वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ८/१५ पृ. ३-४
  • अंधांसाठी कोणती आशा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंधांसाठी कोणती आशा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूच्या दिवसातील अंधांना बरे करणे
  • सुवार्तेसाठी डोळे उघडणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • जन्मांध माणासाला बरे करणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • जन्मांध माणासाला बरे करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ८/१५ पृ. ३-४

अंधांसाठी कोणती आशा?

जॉन मिल्टन यांनी, पूर्ण अंध असूनही पॅरडाईज लॉस्ट व पॅरडाईज रिगेन्ड हे महाकाव्य रचले. हेलन केलर, अंध आणि बधिर होती तरीही, तिने शारीरिक व्यंगत्व असलेल्या इतरांना मदत करण्याचे काम थांबवले नाही. होय, अनेक अंध लोक अंधत्वामुळे होणाऱ्‍या समस्यांचा सामना करून यशस्वी होत आहेत. परंतु सर्वांनाच चांगली दृष्टी असती तर किती उत्तम झाले असते! तुमची कोणी एखादी प्रिय व्यक्‍ती किंवा मित्र, अंध किंवा कमी दृष्टी असलेला असेल तर, तुम्ही विशेषकरून कदाचित याजशी सहमत असाल.

हे खरे की, काही राष्ट्रांमध्ये पुनर्वसनाचे कार्यक्रम, कमी दृष्टी असलेल्या लोकांना दैनंदिन जीवनाचे कौशल्य शिकवतात. ब्रेल लिपी आणि प्रशिक्षित मार्गदर्शक कुत्री, अंधांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात. तरी देखील, अनेक लोक अंधत्व हे सर्वात भयंकर व्यंग आहे असे समजतात. एका लेखकाने असे प्रतिपादन केले: “एक अंध व्यक्‍ती, आमच्या या इंद्रियगोचर जगातील सर्वात महत्त्वाचा भाग पाहण्याची संधी गमावते.” त्याचवेळी, अनेकांना पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहावे लागते.

तुम्ही कदाचित विचार कराल की, अंधत्व सर्वत्र का आढळते? तुम्ही कधी खुपऱ्‍या रोगाविषयी ऐकले आहे का? या रोगामुळेच जवळजवळ ९० लाख लोक अंध होतात. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका खुपऱ्‍या रोगाबद्दल म्हणतो: “हा रोग संसर्गजन्य आहे व गलिच्छ वस्तीत अधिक प्रमाणात आढळतो. धुण्यासाठी पाण्याची कमतरता, आणि मानवी विष्ठेकडे येणाऱ्‍या असंख्य माश्‍या या रोगाचा फैलाव करण्यास हातभार लावतात. काही प्रमाणात खुपऱ्‍या रोगाची ही समस्या वैद्यकीय नव्हे तर सामाजिक आहे. राहणीमानाचे दर्जे जर सुधारले, दलदलीत राहणे कमी झाले, माश्‍यांचा नाश केला व भरपूर पाणी पुरवठा असला तर खुपऱ्‍या रोगाचे प्रमाण जलदगतीने कमी होईल.” आणखी दशलक्ष लोक, ऑनकोकरसायसिस नावाच्या आजाराने पछाडलेले आहेत. किंवा झिरोफथलमियाबद्दल काय? ही नावे फार अवघड असली तरी, वास्तविकता ही आहे की हे आजार अंधत्वाची सर्वसामान्य कारणे आहेत. मधुमेह, घटसर्प, कांजण्या, लोहितांग ज्वर आणि लैंगिक संक्रमीत आजार हे देखील अंधत्वाला कारणीभूत ठरू शकतात.

आम्ही जसजसे वृद्ध होतो तसे, मॅक्यूला ल्युटीत झालेल्या बदलांमुळे होणारी मॅक्यूलर जीर्णता आणि काचबिंदू यासारख्या विकारांमुळे शिवाय ज्याला वगळता येणार नाही त्या मोतीबिंदूमुळे देखील दृष्टीमांद्य येऊ शकते. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका अशी नोंद करतो: “जगातील अनेक राष्ट्रांमध्ये, शस्त्रक्रियेद्वारे मोतीबिंदूला सहजतेने बरे केले जाऊ शकते तरीही, ते अंधत्वाला कारणीभूत ठरते.”

नेत्रवैद्यकात नवे शोध लावले असले तरी, अंधत्वाला पूर्णपणे नाहीसे करणे फारच दूर आहे. तोच विश्‍वकोश पुढे म्हणतो: “अंधत्वाला टाळण्याचे आणि वैद्यकीय तसेच शस्त्रक्रियेच्या उपचारांमध्ये जी प्रगती झाली आहे ती केवळ, वैद्यकीय सुलभता असणाऱ्‍या जनतेलाच उपयोगी पडू शकते. जोपर्यंत जगाच्या लोकसंख्येतील अधिक भागात पोषक व स्वच्छतेच्या दर्जांना सुधारले जात नाही, तोपर्यंत बरे करण्याजोग्या अंधत्वाच्या प्रमाणाची पातळी मुळीच कमी होणार नाही.”

अंधत्वाशी झुंज देण्यासाठी प्रतिजैव औषधे व शस्त्रक्रिया नेहमीच योग्य व उपयोगी आहेत. परंतु यातून कायमचेच बरे होण्याच्या आशेचा संबंध, दोन हजार वर्षांपूर्वी जे घडले त्याच्यासोबत आहे.

येशूच्या दिवसातील अंधांना बरे करणे

साधारण तिशीच्या सुरवातीत असलेला एक पुरूष धुळीच्या रस्त्यावरून जात आहे अशी कल्पना करा. तो जवळून जात आहे असे कळल्यावर, रस्त्याच्या कडेला असलेले दोन अंधळे ओरडू लागतात: “आम्हावर दया करा!” त्यांना बघणारे लोक, त्यांना शांत राहण्यास धमकावतात, तरीही ते ओरडतात: “आम्हावर दया करा!” तो पुरूष त्यांना अगदी दयाळुपणे विचारतो: ‘मी तुम्हासाठी काय करू अशी तुमची इच्छा आहे?’ ते त्याला उत्सुकतेने उत्तर देतात: “आमचे डोळे उघडावे.” आता जरा कल्पना करा: तो पुरूष त्यांच्या डोळ्यांना हात लावतो, आणि तत्काळ त्यांना दृष्टी प्राप्त होते!—मत्तय २०:२९-३४.

पूर्वी अंध असलेल्या या माणसांना किती आनंद झाला असेल! परंतु, अंधत्व तर सर्वसामान्य होते, आणि ही केवळ एक घटना होती. या घटनेने तुमचे लक्ष का वेधवावे? कारण तो नासरेथचा येशू होता ज्याने दयाळुपणे त्या अंधांना दृष्टी प्राप्त करून दिली. वास्तविक पाहता, येशूचा ‘दीनास सुवार्ता सांगण्यास अभिषेक’ करण्याव्यतिरिक्‍त, त्याला ‘अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ’ मिळावा यासाठी देखील पाठवले होते.—लूक ४:१८.

देवाच्या शक्‍तिशाली पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अशाप्रकारे चमत्कारिक बरे करणे पाहून लोक थक्क झाले. आम्ही वाचतो: “मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्त्राएलाच्या देवाचे गौरव केले.” (मत्तय १५:३१) अशा प्रकारच्या विनामूल्य बरे करण्याच्या किंवा त्याच्या क्षमतांचा दिखाऊपणा न करता किंवा स्वत:ला गौरव न आणता, येशूने यहोवा देवाची प्रीती आणि दया ठळकपणे दाखवली. परंतु, येशूला आध्यात्मिक अंधत्व किंवा ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, गांजलेल्या व पांगलेल्या’ असाहाय्य लोकांबद्दल देखील दया वाटत होती.—मत्तय ९:३६.

अशाप्रकारचा इतिहास मनोरंजक वाटत असला तरी, तुम्ही कदाचित विचार कराल, पण आजच्याबद्दल काय? येशूने लोकांना बरे केले त्याप्रमाणे आजपर्यंत कोणीच करत नाही, तर त्या बरे करण्याचा आमच्यासाठी काही अर्थ आहे का? अंधांसाठी काही आशा आहे का? कृपया पुढील लेख वाचा.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“जोपर्यंत जगाच्या लोकसंख्येतील अधिक भागात पोषक व स्वच्छतेच्या दर्जांना सुधारले जात नाही, तोपर्यंत बरे करण्याजोग्या अंधत्वाच्या प्रमाणाची पातळी मुळीच कमी होणार नाही.” —द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा