राज्य घोषकांचा वृत्तांत
त्याने पवित्र शास्त्राने प्रशिक्षित केलेल्या त्याच्या विवेकाला अनुसरले
इस्राएलाचा राजा दावीद याने यहोवाच्या मदतीसाठी प्रार्थना करताना म्हटले: “मी तर सात्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर.” (स्तोत्रसंहिता २६:११) त्याने आपली सचोटी राखल्यामुळे देवाने त्याच्यावर कृपादृष्टी केली. येशूने त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे केल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले, त्याचप्रमाणे त्याने कोलंबियातील एका तरूणाने त्याच्या पवित्र शास्त्राने प्रशिक्षित केलेल्या विवेकाला अनुसरले व देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निश्चय केला तेव्हा त्याला आशीर्वादित केले. हा तरुण सांगतो:
“मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास सुरवात केली तेव्हा, कॅथोलिक शाळेतील एक विद्यार्थी होतो. परंतु, मास (प्रार्थनेचा विधी) याला उपस्थित राहिलो तेव्हा माझ्या विवेकाने मला त्रास दिला, यामुळे मासला उपस्थित राहण्यापासून मुक्त होण्यासाठी मी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे (ते पाळक होते), मार्गदर्शक शिक्षक त्यांच्याकडे तसेच आमच्या गटप्रमुखाकडे याची विचारणा केली. मला जरी यातून मुक्त केले असले तरी, त्याला उपस्थित राहण्याचा काहींनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हा दबाव, मी बाप्तिस्मा घेतलेला एक यहोवाचा साक्षीदार झाल्यानंतर लगेच वाढला. जर मला शाळेतून काढून टाकले तर मला घरातून काढून टाकले जाईल अशी माझ्या वडिलांनी धमकी दिली. त्यांच्या मनात माझ्यासाठी विद्यापिठातील शिक्षण तसेच व्यावसायिक ध्येय होते.
“कॅथोलिकांच्या कर्तव्याला जे पूर्ण करणार नाहीत त्यांच्याविषयी, मुख्याध्यापकांनी अनेकदा इशारे दिले. वर्षातील पहिल्या मासची वेळ झाली तेव्हा, तो संपेपर्यंत मी लपून राहिलो. नंतर मी शिक्षकाला (पाळक) शाळा आणि यहोवाचे साक्षीदार (इंग्रजी) या माहितीपत्रकाची एक प्रत दिली, व त्यांना सांगितले की यहोवाचा एक साक्षीदार असल्यामुळे, मी मासला उपस्थित राहू शकत नाही. त्यांनी म्हटले: ‘दुसरी शाळा शोधणे तुझ्यासाठी चांगले आहे.’ शाळेतून काढून टाकण्याचा अर्थ, माझे वडील मला घरातून हाकलून देतील हे मला माहीत होते. तरीसुद्धा, यहोवाला मी प्रार्थना केली व शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांना मी पूर्णपणे साक्ष देत राहिलो.
“सुटीचे दिवस आले. मग, सुटी संपल्यावर परत शाळेत, व पुन्हा एकदा मासला जाण्याची वेळ आली. मुख्य अधिकारी व इतर पाळक चर्चच्या समोर पापाची कबुली ऐकण्याच्या तयारीतच होते. भयाने मजवर जवळजवळ मातच केली होती. मी जाऊन खाली बसलो, परंतु माझ्या विवेकाने मला त्रास दिला. गायन सुरू झाले तेव्हा, मी विचार केला की, ‘मी येथे काय करत आहे? यहोवा माझा देव आहे. मी भित्रा होऊन त्याचा विश्वासघात करु शकत नाही. मी त्याला कमीपणा येऊ देणार नाही, तो मला त्यागणार नाही.’ मी धैर्यासाठी प्रार्थना केली. मग, मी चर्चच्या बाहेर जाऊन पापाची कबुली देण्यासाठी असलेल्या रांगेत जाऊन उभा राहिलो. मुख्याध्यापकाजवळ गेलो तेव्हा, मी त्यांना सांगितले: ‘गुरूजी, मी पापाची कबुली देण्याकरता येणार नाही.’ त्यांनी म्हटले: ‘मी असाच विचार केला.’ मी त्यांना सांगितले की, होणारे परिणाम सहन करण्यास मी तयार आहे परंतु, मासमध्ये भाग घेण्यास माझा विवेक मला अनुमती देत नाही. पवित्र शास्त्रातून ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्याच्याविरूद्ध मी जाऊ शकत नाही.
“त्यांनी एक टक लावून माझ्याकडे पाहिले, व स्मित हास्य करून म्हटले: ‘मी तुझे कौतुक करतो. तुम्ही सर्वच साक्षीदार कौतुक करण्याच्या पात्रतेचे आहात. तुमच्यासाठी देव प्रथम असतो, व काहीही झाले तरी त्याच्या नियमांचे पालन करण्याची तुमची तयारी असते. असेच करत राहा. तू चांगले करत आहेस. देवासाठी तुझ्यासारखा आवेश व प्रीती सर्वच कॅथोलिकांनी धरली असती तर किती बरे झाले असते. येथून पुढे, आमच्या धार्मिक सेवेत भाग घेण्यापासून तुला मुक्त करण्यात आले आहे.’ मला किती आंनद झाला! पवित्र शास्त्राने प्रशिक्षित केलेल्या विवेकानुसार करण्यासाठी मी केलेल्या निश्चयाला यहोवाने आशीर्वादित केले.
“मुख्याध्यापकाने दुसऱ्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना म्हटले: ‘इतर धर्म आमच्याही पुढे आहेत. आम्ही त्यांच्यासारखे आवेशी, देवावर गाढ प्रीती करणारे व सर्व गोष्टींपेक्षा प्रथम त्याची सेवा करण्यात, त्यांच्यासारखे का नाही? ही अशी एक गोष्ट आहे जी आमच्या अंतःकरणात असली पाहिजे.’
“शेवटी मुख्य अधिकाऱ्याची रोमला बदली झाली, नवीन आलेल्या मुख्य अधिकाऱ्याने, मी भाग घेत नव्हतो, त्याकडे दुर्लक्षच केले. पदवीधर झाल्यावर पूर्ण वेळेच्या सेवेचे माझे ध्येय प्राप्त करण्याचे माझ्यावर सोडून, वडील घरातून दुसरीकडे स्थलांतरीत झाले.”
या तरूणाने पवित्र शास्त्राने प्रशिक्षित केलेल्या विवेकाला अनुसरल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले. त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचा झटून प्रयत्न करणाऱ्या सर्वांना तो अशाचप्रकारे आशीर्वादित करील.—नीतीसूत्रे ३:५, ६.