वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१ पृ. २७-३०
  • खोटे बोलू न शकणाऱ्‍या देवाने पालनपोषण केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खोटे बोलू न शकणाऱ्‍या देवाने पालनपोषण केले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती मिळकत
  • सुवार्तिकाचे कार्य करण्याची आरंभीची आकांक्षा
  • ‘मोठ्या लोकसमुदायाला’ ओळखणे
  • प्रचार करण्याच्या नव्या पद्धती
  • परत पश्‍चिमेकडे
  • विवाह आणि कुटुंब
  • ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांमधील सेवा
  • यहोवाची अक्षय मदत
  • यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • एकटीच परंतु कधीही न त्यागलेली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • वयाच्या ८० व्या वर्षी नेमणूक बदलली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१ पृ. २७-३०

खोटे बोलू न शकणाऱ्‍या देवाने पालनपोषण केले

मेरी विल्स्‌द्वारा कथित

जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम १९३२ पर्यंत पश्‍चिमी ऑस्ट्रेलियातील एकाकी असलेल्या ग्रामीण देशापर्यंत पोंहोचले. त्या वर्षी मी १९ वर्षांची असताना, एलीन डेविस व मला १,००,००० चौरस किलोमीटर व्यापलेल्या क्षेत्रात प्रचार करण्याची नेमणूक मिळाली. सुरवात करण्याचा आमचा बिंदू विलून हे लहान शहर, पश्‍चिमी ऑस्ट्रेलियाची राजधानी, पर्थ येथील आमच्या घराच्या जवळपास ९५० किलोमीटर ईशान्येकडे होते.

तेथील आमच्या मार्गावर असताना, एलीन व मी मैत्रीपूर्ण असणाऱ्‍या रेल्वेच्या गार्डसोबत मागे असलेल्या डब्यात एकत्र प्रवासी होतो. रेल्वे प्रत्येक लहान फाट्यावर थांबत असताना, किती वेळ थांबणार आहे, हे गार्ड आम्हाला सांगत असे. यामुळे, गाडीतून उतरून एकाकी असलेल्या रेल्वेच्या वसाहतीत जाऊन तेथे राहणाऱ्‍या लोकांना साक्ष देण्याची संधी आम्हाला मिळाली. शेवटी, आम्ही धुळीचे वादळ असताना विलून या खाणीच्या शहरात पोहचलो.

तथापि, हा रेल्वेचा लहान फाटा विलून शहरापासून जवळजवळ तीन किलोमीटर दूरवर होता. आमच्या दोघींपैकी कोणीच धट्ट्याकट्ट्या नव्हतो, व आमच्याजवळ प्रकाशने असलेली तीन वजनदार खोकी तसेच दोन पेट्या होत्या. आता आम्ही काय करावे? आम्ही खोक्यामधून काठी घालून दोघींनी काठीच्या एकेका टोकांना धरले. अशाप्रकारे आम्ही एक एक खोके वाहून नेलं. शहरापर्यंत तीन किलोमीटर, तीन खोकी, व आमच्या पेट्या घेऊन जाण्यासाठी आम्हाला सात फेऱ्‍या माराव्या लागल्या. आमचे हात अतिशय दुखत असल्यामुळे रस्त्यावर अनेकदा आम्हाला थांबावे लागले.

धूळ, दुखत असलेले हात, आणि थकलेलो असताना देखील आव्हान व धाडस केल्याचा आनंद आम्हाला वाटला. यहोवा आमच्याबरोबर होता, व दूरवरच्या ठिकाणी प्रचारकार्य सुरू करण्याच्या आमच्या कुवतीचा सामना करण्यासाठी तो आमचे पालनपोषण करत असल्याचे आम्हा दोघींच्याही प्रत्ययास आले. आमच्या कामावरील त्याचा आशीर्वाद देखील आम्हाला लगेच दिसून आला, त्या प्रवासातील आमच्या प्रयत्नाचा परिणाम, तरूण बॉब हॉर्नने पवित्र शास्त्राचे सत्य स्वीकारण्यात झाला. बॉब काही वर्षे बेथेल सेवा करु शकला, तसेच १९८२ मध्ये त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे जवळपास वयाच्या ५० वर्षांपर्यंत त्यांने विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली.

आमच्या ७२५ किलोमीटरपेक्षा अधिक असलेल्या प्रवासात आम्ही वेलूनापासून किनाऱ्‍यावरील जेरल्डटनपर्यंतच्या वसाहतीत कार्य केले. तेथून आम्ही परत पर्थ येथे आलो. काही रात्री आम्ही रेल्वे स्टेशनवरील प्रतिक्षालयात झोपलो व एकदा तर रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या गवताच्या गंजीत झोपलो.

आमच्यासोबत आम्ही पिशवीसारखी धरता येईल अशा उशीच्या खोळीत गव्हाच्या पिठापासून घरी तयार केलेली बिस्कीटे भरुन आणली. आमच्या पहिल्या अर्ध्या प्रवासात हा आमचा प्रमुख आहार होता. कधी कधी आम्हीबोर्डींग व भोजनगृहातील भांडे धुऊन किंवा फरशी घासून जेवण मिळवले. इतर वेळी आम्ही कडक उन्हात वाटाणे किंवा शेंगा तोडण्याचे काम करत असू. पवित्र शास्त्र प्रकाशनाच्या साहित्याचा स्वीकार करणाऱ्‍या आस्थेवाईकांकडून मिळालेल्या वर्गणीवर आमचा खर्च भागविण्यास मदत झाली.

यहोवावर विश्‍वास ठेवण्यासाठी तसेच त्या दिवसातील कठीण परिस्थितीचा आनंदाने सामना करण्यासाठी मला कशाने दृढ केले असेल तर, ते म्हणजे माझ्या आईचे उदाहरण व तिच्याकडून मिळालेले आधीचे प्रशिक्षण हे होते.

ख्रिस्ती मिळकत

माझ्या आईचा निर्माणकर्त्यावर दृढ विश्‍वास होता, व जोवर मला आठवते, ती आम्हा मुलांसोबत त्याच्याविषयी बोलत असे. तथापि, शाळेमध्ये आमच्या सात वर्षाच्या वडिलभावाच्या दुःखद अपघाती मृत्युद्वारे तिचा विश्‍वास तीव्रतेने पारखला. देवाविरूद्ध कटू भावना वाढविण्याऐवजी, आईने गंभीरतेने पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास सुरवात केली. अशा विपत्तीचे कारण काय असावे हे शक्य असल्यास, तिला शिकायचे होते. पवित्र शास्त्राच्या तिच्या संशोधनाला प्रतिफळ मिळाले, व तिने सत्य देव, यहोवाला समर्पण करून १९२० च्या पूर्वार्धाला त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

तेव्हापासून, आमच्या बरोबरच्या चर्चेत तिने देवाची अभिवचने किती खात्रीची आहेत यावर जोर दिला. तिने आम्हाला, काहीही झाले तरी ‘देव कधी खोटे बोलू शकत नाही,’ हे नेहमी लक्षात ठेवण्याचे आजर्वले. (तीतास १:२) यामुळे, आज माझी धाकटी बहिण व मी तसेच माझे दोन भाऊ व आमच्यासोबत आमचे कुटुंब आणि नातवंडे यहोवा देवाची स्तुती करणारे आहेत. माझे दोन भाचे, ॲलन व पौल प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करत आहेत.

सुवार्तिकाचे कार्य करण्याची आरंभीची आकांक्षा

मी अभ्यासात ढ असल्यामुळे, १३ वर्षाची असताना १९२६ मध्ये शाळा सोडली. तथापि, पवित्र शास्त्राविषयी जे काही मी शिकले त्याची सहभागिता इतरांसोबत करण्याच्या तीव्र आकांक्षेला विकसित केले. इतरांना मदत करण्यासाठी मी इतकी शिक्षित नाही असा माझ्या वडिलांनी विचार केला, परंतु आईने म्हटले: “तिने लोकांना, जवळ येत असलेल्या हर्मगिदोनाविषयी व नम्र लोक पृथ्वीचे वतन पावतील एवढे जरी सांगितले, तरी त्यामुळे देवाच्या राज्याची घोषणा होऊ शकेल.” अशाप्रकारे १९३० पर्यंत माझा बाप्तिस्मा झाला नव्हता तरीही, किशोरावस्थेच्या पूर्वार्धामध्येच मी घरोघरच्या प्रचारकार्यात भाग घेण्यास सुरवात केली. परंतु बाप्तिस्म्यानंतर लगेच, पर्थ्‌च्या आसपासातील क्षेत्रात पूर्ण वेळेचे कार्य करण्यास मी सुरवात केली.

त्यानंतरच्या १९३१ या वर्षी आम्ही, यहोवाचे साक्षीदार या आमच्या नवीन नावाचा उपयोग करण्यास आरंभ केला. तथापि, आम्ही देवाच्या पवित्र नामाचा उपयोग करत असल्यामुळे अनेक घरमालकांनी आक्षेप घेऊन कठोर प्रतिसाद दिला. मला अप्रिय गोष्टींचा सामना करावा लागला तरी देखील मी सेवेत टिकून राहिले. देवाने अभिवचन दिलेल्या ‘सामर्थ्यावर अवलंबून’ राहण्याचे जेव्हा त्याच्या सेवकांना तो सांगतो तेव्हा कधी ‘खोटे बोलत नाही’ हा माझा आत्मविश्‍वास होता.—१ पेत्र ४:११; फिलिप्पैकर ४:१३.

‘मोठ्या लोकसमुदायाला’ ओळखणे

१९३५ मध्ये, मला विस्तीर्ण ऑस्ट्रेलिया खंडाच्या दुसऱ्‍या बाजूला नेमणूक मिळाली. अशाप्रकारे, त्यानंतर अनेक वर्षे मी पायनियर सेवक या नात्याने माझ्या पर्थ्‌ येथील आधीच्या घरापासून सुमारे ४,००० किलोमीटर दूर असलेल्या न्यू साऊथ वेल्स्‌च्या राज्यातील संपूर्ण न्यू इंग्लंड जिल्ह्यात सेवा केली.

तोपर्यंत मी येशूच्या मृत्युच्या वार्षिक स्मारक दिनामध्ये बेखमीर भाकर व तांबडा द्राक्षारस या बोधचिन्हांचा सहभाग घेतला होता. विशेषपणे पूर्ण वेळेच्या आवेशी सेवकाने असे करणे योग्य समजले जात असले तरी, मला स्वर्गीय जीवनाची आशा आहे, अशी खात्री कधी पटली नव्हती. मग, १९३५ मध्ये, पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असलेल्या मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करण्याचे कार्य चालू असल्याची आम्हाला स्पष्टता दिली गेली. आम्ही मोठ्या लोकसमुदायाचा भाग होतो हे समजल्यामुळे आमच्यातील अनेकांना आनंद झाला, व आम्ही बोधचिन्हांची सहभागिता घेणे बंद केले. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणेच पवित्र शास्त्रीय सत्य प्रगतीशीलरित्या तेजस्वीपणे प्रकाशत होते.—नीतीसूत्रे ४:१८.

प्रचार करण्याच्या नव्या पद्धती

१९३० च्या मध्यंतराच्या काळात, आम्ही सेवेत ग्रामोफोनचा वापर करण्यास सुरवात केली. अशाप्रकारे, वजनदार ग्रामोफोनच नव्हे तर साहित्याच्या बॅगा ठेवण्याकरता आमच्या कणखर सायकलीला पुढे आणि मागे कॅरिअर बसवायचे होते. माझ्या सायकलीवर सर्व सामानाचे ओझे लादल्यावर मला अधिक खबरदारी घ्यावयाची होती, कारण ती पडली तर, तिला पुन्हा उचलण्यासाठी माझ्याठायी शक्‍ती नव्हती!

त्यावेळी आम्ही, शोभा यात्रा म्हटलेल्या कार्याला सुरवात केली. आम्ही शहरातील हमरस्त्याच्या बाजूने चालत असताना, नजर वेधून घेणारी घोषवाक्ये लिहिलेले पोस्टर, किंवा घोषणाफलकांना खांद्यावर अडकवत असू. मला अटक करुन लिजमॉर शहरातील तुरुंगाच्या लहान कोठडीत रात्रभर बंद केले तेव्हा हे कार्य विशेष विश्‍वासाच्या परीक्षेचे होते, असे मला खासपणे दिसले. दुसऱ्‍या दिवशी केस विंचरण्यास देखील परवानगी न देता न्यायालयात आणणे हे मानखंडनेचे होते! परंतु पुन्हा एकदा यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे मला उचलून धरले. माझे पोस्टर, कॉन्स्टेबलच्या धर्माला अपमानास्पद आहे, केवळ हाच त्यांचा आरोप असल्यामुळे हा खटला फेटाळला गेला.

परत पश्‍चिमेकडे

१९४० च्या पूर्वार्धात, माझ्या पायनियर प्रचाराने मला परत पश्‍चिम ऑस्ट्रेलिया देशाच्या शहरात नेले. येथे मी स्मरणीय अनुभवांचा तसेच आध्यात्मिक आशीर्वादांचा आनंद घेत राहिले. आमच्या शहरापासून जवळपास ११ किलोमीटर दूरवरील, नॉर्द्‌म येथील माझ्या नेमणूकीत, मी घरकामात व्यग्र असलेली गृहिणी फ्लो टिम्मीन्स्‌ हिला भेटले. तिने समेट (इंग्रजी) हे पुस्तक स्वीकारले, व अल्पावधीतच ती यहोवा देवाची एक समर्पित साक्षीदार झाली. ती अजूनही राज्याच्या सेवेत क्रियाशील आहे, तसेच तेव्हा चार वर्षाची असलेली तिची मुलगी आता मोठी होऊन, खास पायनियर सेविका झाली आहे.

परंतु काही अविस्मरणीय अनुभव देखील तेव्हा आले होते. एकदा, माझी सोबतीण व मी बग्गीत बसून नॉर्द्‌ममधील पूल ओलांडत असताना, घोडा अचानक जोराने पळत सुटला, व खालील ॲव्हान नदीतील पाण्याच्या भोवऱ्‍यावरून आम्हाला भीतीदायक रपेट देऊ लागला. जवळपास एक किलोमीटर अंतर कापल्यावर, घोड्याने वेग कमी केला.

विवाह आणि कुटुंब

१९५० मध्ये माझा आर्थर विल्स्‌ यांच्याशी विवाह झाला. ते सुद्धा अनेक वर्षांपासून पायनियर होते. आम्ही पश्‍चिम ऑस्ट्रेलिया देशातील पिंजली या शहरात स्थायिक झालो, तेथे आम्हाला मुलगा बेंटली व मुलगी युनिस ही मुले झाली. मुलांची शाळा संपत येण्याच्या बेतात असताना, आर्थर यांनी पुन्हा पायनियर होण्याचे ठरवले. आमची दोन्ही मुले योग्यतेची झाल्यावर लगेच, वडिलांच्या उत्तम उदाहरणामुळे नियमित पायनियरींग करण्याचे उत्तेजन त्यांना मिळाले.

आर्थर अनेकदा मुलांना दूरवरील ग्रामीण क्षेत्रात प्रचार करण्यासाठी नेत असत. कधी कधी, त्यांच्यासोबत ते आठवडाभर किंवा अधिक वेळ बाहेर रहात असत, रात्री त्यांना तंबुमध्ये रहावे लागे. त्यांच्या गैरहजेरीत, कौटुंबिक फर्निचरचा व्यापार सांभाळण्यासाठी मी घरीच राहिल्यामुळे त्या तिघांना पायनियरींग करण्यास शक्य होत होते.

ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांमधील सेवा

एकदा, सकाळी सर्व, मुले आणि त्यांचे वडील त्यांच्या ग्रामीण भागातील भेटीहून परतल्यावर एक अनपेक्षित पाहुणा आमच्याकडे आला. तो पाहुणा ऑस्ट्रेलियातील मूळचा रहिवाशी होता, त्याने विचारले: “पुन्हा येण्यासाठी मी काय करू शकतो?” प्रथम आम्ही गोंधळूनच गेलो. अनेक वर्षांपूर्वी त्या मनुष्याला मद्यपीपणामुळे ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले होते हे, नंतर आर्थर यांनी ओळखले. तेव्हापासून त्याने अधिक मद्य प्राशन करण्याच्या तसेच कर्ज घेण्याच्या सवयीला वाढवले होते.

यहोवाच्या शुद्ध संघटनेत पुन्हा येण्यासाठी त्याने काय करण्याची गरज आहे याचे स्पष्टीकरण आर्थरने दिले. जास्त काही न बोलता तो शांतपणे निघून गेला, व तो आता काय करील याचा विचार आम्ही सर्व जण करु लागलो. पुढील काही महिन्यांत काय होईल याची आम्हापैकी कोणीही अपेक्षा केली नव्हती. त्या गृहस्थाने केलेले बदल अविश्‍वसनीय होते! तो केवळ त्याच्या पिण्याच्या समस्येतूनच बरा होत नव्हता तर, जिल्ह्यांतील लोकांकडून त्याने जे कर्ज घेतले होते याची त्याने त्यांना आठवण करून दिली, व कर्ज घेतलेल्या सर्वांची त्याने परत फेड केली! आज तो पुन्हा एकदा विश्‍वासातील बांधव आहे, व त्याने काही काळापर्यंत पायनियर सेवक या नात्याने सेवा केली.

पिंजलीमध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक मूळचे रहिवाशी होते, व या नम्र लोकांना देवाचे वचन शिकण्यास व सत्य स्वीकारण्यास मदत करताना आम्ही अधिक समाधानकारक असणाऱ्‍या आमच्या सेवेचा आनंद लुटला. सत्य शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अनेक मूळच्या रहिवाशांना मदत करण्यात माझा भाग होता, हे माझ्या विश्‍वासाला किती मजबूत करणारे होते बरे!

पिंजलीमध्ये एक मंडळी सुरू झाली होती, व सुरवातीला तिचे अनेक सदस्य ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवाशी होते. आम्हाला त्यांच्यातील अनेकांना लिहायला व वाचायला शिकवावे लागले. आधीच्या वर्षांमध्ये त्यांच्याविरूद्ध बराच कलूषितपणा होता, परंतु कालांतराने शहरातील लोक मूळचे रहिवाशी झालेल्या साक्षीदारांना त्यांच्या स्वच्छ राहणीमानामुळे व ते भरवसा ठेवण्यालायक नागरिक असल्यामुळे त्यांना मान देऊ लागले.

यहोवाची अक्षय मदत

माझे प्रिय पती, आर्थर यांनी विश्‍वासूपणे ५७ वर्षे देवाची सेवा केल्यावर, १९८६ च्या सुरवातीला त्यांचा मृत्यू झाला. पिंजलीतील सर्व व्यापारी तसेच जिल्ह्यातील लोकांकडून त्यांना चांगला आदर मिळत होता. यहोवाने पुन्हा एकदा, अचानक झालेल्या या हानीमध्ये मला बळ देऊन माझे पालनपोषण केले.

माझा मुलगा बेंटली पश्‍चिम ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात, वडील या नात्याने सेवा करीत आहे. तेथे तो व त्याची बायको लॉरनाने त्यांच्या कुटुंबाला सत्यात वाढवले आहे. माझ्यासाठी आनंदाचा आणखी एक स्रोत म्हणजे माझी मुलगी, युनिस आजही पूर्णवेळेची सेवा करीत असल्याचा आहे. ती व तिचा पती जफ, पायनियर या नात्याने सेवा करत आहेत. मी आता त्यांच्यासोबत रहात आहे व अखंड सहाय्यक पायनियरींग करण्याचा मला आशीर्वाद मिळाला आहे.

यहोवा त्याच्या सेवकांना बळ पुरवण्याचे तसेच त्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला तरी मदत करण्याच्या त्याच्या प्रेमळ अभिवचनाच्या पूर्णतेचा मी ६० पेक्षा अधिक वर्षे अनुभव घेतला आहे. आम्ही त्याच्याविषयी कधीही संशय धरला नाही किंवा त्याला गृहीत धरले नाही तर, तो आमच्या प्रत्येक गरजा भागवतो. मला, देवाचा हात कार्य करत असल्याची जाणीव होत गेली तसा माझा विश्‍वास मजबूत होत गेला, व आमच्या आकलनाच्याही पलिकडे तो आम्हाला कशाप्रकारे आशीर्वाद देतो हे मी पाहिले आहे. (मलाखी ३:१०) खरोखर, देव खोटे बोलू शकत नाही!

[२७ पानांवरील चित्रं]

मेरी १९३३ मध्ये

[२९ पानांवरील चित्रं]

नंतरच्या वर्षामध्ये मेरी आणि आर्थर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा