वाचकांचे प्रश्न
येशू इशाय व दावीद या दोघांच्या वंशातून आलेला असला, तरी त्याला इशाय व दावीद या पूर्वजांचा “धुमारा” [मूळ] का म्हटले आहे?
तुम्ही एखाद्या झाडाचा किंवा रोपट्याचा बुंधा किंवा फांद्या येण्यापूर्वी फुटणाऱ्या धुमाऱ्याचा (मूळ), सामान्यपणे विचार कराल. यास्तव, इशाय (किंवा त्याचा पुत्र दावीद) यांना मूळ असे म्हटले आहे जेथून येशू येईल हे दिसते. तरीही, यशया ११:१० असे भाकीत करते की, येणारा मशीहा ‘इशायाचा धुमारा’ होईल. त्याचप्रमाणे रोमकर १५:१२ ने ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताला लागू केली. नंतर प्रकटीकरण ५:५ त्याला “यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर” संबोधते. ह्या हुद्यांकरता काही कारणे आहेत.
पवित्र शास्त्र अनेकदा एखाद्या रोपट्याचा, जसे की, झाडाचा उदाहरणादाखल उपयोग करते. कधीकधी हे उदाहरण बीजाला अंकुर फुटतो व ते उगवते, मुख्य शाखा, व इतर फांद्या, किंवा फळे येण्याआधीच त्यांना आधार देण्यासाठी मूळांची वाढ होते या वस्तुस्थितीवर आधारलेले असते. उदाहरणार्थ, यशया ३७:३१ असे वाचावयास मिळते: “यहूदाच्या घराण्यांतील निभावलेला अवशेष पुनः खाली मूळ धरील व वर फळ देईल.”—ईयोब १४:८, ९; यशया १४:२९.
मूळाला काही हानी झाल्यास, संपूर्ण झाडाला त्याचा परिणाम जाणवतो. (पडताळा मत्तय ३:१०; १३:६.) त्यामुळे मलाखीने लिहिले: “तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर [यहोवा, NW] म्हणतो.” (मलाखी ४:१) याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे—संपूर्णपणे नष्ट करणे. पालकांना (मूळांना) त्याचप्रमाणे त्यांच्या संततीला (शाखांना) काढून टाकण्यात येईल.a ही गोष्ट, लहान मुलांविषयी असलेल्या पालकांच्या जबाबदारीला स्पष्ट करते; लहान मुलांचे चिरकालिक भवितव्य हे त्यांच्या पालकांची देवासमोर असलेली भूमिका, यावरून ठरविले जाते.—१ करिंथकर ७:१४.
यशया ३७:३१ व मलाखी ४:१ मधील भाषाशैली, शाखांना (व उपशाखांवरील फळांना), मूळाकडून जीवन मिळते या वस्तुस्थितीला सामोरी आणते. ही गुरूकिल्ली, येशू कशाप्रकारे ‘इशायाचा धुमारा’ व “दाविदाचा अंकुर” आहे त्या गोष्टीला समजावते.
इशाय व दावीद दैहिकरित्या येशूचे पूर्वज होते; ते मूळे होते, व येशू फांदी किंवा प्रमुख शाखा होता. येणाऱ्या मशीहाबद्दल यशया ११:१ मध्ये म्हटले होते: “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल.” त्याचप्रमाणे, प्रकटीकरण २२:१६ मध्ये येशू स्वतःला ‘दाविदाचे संतान’ असे म्हणतो. पण “दाविदाचा अंकुर” असे देखील संबोधतो. का बरे?
येशूद्वारे इशाय व दाविदाच्या वंशावळीचा क्रम कायम राहत असल्यामुळे तो त्यांचा “धुमारा” [मूळ] आहे. आज कोणीही मानव, तो लेवी, दान किंवा यहुदाच्या गोत्राचा असल्याचे शाबीत करु शकत नाही. परंतु, येशू आता स्वर्गात जिवंत असल्यामुळे इशाय व दाविदाचा वंश अजूनही असल्याची खातरी आपल्याला आहे.—मत्तय १:१-१६; रोमकर ६:९.
येशूला स्वर्गीय राजा हा अधिकार देखील मिळाला. (लूक १:३२, ३३; १९:१२, १५; १ करिंथकर १५:२५) यामुळे पूर्वजांबरोबरचा त्याचा नातेसंबंध देखील प्रसंगोचित आहे. भविष्यसूचकपणे, दाविदाने येशूला त्याचा प्रभू म्हटले.—स्तोत्र ११०:१; प्रेषितांची कृत्ये २:३४-३६.
शेवटी, येशूला न्यायाधीश म्हणून अधिकार देण्यात आला. येणाऱ्या हजार वर्षांत, येशूच्या खंडणीचा फायदा इशाय व दावीद यांना देखील होईल. मग, पृथ्वीवरील त्यांचे जीवन येशूवर अवलंबून असेल व तो त्यांचा “सनातन पिता” असेल.—यशया ९:६.
परिणामस्वरुपात, येशू इशाय व दाविदाच्या घराण्यातून आला असला तरी, तो सध्या ज्या पदावर आला आहे व अद्यापि काय करणार आहे त्यामुळे ‘इशायचा धुमारा’ व “दाविदाचा अंकुर” म्हणवून घेण्यास लायक होतो.
[तळटीपा]
a अशाप्रकारच्या भाषाशैलीचा वापर प्राचीन सुरफुनीकी थडग्यावरील कोरीव अक्षरात केला होता. जो कोणी ते थडगे उघडील त्याच्या बाबतीत असे म्हटले होते: “त्यांना खाली मूळे असू नयेत किंवा वर फळे लागू नयेत!”—वेटस टेस्टामेंटम, एप्रिल १९६१.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.