वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१५ पृ. २-३
  • अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • सुवार्तेसाठी डोळे उघडणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • अंधांसाठी कोणती आशा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • परुशांचा मूढ विश्‍वास
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ५/१५ पृ. २-३

अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा

१. येशूनं अंधांसाठी कळवळा कसा दाखवला?

१ काही दिवसांतच येशूचा मृत्यू होणार होता. यरीहो शहरातून निघत असताना दोन अंध भिकाऱ्‍यांनी त्याला मोठ्यानं हाक मारून म्हटलं: “हे प्रभो, ... आम्हावर दया करा.” पुढं येणाऱ्‍या कठीण परीक्षांच्या विचारानं त्याचं मन अस्वस्थ झालं होतं तरी तो थांबला आणि त्या माणसांना बोलवून, त्यानं त्यांना बरं केलं. (मत्त. २०:२९-३४) आपणही अंधांसाठी येशूसारखा कळवळा कसा दाखवू शकतो?

२. अंध व्यक्‍तीला साक्ष कशी देता येईल?

२ त्यांना मदत करा: काही अंधांना अजिबातच दिसत नाही तर काहींना थोड्या प्रमाणात दिसतं; त्यानुसार तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुम्हाला एखादी अंध व्यक्‍ती भेटली तर तुमची ओळख करून द्या आणि काही मदत हवी आहे का ते विचारा. अशा लोकांचा सहसा गैरफायदा घेतला जातो. पण तुम्ही त्यातले नाहीत अशी तिला खातरी दिल्यास ती निश्‍चिंत होईल. तुम्ही तिला सांगू शकता की तुम्ही शैक्षणिक कार्यात भाग घेत आहात आणि स्तोत्र १४६:८ किंवा यशया ३५:५, ६ ही शास्त्रवचनं वाचून दाखवू शकता. तिला ब्रेल लिपीत एखादं प्रकाशन वाचायला आवडेल का, असं तुम्ही विचारू शकता.a तिला jw.org वरून ऑडिओ फाईल्स मिळवायला तुम्ही मदत करू शकता. काही अंधांच्या कंप्यूटरवर स्क्रिन रिडर प्रोग्राम असतो, जो स्क्रिनवरील टेक्स्ट मोठ्यानं वाचतो. ते jw.org वरून काही छापील लेखांचा आणि रिच टेक्स्ट फॉरमॅट (RTF) मध्ये डाऊनलोड करता येणाऱ्‍या इतर प्रकाशनांचा लाभ घेऊ शकतात.—“अंध व्यक्‍तीला मदत करताना . . . ” ही चौकट पाहा.

३. आपल्या क्षेत्रात आपण अंधांना कसं शोधू शकतो?

३ अंधांना शोधून काढा: घरोघरच्या प्रचार कार्यात अंध व्यक्‍ती भेटण्याची शक्यता कमी असते कारण बरेच अंध आपल्या घरी आलेल्या अनोळख्या व्यक्‍तीशी बोलायला कचरतात. अशा लोकांना साक्ष मिळावी म्हणून त्यांना “शोधून” काढण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतील. (मत्त. १०:११) तुमच्या कामावर किंवा शाळेत कुणी अंध आहे का? त्याच्याशी बोलायला पुढाकार घ्या. तुमच्या क्षेत्रात अंधांची शाळा असल्यास तिथल्या वाचनालयात आपली काही ब्रेल लिपीतली प्रकाशनं ठेवता येतील का ते विचारा. तुम्ही अशा कुणाला ओळखता का ज्यांचा नातेवाईक अंध आहे? त्यांना समजावून सांगा की यहोवाचे साक्षीदार अंधांना ब्रेलमधील प्रकाशनं किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग्स देण्याद्वारे मदत करू इच्छितात. अंध लोकांना मदत पुरवणाऱ्‍या आणि अंध लोक राहात असलेल्या काही संस्था तुमच्या क्षेत्रात आहेत का? तिथल्या रिसेप्शनिस्टला (स्वागत कक्षातील व्यक्‍तीला) आणि व्यवस्थापकालासुद्धा तुम्ही हेच सांगू शकता. त्यांना देवाच्या वचनातून दाखवा की देव लवकरच अंधत्व कायमचं काढून टाकेल. तसंच, तुम्ही त्यांना jw.org वरील विदाऊट इट, आय वूड फील लॉस्ट हा व्हिडिओ दाखवू शकता ज्यात एका अंध व्यक्‍तीचा अनुभव दिला आहे. तिला ब्रेलमधील बायबलचा कसा फायदा झाला हे तिनं सांगितलं आहे. तुमचा उद्देश स्पष्टपणे सांगितल्यामुळं अंध व्यक्‍तींशी संपर्क साधणं सोपं जाईल.

४. जॅनेटच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?

४ जॅनेट नावाची एक अंध बहीण एकदा, अंध लोक राहत असलेल्या संस्थेत गेली. तिथं ती एका तरुणीशी बोलू लागली. जॅनेटनं तिला सांगितलं, “येशूनं अंधांना बरं करून दाखवून दिलं की भविष्यात तो अंधांना बरं करणार आहे.” त्यांनी प्रकटीकरण २१:३, ४ वर चर्चा केली आणि हे अभिवचन देवाच्या राज्यात कसं पूर्ण होईल ते जॅनेटनं तिला समजावलं. ती तरुणी थोडा वेळ शांत झाली आणि म्हणाली: “एक अंध व्यक्‍ती असा विश्‍वास करू शकते असं मला वाटलं नव्हतं. इतर लोक अंधांबद्दल असा विचार करतात की त्यांच्या स्वतःच्याच किंवा पूर्वजांच्या कर्मांमुळं ते अंध झाले आहेत.” जॅनेटनं तिला बायबल काय शिकवते या पुस्तकाची लिंक ई-मेल केली आणि आता त्या दोघी आठवड्यातून दोनदा बायबल अभ्यास करत आहेत.

५. आपल्याला येशूसारखं अंधांना बरं करता येत नसलं तरी त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवण्याद्वारे आपल्याला कोणता बहुमान मिळेल?

५ आपण येशूसारखं अंधांना बरं तर करू शकत नाही पण या युगाच्या दैवतानं ज्यांची मनं आंधळी केली आहेत त्यांना आणि जे खरोखरचे आंधळे आहेत त्यांनाही देवाच्या वचनातील सत्य शिकवू शकतो. (२ करिंथ. ४:४) यरीहोजवळ असलेल्या दोन अंधांचा येशूला “कळवळा” आल्यामुळं त्यानं त्यांना बरं केलं. (मत्त. २०:३४) आपणही अंधांबद्दल अशीच आपुलकी दाखवली तर यहोवाबद्दल, म्हणजे जो अंधत्व कायमचं बरं करेल त्या देवाबद्दल काहींना शिकवण्याचा बहुमान आपल्याला मिळू शकतो.

a ब्रेल लिपी खास अंधासाठी असलेली लिपी आहे.

अंध व्यक्‍तीला मदत करताना . . .

  • तिच्याशी थेटपणे बोला पण आपला आवाज चढवू नका. अंधांना दिसत नसलं तरी ते सहसा चांगल्या प्रकारे ऐकू शकतात.

  • तिला तुमचा हात द्या आणि तिच्यासोबत चाला. चालताना खबरदारी घ्या की ती तुमच्या पायावर पाय ठेवून अडखळणार नाही. वाटेत एखादा खांब, पायरी किंवा काही अडखळण असेल तर तिला सांगा.

  • “पाहा” आणि “बघा” असे शब्द वापरायला कचरू नका. अंधसुद्धा हे शब्द वापरतात. ते त्यांच्या इतर ज्ञानेंद्रियांनी जणू “पाहू” शकतात आणि वर्णन केलेल्या गोष्टीचं मनात चित्र उभं करू शकतात.

  • एखाद्या शांत ठिकाणी चर्चा करा. जिथं आवाज आहे अशा ठिकाणी अंधांना अस्वस्थ वाटतं कारण आजूबाजूला काय चाललंय हे त्यांना कळत नसतं.

  • तुम्ही जेव्हा तिथून निघता, तेव्हा तिला तसं सांगा. नाहीतर आपण एकटंच बडबडत होतो या विचारानं तिला वाईट वाटेल.

  • तुमच्या क्षेत्रात राहत नसलेल्या एखाद्या अंध व्यक्‍तीनं आवड दाखवली असेल तर प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म भरून मंडळीच्या सचिवांना द्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा