जेव्हा नेमणूक केली जाते तेव्हा त्याच्याकडून नक्की कशाची अपेक्षा केली जाते याचे पूर्णपणे शिक्षण दिले जावे. नीतिसूत्रे ११:१४ ताकीद देते, “जेथे शहाणपणाची मसलत नसते तेथे लोक पडतात.”—पं. र. भाषांतर.
कोणा एका बांधवाला जमाखर्च, नियतकालिके किंवा साहित्यांचा कारभार जो बांधव सांभाळत आहे त्याच्याकडून घ्या, असे नुसते सांगणे बरोबर नाही. कधीकधी नव्याने नेमणूक मिळालेल्या सेवकांठायी, अहवालाच्या नोंदी करताना चूका करण्याची वा अपूर्ण लिहिण्याची सवय असते. किती हे नाउमेद करणारे! १ करिंथकर १४:४० दर्शविते त्यानुसार, “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” वडिलांनी बांधवांना प्रशिक्षण देण्यास पुढाकार घेतला पाहिजे. मंडळीच्या व्यवस्थांशी परिचित केले पाहिजे आणि त्यानुसार चालणारे म्हणून स्वतः एक उदाहरण असले पाहिजे. उदाहरणार्थ, वडिलांनी मंडळीच्या जमाखर्च अहवालाची हिशेब-तपासणी प्रत्येक तीन महिन्यांनी करण्याची व्यवस्था करावी. अशा महत्त्वपूर्ण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने समस्या उद्भवू शकतात व सेवा-सेवकांना संघटनेच्या सूचनांबद्दल जो आदर असतो तो दुर्बळ होऊ शकतो.
परंतु जर का एक बांधव एक विशिष्ट नेमणूक हाताळण्यात दुर्लक्ष करीत असेल तर काय? त्याला त्याच्या नेमणूकीतून तडकाफडकी काढून टाकण्याऐवजी, वडिलांनी त्याच्यासोबत बोलणी करावी. प्रशिक्षणाची उणीव हीच कदाचित त्याच्यासोबत समस्या असेल. जर त्या बांधवाला त्याची नेमणूक हाताळण्यात समस्या येतच असतील, तर तो कदाचित दुसरी नेमणूक योग्यप्रकारे पार पाडू शकेल.
वडीलजन नम्रता प्रदर्शित करून देखील सुसंगतता वाढवू शकतात. फिलिप्पैकर २:३ ख्रिस्ती जनांना, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना,” असे उत्तेजन देते. एखाद्या सेवकाने सभागृहात एखाद्या विशिष्ट जागेवर बसण्यास सांगितले तर वडिलांनी त्याला सहकार्य देण्याचा प्रयत्न करावा. ते एक वडील असल्यामुळे त्यांना आज्ञा पाळण्याची काही गरज नाही असा वाद घालता कामा नये. तो सेवक कदाचित, सभागृहाच्या विविध भागात बसण्याच्या ज्या सूचना आहेत त्या अनुसरत असेल. परंतु त्याने हे लक्षात ठेवावे की, सर्वांनी तसे केलेच पाहिजे असा कोणताही नियम नाही.a एखादे वडील, एखाद्या विशिष्ट सेवा-सेवकाला नेमून दिलेल्या नेमणूकीबद्दल अनावश्यकपणे प्रतिकूल निर्णय देण्याचे टाळतील.
सुसंगततेसाठी झटणारे सेवा-सेवक
‘तसेच सेवा-सेवकांनी गंभीर असावे,’ अशी नोंद प्रेषित पौल करतो. (१ तीमथ्य ३:८) त्यांनी नेमणूकीकडे गंभीर दृष्टीने—त्यांच्या पवित्र सेवेचा एक भाग या नात्याने—पाहिल्यामुळे ताण वाढणे टळते. तुम्ही एक सेवा-सेवक आहात, तर तुम्ही तुमची नेमणूक आवेशाने पार पाडता का? (रोमकर १२:७, ८) तुमचे कर्तव्य हाताळण्यात कुशल होण्यासाठी तुम्ही स्वतः परिश्रमपूर्वकतेने व्यवहारात आणता का? तुम्ही विश्वसनीय व भरवसापात्र आहात का? नेमणूकीविषयी तुम्ही स्वखुशीचा आत्मा दाखवता का? आफ्रिका प्रदेशातील एक सेवा-सेवक मंडळीत तीन विविध नेमणूका हाताळतो. त्याची मनोवृत्ती? तो म्हणतो, “तुम्हाला अधिक श्रम करावे लागते आणि अधिक श्रम केल्याने तुम्ही मरत नाही.” निश्चितच, जे स्वतःला वाहून घेतात ते सर्वात अधिक आनंदाचा उपभोग घेतात.—प्रे. कृत्ये २०:३५.
वडिलांना पूर्णपणे सहकार्य देऊन तुम्ही देखील सुसंगतता वाढवू शकता. इब्रीकर १३:१७ म्हणते, “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशोब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करीतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” हे खरे की, वडीलजन अपूर्ण मानव आहेत आणि त्यांच्या चुका शोधणे अतिशय सोपे असेल. तरीही टीकारूप दृष्टिकोन अविश्वास उत्पन्न करतो. तो तुमचा आनंद नष्ट करू शकतो शिवाय मंडळीतील इतरांवर विपरीत परिणाम करू शकतो. यास्तव प्रेषित पेत्राने असा सल्ला दिला की: “तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; . . . देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे.”—१ पेत्र ५:५, ६.
अशा प्रकारचा सल्ला विशेषकरून, तेव्हा अनुलक्षून आहे जेव्हा, कोणत्याही सेवेच्या सुहक्कासाठी तुमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे तुम्हाला वाटते. तुम्ही कदाचित ‘अध्यक्षाचे काम करण्याच्या पात्रतेचे’ बनला आहात, परंतु तुमची नेमणूक झालेली नाही. (१ तीमथ्य ३:१) मनाची लीनता, तुम्हाला ‘थांबून राहण्याची मनोवृत्ती’ टिकवून ठेवण्यास मदत करील. (विलापगीत ३:२४, NW) वडिलांविरूद्ध संताप दाखवण्याऐवजी—जे तुमच्या चांगल्या नातेसंबंधाला धुळीस मिळवू शकते—तुम्हाला कोठे सुधारणा करावयाच्या आहेत ते त्यांना विचारू शकता. सल्ला स्वीकारण्याच्या व लागू करण्याच्या तुमच्या प्रामाणिक स्वेच्छेवरून निःसंशये तुमच्या आध्यात्मिक वाढीचा पुरावा दिसून येईल.
ईश्वरी नम्रता आणि सभ्यता एखाद्या सेवा-सेवकाला, त्याच्या अपवादात्मक क्षमता किंवा त्याची शैक्षणिक व सामाजिक उपयुक्तता समतोल राखण्यास मदत करू शकेल. त्याला, वडिलांपेक्षा वरचढ असल्यासारखे दाखवणे किंवा स्वतःच्या क्षमतांवर इतरांचे लक्ष आकर्षित करण्याचा मोह होऊ शकतो! नीतिसूत्रे ११:२ आम्हाला आठवण करून देते की, “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” एक सभ्य बांधव त्याच्या मर्यादांबद्दल जागृत असतो. तो वडिलांच्या पुढे जाऊन नव्हे तर मागे राहून व त्याच्या क्षमतांचा उपयोग वडिलांना आधार देण्यासाठी करू इच्छितो. जगिक मार्गाने त्याला कितीही ज्ञान असले तरी, वडिलांनी ज्या गुणात श्रेष्ठ असले पाहिजे; ते आध्यात्मिक ज्ञान आणि समज या महत्त्वाच्या क्षेत्रात त्याला ज्ञानाची उणीव आहे हे ओळखण्यास सभ्यता मदत करील.—१ करिंथकर १:२६–२:१३; फिलिप्पैकर १:९.
स्पष्टतः, वडील आणि सेवा-सेवक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. मंडळीची उभारणी करण्याकरता ते पुष्कळ गोष्टी एकत्र करू शकतात. परंतु असे करण्यासाठी, त्यांनी ‘पूर्ण नम्रता, सौम्यता, व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून एकत्र काम करून आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटून’ सुसंगतीत एकजुटीने काम केले पाहिजे.—इफिसकर ४:२, ३.
[तळटीपा]
a ऑगस्ट १५, १९९२ चे द वॉचटावर, पृष्ठ १२ पहा.
[२७ पानांवरील चित्रं]
वडीलजन सेवा-सेवकांना, त्यांच्या हाताखाली काम करणारे म्हणून नव्हे तर देवाचे सहसेवक असे लेखतात