वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ८/१५ पृ. ५-७
  • सुवार्तेसाठी डोळे उघडणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्तेसाठी डोळे उघडणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक अंधत्वावर मात करणे
  • केवळ एकमात्र कायमचा उपाय—देवाचे राज्य
  • देवाच्या नव्या जगातील आनंद
  • अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • अंधांसाठी कोणती आशा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • परुशांचा मूढ विश्‍वास
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ८/१५ पृ. ५-७

सुवार्तेसाठी डोळे उघडणे

“अंधळ्याला पाहता येत नाही म्हणून आकाशाचा निळा रंग कमी होत नाही,” अशी एक डॅनिश म्हण आहे. परंतु, आमच्या व्यस्त दैनंदिन जीवनात, आकाश निळे आहे याकडे आमचे लक्ष असते का? आम्ही भवितव्याकडे आत्मविश्‍वासाने पाहतो का? देवाचे वचन, पवित्र शास्त्र जी सुवार्ता सादर करते त्यावर आम्ही वास्तविकपणे विश्‍वास ठेवतो का?

मागील लेखात, आपण वास्तविक अंधत्वाचे पैलू पाहिले. आता आपण, त्याही पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असलेल्या एक प्रकारच्या दृष्टीचे परीक्षण करू या. त्यामध्ये आमचा चिरकाल आनंद तसेच आमच्या प्रियजनांचे भवितव्य गोवलेले आहे.

निःसंशये, आम्ही ‘कठीण दिवसांचा’ सामना करीत आहोत. (२ तीमथ्य ३:१) लोक जेव्हा उपजीविकेसाठी झटतात, आरोग्याच्या व कौटुंबिक समस्या सहन करतात तसेच सामाजिक अन्याय व प्रीतीच्या अभावाविरूद्ध सामना करतात तेव्हा काय होते? दुःखाची गोष्ट अशी की, सहमानव, धर्म आणि सरकारावरचा त्यांचा विश्‍वास क्षीण होत चालला आहे असे अनेकांना आढळून आले आहे. यावर काहीच उपाय नाही असे पाहिल्यावर, काही जण या निष्कर्षाप्रत येतात की त्यांच्या समस्या सामान्य मार्गाने सोडविता येणार नाहीत. जॉरनल डा टारडे या ब्राझिलियन वृत्तपत्रात, जेकब पिनयेरू गोल्डबर्ग असे निरीक्षण करतात: “कठोर वास्तविकतेत असताना, लोक, चुकांबद्दल इतके संतप्त होतात की, तर्कशुद्ध युक्‍तीवाद करीत नाहीत, आणि ते विफल गूढवादावर विसंबून राहतात.” परंतु, जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा आम्ही योग्य आणि समंजस विचारशक्‍तीचा उपयोग केला पाहिजे, हो ना?

क्षणभर जरा कल्पना करा की, तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला एक घर हवे आहे, आणि त्यासाठी किती पैसे लागतील याची तुम्हाला चिंता नाही. कदाचित तुम्ही आजूबाजूला आणि विविध परिसरांमध्ये जाऊन पुष्कळ घरे पाहता. स्थावर संपदेचे विक्रेते तुमच्या आवडीनिवडी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी, तुमच्या मनासारखे घर तुम्हाला मिळालेले नाही. यामध्ये तुमच्या कुटुंबाचे समाधान आणि क्षेमकुशल गोवल्यामुळे तुम्ही हार पत्करता का? आता सरतेशेवटी, तुम्हाला तुमच्या स्वप्नासारखे घर मिळाल्यावर तुम्हाला जो आनंद होतो त्याची जरा कल्पना करा.

तुम्ही जसे एक नवे घर शोधण्यासाठी वेळ खर्च करता त्याचप्रकारे तुमच्या समस्यांचा उपाय शोधण्यासाठी पवित्र शास्त्राचे परीक्षण का करीत नाही? घर घेण्यासंबंधी आम्हाला वास्तविकतांचा जसा बारकाईने विचार करावा लागतो, त्याचप्रमाणे देवाच्या वचनात आम्ही जे काही वाचतो त्यावर योग्य तर्क करण्याची गरज आहे. शिवाय एक नवे घर शोधण्यापेक्षा, यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताबद्दलच्या सत्याचे परीक्षण करून त्याचा स्वीकार करणे हे अधिक फायदेकारक आहे. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

परंतु जर पवित्र शास्त्राचा संदेश इतका मौल्यवान आहे, तर त्यातील सुवार्तेबद्दल इतके लोक कसे अंध राहिले बरे? त्याचे एक कारण आहे व ते अनेकांना आश्‍चर्यचकीत करील की, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) परिणामी, दियाबल सैतानाने “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत असलो तरी, डोळ्यांत शिरणाऱ्‍या प्रकाशाचे विश्‍लेषण आम्हाला आमचा मेंदू देतो. यास्तव, अंध असण्याची व्याख्या, “समजून वा निर्णय घेता न येणारा किंवा अनिच्छुक” अशीही केली जाते. यावरून एका प्रचलित म्हणीची आठवण होते जी म्हणते: “ज्यांना पाहण्याची इच्छाच नाही त्यांच्यासारखा दुसरा अंध नाही.”

एखाद्या आंधळ्याला त्याच्यापुढे काय आहे हे पाहता येत नसल्यामुळे त्याला इजा होण्याचा धोका असतो. अनेकांच्या शारीरिक अंधत्वाला आता बदलता येत नाही, परंतु कोणीही आध्यात्मिक अंधळेपणात राहण्याच्या बंधनात नाही.

आध्यात्मिक अंधत्वावर मात करणे

गलिच्छ परिसर ज्याप्रमाणे नेत्रांना दुर्बल करू शकतो; त्याप्रमाणे अवनत वातावरण नैतिक अंधत्वाला हातभार लावू शकते. शिवाय, येशू ख्रिस्ताने मनुष्य निर्मित शिकवणी आणि परंपरा यांच्याविरूद्ध ताकीद दिली. त्याने हे स्पष्ट केले की, तेव्हाचे धार्मिक पुढारी त्यांच्या कळपाची दिशाभूल करत होते: “ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”—मत्तय १५:१४.

अंधळ्या नेत्यांपासून स्वतःची फसवणूक करून घेण्याऐवजी, देवाच्या राज्याविषयीच्या सुवार्तेला पाहण्यासाठी स्वतःचे डोळे उघडणारे किती धन्य आहेत! येशू म्हटले: “मी न्यायनिवाड्यासाठी ह्‍या जगात आलो आहे; ह्‍यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे.” (योहान ९:३९) परंतु, आध्यात्मिकरीत्या अंधळे असणारे कसे पाहू शकतील? त्यासाठी आपण शारीरिक अंधत्वाची आमची उजळणी पुढे चालू ठेवू या.

दृष्टीमांद्य असलेल्यांसाठी आता विविध सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी तसे नव्हते. अंधांना मदत देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नव्हते. परंतु १७८४ मध्ये वालेन्टीन आऊये यांनी अंधांसाठी एक शाळा काढली. त्यानंतर लुईस ब्रेल यांनी, दृष्टीमांद्य असलेल्यांना वाचण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांच्याच नावाची ब्रेल लिपी तयार केली.

आध्यात्मिक अंध असलेल्यांबद्दल काय? अलिकडच्या काळात पृथ्वीच्या सर्वात दूरच्या भागात सुवार्ता घोषित करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले गेले. (मत्तय २४:१४) यहोवाचे साक्षीदार लाक्षणिक तसेच शारीरिकरीत्या अंध असलेल्या दोहोंकडे आशा नेण्यास उत्सुक आहेत.

ब्राझिलच्या एका विवाहीत स्त्रीने लिहिले: “मला हे सांगावेसे वाटते की, मला शारीरिक व्यंगत्व असले तरी मी आध्यात्मिकरीत्या पाहू शकते. किती आश्‍चर्यकारक देव! आम्हाला हे जाणून आनंद झाला आहे की, ‘यहोवा आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्राची इच्छा पुरी’ करील.” (स्तोत्र १४५:१६) तसेच झॉर्झ, जो शारीरिकरीत्या अंध आहे, आठवून सांगतो: “माझ्या जीवनाचे सहजरीत्या दोन भागत विभाजन केले जाऊ शकतात: साक्षीदार येण्यापूर्वी आणि ते आल्यानंतर. . . . साक्षीदारांद्वारे मी मानसिकरीत्या जगाला स्पष्ट आणि उजळपणे पाहू लागलो. मला मंडळीतील सर्वांबरोबर उत्तम संपर्क साधता येतो म्हणून आनंद वाटतो.” ते आल्हाददायक आहे त्याप्रमाणे, पवित्र शास्त्र आम्हाला याची हमी देते की, लवकरच पृथ्वीवर कोणीही अंध असणार नाही—मग ते शारीरिक असो की आध्यात्मिक. ते कसे शक्य होईल? संपूर्ण भूतलावर “परमेश्‍वर [यहोवा, NW] अंधळ्यांना दृष्टी देतो” हे कसे सिद्ध होईल?—स्तोत्र १४६:८.

केवळ एकमात्र कायमचा उपाय—देवाचे राज्य

वैद्यकीय ज्ञानात नैपुण्य मिळालेले असले तरी, अनेक रोग अंधत्व, वेदना आणि मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. तर मग, कुपोषण, स्वच्छतेच्या सर्वात हलक्या व्यवस्था, तसेच दृष्टी व जीवनातील आनंद हिरावून घेणारे दुःख यांचा समूळ नाश करण्यासाठी कशाची गरज आहे? येशूचे अंधळ्यांना आणि इतरांना बरे करणे हे, भवितव्यात जे होणार आहे त्याचा तो एक लहान प्रमाणात नमुना होता. त्याची शिकवण व बरे करण्याचे कार्य यांनी, देव राज्याच्या सरकारात पृथ्वीवर जे आशीर्वाद व्याप्तरूपाने पसरविले जातील त्यांची पडछाया दाखवली हे आनंदाचे आहे.

जगव्याप्त प्रमाणावर बरे करण्याचे कार्य अतिशय जवळ आहे.a बरे करण्याच्या या ईश्‍वरी कार्यक्रमाचे सुंदर सचित्र वर्णन प्रेषित योहानाकरवी दिले आहे: “त्याने देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.”—प्रकटीकरण २२:१, २.

“जीवनाचे पाणी” व “जीवनाचे झाड” यासारखे वाक्‌प्रचार, आजच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत झाल्यावर, देवाच्या राज्याच्या उपचार सुविधा हळूहळू मानवजातीला पूर्णत्वाप्रत नेईल याचे सचित्र उदाहरण देतात. वास्तविक पाहता, येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे, (यामध्ये पापांसाठी पूर्णपणे क्षमेचा देखील समावेश आहे) तसेच येशू ख्रिस्त आणि त्याच्या पित्याचे ज्ञान, परिपूर्ण आरोग्य आणि सार्वकालिक जीवन प्रदान करील.—योहान ३:१६.

देवाच्या नव्या जगातील आनंद

हिंसा, प्रदूषण किंवा दारिद्‌य्र यातून मुक्‍त अशा तेव्हाच्या पृथ्वीचे चित्र डोळ्यासमोर आणा. तुमचे कुटुंब पुनर्स्थापित नंदनवनात शांतीने राहत असल्याची कल्पना करा. (यशया ३२:१७, १८) पूर्ण मनाने आणि ज्ञानेंद्रियांनी रंगांच्या विविधतेचे परीक्षण करणे किती आल्हाददायक असेल!

“प्रकाश, रंग आणि आकारांच्या वारंवार बदलणाऱ्‍या वातावरणात जगणे ही मानवाची नैसर्गिक परिस्थिती आहे. निसर्गामध्ये कंटाळवाणे वातावरण नाही. रंग, या जगातील नैसर्गिक सुखातील एक सुख आहे. तो निसर्गाचा सर्वत्र दिसणारा गुण आहे व आनंदविणारे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे” असे फेबर बिरेन म्हणतात.

पाहण्याची देणगी किती मौल्यवान आहे! पूर्वीचे अंध नेत्र—शारीरिक किंवा आध्यात्मिक—पुन्हा पाहू लागतील तेव्हाचा तो समय किती आनंदाचा असेल!

होय, येणाऱ्‍या पुनर्स्थापित नंदनवनात, अंधत्व आणि इतर व्यंगत्व येथून पुढे कधीही निराशेला कारणीभूत होणार नाही! कोणाचीही दिशाभूल होणार नाही. सर्वत्र खरी प्रीती असल्यामुळे, सर्व जण आध्यात्मिकरीत्या प्रज्वलित होतील. या सर्व गोष्टी नजिकच्या भवितव्यात पूर्ण होतील, परंतु आता, यहोवा देव जो, “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील,” हे त्याचे भविष्यसूचक अभिवचन पूर्ण करील त्याची स्वीकृती प्राप्त करण्याचा समय आहे!—यशया ३५:५.

[तळटीपा]

a कृपया वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने छापलेले तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकाच्या १८ व्या प्रकरणात सादर केलेल्या पुराव्याचे परीक्षण करा.

[७ पानांवरील चित्रं]

तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा