वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१५ पृ. ३२
  • अब्राहाम येथे पुरले, तरीही जिवंत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अब्राहाम येथे पुरले, तरीही जिवंत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१५ पृ. ३२

अब्राहाम येथे पुरले, तरीही जिवंत?

अनेक शतकांसाठी, यहुदी, मुस्लिम, आणि ख्रिश्‍चनांनी या ठिकाणाला भेट दिली आहे.

तुम्ही, यरुशलेमेच्या दक्षिणेकडील, प्राचीन हेब्रोन शहरातील या जागेला भेट देऊ शकता. त्या बांधकामाला हरीम एल-खलील आणि कुलपित्यांचे थडगे अशा दोन नावांनी संबोधले जाते. होय, अब्राहाम, इसहाक, आणि याकोब या कुलपित्यांना तसेच अनुक्रमे त्यांच्या पत्नी, सारा, रिबका, आणि लेआ यांचे हे कबरस्थान आहे असे फार मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते.

पवित्र शास्त्रातून याची आठवण करा की, अब्राहामाची प्रिय पत्नी सारा हिचा मृत्यू झाला तेव्हा त्याने हेब्रोनजवळ, मकपेला नावाची गुहा आणि काही जमीन कबरस्थानासाठी विकत घेतली. (उत्पत्ती २३:२-२०) नंतर, अब्राहामाला सुद्धा इतर कौटुंबिक सदस्यांप्रमाणे येथे पुरण्यात आले. अनेक शतकांनंतर, हेरोद राजाने त्या पारंपारिक कबरस्थानाच्या भोवती एक प्रभावशाली इमारत बांधली. कालांतराने विजेत्यांनी, त्यांच्या स्वतःच्या धार्मिक विश्‍वासांना प्रतिबिंबित करण्यासाठी त्यामध्ये बरेच फेरफार व परिवर्तन केले.

आतमध्ये प्रवेश केल्यावर, तुम्हाला सहा स्मारक (स्मारक-शिल्प किंवा रकामी थडगी) दिसून येतील. आतील चित्रात अब्राहामाचा पुत्र, इसहाक याचे स्मारक असल्याचे दिसते. त्याच्याजवळ जमिनीत खड्डे आहेत, ज्यांचा उपयोग खाली जे आहे तेथे जाण्यासाठी केला जात होता. संशोधकांना कप्पे सापडले आहेत, ज्यामध्ये अनेक प्राचीन हाडे राहिली असतील.

अब्राहामाविषयी काय? त्याला जर या गुहेत या खालच्या कप्प्यात पुरले गेले आहे तर मग, त्याचा मृत्यू होऊन तर अनेक वर्ष झाली आहेत, हो ना? अनेक पर्यटक हे कबूल करतील. तरीही, अब्राहामापेक्षाही एका थोर संदेष्ट्याने म्हटले की अब्राहाम जणू काय अजूनही जिवंत आहे. ते कसे? शिवाय या धारणेचा तुमच्या विश्‍वासावर काय परिणाम होईल?

कृपया, “तुमचे मृत प्रियजन—ते कोठे आहेत?” (पृष्ठ ३) हा लेख वाचा. तो लेख, अब्राहाम जिवंत असण्याविषयी त्या थोर संदेष्ट्याने काय म्हटले ते सादर करतो. ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी मोठ्या मोलाची असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा