अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
“देवापासून नाही असा अधिकार नाही.”—रोमकर १३:१.
१. यहोवा सर्वोच्च अधिकारी आहे असे का म्हटले जाऊ शकते?
अधिकाराचा संबंध निर्माणकर्त्याच्या पदाशी आहे. सजीव व निर्जीव सर्व निर्मितीला अस्तित्वात आणणारा, परात्पर, यहोवा देव आहे. तो नाकारता न येण्याजोगा सर्वोच्च अधिकारी आहे. खरे ख्रिस्ती, स्वर्गीय प्राण्यांनी घोषित केलेल्या भावनेत सहभागी होतात: “हे प्रभो, [यहोवा, NW] आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य, ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.
२. प्राचीन काळच्या मानवी शासकांनी, त्यांच्या सहमानवांवर सत्ता गाजवणे हा स्वाभाविक हक्क नसल्याचे कसे कबूल केले, व येशूने पंतय पिलाताला काय सांगितले?
२ तथापि, प्राचीन काळातील मानवी शासनकर्त्यांपैकी अनेकांनी, स्वतः देव असल्याचा किंवा देवाचे प्रतिनिधी असण्याचा दावा करून त्यांच्या अधिकाराला कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट, कोणाही मानवाला दुसऱ्या मानवावर अधिकार चालवण्याचा वारसा हक्क नाही याची संमती देते.a (यिर्मया १०:२३) अधिकाराचा कायदेशीर स्रोत केवळ यहोवा देव आहे. येशूने यहुदीयातील रोमी राज्यपाल, पंतय पिलातास म्हटले: “आपल्याला वरुन अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता.”—योहान १९:११.
“देवापासून नाही असा अधिकार नाही”
३. प्रेषित पौलाने ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी’ काय म्हटले, आणि येशू आणि पौलाच्या वक्तव्याने कोणते प्रश्न उभे राहतात?
३ रोमी सरकाराच्या वर्चस्वाखाली राहात असलेल्या ख्रिस्ती लोकांना प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत.” (रोमकर १३:१) पिलाताला, “वरून” अधिकार मिळाला आहे असे म्हणण्याचा येशूचा काय अर्थ होता? व पौलाच्या काळातील राजकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जागेवर देवाने नेमले आहे, असा विचार त्याने का केला? त्यांच्या बोलण्याचा अर्थ, या जगातील प्रत्येक राजकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास यहोवा व्यक्तिगतपणे जबाबदार आहे असा होत होता का?
४. येशू व पौलाने सैतानाला काय म्हटले, आणि सैतानाकडील कोणत्या दाव्याला येशूने नाकारले नाही?
४ येशूने सैतानाला “ह्या जगाचा अधिकारी,” व प्रेषित पौलाने त्याला ‘ह्या युगाचे दैवत’ म्हटलेले असताना ते कसे होऊ शकते? (योहान १२:३१; १६:११; २ करिंथकर ४:४) शिवाय, येशूला मोहित करताना, सैतानाने त्याला “जगातील सर्व राज्ये” यांचा “अधिकार” देऊ केला, व हा अधिकार त्याला दिला असल्याचा दावा त्याने केला. येशूने तो देत असलेल्या गोष्टीला नाकारले, परंतु तो अधिकार सैतानाचा होता हे, त्याने नाकारले नाही.—लूक ४:५-८.
५. (अ) मानवी अधिकाराविषयी आम्ही, येशू व पौलाच्या शब्दांना कसे समजले पाहिजे? (ब) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्थान कोणत्या अर्थाने ‘सापेक्ष स्थितीत देवाने नेमलेले’ आहे?
५ यहोवाने, सैतानाला त्याच्या बंडानंतर, तसेच आदाम आणि हव्वेला फसवून यहोवाच्या सार्वभौम सत्तेविरूद्ध बंड करण्यास कारणीभूत केल्यानंतरही त्याला जगू देऊन, या जगावर शासन करण्याचे सैतानाच्या स्वाधीन केले आहे. (उत्पत्ती ३:१-६; पडताळा निर्गम ९:१५, १६.) यास्तव, येशू आणि पौलाच्या शब्दांचा अर्थ असा होत असेल की, एदेनमध्ये पहिल्या मानवी जोडप्याने ईश्वरकृत शासनाला, किंवा देवाच्या अधिपत्याला नाकारल्यानंतर, यहोवाने दुरावलेल्या मानवांना, सुव्यवस्थित समाजात राहण्याची परवानगी देण्याकरता अधिकाराची रचना करण्याची अनुमती दिली. कधीकधी, यहोवाने त्याचा उद्देश साध्य करण्यासाठी, विशिष्ट शासकांचा किंवा सरकारांचा पाडाव केला. (दानीएल २:१९-२१) इतरांना त्याने सत्तेवर राहण्यासाठी अनुमती दिली. ज्या शासकांचे अस्तित्त्व यहोवा सहन करतो त्याबद्दल असे म्हणता येते की, “जे अधिकार आहेत ते देवाकडून त्यांच्या सापेक्ष पदी आहेत.”
आरंभीचे ख्रिस्ती आणि रोमी अधिकारी
६. आरंभीच्या ख्रिश्चनांचा रोमी अधिकाऱ्यांबद्दल कसा दृष्टिकोन होता, व का?
६ आरंभीचे ख्रिस्ती, रोमी लोक ताब्यात घेत असलेल्या इस्राएलाविरूद्ध कट केलेल्या व लढलेल्या यहुदी लोकांच्या पंथांच्या सैन्यांबरोबर सामील झाले नाहीत. रोमी अधिकाऱ्यांनी जोपर्यंत, त्यांच्या तेवढ्यापुरता संग्रहित कायदेशीर पद्धतीसह, जमिनीवर तसेच समुद्रावर सुव्यवस्था राखली; नळाकरता अनेक मोठे उपयुक्त सेतुप्रणाल, रस्ते, व पूल बांधले; व त्याने सर्वसाधारणपणे सर्वांच्या हितासाठी कार्य केले, तोपर्यंत ख्रिस्ती लोकांनी त्यांना ‘त्यांच्या हितासाठी देवाचा सेवक’ म्हणून मानले. (रोमकर १३:३, ४) कायदा आणि नियमांनी अशी एक परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे ख्रिस्ती लोकांना, येशूने आज्ञापिल्याप्रमाणे, सुवार्तेचा दूर दूर प्रचार करण्यास साहाय्य केले. (मत्तय २८:१९, २०) चांगल्या विवेकासह ते, रोमी सरकारने आकारलेला कर, ज्यातील काही पैसा देवाला स्वीकृत नसलेल्या उद्देशांसाठी देखील वापरला जात असला तरी, भरू शकत होते.—रोमकर १३:५-७.
७, ८. (अ) रोमकर १३:१-७ चे काळजीपूर्वक केलेल्या वाचनाने काय प्रकट होते, व संदर्भ काय दाखवतो? (ब) कोणत्या परिस्थितीत रोमी अधिकारी “देवाचा सेवक” या प्रमाणे वागले नाहीत, ह्या बाबतीत आरंभीच्या ख्रिश्चनांनी कोणती मनोवृत्ती स्वीकारली?
७ रोमकराच्या १३ व्या अध्यायातील पहिल्या सात वचनांचे काळजीपूर्वक वाचन प्रकट करते की, “वरिष्ठ अधिकारी” चांगले करणाऱ्यांची स्तुती व वाईट करणाऱ्यांस शिक्षा देण्यासाठी “देवाचे सेवक” होते. परंतु संदर्भ दाखवतो की, चांगले आणि वाईट काय आहे हे वरिष्ठ अधिकारी नव्हे, तर देव ठरवतो. यास्तव, रोमी सम्राट किंवा इतर कोणत्याही राजकीय अधिकाऱ्याने देव मनाई किंवा अपेक्षा करत असलेल्या गोष्टींना उलटपणे मनाई केल्यास, तो देवाचा सेवक म्हणून कार्य करत नव्हता. येशूने म्हटले: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” (मत्तय २२:२१) रोमी राज्याने, उपासना, किंवा एखाद्या व्यक्तीचे जीवन यासारख्या देवाच्या मालकीच्या गोष्टी मागितल्या तर, खऱ्या ख्रिस्ती लोकांनी, प्रेषितीय सल्ल्याचे अनुकरण केले: “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९.
८ आरंभीच्या ख्रिश्चनांनी सम्राटाची उपासना, मूर्तिपूजा करणे, ख्रिस्ती सभांचा त्याग करणे, व सुवार्ता प्रचारकार्य बंद करणे याबद्दलचा नकार दाखवल्यामुळे छळ ओढवून घेतला. सम्राट निरोच्या आज्ञेवरून, प्रेषित पौलाचा वध झाल्याचा सर्वसामान्यपणे विश्वास बाळगला जातो. इतर सम्राट, जसे की, डॉमिनिशियन, मार्कस, ऑरीलियस, सेप्टीमियस, सिव्हरस, डेसियस, व डायक्लोशियन यांनी देखील आरंभीच्या ख्रिश्चनांचा छळ केला. हे सम्राट तसेच त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला तेव्हा ते निश्चितच, ‘देवाचे सेवक’ म्हणून वागत नव्हते.
९. (अ) राजकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी कोणती गोष्ट खरी राहते, व कोणाकडून राजकीय श्वापदाला सामर्थ्य व अधिकार प्राप्त होतो? (ब) वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवायच्या ख्रिस्ती अधीनतेबद्दल तर्कसंगतपणे काय म्हटले जाऊ शकते?
९ या सर्व गोष्टी याचे उदाहरण देण्यास मदतदायी ठरतात की, राजकीय वरिष्ठ अधिकारी जरी काही प्रमाणात, मानवी समाजाला व्यवस्थित ठेवताना, “देवाच्या व्यवस्थेप्रमाणे” करत असले तरी, ते सैतान ज्याचा देव आहे त्या जगीक व्यवस्थिकरणाचे भाग आहेत. (१ योहान ५:१९) प्रकटीकरण १३:१, २ मधील लाक्षणिक ‘श्वापदाद्वारे’ चित्रित होणाऱ्या जगव्याप्त राजकीय संघटनेचे ते भाग आहेत. त्या श्वापदाला सामर्थ्य व अधिकार “मोठा अजगर” म्हणजे दियाबल सैतान याकडून प्राप्त होतो. (प्रकटीकरण १२:९) या कारणास्तव, तर्कशुद्धतेत, अशा अधिकाऱ्यांसाठी ख्रिश्चनांची अधीनता पूर्ण नसून ती सापेक्ष आहे.—पडताळा दानीएल ३:१६-१८.
अधिकारासाठी उचित आदर
१०, ११. (अ) आम्ही, अधिकारावर असलेल्या पुरूषांबद्दल आदरणीय असावे हे पौलाने कसे दाखवले? (ब) “राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता” प्रार्थना कशाप्रकारे व का करण्यास हवी?
१० तथापि, ख्रिश्चनांनी राजकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल उद्धट, बेपर्वावृत्ती दाखवावी असा याचा अर्थ होत नाही. हे खरे आहे की, यातील अनेक लोक, त्यांच्या व्यक्तिगत, किंवा जन-जीवनात आदराच्या लायकीचे नाहीत. तरीही, अधिकार असलेल्या लोकांसोबत आदराने वागले पाहिजे ही गोष्ट प्रेषितांनी त्यांच्या उदाहरणाद्वारे व त्यांच्या सल्ल्याद्वारे दाखवली. पौल जेव्हा गोत्रगमनी हेरोद अग्रिप्पा २ समोर हजर राहिला तेव्हा, तो त्याच्यासोबत उचित आदराने बोलला.—प्रे. कृत्ये २६:२, ३, २५.
११ पौलाने, आमच्या जीवनावर व ख्रिस्ती कार्यावर विशेषपणे परिणाम करणारा निर्णय घेण्याचे अपील जगीक अधिकाऱ्यांना केले तेव्हा, त्यांचा उल्लेख आमच्या प्रार्थनेत करण्याबद्दल उचितपणे सांगितले. त्याने लिहिले: “सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुति करावी; राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:१-४) आमच्या आदरणीय वृत्तीमुळे, “सर्व माणसांचे तारण” होण्यासाठी आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण करण्यास परवानगी देण्याप्रत निरवील.
१२, १३. (अ) पेत्राने अधिकाराविषयी कोणता समतोल सल्ला दिला? (ब) आम्ही, यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध पूर्वग्रह निर्माण करणाऱ्या “निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला” कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?
१२ प्रेषित पेत्राने लिहिले: “प्रभूकरिता तुम्ही माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याहि अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे; दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा. सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजांचा मान राखा.” (१ पेत्र २:१३-१७) किती संतुलित सल्ला! आम्ही देवाचे दास या नात्याने त्याला संपूर्ण अधीनता दाखवण्याबद्दल ऋणी आहोत, तसेच वाईट करणाऱ्यांस शिक्षा देण्यासाठी राजकीय अधिकाऱ्यांना आम्ही सापेक्ष व आदरयुक्त अधीनता दाखवतो.
१३ असे प्रत्ययास आले आहे की, यहोवाच्या साक्षीदारांविषयी अनेक लौकिक अधिकाऱ्यांना विलक्षण गैरसमज आहेत. ते बहुधा, देवाच्या लोकांच्या द्वेषयुक्त शत्रूंनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे घडतात. किंवा त्यांना आमच्याविषयी जे काही माहीत आहे ते, नेहमीच निःपक्षपाती नसणाऱ्या वर्तमानपत्रे, रेडियो, दूरदर्शनाच्या साधनाद्वारे प्रसारित केलेल्या गोष्टीमुळे होतात. कधीकधी आम्ही आमच्या आदरयुक्त वागणूकीद्वारे तसेच, शक्य असल्यास अधिकाऱ्यांना यहोवाच्या साक्षीदारांचे काम आणि विश्वासाचे अचूक चित्र देण्याकरवी पूर्वग्रहावर मात करु शकतो. कामात व्यग्र असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार (इंग्रजी) हे माहितीपत्रक संक्षिप्त माहिती पुरवते. संपूर्ण माहितीसाठी, त्यांना यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) हे पुस्तक दिले जाऊ शकते. हे उत्कृष्ट साहित्य, स्थानिक व राष्ट्रीय सार्वजनिक ग्रंथालयाच्या कपाटात ठेवण्याच्या पात्रतेचे आहे.
ख्रिस्ती घरातील अधिकार
१४, १५. (अ) ख्रिस्ती घराण्यात अधिकाराचा आधार काय आहे? (ब) ख्रिस्ती पत्नींची त्यांच्या पतीबद्दल काय मनोवृत्ती असावी, आणि का?
१४ देव, जगीक अधिकाऱ्यांना योग्य आदर दाखविण्याचे अपेक्षितो तर, त्याने घरामध्ये स्थापन केलेल्या अधिकाराच्या रचनेला त्याचप्रमाणे आदर दिला पाहिजे हे सांगायची जरुरी नाही. प्रेषित पौलाने यहोवाच्या लोकांमध्ये दिसत असलेल्या मस्तकपदाच्या तत्त्वाला संक्षिप्त परिभाषेत मांडले. त्याने लिहिले: “प्रत्येक पुरूषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरूष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ११:३) हे ईश्वरी शासनाचे किंवा देवाच्या अधिपत्याचे तत्त्व आहे. त्यात कशाचा समावेश होतो?
१५ ईश्वरी शासनाच्या आदराला घरातून सुरवात होते. एखादी ख्रिस्ती स्त्री, तिचा पती ख्रिस्ती विश्वासातील असो कि नसो, त्याच्या अधिकाराला योग्य आदर दाखवत नसल्यास, ती ईश्वरशासित नाही. पौलाने ख्रिस्ती लोकांना सल्ला दिला: “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे.” (इफिसकर ५:२१-२४) ख्रिस्ती पुरूषाला जसे ख्रिस्ताच्या मस्तकपदाला अधीन राहावे लागते, तसे ख्रिस्ती स्त्रियांनी देखील देवाने त्यांच्या पतीला दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहण्यातील सुज्ञानाला ओळखले पाहिजे. यामुळे त्यांना सखोल आंतरिक समाधान मिळेल, व अधिक महत्वाचे म्हणजे, त्यांच्यावर यहोवाचा आशीर्वाद येईल.
१६, १७. (अ) ख्रिस्ती घरात संगोपन केलेली मुले आजच्या इतर युवकांपासून वेगळी कशी दिसू शकतात, व त्यांच्यासाठी कोणते उत्तेजन आहे? (ब) येशू, आजच्या तरुणांसाठी, कशाप्रकारे उत्तम उदाहरण आहे, व काय करण्यासाठी त्यांना उत्तेजन दिले आहे?
१६ ईश्वरशासित मुले त्यांच्या पालकांना योग्य आदर दाखविण्यात आनंदी असतात. या शेवटच्या दिवसातील तरुण पिढीबद्दल, “आईबापास न मानणारी” असे भाकीत केले होते. (२ तीमथ्य ३:१, २) परंतु ख्रिस्ती मुलांविषयी देवाचे प्रेरित वचन म्हणते: “मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे.” (कलस्सैकर ३:२०) पालकांच्या अधिकाराला आदर दिल्याने यहोवाला संतोष होतो व त्याचा आशीर्वाद येतो.
१७ हे येशूच्याबाबतीत दिसून आले. लूकचा अहवाल सांगतो: “मग तो त्यांच्याबरोबर [त्याच्या पालकांसोबत] खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. . . . येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला.” (लूक २:५१, ५२) येशू त्यावेळी १२ वर्षांचा होता, व येथे वापरलेले ग्रीक क्रियापदाचे रुप, तो त्याच्या पालकांच्या “आज्ञेत राहिला” ह्या गोष्टीवर जोर देतो. यास्तव त्याने किशोरावस्थेत पदार्पण केल्यावर त्याची अधीनता संपुष्टात आली नाही. तुम्हा तरुणांची, आध्यात्मिकतेत तसेच यहोवा आणि माणसांच्या कृपेत वाढ करण्याची इच्छा असल्यास, घरातील व बाहेरील अधिकाराला तुम्ही आदर दाखवाल.
मंडळीत अधिकार
१८. ख्रिस्ती मंडळीचा मस्तक कोण आहे, व त्याने कोणाला अधिकार दिला आहे?
१८ ख्रिस्ती मंडळीत व्यवस्था असण्याच्या गरजेविषयी बोलताना पौलाने लिहिले: “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. . . . सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथकर १४:३३, ४०) सर्व गोष्टी शिस्तवार होण्यासाठी, ख्रिस्ती मंडळीचा मस्तक ख्रिस्त याने, विश्वासू पुरूषांकडे तो अधिकार सोपवला आहे. आम्ही वाचतो: “त्यानेच कोणी प्रेषित, कोणी भविष्यवादी, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; सेवेच्या कामासाठी पवित्रांची पूर्णता करण्यास . . . परंतु आपण प्रीतीने बोलत असता जो मस्तक आहे त्याच्यात म्हणजे ख्रिस्तात सर्व प्रकारे वाढावे.”—इफिसकर ४:११, १२, १५, पंडिता रमाबाई भाषांतर.
१९. (अ) ख्रिस्ताने त्याच्या पृथ्वीवरील परिवारावर कोणाची नियुक्ती केली आहे, व कोणाला त्याने खास अधिकार दिला आहे? (ब) ख्रिस्ती मंडळीत कोणता अधिकार सुपूर्त करण्यात येतो, हे आमच्याकडून कशाची अपेक्षा करते?
१९ या अंतसमयात, ख्रिस्ताने ‘आपल्या सर्व परिवाराला’ किंवा पृथ्वीवरील राज्य आस्थेवर, सामूहिक “विश्वासू व बुद्धिमान दास” नेमला आहे. (मत्तय २४:४५-४७) पहिल्या शतकाप्रमाणेच, हा दास, अभिषिक्त ख्रिस्ती पुरूषांचे नियमन मंडळ याद्वारे चित्रित होतो. या दासाला निर्णय घेण्यासाठी व इतर पर्यवेक्षकांना नियुक्त करण्यासाठी ख्रिस्ताने अधिकार दिला आहे. (प्रे. कृत्ये ६:२, ३; १५:२) त्यानंतर, नियमन मंडळ शाखा समिती, प्रांतीय व विभागिय पर्यवेक्षक, व संबंध पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदारांच्या ७३,००० पेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक मंडळीतील वडिलांना अधिकार देते. हे सर्व समर्पित ख्रिस्ती पुरुष आमचा सहयोग व आदराच्या पात्रतेचे आहेत.—१ तीमथ्य ५:१७.
२०. अधिकारावर असणाऱ्या सहख्रिश्चनांसाठी अनादर दाखविणाऱ्यांवर यहोवा नाराज असतो यास कोणते उदाहरण दाखवते?
२० ख्रिस्ती मंडळीत अधिकार पदावर असणाऱ्यांसाठी आम्ही द्यावयाचा आदर तसेच, लौकिक अधिकाऱ्यांना आपण दाखवत असलेली अधीनता यांच्यामध्ये चित्तवेधक तुलना केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती, देवाला मान्य असलेल्या मनुष्याच्या नियमाचे उल्लंघन करते तेव्हा, ‘शासन कर्त्यांनी’ दिलेली शिक्षा म्हणजे वस्तुतः, अप्रत्यक्षपणे देवाचा क्रोध “वाईट करणाऱ्यांवर” येत असतो. (रोमकर १३:३, ४) एखादी व्यक्ती मनुष्याचे नियम तोडून जगीक अधिकाऱ्यांसाठी आदराची उणीव दाखवत असल्यावर यहोवाला क्रोध येतो तर, एखादा समर्पित ख्रिस्ती, पवित्र शास्त्र तत्त्वांना तुच्छ मानत असल्यास व अधिकारावर असणाऱ्या सहविश्वासू ख्रिश्चनांसाठी अनादर दाखवत असल्यास, याबद्दल यहोवा किती अधिक नाराज होत असेल बरे!
२१. कोणत्या शास्त्रवचनीय सल्ल्याचे अनुकरण करण्यास आम्ही आनंदी असू, व पुढील लेखात कशाचा विचार केला जाईल?
२१ बंडखोर व स्वातंत्र्याची प्रवृत्ती स्वीकारून देवाचा क्रोध ओढून घेण्याऐवजी, आम्ही पौलाने फिलिप्पै मधील ख्रिश्चनांना दिलेल्या सल्ल्याचा अवलंब करु या: “म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आहां, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताहि भीत व कांपत आपले तारण साधून घ्या; कारण इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरूपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता.” (फिलिप्पैकर २:१२-१५) अधिकाराचा पेचप्रसंग स्वतःवर ओढवून घेतलेल्या सद्य विकृत व कुटिल पिढीपेक्षा, यहोवाचे लोक अधिकाराला अधीनता दाखविण्यात तयार असतात. या कारणामुळे त्यांना अनेक लाभ मिळतात, हेच आम्ही पुढील लेखात पाहणार आहोत.
[तळटीपा]
a मागील लेख पाहा.
उजळणीद्वारे
▫ सर्वोच्च अधिकारी कोण आहे, व त्याचा अधिकार कायदेशीर का आहे?
▫ वरिष्ठ अधिकारी, कोणत्या अर्थाने ‘सापेक्ष स्थितीत देवाने नेमलेले’ आहेत?
▫ वरिष्ठ अधिकारी, “देवाचा सेवक” होण्याचे केव्हा थांबवतात?
▫ ख्रिस्ती कुटुंबात अधिकाराची कोणती रचना हयात आहे?
▫ ख्रिस्ती मंडळीत कोणता अधिकार सुपूर्त केलेला आहे?
[१८ पानांवरील चित्रं]
येशूने म्हटले: “कैसराचे ते कैसराला द्या”