वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१५ पृ. २८-३१
  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भक्‍तीला जरूर असणारे नाव
  • बेथेल सेवेला यशस्वी बनवणे
  • बेथेल मधील पवित्र सेवेला उच्च आदर
  • ‘देवाच्या घरातील’ आशीर्वाद
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • सर्वांसाठी एक निमंत्रण!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१५ पृ. २८-३१

‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे

“परमेश्‍वराजवळ [यहोवा, NW] मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्‍वराचे [यहोवा, NW] मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.”—स्तोत्र २७:४.

गुणग्राहकता बाळगणाऱ्‍या दावीद राजाने, यहोवाच्या मंदिराकडे आनंदाने किंवा मनोहरतेने पाहिले. तुम्हाला देखील खऱ्‍या उपासनेच्या आजच्या केंद्राविषयी असेच वाटते का? वॉचटावर सोसायटीच्या शाखा दप्तरांच्या ९५ पेक्षा अधिक असलेल्या बेथेल गृहांचा संबंध आमच्या दिवसातील यहोवाच्या उपासनेच्या सुविधांमधील आहे.

जर्मनीत १९४८ मध्ये बेथेल सेवा सुरु केलेली हेल्गॉ सांगते, “मी अनेक वर्षे केलेल्या बेथेल सेवेचे सिंहावलोकन केल्यावर, माझे हृदय खोल कृतज्ञतेने व अधिक गुणग्राहकतेने भरून येते. जे की वर्षानुवर्ष वाढत राहते.” हेल्गॉ, १९९३ च्या सेवा वर्षात जगभरातील १३,८२८ आनंदी बेथेल सदस्यांपैकी ‘यहोवाची मनोहरता पाहणाऱ्‍यांपैकी’, एक आहे. बेथेल या नावाचा अर्थ काय होतो? यहोवाच्या साक्षीदारांमधील प्रत्येक जण, देवाची सेवा बेथेलमध्ये किंवा बाहेर करत असो, या व्यवस्थेकडे कशाप्रकारे गुणग्राहकतेने पाहू शकतो?

भक्‍तीला जरूर असणारे नाव

“बेथेल” हे नाव अगदी उचित आहे, कारण इब्री शब्द बेथ_ʼएलʹ याचा अर्थ, “देवाचे घर” आहे. (उत्पत्ती २८:१९) होय, बेथेल एका सुसंघटित घरासारखे किंवा देवाच्या ‘सुज्ञानाच्या योगे बांधलेल्या घरासारखे’ आहे व ज्यामध्ये त्याची इच्छा केंद्रस्थानी ठेवलेली असते. (नीतीसूत्रे २४:३) हरतॉ गुणग्राहकतेसह म्हणते, “ते कुटुंबासोबत राहण्यासारखे आहे. आम्हाला सुसंघटित असा दैनिक कार्यक्रम आहे.” हेल्गॉप्रमाणेच ती सुद्धा ४५ वर्षांपासून त्याच बेथेलमध्ये सेवा करीत आहे. या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कार्य आणि ठिकाण असते. बेथेल या नावाच्या सुसंगत, चांगली व्यवस्था व संघटनेद्वारे प्रत्येक विभागाचे लक्षण दिसून येते. त्यामुळे शांती राहते, सुवार्तेचा प्रचार प्रभावी रीतीने करण्यास शक्य होते, आणि मंडळ्यांना, ‘देवाच्या घराला’ उच्च स्थानी ठेवण्यास चांगले कारण पुरवते.—१ करिंथकर १४:३३, ४०.

अशा सुविधांची जरुरी का आहे? उदाहरणार्थ, हे मासिक बेथेल छापखान्यात तयार केलेले आहे. येशू ख्रिस्ताने अगाऊपणेच पाहिलेला राज्य संदेशाचा प्रचार व आध्यात्मिक अन्‍नाचे वाटप, या दोन्ही गोष्टी बेथेलसारख्या संघटनात्मक व्यवस्थेला अत्यावश्‍यक बनवतात. तिला सहकार्य देणारे स्वयंसेवक तसेच, यहोवाच्या सर्वच उपासकांचे याविषयी चांगले मत आहे.—मत्तय २४:१४, ४५.

येथील रोजच्या कामाविषयी तुम्हाला अधिक शिकायचे आहे का? हेल्गॉ आणि हरतॉ रहात असलेल्या सर्व निवासस्थानी सकाळी ६:३० वाजता घंटेच्या मंजुळ गजरचा आवाज ऐकू येतो. परंतु, ८०० पेक्षा अधिक असलेले नियमित सदस्य दिवसाची तयारी करण्यासाठी लवकरच उठतात. दैनिक वचनावर चर्चा किंवा प्रातःउपासना करण्यासाठी हे कुटुंब सोमवार ते शनिवार सकाळी ७:०० वाजता जेवणाच्या खोलीत एकत्र होते. त्यानंतर पोषक न्याहरी येते. प्रत्येक दिवशी सकाळी ८:०० वाजता काम सुरू होते, व ते आठ तास चालते, मध्यंतरी, फक्‍त दुपारी जेवणासाठी सुटी असते. (हे कुटुंब शनिवारी बहुतेक करुन फक्‍त अर्धा दिवस काम करते.) स्वयंपाकघर, छापखाना, धुलाईघर, कार्यालये, कारखाना, पुस्तक बांधणी, किंवा इतर कोणत्याही विभागात असो, सर्व ठिकाणी काम करण्यासाठी पुष्कळ आहे.

या कुटुंबातील सदस्य, संध्याकाळी आणि सप्ताहांतादरम्यान, सभा व जाहीर प्रचारासाठी स्थानिक मंडळीसोबत सहवास ठेवतात. ह्‍या मंडळीत अनेक बेथेल बांधव, वडील किंवा सहाय्यक सेवक आहेत. दोन्ही गट परस्परांना आदर व समजदारीने एक दुसऱ्‍यांसोबत एका शरीरासारखे सुसंगत वागत असल्यामुळे, स्थानिक साक्षीदार या सहकार्याबद्दल त्यांची खरेपणाने गुणग्राहकता बाळगतात. (कलस्सैकर २:१९) प्रत्येक बेथेल सदस्य, ‘देवाच्या घरातील’ नेमणूकीला इतर सर्व कार्यापेक्षा प्राधान्य देतो. तरीपण, मंडळीत प्रचारासाठी आवेश व त्यामध्ये भाग घेण्याची संतुलित मनोवृत्ती बेथेल सदस्याची आध्यात्मिकता मजबूत करु शकते, त्याचा आनंद वाढवू शकते, व त्याला कुटुंबाचा अधिक उत्पादनक्षम सदस्य बनवते. पूर्ण जीवाने भक्‍ती करण्याच्या नावाचा संबंध असणाऱ्‍या ‘घरात’ काम करणे किती महत्त्वाचे आहे!

बेथेल सेवेला यशस्वी बनवणे

पुष्कळ यहोवाच्या साक्षीदारांना, त्यांच्या जीवनात बेथेल सेवा यशस्वी बनविण्यासाठी कशाने मदत केली? अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या फ्रान्स मधील बेथेल कौटुंबिक सदस्यांनी अशाप्रकारे विवेचने केली: “यहोवासाठी प्रीती. तो आम्हाला जेथे कोठे कार्य नेमून देतो तेथे निरंतर राहण्याचा निश्‍चय करणे; संस्थेने दिलेल्या मार्गदर्शनाला लीनता, अधीनता, आणि आज्ञाधारकपणा दाखविणे.” (डेनिस) “पौलाने रोमकर १२:१० मध्ये: ‘एकदुसऱ्‍याला आदराने थोर मानण्यात पुढाकार घ्या’ या सांगितलेल्या तत्त्वाला आदर दाखविणे किती महत्त्वपूर्ण आहे, हे मी पाहिले. हे शास्त्रवचन आम्हाला, आमच्या वैयक्‍तिक मतांचा स्वीकार करण्याची जबरदस्ती करण्यापेक्षा, दुसऱ्‍यांच्या मतांचा विचार करण्याचे महत्त्व दाखवते. दुसऱ्‍या शब्दात सांगायचे झाल्यास, प्रतिष्ठा मिळवण्याचा शोध न करणे होय.” (जीन-जॅकस्‌) “आम्ही दैहिक, मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास, बेथेल सेवेसाठी असलेला आमचा आदर गमावू शकतो,” बार्बरा म्हणते, “कारण तो आम्हाला, यहोवा त्याच्या संघटनेला मार्गदर्शन करीत असल्याबद्दलची दृष्टी गमावण्याकडे निरवू शकतो. आपण, इतरांच्या अपरिपूर्णतेमुळे अडखळलो तर असा आदर गमावला जाऊ शकतो.”

बेथेलमधील प्रत्येक जण अपरिपूर्ण असल्यामुळे, सहवास ठेवण्यास काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. तरुण, तसेच अलिकडेच आलेल्यांनी त्यांच्या वयोमानाच्या गटापुरतीच त्यांची संगती मर्यादित ठेवू नये. कुरकूर करणे किंवा नकारात्मक विचार करणारे बेथेलमध्ये किंवा मंडळीत उभारणीकारक सहवास ठरू शकत नाहीत. दुसऱ्‍या बाजूला पाहता, याकोब ३:१७ मध्ये वर्णन केलेल्या ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानाचे’ अनुकरण करण्यामुळे आशीर्वाद येतात. कारण ते “शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ” असे आहे. हे गुण व सोबत सहनशीलता आणि दया या गोष्टी ‘देवाच्या घरात’ ठळकपणे दिसतात. ते एखाद्याला तेथे राहण्यासाठी आनंदी आणि उत्साही बनवतील. इतकेच नव्हे तर, साक्षीदार नसलेले अभ्यागत अनेकदा, सदस्यांचे चांगले वर्तन, मैत्रीभाव आणि आनंदी आत्मा याबद्दल, प्रशंसा व्यक्‍त करतात.

७० वयोमान असलेली ॲनी १९५६ पासून जर्मनीच्या बेथेल कुटुंबातील एक सदस्य या नात्याने सेवा करीत आहे. तिने सेवा करण्याच्या स्वेच्छेला कसे टिकवले आहे, त्याचा खुलासा देते: “माझ्या आध्यात्मिक हितासाठी मी संस्थेच्या प्रकाशनासोबत अद्ययावत राहण्यास, सभांना नियमित उपस्थित राहण्यासाठी, आणि नियमित प्रचारकार्यात भाग घेण्यासाठी अधिक प्रयत्न करते. तसेच रोज सकाळी व्यायाम करण्याद्वारे, लिफ्टचा वापर न करण्याद्वारे आणि विशेषपणे क्षेत्र सेवेसाठी अनेकदा शक्यतो चालत जाण्यामुळे मी सुदृढ स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते.”

बेथेलमधील जीवनाचा अनुभव घेतलेले अनेक जण ॲनी बरोबर सहमत असतील. ते कधीही शिकण्याचे किंवा काम करण्याचे थांबवत नाहीत. शारीरिक आरोग्य त्यांना पुरेशी झोप व काही प्रमाणात व्यायाम तसेच खाण्यापिण्यात संयम राखण्याची त्यांच्याकडून मागणी करत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते वैयक्‍तिक प्रार्थना आणि पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत नाही.

बेथेल मधील पवित्र सेवेला उच्च आदर

“तुम्ही कोठे काम करता?” हा प्रश्‍न बेथेल सदस्यांना अनेकदा विचारला जातो. कामाच्या नेमणूका भिन्‍न असतात, परंतु सर्वांनी प्रत्येक नेमणूक आदरणीय समजली पाहिजे. का बरे? कारण प्रत्येक नेमणूक—आध्यात्मिक भोजन असणाऱ्‍या पुस्तकांच्या छपाईची यंत्रे चालवणे, कपडे धुणे, कुटुंबासाठी जेवण तयार करणे व स्वच्छता ठेवण्याचे काम असो किंवा ऑफिसमधील काम—ही सर्व कामे पवित्र सेवा आहेत. वर सांगितल्याप्रमाणे ख्रिश्‍चन यात कोणताही भेदभाव करीत नाहीत. हे लक्षात असू द्या की, मंदिरामध्ये, अंगणात, किंवा जेवणाच्या खोलीत असो, लेवी आणि याजक करीत असलेली सर्व आवश्‍यक कामे यहोवासाठी पवित्र सेवा असल्याचे समजले जात असे. त्यामध्ये प्राण्यांना मारुन त्यांना बलिदानासाठी तयार करणे, तेलाचे दिवे भरून ठेवणे, शिवाय साफसफाईचे काम करणे व पहारेकऱ्‍याची नेमणूक पार पाडण्याचाही समावेश होतो. अशाचप्रकारे, बेथेलमधील प्रत्येक नियुक्‍ती “प्रभूच्या कामात” समाधानी आणि खऱ्‍या योग्यतेचे कार्य आहे, म्हणूनच ती एक असाधारण सुसंधी आहे.—१ करिंथकर १५:५८.

‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहण्यास अडथळा आणणाऱ्‍या एका लक्षणाचा थोडक्यात विचार करा. बेथेलमध्ये असणाऱ्‍या व नसणाऱ्‍या सर्व ख्रिश्‍चनांनी, ‘हाडे कुजवणाऱ्‍या’ हेवा आणि मत्सरापासून दक्ष राहिले पाहिजे. (नीतीसूत्रे १४:३०) कोणालाही बेथेल सदस्याच्या सेवेच्या सुसंधीबद्दल मत्सर बाळगण्याचे कारण नाही. शिवाय, बेथेल कुटुंबात, देहाचे कर्म असलेल्या मत्सराला काहीच स्थान नाही. इतरांना अधिक सुसंध्या दिल्या जातात व एखाद्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे एखाद्याला वाटत असल्यास—नम्रतेने थांबून राहा, हा चांगला सल्ला आहे. बेथेलमध्ये आर्थिक पार्श्‍वभूमीची मोठ्या प्रमाणात तफावत असणाऱ्‍या व्यक्‍ती अधिक जवळ राहतात. जर एखाद्याने त्याच्या “परिस्थितीची तुलना दुसऱ्‍याच्या परिस्थितीसोबत केल्यास” ते किती नाउमेद करणारे असेल! “अन्‍नवस्र असल्यास” तेवढ्यात तृप्त राहिल्याने ‘देवाच्या घरात’ अनेक दशके विश्‍वासूपणे सेवा करण्यास त्यांना मदत मिळाली आहे.—गलतीकर ५:२०, २६; ६:४; १ तीमथ्य ६:८.

बेथेलमध्ये देवावरील व शेजाऱ्‍यावरील निःस्वार्थी प्रीतीमुळे—विनामूल्य केल्या जाणाऱ्‍या सेवेबद्दल यहोवाचे साक्षीदार तसेच इतर लाखो लोकांना त्याचा फायदा मिळत आहे. बेथेल गृहे आणि वॉचटावर सोसायटीचे छापखाने, इतर ईश्‍वरशासित सुविधांप्रमाणेच ऐच्छिक अनुदानाकरवी चालविले जात आहेत. (२ करिंथकर ९:७) दावीद राजा, राजपुत्र, आणि इस्राएलाचे सरदार व शताधिपती यांच्याप्रमाणे संस्थेला नैतिक आणि आर्थिक बळ पुरविण्याद्वारे आम्ही ‘देवाच्या घराला’ अधिक सन्मान दाखवून गुणग्राहकता बाळगू शकतो. (१ इतिहास २९:३-७) बेथेलमध्ये ‘यहोवाचे मनोहर रूप पाहणे’ कसे शक्य आहे ते आता आपण पाहू या.

‘देवाच्या घरातील’ आशीर्वाद

संमेलनाला उपस्थित राहत असताना, तुमच्या आवतीभोवती यहोवाचे आनंदी उपासक असल्यामुळे तुम्हाला अधिक समाधानी असल्याचे वाटते का? बेथेल सदस्याला, प्रत्येक दिवशी बांधवांच्या समुदायात यहोवाची सेवा करण्याची सुसंधी असते, याची जरा कल्पना करा! (स्तोत्र २६:१२) ते आध्यात्मिक वाढीसाठी किती उत्कृष्ट भवितव्य देते! एका बांधवाला त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाला घडविण्यास मदत करण्यासाठी बाहेर तीन वर्षे लागत असताना बेथेलमध्ये त्याला केवळ एकच वर्ष लागले, असे त्याने म्हटले. का बरे? कारण इतर कोठेही प्रौढ ख्रिश्‍चनांच्या व्यक्‍तिमत्वाचा विश्‍वास ग्रहण करण्यास व त्याचे अनुकरण करण्यास त्याला संधी मिळाली नाही.—नीतीसूत्रे १३:२०.

बेथेलमध्ये एखाद्या व्यक्‍तीला जणू काय अनुभवी सल्लागारानी वेढलेले आहे. याशिवाय, प्रातः उपासनेत उत्कृष्ट प्रकारे तयारी केलेली विवेचने ऐकण्यामुळे तसेच, बेथेल कुटुंबाचा वॉचटावर अभ्यास व सोमवारी संध्याकाळी भाषणे ऐकण्याद्वारे लाभ मिळतो. नवोदितांना बेथेल प्रवेश धारकांसाठी प्रशालेमधून प्रशिक्षण मिळते व पहिल्या १२ महिन्यात पूर्ण पवित्र शास्त्राचे वाचन करण्याची नियुक्‍ती मिळते.

इतर देशातील भेट देणाऱ्‍यांकडील अहवाल आणि अनुभव देखील आणखी उत्तेजन देत असतात. शिवाय, नियमन मंडळाचे सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी शाखा दप्तरांना भेट देत असतात. हेल्गॉ सांगते की, “त्यांना अधिक काही करावयाचे असताना देखील, मित्रत्त्वाचे शब्द व स्मित हास्य करण्यास या बांधवांकडे नेहमीच वेळ असतो.” अशा निष्ठावान पुरूषांच्या तजेलदार व नम्र प्रवृत्तीला वैयक्‍तिकपणे पाहणे किती उत्तेजनदायक आहे बरे!

विशेषपणे, बेथेलमध्ये एखाद्याला, देव त्याच्या संघटनेला कसे चालवतो तसेच त्याचा पवित्र आत्मा ऐच्छिक अंतःकरणे व हातांना कामाला कसे प्रवृत्त करतो हे बारकाईने पाहता येईल. फ्रान्समधील बेथेलमध्ये १९४९ पासून, सेवा करीत असलेला एक बांधव खुलासा करतो, “बेथेलमध्ये एखाद्याला ‘कार्याच्या केंद्रस्थानाजवळ असल्याचे वाटते.’” तो पुढे असे म्हणतो: “मी खचित सांगतो की, बेथेल हे पूर्ण वेळेच्या सेवेचा एक प्रकार आहे, ते मला यहोवाच्या सेवेत अधिक वेळ व बळ समर्पित करण्यास तसेच, अनेक बांधवांची सेवा करण्याची परवानगी देते.” आमच्या जीवनात, देवाची इच्छा करण्याचा तोच खरा उद्देश नाही का? बेथेलमध्ये एक व्यक्‍ती ‘दिवसभर उपकारस्तुती’ करु शकते. केवढा तो आशीर्वाद!—स्तोत्र ४४:८, NW.

आम्हाला हे कळून आले की, बेथेल गृहामध्ये काम करत असलेली व्यक्‍ती यहोवाच्या मनोहरतेला पाहून अधिक प्रमाणात आशीर्वाद प्राप्त करु शकते. (इब्रीयांस ६:१०) ‘देवाच्या घरातील’ सेवा तुम्हासाठी बहुमानाची आहे का? यहोवाच्या साक्षीदारांपैकी कमीत कमी १९ वय असणारे व चांगल्या आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्याचा आनंद घेणारे तसेच, तीमथ्याप्रमाणे ‘बंधूनी नावाजलेले’ असणारे, बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी अर्ज करु शकतात. (प्रे. कृत्ये १६:२) वर उद्धृत केल्याप्रमाणे, अनेकांनी बेथेल सेवेला त्यांचे आयुष्यभराचे काम बनविले आहे. त्यांच्याठायी स्तोत्रकर्त्याप्रमाणे, ‘आयुष्यभर यहोवाच्या घरात वस्ती करण्याची’ उत्कट ओढ असल्याची वास्तविकता बनली आहे.

बेथेलमधील बंधू आणि भगिणी त्यांची नियुक्‍ती स्वेच्छेने आणि आनंदाने पूर्ण करताना दाखवत असलेल्या स्वार्थत्यागी आत्म्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्याबद्दल अधिक आदर आहे. आम्ही यहोवाची सेवा बेथेलमध्ये किंवा इतर ठिकाणी करीत असलो तरी, दाविदाप्रमाणे, आम्हा प्रत्येकाजवळ—‘यहोवाच्या घराबद्दल’ गुणग्राहकता, किंवा मनोहरता वाटण्याचे चांगले कारण आहे.

[३१ पानांवरील चित्रं]

या ख्रिश्‍चनांनी, जर्मनीतील बेथेलमध्ये अनेक दशकांपासून पवित्र सेवा करण्यात आनंद उपभोगला आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा