अधिकाराला आनंदी अधीनता
‘तुम्ही मनापासून पालन केले.’—रोमकर ६:१७.
१, २. (अ) आज जगामध्ये कोणता आत्मा स्पष्ट दिसत आहे, आणि त्याचे उगम व त्याचे परिणाम काय आहेत? (ब) यहोवाचे समर्पित सेवक कसे दाखवतात की ते वेगळे आहेत?
आज, ‘आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा आत्मा’ भयानकपणे स्पष्ट दिसत आहे. तो आत्मा, अनियंत्रित स्वातंत्र्याचा आहे व सैतान, जो या “आत्म्याचा अधिपती” आहे त्याच्याकडून उद्भवतो. तो आत्मा, ती “हवा,” किंवा स्वार्थीपणा आणि आज्ञाभंगाची वर्चस्वी मनोवृत्ती, बहुतेक मानवजातीवर “अधिकार” किंवा सत्ता गाजवत आहे. जग, ज्याला अधिकाऱ्याचे अरिष्ट म्हणतात त्यातून का जात आहे याचे हे एक कारण आहे.—इफिसकर २:२.
२ आनंदाची गोष्ट अशी आहे की, आज, यहोवाचे समर्पित सेवक, त्यांच्या आध्यात्मिक फुफ्फुसांना या दूषित ‘हवेने’ किंवा बंडखोरीच्या आत्म्याने भरत नाहीत. त्यांना हे माहीत आहे की, “आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप” येत आहे. प्रेषित पौल यात आणखी भर घालतो: “म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका.” (इफिसकर ५:६, ७) उलटपक्षी, खरे ख्रिस्ती, “आत्म्याने [यहोवाच्या] परिपूर्ण” होण्याचा प्रयत्न करतात आणि ‘वरून येणाऱ्या ज्ञानाचे’ प्राशन करतात जे ‘शुद्ध, शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे’ आहे.—इफिसकर ५:१७, १८; याकोब ३:१७.
यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला स्वेच्छापूर्ण अधीनता
३. ऐच्छिक अधीनतेची गुरूकिल्ली काय आहे, आणि इतिहास कोणता मोठा धडा आम्हाला शिकवतो?
३ स्वेच्छापूर्ण अधीनतेची गुरूकिल्ली, कायदेशीर अधिकाराला मान्यता देणे होय. मानवाचा इतिहास दाखवतो की, यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला धिक्कारल्याने आनंद मिळत नाही. अशा प्रकारच्या धिक्कारण्याने आदाम आणि हव्वेला किंवा त्यांच्या बंडाळीला चिथावणाऱ्या, दियाबल सैतानालाही आनंद मिळाला नाही. (उत्पत्ती ३:१६-१९) त्याच्या सध्याच्या हीनमूल्य अवस्थेत, सैतान “अतिशय संतप्त” झालेला आहे कारण, त्याचा काळ फार थोडा आहे हे त्याला माहीत आहे. (प्रकटीकरण १२:१२) मानवजातीची, होय, संपूर्ण विश्वाची शांती आणि आनंद, यहोवाच्या धार्मिक सार्वभौमत्त्वाला सार्वत्रिक मान्यता देण्यावर अवलंबून आहे.—स्तोत्र १०३:१९-२२.
४. (अ) यहोवा त्याच्या सेवकांनी कोणत्या प्रकारची अधीनता व आज्ञाधारकता दाखवावी असे अपेक्षितो? (ब) आम्हाला कशाची खात्री झाली पाहिजे, आणि हे स्तोत्रकर्ता कसे व्यक्त करतो?
४ तरीही, यहोवाच्या अद्भुत समतोलित गुणांमुळे, तो भावनारहित अधीनतेने समाधानी होत नाही. होय, तो शक्तीमान आहे! परंतु तो काही जुलमी नाही. तो प्रीतीचा देव आहे, आणि त्याच्या बुद्धिजीवी प्राण्यांनी त्याला स्वइच्छेने, प्रीतीमुळे अधीनता दाखवावी अशी त्याची इच्छा आहे. त्यांनी त्याच्या सार्वभौमत्त्वाला अधीनता दाखवावी अशी त्याची इच्छा आहे, कारण त्यांनी स्वतःला त्याच्या धार्मिक आणि कायदेशीर अधिकाराखाली राहण्याचे मनापासून निवडले आहे. त्यांना याची खात्री झाली आहे की, अनंतकाळासाठी त्याला अधीनता दाखवण्यापेक्षा इतर कोणतीच गोष्ट लाभदायक नाही. यहोवाला त्याच्या विश्वात अशा प्रकारची व्यक्ती हवी आहे जी स्तोत्रकर्त्याच्या भावनांमध्ये सहभागिता घेते, ज्याने लिहिले: “परमेश्वराचे [यहोवा, NW] नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरूज्जीवन करिते; परमेश्वराचा [यहोवा, NW] निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समजंस करितो. परमेश्वराचे [यहोवा, NW] विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्वराची [यहोवा, NW] आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे [यहोवा, NW] भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे [यहोवा, NW] निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.” (स्तोत्र १९:७-९) आम्ही यहोवाच्या नव्या जगात जगू इच्छितो तर—यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा खरेपणा आणि धार्मिकतेवर निर्विवादपणे आत्मविश्वास, ही आमची मनोवृत्ती असली पाहिजे.
आमच्या राजाला आनंदी अधीनता
५. येशूला त्याच्या आज्ञाधारकतेचे प्रतिफळ कसे मिळाले, आणि आम्ही स्वेच्छेने काय कबूल करतो?
५ ख्रिस्त येशू स्वतः, त्याने त्याच्या स्वर्गीय पित्याला दाखवलेल्या अधीनतेचे ज्वलंत उदाहरण आहे. आम्ही वाचतो की त्याने, “वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” पौल आणखी पुढे म्हणतो: “ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे.” (फिलिप्पैकर २:८-११) होय, आम्ही आमचा नेता आणि राज्य करणारा राजा, ख्रिस्त येशू, याच्यासमोर आनंदाने गुडघे टेकतो.—मत्तय २३:१०.
६. येशूने, राष्ट्रीय समूहासाठी एक साक्षीदार आणि एक नेता कसे शाबीत केले आहे, आणि त्याची “सत्तावृद्धि” मोठ्या संकटानंतरही कशी चालू राहील?
६ आमचा नेता या नात्याने, ख्रिस्त याच्याविषयी यहोवाने भाकीत केले: “पाहा! मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे.” (यशया ५५:४) येशूने स्वतःला सर्व राष्ट्रांच्या लोकांपुढे, त्याच्या पृथ्वीवरच्या सेवेद्वारे आणि त्याच्या मृत्यू व पुनरूत्थानंतर स्वर्गातून प्रचारकार्याला मार्गदर्शन करण्याद्वारे, त्याच्या पित्याचा “विश्वासू आणि खरा साक्षी” शाबीत केले आहे. (प्रकटीकरण ३:१४; मत्तय २८:१८-२०) अशाप्रकारचे राष्ट्रीय समूह आता ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ वाढत्या संख्येचे प्रतिनिधीत्त्व करतात, जे ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाखालच्या “मोठ्या संकटातून” बचावतील. (प्रकटीकरण ७:९, १४) परंतु, येशूचे नेतृत्त्व तेथेच समाप्त होत नाही. त्याची “सत्तावृद्धी” हजार वर्षांसाठी टिकेल. आज्ञाधारक मानवांकरिता तो, “अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” या त्याला दिलेल्या नावांप्रमाणे कार्य करील.—यशया ९:६, ७; प्रकटीकरण २०:६.
७. जर आम्ही, ख्रिस्त येशूने आम्हाला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ” न्यावे अशी इच्छा बाळगतो, तर आम्ही वेळ न दवडता काय केले पाहिजे, आणि कोणत्या गोष्टीमुळे येशू आणि यहोवा आमच्यावर प्रीती करू लागतील?
७ आम्हाला, कोकरा, म्हणजे, ख्रिस्त येशू, खऱ्या अंतःकरणाच्या मानवांना ज्या “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ” नेत आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे तर, आम्ही वेळ न दवडता आमच्या कार्याद्वारे हे सिद्ध केले पाहिजे की, आम्ही स्वतः त्याला राजा या नात्याने त्याच्या अधिकाराला आनंदाने अधीन होतो. (प्रकटीकरण ७:१७; २२:१, २; पडताळा स्तोत्र २:१२.) येशूने म्हटले: “माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील; मीहि त्याच्यावर प्रीति करीन व स्वतःला त्याला प्रगट होईन.” (योहान १४:१५, २१) तुम्हाला येशू आणि त्याच्या पित्याने प्रीती करावी असे वाटते का? तर मग त्यांच्या अधिकाराच्या अधीन राहा.
पर्यवेक्षक आनंदाने पालन करतात
८, ९. (अ) ख्रिस्ताने मंडळीच्या उभारणीकरता काय पुरवले आहे, आणि कोणत्या बाबतीत या पुरूषांनी कळपाला कित्ता असे असावे? (ब) ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या अधिनतेला प्रकटीकरणाच्या पुस्तकात कसे चित्रित केले आहे, आणि त्यांनी न्यायालयीन प्रकरणांना हाताळताना ‘आज्ञाधारक अंतःकरणाचा’ शोध कसा घ्यावा?
८ ‘मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे.’ तिचा पर्यवेक्षक या नात्याने, त्याने मंडळीच्या ‘उभारणीकरता’ “मानवांना देणग्या दिल्या” आहेत. (इफिसकर ४:८, ११, १२; ५:२४) ह्या आध्यात्मिकरीत्या वडील जनांना त्यांच्या ‘हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करून नव्हे तर कळपाला कित्ता’ असे होऊन “देवाच्या कळपाचे पालन” करण्यास सांगितले आहे. (१ पेत्र ५:१-३) हा कळप यहोवाचा आहे, आणि ख्रिस्त, त्याचा “उत्तम मेंढपाळ” आहे. (योहान १०:१४) पर्यवेक्षक, यहोवा आणि येशूने त्यांना सोपवलेल्या मेंढरांकडून ऐच्छिक सहकार्याची योग्य अपेक्षा करत असल्यामुळे, त्यांनी स्वतः प्रथम आज्ञाधारकतेचे उत्तम उदाहरण असले पाहिजे.—प्रे. कृत्ये २०:२८.
९ पहिल्या शतकात, अभिषिक्त पर्यवेक्षक, जणू काय ख्रिस्ताच्या उजव्या “हातात” असल्याचे लाक्षणिकपणे चित्रित करत होते. यावरून मंडळीचा मस्तक या नात्याने ख्रिस्ताला त्यांची अधीनता प्रदर्शित होत होती. (प्रकटीकरण १:१६, २०; २:१) त्याचप्रमाणे आजही, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील पर्यवेक्षकांनी, ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाच्या अधीन झाले पाहिजे आणि ‘स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन’ केले पाहिजे. (१ पेत्र ५:६) न्यायाधीन प्रकरणांना हाताळण्याची विनंती केल्यावर त्यांनी, शलमोनाने त्याच्या विश्वासू वर्षांदरम्यान यहोवाला प्रार्थना केली तशी करावी: “आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाईटाचा विवेक करिता येईल.” (१ राजे ३:९) वडिलांना त्यांचे आज्ञाधारक अंतःकरण, यहोवा आणि येशू ज्या दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे पाहतात त्याप्रमाणे पाहण्यास प्रवृत्त करील जेणेकरून, पृथ्वीवर ते जो काही निर्णय घेतील तो, होता होईल तितका, स्वर्गात घेतल्या जाणाऱ्या निर्णयाच्या अनुरूप असेल.—मत्तय १८:१८-२०.
१०. सर्व पर्यवेक्षकांनी, येशूने मेंढरांना ज्याप्रकारे वागवले त्याप्रकारे त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न का करावा?
१० प्रवासी पर्यवेक्षक आणि मंडळीतील वडीलजन, ख्रिस्ताने मेंढरांना जसे वागवले त्याप्रमाणे त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. परूश्यांप्रमाणे येशूने, पाळावयास कठीण असलेल्या नियमांच्या ओझ्याला लादले नाही. (मत्तय २३:२-११) त्याने मेंढरासमान लोकांना म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवास विसावा मिळेल;’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) प्रत्येक ख्रिश्चनाने “स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे” ही गोष्ट खरी आहे. तरीही, पर्यवेक्षकांनी येशूचे उदाहरण ध्यानात ठेवावे. त्यांनी त्यांच्या बांधवांना, त्यांच्या ख्रिस्ती जबाबदारीचा भार “सोयीचा,” “हलका,” आणि उचलण्यात आनंदविणारा आहे असे वाटण्यास त्यांची मदत केली पाहिजे.—गलतीकर ६:५.
ईश्वरशासित अधीनता
११. (अ) एखादी व्यक्ती मस्तकपदाचा आदर करूनही खरोखर ईश्वरशासित कशी होऊ शकत नाही? उदाहरण द्या. (ब) खरोखर ईश्वरशासित होण्याचा काय अर्थ होतो?
११ ईश्वरशासन म्हणजे देवाकडून असलेले शासन. त्यात १ करिंथकर ११:३ मध्ये, व्यक्त केलेल्या मस्तकपदाच्या तत्त्वाचा समावेश आहे. परंतु, त्याचा याहूनही अधिक काही अर्थ आहे. एखादा व्यक्ती मस्तकपदाला आदर दाखवत असल्याचा बहाणा करत असेल परंतु, तरीही या शब्दाच्या पूर्ण अर्थाने ईश्वरशासित नसेल. ते कसे होऊ शकते? याचे उदाहरण देण्यासाठी, लोकशाही म्हणजे लोकांच्या सत्तेखालची राज्यपद्धती, आणि लोकशाहीवादी याचा अर्थ, “लोकशाहीच्या ध्येयांवर विश्वास करणारा” असा होतो. एखादी व्यक्ती कदाचित लोकशाही असल्याचा दावा करीत असेल, निवडणूकांमध्ये भाग घेत असेल, आणि सक्रिय राजकारणी देखील असेल. परंतु, त्याच्या सामान्य जीवन पद्धतीत, लोकशाहीच्या आत्म्याला आणि त्यात गोवलेल्या सर्व तत्त्वांना उद्दामपणे धिक्कारत असेल, तर तो लोकशाहीवादी आहे असे खरेपणाने म्हणता येईल का? त्याचप्रकारे, रास्तपणाने ईश्वरशासित होण्यासाठी, एखाद्याला मस्तकपदाला नाममात्र अधीनता दाखवण्यापेक्षा अधिक काही केले पाहिजे. त्याने यहोवाच्या मार्गांचे आणि गुणांचे अनुकरण केले पाहिजे. त्याने यहोवाद्वारे प्रत्येक मार्गात खरोखर शासित असले पाहिजे. शिवाय, यहोवाने त्याच्या पुत्राला पूर्ण अधिकार देऊन विभूषित केल्यामुळे, ईश्वरशासित होणे म्हणजे येशूची देखील नक्कल करणे होय.
१२, १३. (अ) ईश्वरशासित असण्यामध्ये विशेषतः काय गोवलेले आहे? (ब) ईश्वरशासित अधीनतेत, पुष्कळ निमयांचे पालन करणे गोवलेले आहे का? उदाहरण द्या.
१२ लक्षात असू द्या की, यहोवाला, प्रीतीने ओतप्रोत भरलेली ऐच्छिक अधीनता हवी आहे. विश्वावर शासन करण्याची त्याची हीच पद्धत आहे. तो प्रीतीचा उत्कृष्ट नमुना आहे. (१ योहान ४:८) ख्रिस्त येशू “त्याच्या गौरवाचे तेज, व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप” आहे. (इब्रीयांस १:३) तो, त्याच्या खऱ्या शिष्यांनी एकमेकांवर प्रीती करण्याची मागणी करतो. (योहान १५:१७) यास्तव, ईश्वरशासित होण्यामध्ये केवळ अधीन असणे गोवलेले नाही, तर प्रेमळही असले पाहिजे. या गोष्टीचा पुढीलप्रमाणे सारांश दिला जाऊ शकतो: ईश्वरशासित म्हणजे देवाकडून असलेले शासन; देव प्रीती आहे; यास्तव ईश्वरशासित म्हणजे प्रीतीद्वारे शासन.
१३ एक वडील कदाचित असा विचार करतील की, ईश्वरशासित होण्यासाठी, बांधवांनी सर्व प्रकारच्या नियमांना पाळले पाहिजे. काही वडिलांनी, “विश्वासू आणि बुद्धिमान दास” याकरवी वेळोवेळी येणाऱ्या सूचनांमधून काही नियम बनवले आहेत. (मत्तय २४:४५) उदाहरणार्थ, एकदा असे सुचविण्यात आले होते की, मंडळीतील बांधवांशी आणखी जास्त परिचित होण्यासाठी, राज्यसभागृहात प्रत्येक वेळी एकाच ठिकाणी जाऊन बसणे उचित नाही. ही सूचना व्यवहारिक होती, पक्का नियम नव्हे. परंतु काही वडिलांचा त्या सूचनेला नियमात बदलण्याकडे कल जाईल, आणि मग त्यांना असे वाटेल की जे त्याला अनुसरत नाहीत ते ईश्वरशासित नाहीत. तरीही, काही बंधू आणि भगिणी त्या एका विशिष्ट ठिकाणी का बसू इच्छितात यासाठी पुष्कळ काही उचित कारणे असतील. जर एखादे वडील या गोष्टींचा प्रेमळपणे विचार करत नाहीत तर ते स्वतः तरी खरोखर ईश्वरशासित आहेत का? ईश्वरशासित होण्यासाठी “तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करावे.”—१ करिंथकर १६:१४.
आनंदाने सेवा करणे
१४, १५. (अ) एखादे वडील, यहोवाची सेवा करताना विशिष्ट बंधू किंवा भगिणींचा आनंद त्यांच्यापासून कसा हिरावून घेऊ शकतात, आणि हे ईश्वरशासित का नसेल? (ब) येशूने कसे दाखवले की तो आमच्या सेवेद्वारे व्यक्त केलेल्या प्रमाणापेक्षा, प्रीतीची अधिक गुणग्राहकता बाळगतो? (क) वडिलांनी कोणती गोष्ट विचारात घ्यावी?
१४ ईश्वरशासित होण्याचा अर्थ, यहोवाची सेवा आनंदाने करणे असाही होतो. यहोवा हा “आनंदी देव आहे.” (१ तीमथ्य १:११, NW) त्याच्या उपासकांनी त्याची सेवा आनंदाने करावी अशी इच्छा तो बाळगतो. नियमांवर फाजील जोर देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, इस्त्राएल लोकांना “काळजीपूर्वकतेने” पाळावयास दिलेल्या नियमांमधील एक पुढील प्रमाणे होता: “जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव [यहोवा, NW] ह्याच्यासमोर आनंद कर.” (अनुवाद १२:१, १८) आम्ही यहोवाच्या सेवेत असताना जे काही काम हाती घेतो ते, ओझे समजून नव्हे तर आनंद म्हणून स्वीकारले पाहिजे. पर्यवेक्षक, बांधवांना यहोवाची सेवा करत असताना आनंदी वाटण्यासाठी पुष्कळ काही करू शकतात. उलटपक्षी, जर वडीलजन काळजीपूर्वक नसतील तर ते काही बांधवांचा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेतील. उदाहरणार्थ, वडीलजन कदाचित, मंडळीच्या सरासरी तासापेक्षा अधिक किंवा त्याच्याही पलिकडे साक्षकार्यात तास खर्च करणाऱ्या बांधवांची अधिक प्रशंसा करतील, आणि ज्यांना इतके तास करता येत नाहीत अशांची टीका करतील. परंतु मग, ज्या लोकांना काही विशिष्ट परिस्थितीमुळे अधिक तासांचा अहवाल देता आला नाही अशांवर, या प्रकारच्या बोलण्याचा काय परिणाम होईल? यामुळे त्यांना अनावश्यकपणे दोषी असल्यासारखे वाटून त्यांचा आनंद हिरावून घेतला जाणार नाही का?
१५ जे लोक जाहीर साक्षकार्यात कमी तास खर्च करत असतील ते कदाचित, इतर जणांनी तरुण वय, सुदृढ आरोग्य व, इतर कारणांमुळे प्रचारात खर्च केलेल्या अधिक तासांपेक्षा मोठ्या परिश्रमाला चित्रित करणारे असू शकतील. याबाबतीत, वडिलांना त्यांचा न्याय करण्याचा अधिकार नाही. वास्तविक पाहता, पित्याने येशूला “न्यायनिवाडा करण्याचा अधिकार” सोपविला आहे. (योहान ५:२७) येशूने, त्या गरीब विधवेने भांडारात टाकलेली रक्कम सरासरीपेक्षा कमी होती म्हणून तिची थट्टा केली का? नाही, तो त्या दोन कवड्या तिच्यासाठी किती बहुमूल्य होत्या याविषयी संवेदनाक्षम होता. त्या कवड्या तिची “सर्व उपजिविका” होत्या. त्यांनी यहोवासाठी किती खोलवर प्रीती चित्रित केली. (मार्क १२:४१-४४) मग वडिलांनी, जे प्रेमळपणे प्रयत्न करून “सरासरीपेक्षा” संख्यात्मकरीत्या कमी आहेत अशांविषयी यापेक्षा कमी संवेदनाक्षम असावे का? यहोवाच्या प्रीतीसोबत तुलना केल्यावर, अशाप्रकारचे प्रयत्न सरासरीपेक्षा अधिक असू शकतात!
१६. (अ) जर पर्यवेक्षक त्यांच्या भाषणांमध्ये संख्येचा उपयोग करतात तर, त्यांना समजूतदारपणा आणि उचित समतोल राखण्याची आवश्यकता का आहे? (ब) बांधवांना त्यांची सेवा वाढविण्यासाठी सर्वोत्तम मदत कशी देता येऊ शकते?
१६ संख्या काय पण सरासरींचा देखील उल्लेख केला जाऊ नये अशा नव्या “नियमात” या शेऱ्यांना बदलवून टाकावे का? नाही, मुळीच नाही! मुद्दा हा आहे की, पर्यवेक्षकांनी, बांधवांना त्यांची सेवा आणखी विस्तृत करण्याचे उत्तेजन देण्यात, आणि ते जे काही करतील ते सर्व काही आनंदाने करण्यास त्यांना मदत देण्यात समतोल असले पाहिजे. (गलतीकर ६:४) येशूच्या रूपयांच्या दृष्टांतात, धन्याने त्याच्या दासांना “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” त्याची मालमत्ता सोपवली. (मत्तय २५:१४, १५) त्याचप्रकारे वडिलांनी प्रत्येक राज्य प्रचारकाच्या क्षमतेला विचारात घेतले पाहिजे. यासाठी समजदारीची आवश्यकता आहे. कदाचित काहींना आणखी करण्यासाठी खरोखरच उत्तेजनाची गरज असेल. ते, त्यांच्या कार्याची आणखी चांगली व्यवस्था करण्यास मदत दिल्याबद्दल गुणग्राहकता दाखवतील. काहीही झाले तरी, त्यांना जे काही करता येते ते आनंदाने करण्यास त्यांना मदत करता येत असेल तर, तो आनंद बहुधा त्यांना, त्यांच्या ख्रिस्ती कार्याला शक्य तेथे वाढण्यासाठी दृढ करू शकेल.—नहेम्या ८:१०; स्तोत्र ५९:१६; यिर्मया २०:९.
आनंदी अधीनतेतून येणारी शांती
१७, १८. (अ) आनंदी अधिनता आम्हाला शांती आणि धार्मिकता कशी आणू शकते? (ब) आम्ही जर खरोखर देवाच्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकल्या तर कोणत्या गोष्टी आमच्या होतील?
१७ यहोवाच्या कायदेशीर सार्वभौमत्त्वाला आनंदी अधीनता आम्हाला अपरंपार शांती देते. स्तोत्रकर्त्याने यहोवाला प्रार्थना करताना म्हटले: “तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांति असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तोत्र ११९:१६५) देवाच्या नियमांचे पालन केल्यामुळे आम्ही स्वतःचा फायदा करून घेतो. यहोवाने इस्त्राएल लोकांना सांगितले: “परमेश्वर [यहोवा, NW] तुझा उद्धारकर्ता, इस्त्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्वर [यहोवा, NW] तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.
१८ ख्रिस्ताचे खंडणी बलिदान, देवासोबत शांती राखण्यास आम्हाला साहाय्य करते. (२ करिंथकर ५:१८, १९) आम्हाला जर ख्रिस्ताच्या विमोचन करणाऱ्या रक्तावर विश्वास आहे, व आमच्या दुर्बळतेशी लढत देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला, आणि देवाची इच्छा पूर्ण केली तर दोषी असल्याच्या भावनांपासून आम्हाला मुक्तता मिळते. (१ योहान ३:१९-२३) क्रियांसहित कार्य करणारा अशाप्रकारचा विश्वास, आम्हाला यहोवा समोर धार्मिकतेने उभे राहण्यासाठी मदत करतो आणि “मोठ्या संकटातून” बचावण्याची तसेच, यहोवाच्या नव्या जगात अनंतकाळासाठी जगण्याची आश्चर्यकारक आशा पुरवतो. (प्रकटीकरण ७:१४-१७; योहान ३:३६; याकोब २:२२, २३) या सर्व गोष्टी, आम्ही जर ‘देवाच्या आज्ञा लक्षपूर्वक’ ऐकल्या तरच त्या आमच्या होतील.
१९. आमचा आताचा आनंद आणि सार्वकालिक जीवनाची आशा कशावर अवलंबून आहे, आणि स्तोत्रकर्त्या दाविदाने आमची अंतःकरणपूर्वक भावना कशी व्यक्त केली?
१९ होय, आता आमचा आनंद आणि नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आमची आशा, विश्वाचा सार्वभौम प्रभु या नात्याने यहोवाच्या अधिकाराला आनंदी अधीनता दाखवण्यावर केंद्रित आहे. आपणही, स्तोत्रकर्ता दाविदासारखीच भावना बाळगू शकतो, ज्याने म्हटले: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] महिमा, पराक्रमा, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशांत व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा [यहोवा, NW]; राज्यहि तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुति करितो.”—१ इतिहास २९:११, १३.
लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे
▫ यहोवा, त्याच्या सेवकांनी कोणत्या प्रकारची अधीनता आणि आज्ञाधारकता दाखवावी असे इच्छितो?
▫ येशूला त्याच्या आज्ञाधारकतेचे प्रतिफळ कसे मिळाले, आणि आम्ही आमच्या कार्यांद्वारे काय सिद्ध केले पाहिजे?
▫ सर्व पर्यवेक्षकांनी, येशूने मेंढरांना ज्याप्रकारे वागवले त्याप्रकारे त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न का करावा?
▫ ईश्वरशासित होण्यामध्ये काय गोवलेले आहे?
▫ आनंदी अधीनता आमच्यासाठी कोणते आशीर्वाद आणते?
[२४ पानांवरील चित्रं]
वडीलजन कळपाला, ते जे काही करू शकतात ते सर्व आनंदाने करण्याचे उत्तेजन देतात
[२६ पानांवरील चित्रं]
यहोवाला, जो त्याची आज्ञा हृदयापासून पाळतो तो आवडतो