फिजी येथील पाण्यात “मासेमारी” करणे
फिजी—हे नाव ऐकल्यावर दक्षिण प्रशांत महासागराच्या नंदनवनाचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. निळसर-हिरवे पाणी, प्रवाळ खडक, नारळाची झुलणारी झाडी, हिरवेगार पर्वत, उष्णकटिबंधातील मासे, परदेशीय फळे आणि फुले. तुम्हाला या सर्व गोष्टी, दक्षिण प्रशांत महासागरात, न्यू झीलंडच्या उत्तरेस १,८०० किलोमीटर्सच्या ३०० द्वीपसमूहावर विपुलपणे सापडतील. यास्तव, फिजी, उष्णकटिबंधीय नंदनवन आहे असे सर्वांचे स्वप्न असेल हे तुम्ही कबूल कराल.
तथापि, फिजी त्याच्या नैसर्गिक सौंदर्याहून अधिक विलोभनीय आहे. होय, प्रवाळ खडकांमध्ये ज्याप्रकारे अनेक जातीचे मासे आहेत, त्याप्रकारे जमीनीवर देखील अनेक प्रकारच्या विविध गोष्टी आहेत. फिजीतील विभिन्न वंशातील वैधर्म्य, कदाचित, दक्षिण प्रशांत महासागरात अजोड आहेत. त्याच्या सुमारे ७,५०,००० रहिवाश्यांमधील सर्वात मोठे दोन गट, मूळचे फिजी ज्यांचा उगम मेलानीशियन आहे, आणि दुसरा भारतीय फिजीयन, जे ब्रिटिश वसाहतींच्या दिवसामध्ये भारतातून आलेल्या भारतीय कामगारांचे वंशज आहेत. परंतु तेथे बन्बेयिन्स, चिनी, युरोपियन, गिलबर्टिज, रोटुमन्स, तुवालुवन्स आणि इतर लोक राहतात.
या बहुसांस्कृतिक समाजात, यहोवाचे साक्षीदार “मासे धरण्याच्या” कामात व्यग्र आहेत. (मार्क १:१७) अशा विभिन्न समाजात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हे उत्प्रेरक कार्य आहे. प्रथम, तेथे भाषा आणि सांकृतिक अडखळणे आहेत, ज्यांच्यावर मात करणे आवश्यक आहे. इंग्रजी ही शासकीय कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता पावलेली असली तरी अनेक वेळा, फिजीयन, हिंदी, रोटुमन किंवा इतर भाषाही वापराव्या लागतात.
विविध धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांसोबत संभाषण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरावे लागतात. अनेक मूळचे फिजियन लोक आणि इतर बेटांवर राहणारे लोक विविध ख्रिस्ती पंथांचे आहेत. भारतीय लोकसंख्येत, हिंदु, मुस्लिम व शीख आहेत, यामध्ये बहुतेक हिंदु आहेत. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये अनेक चर्च आहेत, परंतु फिजीच्या दोन सर्वात मोठ्या द्वीपांवर, अनेक हिंदु मंदिरे आणि मुस्लिम मशिदी वैधर्म्य दाखवतात.
अनेक स्थानिक साक्षीदार, इंग्रजी, फिजीयन, हिंदी या तीन मुख्य भाषा बोलणाऱ्यात लहानाचे मोठे झाले आहेत. या कलेमुळे “मासे धरण्याच्या” कामात खूप लाभ होतो. काही वेळा तर, लोक, एका फिजीयन माणसाला अस्खलित हिंदी बोलताना आणि एका हिंदु व्यक्तीला अस्खलित फिजीयन बोलताना पाहून आश्चर्यचकित होतात. सांकृतिक, धार्मिक, आणि भाषिक भेदांचा सामना करत असताना, ‘[सुवार्तेची] इतरांबरोबर भागिदारी’ करण्यासाठी अष्टपैलू पवित्र्यांची गरज आहे.—१ करिंथकर ९:२३.
फिजीयन खेड्यात “मासेमारी” करणे
मूळचे फिजीयन लोक स्नेही, आतिथ्यशील आहेत. एका शतकापेक्षा काही अधिक काळापूर्वी, जमातींमध्ये संघर्ष सर्वत्र पसरलेला होता याची कल्पना करणे देखील कठीण जाते. वास्तविक पाहता, युरोपियनांसोबत पहिल्यांदा संपर्क आला तेव्हा, फिजी स्वजातिभक्षक द्वीपसमूह म्हणून ओळखला जात होता. मग हळूवारपणे, एका टोळीप्रमुखाचे प्राबल्य आणि त्याच्या धर्मांतरामुळे तेथील संघर्ष आणि स्वजातिभक्षकपणा संपूर्ण नष्ट झाला. बाबुऑन पोटभाषा विस्तृतपणे समजली जात असली तरी, आदिवासी जमातींमधील भेद, विविध प्रांतात सापडणाऱ्या अनेक पोटभाषा टिकून राहिल्या आहेत.
फिजीची राजधानी, सूव्हा या शहरासोबत, संपूर्ण फिजीमध्ये अनेक शहरे आहेत. बहुतेक फिजीयन लोक, जमातीच्या प्रमुखाच्या नियंत्रणाखाली, खेड्यांच्या आदिवासी जमातीत राहतात. त्या जमातीच्या प्रमुखाला तुरॉग्नॉ नी कॉरो असे म्हटले जाते. ‘मासेमारीच्या’ कार्यासाठी एखाद्या खेड्यात प्रवेश करताना, या प्रमुखाला भेटून त्याच्याकडून विविध बूर किंवा स्थानिक घरांना भेटण्याची परवानगी काढण्याची तेथे रूढी आहे. क्वचितच, यहोवाच्या साक्षीदारांच्या विरोधात असणाऱ्या गावातील पाळक वर्गामुळे परवानगी नाकारली जाते. एका फिजीयन घरात प्रवेश करणे कशासारखे आहे?
बूरमध्ये प्रवेश केल्यावर, आम्ही जमिनीवर मांडी घालून बसतो. येथे, व्यग्र असलेल्या पाश्चात्य लोकांच्या आस्थेला मिळवण्यासाठी लक्षपूर्वकतेने शब्दांची मांडणी करून प्रस्तावना जशी द्यावी लागते, त्याप्रमाणे द्यावी लागत नाही. देवाविषयी बोलणाऱ्या कोणाचेही येथे स्वागत केले जाते. घरमालकाला जेव्हा त्याचे पवित्र शास्त्र घेण्यास सांगितले जाते तेव्हा, “तुलो” (मला क्षमा करा) असे म्हणून तो त्याचे फिजीयन पवित्र शास्त्र फळीवरून आणतो आणि भेट देणारा सेवक विविध वचने त्याला वाचावयास सांगतो तो ती अगदी उत्साहाने वाचतो. परंतु, ही आतिथ्यशील आणि आदरणीय फिजीयन मनोवृत्ती, एका वेगळ्या मार्गाने आव्हान सादर करते. घरमालकांना संभाषणात सामील करण्यासाठी, जो युक्तीवाद चालू आहे त्याला अनुसरण्यास उत्तेजन देण्यासाठी, किंवा त्यांना त्यांच्या स्वतःच्या विश्वासांची तुलना पवित्र शास्त्रासोबत करणे जरूरीचे आहे हे दाखण्यास त्यांची मदत करण्यासाठी योग्य समज आणि युक्तीची गरज आहे.
फिजीयन घरमालक सर्वसामान्यपणे, सामाजिक परिस्थिती किंवा वादविषयांवर बोलण्याऐवजी तात्त्विक विषयांवर चर्चा करण्यास अधिक रस घेतात. वास्तविक पाहता, फिजी येथील १,४०० पेक्षा अधिकांमधील अनेक यहोवाचे सक्रिय साक्षीदार, नरक कोणत्या प्रकारचे स्थळ आहे? स्वर्गात कोण जातात? व या पृथ्वीचा नाश होईल का? यासारख्या प्रश्नांची चर्चा केल्यामुळे पवित्र शास्त्र सत्यामध्ये अधिक आस्थेवाईक झाले. परंतु, आस्था दाखवल्यावर त्याचा मागोवा घेण्यासाठी, अनुकूलनक्षमता आणि टिकाव याची गरज आहे. ठरवलेल्या वेळेला भेटण्याची बोलणी केल्यानंतर एखादा तेथे गेल्यावर, घरमालक टेटेला (मळ्यात) किंवा कोठेतरी इतर ठिकाणी गेलेला असेल हे त्याला दिसून येईल. परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्याला भेटीची कृतज्ञता नाही, तर, ते लोक वेळेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. अर्थात, स्थानिक साक्षीदारांसाठी ही गोष्ट काही असामान्य नाही. ते दुसऱ्या वेळेला भेट देऊन त्यांचा प्रयत्न चालू ठेवतात. तेथे गल्लींना किंवा घरांना नावे नसल्यामुळे, पुनर्भेट करणाऱ्यांना चांगल्या स्मरणशक्तीची आवश्यकता लागते.
पॉलिनीशीयन पद्धतीत “मासेमारी” करणे
आता आपण, एखादे प्रवासी पर्यवेक्षक किंवा विभागीय पर्यवेक्षक रोटूमा येथील छोट्याशा मंडळीला भेट देत असताना त्यांच्यासोबत “मासेमारी” साठी जाऊ या. ज्वालामुखीपासून बनलेली ही बेटे उत्तर फिजीपासून ५०० किलोमीटर्स दूर आहेत. तेथे जाण्यासाठी आम्ही, १९ आसने असलेल्या एका विमानाने प्रवास करतो. तेथील मुख्य बेट फक्त ५० चौरस. किलोमीटर्सचे आहे व त्यावर जवळजवळ ३,००० लोकांची वस्ती आहे. किनाऱ्याच्या जवळून रेताड रस्ता आहे, जो २० खेडेगावांना जोडतो. रोटुमावर फिजी शासन करत असले तरी, तेथे एक वेगळीच संस्कृती आणि भाषा आहे. पॉलिनीशीयन उगमाचे असल्यामुळे तेथील लोकांचा बांधा, मेलानीशीयन फिजीयन लोकांपासून फार वेगळा आहे. धर्माविषयी बोलायचे झाले तर, तेथील बहुतेक जण एकतर रोमन कॅथलिक किंवा मेथडिस्ट आहेत.
विमान जसजसे खाली येते व उतरण्यासाठी सज्ज आहे, तसे आम्ही बेटावरची हिरवीगार वनस्पती पाहतो. नारळाच्या झाडाचे पर्णाकार अवयव सगळीकडे पाहावयास मिळतात. आठवड्यातून एकदाच येणाऱ्या विमानाचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमूह तेथे उपस्थित आहे. त्यांच्यामध्ये साक्षीदारांचा एक गट आहे. आमचे उबदारपणे स्वागत होते, आणि पुष्कळांच्या हातात हिरवे नारळ जणू काय “डोळे” उघडे करून आमच्यासाठी तयार आहेत.
थोडेसे फिरल्यावर, आम्ही आमची राहण्याची सोय जेथे केली होती तेथे येतो. जमीनीत खड्डा करून गरम दगडांवर तयार केलेले अन्न आम्हाला दिले जाते. अग्नीवर भाजलेले डुकराचे मांस, कोंबडी, तळलेला मासा, चिमोरे, आणि तेथे सर्रासपणे खाण्यात येणारे सल्गम, तारो, हे आमच्यासमोर वाढून ठेवलेले आहे. ती एक मेजवानीच होती, आणि तीही लहान नारळाच्या झाडाखाली तिची रचना, अगदी नंदनवनासारखी होती!
दुसऱ्या दिवशी आम्ही खेडेगावातील लोकांना भेटतो, ज्यांना रोटुमन भाषेत हुआँग्नॉ असे म्हटले जाते. आम्ही जसे पहिल्या घरात जातो तेवढ्यात, डुक्करवाड्यातून निसटून आलेले एक डुकराचे पिल्लू, आमच्यासमोरून किंचाळत जाते. घरमालकाने आम्हाला येताना पाहिल्यामुळे, स्मित हास्याने तो दार उघडतो, व आम्हाला रोटुमन भाषेत “नॉइयॉ!” म्हणून आमचे स्वागत करून आम्हाला बसण्यास सांगतो. आमच्यासमोर एका ताटात पिकलेली केळी ठेवली जातात, आणि आम्हाला कच्च्या नारळाचे पाणी पिण्यास दिले जाते. रोटुमा मध्ये सर्वात पहिल्यांदा आतिथ्य केले जाते.
येथे अज्ञेयवादी किंवा उत्क्रांतीवादी लोक नाहीत. सर्व जण पवित्र शास्त्रामध्ये विश्वास ठेवतात. पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश यासारखे विषय त्यांचे लक्ष सहजपणे काबीज करते. घरमालक, पृथ्वीचा कधीच नाश होणार नाही तर, धार्मिक लोकांची अनंतकाळासाठी लोकवस्ती असेल हे शिकल्यावर आश्चर्यचकीत होतो. (स्तोत्र ३७:२९) या मुद्याला पवित्र शास्त्रातून वाचले जात असताना तो त्याच्या पवित्र शास्त्रात अगदी बारकाईने ते पाहतो, आणि मग जेव्हा आम्ही त्याला पवित्र शास्त्र आधारित साहित्य देतो तेव्हा तो ते उत्साहाने स्वीकार करतो. आम्ही जाण्याची तयारी करतो तेव्हा तो, आम्ही तेथे आल्याबद्दल आमचे आभार मानतो आणि रस्त्यात जाताना खाण्यासाठी आम्हाला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पिकलेली केळी देतो. त्यामुळे, येथे प्रचार कार्य करताना एखाद्याचे वजन फार लवकर वाढू शकते!
भारतीय समाजासोबत जुळवून घेणे
दक्षिण पॅसेफिक महासागरातील इतर पुष्कळ बेटे असलेली रा बहुवंशिक असली तरी, फिजी यामध्ये सर्वात ठळकपणे दिसतो. मेलानीशीयन, मॅक्रोनीशीयन, आणि पॉलिनीशीयन संस्कृतींच्या शेजारी, आशियातील एका संस्कृतींचे प्रतिरोपन देखील येथे केलेले आहे. १८७९ व १९१६ च्या दरम्यान, भारतातून करारबद्ध कामगारांना ऊसाच्या मळ्यात काम करण्यासाठी आणले गेले. ही व्यवस्था जिला गीरमीट (करारनामा) म्हटले जाते, त्या करारनाम्यामुळे हजारो भारतीय फिजीत येऊ लागले. फिजी राष्ट्राचा मोठा खंड या कामगारांच्या मिळून बनलेला आहे. त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा, व धर्म त्यांच्यासोबतच जोपासला आहे.
फिजीच्या मुख्य बेटाच्या वाताभिमुख बाजूला, लउटोका नावाचे शहर आहे. ते फिजीच्या साखर कारखान्याचे केंद्र आहे व त्या राष्ट्रातील बहुतेक भारतीयांच्या लोकसंख्येचे घर आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन मंडळीतील सदस्यांना त्यांच्या ‘मासेमारीच्या’ कार्याला जुळवून घेण्याची गरज आहे. घरोघर जात असताना, एखाद्याला घरमालकाचा धर्म किंवा जात यानुसार त्याचे विषय बदलण्यात तरबेज असणे आवश्यक आहे. चला आपण स्थानिक साक्षीदारांच्या एका गटात जाऊ व ते लउटोकाच्या बाहेरील बाजूला, ऊसाच्या मळ्यात इतरत्र पसरलेल्या घरांना भेटी देणार आहेत.
आम्ही पहिल्या घराजवळ येत असताना, आम्ही समोरील अंगणाच्या कोपऱ्यातील बांबूच्या खांबांवर लाल फडकी बांधलेली पाहतो. यावरून ते कुटुंब हिंदु आहे हे कळून येते. अनेक हिंदुंची घरे त्यांच्या दैवतांच्या चित्रांनी सजवलेली असतात. प्रत्येकांना आपआपल्या पसंतीची दैवते आहेत; काहींना कृष्ण आवडतो, अनेकवेळा तेथे लहान देव्हारा देखील असतो.a
बहुतेक हिंदुंचा असा विश्वास आहे की, सर्व धर्म चांगले आहेत, केवळ उपासना करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. अशाप्रकारे, एखादा घरमालक सभ्यतेने ऐकेल, साहित्याचा स्वीकार करील, काही अल्पोपहार देईल, व त्याने त्याचे कर्तव्य केल्याचे समाधान मानून घेईल. घरमालकांना आणखी अर्थभरीत चर्चेत आणण्यास योग्य प्रश्न उभे करण्यासाठी, त्यांच्या विश्वासाचा भाग असलेल्या काही कहाण्या जाणणे बहुधा मदतदायी ठरते. उदाहरणार्थ, काही अशा कहाण्या आहेत ज्यात त्यांच्या दैवतांनी अनेक लोक हरकत घेतील अशी कृत्ये आचरल्याचे वर्णन आहे, तर त्याप्रकारच्या कहाण्यांचा संदर्भ घेऊन आपण विचारू शकता: “तुमची पत्नी (पतीने) अशा प्रकारची वर्तणूक दाखवत असेल तर तुम्ही तिला परवानगी द्याल का?” तेव्हा, सर्वसाधारणपणे “मुळीच नाही!” हेच उत्तर असेल. मग घरमालकाला पुन्हा प्रश्न विचारा: “तर मग देवाकडून अशा प्रकारच्या वागणूकीची अपेक्षा केली जाऊ शकते का?” अशा चर्चा पवित्र शास्त्राचे मूल्य दाखवण्यासाठी अनेक संधी खुल्या करतात.
हिंदुत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य, पुर्नजन्माचा विश्वास हा आहे, जो चर्चेसाठी कल्पक विषय आहे. एका सुशिक्षित हिंदु स्त्रीने अलिकडेच तिच्या वडिलांना मृत्यूमध्ये गमावले व तिला विचारण्यात आले की: “तुम्हाला तुमचे वडील जसे होते त्याप्रकारे त्यांना पुन्हा पाहावयास आवडेल का?” तिने उत्तर दिले: “होय, ते फारच अद्भुत असेल.” तिच्या प्रतिसादामुळे आणि त्यानंतरच्या संभाषणामुळे, हे स्पष्ट झाले की ती, तिचे वडील कोणत्या तरी रूपात अजूनही जिवंत आहेत व ते पुन्हा कधीच भेटू शकणार नाही या विश्वासामुळे समाधानी नव्हती. परंतु पवित्र शास्त्रातील पुनरूत्थानाच्या शिकवणीने तिच्या हृदयाला स्पर्श केला.
काही हिंदुंचे अनेक प्रश्न आहेत आणि समाधानकारक उत्तराचा ते शोध करीत आहेत. एका साक्षीदाराने एका हिंदु घरात भेट दिली तेव्हा, त्या घरमालकाने त्याला विचारले की: “तुमच्या देवाचे नाव काय आहे?” साक्षीदाराने त्याला स्तोत्र ८३:१८ वचन वाचून दाखवले आणि सांगितले की देवाचे नाव यहोवा आहे, व रोमकर १०:१३ म्हणते की, तारण मिळण्यासाठी आपल्याला त्या नावाचा धावा करायचा आहे. त्या माणसावर त्याचा खूप प्रभाव झाला आणि त्याची आणखी जाणण्याची इच्छा होती. वास्तविक पाहता, त्याला ते जाणून घ्यायची तिव्र इच्छा होती. त्याने सांगितले की त्याचे वडील त्यांच्या कुल दैवताचे भक्त होते, व असेच एकदा त्या मूर्तीची पूजा करत असताना ते त्याच्यासमोर पडले आणि थोड्याच वेळानंतर मरण पावले. त्यानंतर मग, त्या घरमालकाचा थोरला भाऊ देखील याचप्रकारे मरण पावला. पुढे त्याने म्हटले: “ती मूर्ती केवळ मरण आणत आहे, जीवन देत नाही. म्हणजेच तिची उपासना करण्यातच काही तरी चुकीचे असू शकते. कदाचित हा देव यहोवा, आम्हाला जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी मदत करील.” याकारणास्तव, त्या व्यक्तीसोबत, त्याची पत्नी आणि दोन मुलांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास चालू करण्यात आला. त्यांनी फार लवकर प्रगती केली आणि लगेचच त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी त्यांच्या मूर्त्यांना सोडून टाकले आहे आणि आता जीवनाचा देव, यहोवा याच्या मार्गाने चालत आहेत.
त्यानंतर आम्ही एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात येतो. तेथे देखील त्याच प्रकारचा आतिथ्यशील आत्मा दिसून येतो, व आम्हाला लगेच बसण्याची विनंती करून शीत पेय पिण्यास दिले जाते. या घरात आम्हाला भिंतींवर धार्मिक चित्रे दिसत नाहीत, फक्त अरेबिक भाषेत लिहिलेल्या वचनाची चौकट दिसते. आम्ही त्यांना सांगतो की पवित्र शास्त्र आणि कुराण यामध्ये सामान्य संबंध आहे, विशेषकरून मूळ पुरूष अब्राहाम, ज्याला देवाने अभिवचन दिले होते की, त्याच्या वंशातून सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. ते अभिवचन, देवाचा पुत्र, येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होणार होते. काही मुस्लिम, देवाला पुत्र असल्याच्या या विचारावर आक्षेप घेतील. परंतु, आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगतो की, जसे पहिला पुरूष आदाम, याला देवाने निर्माण केल्यामुळे त्याला देवाचा पुत्र असे म्हटले जाते, त्याचप्रकारे येशू हा देखील देवाचा पुत्र आहे. अशा प्रकारच्या पुत्रांना निर्माण करण्यासाठी देवाला अक्षरशः पत्नीची गरज नाही. मुस्लिम लोक त्रैक्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवत नसल्यामुळे, यहोवा देव हा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी आम्ही याच विषयाचा उपयोग करतो.
आतापर्यंत दुपार झाली आहे, आणि आमच्या गटातील लोक ऊसाच्या मळ्यातून बाहेर, शहरात जाणाऱ्या बससाठी पुन्हा रस्त्यावर येत आहेत. थोडे थकलेले असलो तरी, सर्व जण सकाळच्या ‘मासेमारीच्या’ कार्यामुळे उत्साही आहोत. समोर आलेली विविध परिस्थिती व विश्वास यानुसार जुळवून घेण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते सार्थ ठरले.
फिजीच्या पाण्याला आणि खडकाला अनेक प्रकारच्या माश्यांची देणगी लाभली आहे. यशस्वी होण्यासाठी, फिजीयन ग्नॉनेनडोला (कोळ्याला) त्याच्या कामात कुशल असले पाहिजे. हीच गोष्ट येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जे कार्य नेमून दिले होते त्या “मासेमारी” बद्दल खरी आहे. ख्रिस्ती “माणसे धरणाऱ्यांना” कुशल, त्यांच्या प्रस्तुतींना व जनसमाजाच्या विविध विश्वासासाठी उचित असलेल्या युक्तीवादपद्धतीला जुळवून घेणारे असे असले पाहिजे. (मत्तय ४:१९) हीच गोष्ट निश्चितरूपाने फिजी येथे हवी. तसेच त्याचे परिणाम यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक संमेलनात दिसून येतात, जेथे फिजीयन, भारतीय, रोटुमन आणि विभिन्न वंशातील वैधर्म्याच्या पार्श्वभूमीचे लोक यहोवा देवाची उपासना ऐक्यतेत करतात. होय, फिजीयन पाण्यात ‘मासेमारीच्या’ कार्यावर त्याचे आशीर्वाद आहेत.
[तळटीपा]
a देवासाठी मानवाचा शोध (इंग्रजी) हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका, ने छापलेले पुस्तक पाहा, पृष्ठे. ११५-१७.
[२३ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
व्हीटी लेव्हू
व्हानूआ लेव्हू
सूव्हा
लाऊटोका
नंदी
० १०० किमी
० १०० मै.
१८°
१८०°
[२४ पानांवरील चित्रं]
बूर, स्थानिक घर
[२४ पानांवरील चित्रं]
फिजीतील हिंदु मंदिर
[२५ पानांवरील चित्रं]
फिजीतील माणसांची यशस्वी “मासेमारी”