वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१ पृ. १४-१७
  • अधिकाराला काय झाले आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अधिकाराला काय झाले आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अधिकार संकटात
  • मानवाचा कायदेशीर अधिकारासाठी शोध
  • “दोन सत्ता,” “दोन तरवारी”
  • लोकप्रिय प्रभुत्वाची दंतकथा
  • राष्ट्रीय प्रभुत्वाची दंतकथा
  • मानवी प्रयत्नांना अपयश
  • अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवाचे सार्वभौमत्त्व आणि देवाचे राज्य
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का असावे?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१ पृ. १४-१७

अधिकाराला काय झाले आहे?

विचारवंत लोक अधिकाराची गरज ओळखतात. कोणत्याही प्रकारच्या अधिकाराच्या रचनेविना, मानवी संस्था लगेच अव्यवस्थित होईल. यास्तव, संविधानीय नियमावरील एक उत्कृष्ट फ्रेंच पाठ्यपुस्तक म्हणते: “कोणत्याही मानवी समुदायात, दोन प्रकारचे लोक सापडतात: आज्ञा देणारे आणि आज्ञा मानणारे, हुकूम करणारे व त्याचे पालन करणारे, नेते आणि सदस्य, राज्यकर्ते व शासित. . . . अधिकाराच्या अस्तित्वाला कोणत्याही मानवी समाजामध्ये पाहिले जाऊ शकते.”a

परंतु, दुसऱ्‍या महायुद्धापासून, खासपणे १९६० च्या दशकापासून अधिकाराविषयीची प्रवृत्ती बदलली आहे. त्या काळावर भाष्य करताना, फ्रेंच एन्साक्लोपिडीया युनिव्हर्सलिज्‌ “अधिकारश्रेणी विरोधी व अधिकार विरोधी संकटप्रसंग” याविषयी बोलतो. पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांना असा संकटप्रसंग आश्‍चर्याचा नाही. प्रेषित पौलाने भाकीत केले होते: “या जगाच्या शेवटल्या युगाचा काळ संकटाचा असेल, याची आठवण ठेव! लोक केवळ स्वतःवर आणि स्वतःच्या पैशावरच प्रेम करतील; ते गर्विष्ठ, बढाईखोर, उपहास करणारे; मातापित्यांची अवज्ञा करणारे . . . त्यांच्याशी कृतघ्न होणारे, . . . आत्मसंयमन न करणारे व हिंसक, . . . गर्वाने फुगलेले असतील. ते सुखविलासावर त्यांच्या देवापेक्षा अधिक प्रीती करतील.”—२ तीमथ्य ३:१-४, द रिवाईज्ड इंग्लिश बायबल.

अधिकार संकटात

ही भविष्यवाणी आमच्या दिवसाचे व युगाचे वर्णन चांगल्याप्रकारे करते. अधिकाराला सर्व स्तरातून आव्हान केले जात आहे—कुटुंब, सार्वजनिक शाळा, विद्यापीठ, व्यापारी क्षेत्र, स्थानिक आणि राष्ट्रीय सरकार. लैंगिक क्रांती, मूलगामी रॅप संगीत, विद्यार्थ्यांची प्रदर्शने, अविचारीपणे केलेले संप, नागरी कायदेभंग, दहशतवादाची कृत्ये, ही सर्व अधिकाराला आदर न दाखविलेली चिन्हे आहेत.

पॅरीसमध्ये फ्रान्सच्या राजकीय विज्ञानाच्या संस्थेने एक परिसंवाद आयोजित केला होता. तेथे, पॅरीसच्या ली मोण्ड, दैनिकात प्राध्यापक इव्ह मेनी यांनी म्हटले: “अधिकाराला कायदेशीरपणाची पुष्टी मिळाली तरच तो राहू शकतो.” आज अधिकार संकटात असण्याचे एक कारण म्हणजे, अनेक लोक अधिकारावर असलेल्यांच्या कायदेशीरपणाबद्दल शंका बाळगतात हे होय. अधिकारावर असण्याच्या त्यांच्या हक्काबद्दल ते संशय बाळगतात. १९८० दशकाच्या आरंभातील मतमोजणी प्रकट करते की, अमेरिकेतील ९ टक्के, ऑस्ट्रेलियातील १० टक्के, ब्रिटनमधील २४ टक्के, फ्रान्समधील २६ टक्के, व भारतातील ४१ टक्के लोकसंख्येने त्यांचे सरकार बेकायदेशीर असल्याचा विचार केला.

मानवाचा कायदेशीर अधिकारासाठी शोध

पवित्र शास्त्रानुसार, मुलतः मानव प्रत्यक्ष देवाच्या अधिकाराखाली होता. (उत्पत्ती १:२७, २८; २:१६, १७) तथापि, अगदी सुरवातीलाच, मानवाने त्याच्या निर्माणकर्त्यापासून नैतिक स्वातंत्र्याची मागणी केली. (उत्पत्ती ३:१-६) ईश्‍वरी पद्धतीच्या शासनाला, किंवा देवाच्या अधिपत्याला नाकारल्यावर, त्यांना अधिकाराच्या दुसऱ्‍या पद्धतीचा शोध करावा लागला. (उपदेशक ८:९) काहींनी त्यांच्या अधिकाराचे सामर्थ्याच्या जोरावर प्रतिपादन केले. त्यांच्याकरता बळ हेच उचित होते. त्यांच्या इच्छांना जबरदस्तीने लादण्यासाठी त्यांच्याठायी सामर्थ्य पुरेसे होते. तरीही, शासन करण्याच्या त्यांच्या हक्काला कायदेशीर ठरविण्याची त्यांना गरज भासली.

प्राचीन काळापासून, अनेक शासन कर्त्यांनी, ते देव आहेत किंवा त्यांना देवांकडून अधिकार मिळाला आहे, असे म्हणून ही गोष्ट पूर्ण केली. मेसोपोटेमिया, व इजिप्तमधील प्राचीन काळचा फारो या प्राचीन शासनकर्त्यांनी दावा केलेले “पवित्र राज्यपद” याविषयीची ही काल्पनिक दंतकथा आहे.

थोर सिकंदर, त्याच्यानंतरचे हेलेनिस्टीक राजे, व अनेक रोमी सम्राटांनी ते देव असल्याचा दावा केला व त्यांची उपासना केली जाण्याची मागणी देखील केली. त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या व्यवस्थेला “शासनकर्त्याचा पंथ” असे ओळखले जाई, व त्यांचा उद्देश, विजय प्राप्त केलेल्या मिश्र लोकांवर शासनकर्त्याच्या अधिकाराला मजबूत करणे हा होता. शासकाची भक्‍ती करण्यास नकार दिल्याने प्रांताविरूद्ध कृत्य करणारा समजून त्याचा निषेध केला जात असे. रोमचा वारसा (इंग्रजी) या पुस्तकात, प्राध्यापक अर्नेस्ट बॉर्कर यांनी लिहिले: “[रोमी] सम्राटाला देवत्वावर चढवणे, व देवत्वाच्या सद्‌भगुणामुळे त्याला मिळत असलेली निष्ठा, हे नक्कीच साम्राज्याचा पाया, किंवा निदान एकत्र सांधणारे सिमेंट ठरते.”

ही गोष्ट, (सा. यु. ३०६-३३७ मध्ये शासन केलेल्या) सम्राट कॉन्स्टंटाईनने ‘ख्रिस्तीत्वाला’ कायदेशीर बनविल्यानंतर आणि मग (सा. यु. ३७९-३९५ मध्ये शासन केलेल्या) सम्राट थिओडोसियस पहिला याने, रोमी साम्राज्याचा प्रांतीय धर्म म्हणून ख्रिस्तीत्वाचा स्वीकार केला तेव्हाही खरीच राहिली. नंतर सामान्य युगाच्या पाचव्या शतकापर्यंत काही “ख्रिश्‍चन” सम्राटांना देव समजून त्यांची उपासना केली जात होती.

“दोन सत्ता,” “दोन तरवारी”

पोपचा अधिकार जसजसा अधिक प्रबळ होत गेला, तसतशा चर्च व प्रांतामधील समस्या तीव्र वाढत गेल्या. या कारणास्तव, पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात, पोप गेलॅसियस पहिला यांनी “दोन सत्तांचे” तत्त्व समोर मांडले: राजांच्या बादशाही सत्तेच्या काळातच पोपचा पवित्र अधिकार देखील अस्तित्वात राहील—राजे मात्र पोपच्या खालोखाल असतील. या तत्त्वाचा नंतर “दोन तरवारी” या सिद्धांतामध्ये विकास झाला: “पोप स्वतः आध्यात्मिक तरवार चालवतात व शासकांना त्यांनी ऐहिक तरवार चालवण्यास दिली आहे, परंतु त्यांनी ती पोपच्या मार्गदर्शनानुसारच वापरली पाहिजे.” (द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका) या सिद्धांताच्या आधारावर मध्य युगात, कॅथोलिक चर्चनी सम्राट व राजे यांना मुकुट घालण्याचा व त्यांचा अधिकार त्याद्वारे कायदेशीर ठरवण्याचा दावा केला. अशाप्रकारे, ‘पवित्र राज्यपदाच्या’ प्राचीन काल्पनिक कथा चिरस्थायी केल्या.

परंतु याचा, नंतर विकसित झालेल्या राजांचा तथाकथित ईश्‍वरी हक्क या घटनेशी गोंधळ करु नये. ती घटना, राजकीय शासनकर्त्यांना पोपच्या अधिकाराखालून मुक्‍त करण्याच्या उद्देशाने विकसित झाली. ईश्‍वरी हक्काचा सिद्धांत सांगतो की, राजांना राज्य करण्याचा हक्क, रोमच्या पोपकडून नव्हे तर, थेट देवाकडून मिळतो. द न्यू कॅथोलिक एन्साक्लोपिडीया म्हणतो: “पूर्वी एकेकाळी जेव्हा, पोप, प्रांताच्या प्रमुखांवर सार्वत्रिक आध्यात्मिकता व इतकेच नव्हे तर, ऐहिक सत्ता गाजवित होता तेव्हा, ईश्‍वरी हक्काच्या कल्पनेने राष्ट्रीय प्रांतातील राजांना, त्यांचा अधिकार पोपप्रमाणेच ईश्‍वरी आहे, अशाप्रकारे अधिकाराची हातमिळवणी करण्याच्या स्थितीत त्यांना ठेवले.”b

लोकप्रिय प्रभुत्वाची दंतकथा

वेळ जसा निघून गेला तसे, मानवांनी अधिकाराचे इतर स्रोत सुचवले. एक स्रोत म्हणजे, लोकांचे प्रभुत्व होय. या कल्पनेचा उगम ग्रीसमध्ये झाल्याचा अनेक लोकांचा विश्‍वास आहे. तथापि, प्राचीन ग्रीकमधील लोकशाही, केवळ काही शहरात होती, व त्यात फक्‍त पुरूष नागरिकच मतदान देत. स्त्रिया, दास, आणि परदेशी नागरिक—लोकसंख्येचा अर्धा ते चार पंचमांश असून—त्यांचा यात भाग नव्हता. लोकप्रिय प्रभुत्व जवळजवळ नाहीच!

लोकांच्या प्रभुत्वाची कल्पना कोणी वाढवली आहे? ती मध्य युगात रोमन कॅथोलिक वेदान्त ज्ञान्यांनी सुरू केली हे मनोरंजक आहे. १३ व्या शतकात, थॉमस ॲक्वीनसने, प्रभुत्वाचा उगम देवासोबत होत असल्यामुळे, तो लोकांच्या स्वाधीन केला आहे असे गृहीत धरले. ही कल्पना लोकप्रिय ठरली. द न्यू कॅथोलिक एन्साक्लोपिडीया म्हणतो: “लोकांच्या या कल्पनेला, १७ व्या शतकात अनेक कॅथोलिक वेदान्त ज्ञान्यांनी अधिकाराच्या उगमाप्रमाणे दुजोरा दिला.”

ज्या लोकांना पोप, बिशप किंवा पाळकांच्या निवडीविषयी कोणताही अधिकार नव्हता, अशा चर्चमधील वेदान्त ज्ञान्यांनी लोकांच्या प्रभुत्वाच्या कल्पनेला का वाढविले असेल बरे? कारण काही युरोपातील राजे, पोपच्या अधिकाराखाली सतत बेचैन होते. लोकप्रिय प्रभुत्वाच्या सिद्धांताने पोपला, आवश्‍यकता वाटल्यास, सम्राट किंवा राजाला उलथून टाकण्याचा अधिकार दिला होता. इतिहासकार विल व एरियल डुरंट यांनी लिहिले: “लोकप्रिय प्रभुत्वाच्या समर्थकात अनेक जेसूटांचा समावेश होता, ज्यांनी याकडे पोपच्या अधिकाराला कमजोर करण्याचे माध्यम या दृष्टीने पाहिले. जर राजाचा अधिकार लोकांकडून आला आहे, आणि तो त्यांच्याच हक्काचा आहे तर, ते स्पष्टपणे पोपच्या अधिकाराच्या दुय्यम स्थानी आहेत असा वाद चर्चचा अधिकारी बेलारमाइन यांनी घातला. . . . लुईस मोलिना या स्पॅनिश जेसूटने असा निष्कर्ष काढला की, लोक प्रापंचिक अधिकाराचा उगम या नात्याने, अन्यायी राजाला न्याय्यपणे—परंतु सुव्यवस्थित रीतीने—अधिकारावरून दूर करू शकतात.”

अर्थातच, या “सुव्यवस्थित रीतीची” व्यवस्था पोपद्वारेच होणार होती. याची खात्री देण्यासाठी, फ्रेंच कॅथोलिक हिस्टॉयर युनिव्हर्सल डी लʹइग्लीश कॅथोलिक बायोग्राफी युनिव्हर्सल याचे अवतरण घेत म्हणते: “बेलारमाइन . . . सामान्य कॅथोलिक सिद्धांताप्रमाणेच शिकवतात की, लोकांच्या निवडीवरून राजपुत्र सत्ता मिळवतात, पण लोक केवळ पोपच्या बळाच्या अधीन राहून हा हक्क बजावू शकत होते.” (तिरपी अक्षरे आमची.) अशाप्रकारे, लोकप्रिय प्रभुत्व हे, पोपने शासनकर्त्याची निवड करण्यासाठी व जरुरी भासल्यास त्यांना अधिकारावरून दूर करण्याच्या दबावाचे शस्त्र बनले. अलिकडच्याच काळात, कॅथोलिक अधिकारश्रेणीला कॅथोलिक लोकशाही प्रतिनिधींच्या मतदारावर दबाव टाकण्यास परवानगी दिली.

आधुनिक लोकशाहीत सरकारचा कायदेशीरपणा, “कारभार चालविण्याची संमती” म्हटलेल्यावर आधारित आहे. उत्तम असले तरी, ही “बहुसंख्याकाची संमती” आहे व मतदाराच्या भावना व राजकीय लबाड्यामुळे ही “बहुसंख्याक” खरे पाहता लोकसंख्येची अल्पसंख्याच आहे. आज, “कारभार चालविण्याची संमती” याचा अर्थ, “कारभार चालविण्याची मुकाट्याने दिलेली संमती किंवा राजीनामा असा होतो.”

राष्ट्रीय प्रभुत्वाची दंतकथा

आरंभीच्या पोपनी पवित्र राज्यपदाच्या वाढविलेल्या दंतकथेला, राज्याच्या ईश्‍वरी हक्काला अबोल केले तेव्हा पोपच्या अधिकारावर त्याचा भलताच परिणाम झाला. लोकप्रिय प्रभुत्वाचा सिद्धांत त्याचप्रमाणे कॅथोलिक चर्चवर उलटून आला. १७ व्या व १८ व्या शतकाच्या दरम्यान, लौकिक तत्त्वज्ञानी, जसे की इंग्लिशमॅन थॉमस हॉबिज्‌ व जॉन लॉकी तसेच फ्रेंचमॅन जीन-जॅक्स्‌ रुसो यांनी लोकप्रिय प्रभुत्वाच्या कल्पनेला वाढवले. त्यांनी शासक व राज्य केलेले यांच्यामधील “सामाजिक कराराच्या” सिद्धांताच्या स्व-दृष्टिकोनांना वाढवले. त्यांचे तत्त्व वेदांतशास्त्रावर नव्हे तर, ते “नैसर्गिक नियम” यावर आधारित होते. शिवाय त्या कल्पनांनी कॅथोलिक चर्च व पोपच्या अधिकाराला गंभीर हानी करणाऱ्‍या कल्पनेचा कळस गाठला.

रुसो यांच्या मरणानंतर लगेच फ्रेंच क्रांती सुरू झाली. या क्रांतीने कायदेशीरपणाच्या काही विशिष्ट कल्पनांचा नाश केला, पण राष्ट्रीय प्रभुत्वासारख्या नवीन कल्पना निर्माण केल्या. द न्यू एन्साक्लोपिडीया ब्रिटानिका विवेचन मांडतो: “फ्रान्सने राजांच्या ईश्‍वरी हक्काला, उमदेपणाच्या वर्चस्वाला, रोमन कॅथोलिक चर्चच्या सुअधिकारांना जुमानले नाही.” परंतु ब्रिटानिका पुढे म्हणतो, “क्रांतीने, देशीय-राष्ट्र ते परिपाक या नवीन शोधाला आणले.” क्रांतीकाऱ्‍यांना या नवीन “शोधाची” गरज होती. का बरे?

कारण रुसो याने ज्या व्यवस्थेची शिफारस केली होती, त्यामध्ये शासकांची निवड करण्यासाठी सर्व नागरिकांचे एकच मत होणार होते. याचे पर्यवसान बालिग मताधिकारावर आधारित असलेल्या लोकशाहीत झाले असते, ज्याला फ्रेंच क्रांतीच्या नेत्यांनी मेहरबानी दाखवली नसती. प्राध्यापक डुव्हरजर खुलासा करतात: “या परिणामाला अगदी तशाचप्रकारे टाळण्यासाठी, १७८९ पासून १७९१ पर्यंत घटना समितीच्या मध्यम वर्गीय लोकांनी राष्ट्रीय प्रभुत्वाच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांनी लोकांची ‘राष्ट्रासोबत,’ ज्याला ते घटकांपासून खरी वस्तु असे मानीत त्याच्याबरोबर ओळख करून दिली. केवळ राष्ट्राला त्याच्या प्रतिनिधीद्वारे, प्रभुत्व चालवण्याचा हक्क आहे . . . दिसत असलेली लोकशाही, राष्ट्रीय प्रभुत्वाचा सिद्धांत खरेपणाने लोकशाहीचा नाही, कारण त्याचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या सरकारासाठी, स्वयंसत्तापद्धतीचे समर्थन व्यावहारिकपणे करण्यासाठी केला जाऊ शकतो.” (तिरपे अक्षर त्यांचे.)

मानवी प्रयत्नांना अपयश

अधिकाराचा कायदेशीर उगम म्हणून त्याच्या देशीय-राष्ट्राच्या स्वीकाराने, राष्ट्रवादाकडे निरवले. द न्यू एन्साक्लोपिडीया ब्रिटानिका म्हणतो: “राष्ट्रीयवादाला अनेकदा अतिशय जुना म्हणून समजले जाते; कधी कधी त्याला राजकीय वर्तनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून चुकीने समजले जाते. खरे पाहता, अमेरिका आणि फ्रान्समधील क्रांतीला त्यांचे पहिले सामर्थ्यशाली प्रकटन अशारितीने समजले जाऊ शकते.” त्या क्रांत्यांमुळे राष्ट्रवाद, अमेरिका, युरोप, आफ्रिका, व आशिया पलिकडे पसरला. राष्ट्रवादाच्या नावाखाली द्वेषयुक्‍त युद्धे कायदेशीर झाली.

ब्रिटीश इतिहासकार अर्नाल्ड टॉयन्बी यांनी लिहिले: “जनजातिवादाच्या जुन्या बाटल्यातील, लोकशाहीच्या नव्या द्राक्षरसात, राष्ट्रीयतेचा आत्मा, आंबविणारा पदार्थ आहे. . . . लोकशाही व जनजातिवादामधील ही विचित्र हातमिळवणी, लोकशाहीपेक्षा, आमच्या आधुनिक पाश्‍चात्य जगातील व्यावहारिक राजनीतीपेक्षा अधिक शक्‍तीशाली आहे.” राष्ट्रवादाने शांतीमय जग आणले नाही. टॉयन्बी यांनी म्हटले: “धार्मिक युद्धे, राष्ट्रवादाच्या युद्धांच्या संक्षिप्त विलंबामुळे झाली; आणि आमच्या आधुनिक पाश्‍चात्य जगात, धार्मिक धर्मवेडेपणाचा आत्मा व राष्ट्रीय अत्याग्रही आत्मा एकच आहे व तो तीव्र भावना प्रकट करतो.”

“पवित्र राजत्व,” “राजांचा ईश्‍वरी हक्क,” “लोकप्रिय प्रभुत्व,” व “राष्ट्रीय प्रभुत्व” या दंतकथांद्वारे शासकांनी, सहमानवांवर त्यांच्या अधिकाराला कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला. तथापि, मानवी शासकांच्या अहवालांचा विचार केल्यावर, एखाद्या ख्रिश्‍चनाला शलमोनाने सांगितलेल्या विचारात सहभागी झाल्यावाचून गत्यंतर नाही: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”—उपदेशक ८:९.

राजकीय राष्ट्राची उपासना करण्याऐवजी, ख्रिस्ती लोक देवाची उपासना करतात व अधिकाराच्या उगमाचा कायदेशीर हक्क त्याच्याचकडे असल्याचे ओळखतात. स्तोत्रकर्त्या दाविदाबरोबर त्यांचे सहमत आहे, ज्याने म्हटले: “हे याव्हे, माहात्म्य, सत्ता, ऐश्‍वर्य, दीर्घ आयुष्य आणि महिमा तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. प्रभुत्व तुझेच, हे याव्हे; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस.” (१ इतिहास २९:११, द न्यू जरुसलेम बायबल) तरीही, ते देवाखातर, लौकिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकाराला योग्य आदर दाखवतात. ते, ही गोष्ट आनंदाने कशी व का करु शकतात याचे परीक्षण पुढील दोन लेखात केले जाईल.

[तळटीपा]

a मॉरिस डुव्हेरझॉ यांचे ड्रॉइट कॉन्स्टीट्यूशनल एट इंस्टिट्युशन्स्‌ पॉलीटीक्स.

b द कॅथोलिक एन्साक्लोपिडीया म्हणतो: “‘राजांच्या या ईश्‍वरी हक्काला’ (राजा किंवा लोकांकडील सर्व अधिकार देवाकडून आहे या सिद्धांतापेक्षा फारच वेगळे), कॅथोलिक चर्चने कधीच मंजूर केले नाही. सुधारणेच्या वेळी राजांच्या ईश्‍वरी हक्काला कॅथोलिसिझमच्या कट्टर विरोधात असल्याचे गृहीत धरले, हेन्री आठवा, व इंग्लंडचा जेम्स पहिला यासारख्यांनी आध्यात्मिक तसेच नागरी प्राधिकारी असल्याचा पूर्णपणे दावा केला.”

[१५ पानांवरील चित्रं]

कॅथोलिक चर्चने सम्राट व राजे यांना शिरोभूषित करण्याच्या अधिकाराचा दावा केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा