तुम्ही कशी उपासना करता याला काही अर्थ आहे का?
आफ्रिकेतील लहान शहराला दुपारच्या कडक उन्हाची झळ लागत आहे. जवळपासच्या दरीतून चित्तभ्रम करणारा ढोल वाजण्याचा, गाण्याचा, व आनंदाने टाळ्या वाजविण्याचा आवाज ऐकू येत आहे. पण हे काही सामाजिक कार्य नव्हे. ती आफ्रिकेतील पारंपारिक उपासना आहे. परंतु तो आवाज जवळच्या कॅरिसमॅटिक चर्चमधून येणाऱ्या कर्णकटू आवाजाबरोबर चढाओढ करीत आहे. तेथे हर्षभरीत झालेले उपासक अद्भुतरित्या “बरे” करीत आहेत तसेच, अन्य भाषेत बोलत आहेत. शिवाय, शहराच्या दुसऱ्या टोकाला आणखी एका प्रकारची उपासना चालली आहे. अज़ान देणारा, त्याच्या सुश्राव्य आवाजात सह मुसलमान उपासकांना प्रार्थना करण्यासाठी बोलावत आहे.
होय, आफ्रिकेतील अनेक शहरांत आणि नगरांमध्ये धार्मिक उपासनेतील पुष्कळ विविधता दिसू शकते. अनेक पिढ्यांपासून आफ्रिकेतील लोक त्यांच्या धार्मिक रुढीपरंपरेनुसार वागण्यात समाधानी होते. परंतु मग ख्रिस्ती धर्मजगतामधील मिशनरी आले. त्यांनी पाठोपाठ युरोपातील विविध राष्ट्रांतील लष्कर आणले, व प्रत्येकाला “ख्रिस्ती बनविण्यासाठी”—त्यांचे वैयक्तिक नाव सुद्धा बदलण्याचा निर्दयी प्रयत्न केला.
याचा परिणाम काय झाला? धर्माच्या या वर्गाचे म्हणजे, आयात केलेल्या या धार्मिक विश्वासाचे आफ्रिकेतील लोकांच्या पारंपारिक विश्वासात आणि आचारात मिलन घडले. आजही अनेक “ख्रिस्ती” उपासक ताईत व मंत्रविद्ध ताईत वापरतात. तरीही, ख्रिस्ती धर्मजगताच्या मिशनऱ्यांनी खऱ्या ख्रिस्ती धर्माचा निव्वळ विपर्यास केला व त्यांनी आधीच्या चिडखोरपणाच्या भावनेला तसेच रेंगाळत ठेवले आहे. आजही आफ्रिकेतील काही लोकांठायी पवित्र शास्त्राबद्दल असलेल्या त्यांच्या दुराग्रही प्रवृत्तीला ते मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.
तरीसुद्धा, “ख्रिस्ती धर्माचे” अनेक प्रकार अजुनही विस्तृत प्रमाणात आचरले जात आहेत. अलिकडील वर्षांमध्ये विशेषपणे कॅरिसमॅटिक धार्मिक गट लोकप्रिय झाले आहेत; विश्वासाने बरे करणाऱ्या चर्च मध्ये वाढ झाली आहे. ‘धर्माविषयी आफ्रिकेतील कल्पना ही मोठ्या प्रमाणात उपयुक्ततावादी असल्याचे परीक्षण केल्यावर, वर्तमान पत्राच्या एका स्तंभलेखिकेने या चर्चच्या अपीलाचे स्पष्टीकरण केले. आफ्रिकेतील लोकांच्या मताप्रमाणे धर्म हा, मनुष्याच्या अस्तित्वासाठी थेट भौतिक समाधान देण्यास समर्थ असला पाहिजे. अशाप्रकारे, त्या आध्यात्मिक माध्यमाची प्रत्येक गोष्टीत गरज आहे असा विश्वास करणाऱ्या आफ्रिकेतील लोकांसाठी, जीवनातील त्यांच्या मागणीला अनुसरून विशेष पद्धतीने आध्यात्मिक [किंवा विश्वासाने बरे करणे] चर्च कार्य करत आहेत.’ तथापि, अनेक कॅरिसमॅटिक चर्चेसची पैसे कमावण्याच्या उद्दिष्टांसाठीच स्थापना केलेली आहे हे दुःखाचे आहे.
आज, आफ्रिकेत ६,००० पेक्षा अधिक धार्मिक पंथ आहेत. कदाचित तुम्हाला वाटले असेल की, या सर्व धर्मांकडे व पंथांकडे तारणाची गुरूकिल्ली आहे. परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की, देवाला याविषयी कसे वाटते?
कोणताही धर्म देवाला संतुष्ट करू शकतो का?
निश्चितच, विश्वाचा निर्माणकर्ता आम्हाला याविषयी मार्गदर्शन दिल्याविना रहाणार नाही. (आमोस ३:७; प्रे. कृत्ये १७:२६, २७) आणि ईश्वरी मार्गदर्शन पवित्र शास्त्रात मिळू शकते याचा भरपूर पुरावा आहे. पवित्र शास्त्र हे, काही आफ्रिकेतील काळे लोक म्हणत असल्याप्रमाणे गोऱ्या लोकांचे पुस्तक नाही. वस्तुतः कोणीही मनुष्य—काळा किंवा गोरा—त्याचे श्रेय घेऊ शकत नाही. २ तीमथ्य ३:१६ म्हणते, ‘प्रत्येक शास्त्रलेख ईश्वरप्रेरित आहे.’ पवित्र शास्त्राची सत्य, प्रामाणिक शिकवण, त्याचा मोठा दीर्घ काळ, द्वेषयुक्त हल्ल्याच्या सामन्यात त्याचा बचाव, त्याच्या अचूक भविष्यवाण्या व अतुलनीय सार्वत्रिक खप—हे सर्व त्याच्या ईश्वरी जनकाच्या अधिकाराचे स्पष्ट पुरावे आहेत.
ते पुस्तक आम्हास काय शिकवते? प्रथम, ते आम्हाला सांगते की, केवळ एकच “खरा देव” आहे. (योहान १७:३) जर असे आहे, तर मग सर्वच धर्मात सत्य कसे असू शकेल? देवाची ओळख व तो कसा आहे ही गोष्ट उद्भवते तेव्हा धार्मिक गट एकदुसऱ्यांसोबत भांडण करत नाहीत काय? पवित्र शास्त्राचा लेखक याकोब “शुद्ध व निर्मळ धर्म” याविषयी बोलला. (याकोब १:२७, पं. रमाबाई भाषांतर) खरा धर्म ओळखायचा असल्यास, खोटा किंवा बनावट धर्मही असला पाहिजे. ही गोष्ट, सर्व धर्म देवाकडे जाण्यासाठी विविध मार्ग आहेत या कल्पनेच्या विरोधात असेल.
उपासनेसाठी निर्माणकर्त्याचे दर्जे
देवाची उपासना करण्याचा कोणता योग्य मार्ग आहे? पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते की, खरी उपासना अचूक ज्ञानात मुळावलेली आहे. थोर संदेष्टा, येशू ख्रिस्ताने एकदा एका शोमरोनी स्त्रीला सांगितले: “तुम्हाला ठाऊक नाही अशांची तुम्ही उपासना करता.” (योहान ४:२२) हेच तुमच्या बाबतीत देखील खरे असू शकते का? सर्वशक्तीमान देवाचे व्यक्तिगत नाव यहोवा आहे, असे तुम्हाला शिकवले आहे का? (स्तोत्रसंहिता ८३:१८) मनुष्य आणि पृथ्वीसाठी त्याचे काय उद्देश आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? (मत्तय ६:९, १०; इफिसकर १:९, १०; ३:११) तुमचा धर्म तुम्हाला चांगल्या भविष्याची व्यावहारिक आशा प्रदान करतो का? व तुम्ही स्वतःला ख्रिस्ती असे समजता तर, तुम्ही शास्त्रवचनातून तुमच्या विश्वासाचे स्पष्टीकरण देऊ शकाल का, किंवा तो, केवळ परंपरेने तुम्हाकडे आला आहे ज्याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी तुम्ही थोडा देखील वेळ दिलेला नाही?
तुमच्याठायी अचूक ज्ञानाची उणीव असल्याचे दिसल्यास, तुम्ही ते देवाचे वचन, पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याद्वारे प्राप्त करू शकता. यहोवा देव त्याच्या खऱ्या उपासकांकडून, ते पवित्र पुस्तक काय शिकवते, त्याच्याशी त्यांनी परिचित झाले पाहिजे अशी अपेक्षा करतो. त्यापेक्षाही अधिक म्हणजे, शिकलेल्या गोष्टींचा अवलंब त्यांनी त्यांच्या जीवनात करण्याची तो अपेक्षा करतो. आमची मनोवृत्ती स्तोत्रकर्त्यासारखी असली पाहिजे, ज्याने म्हटले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” (स्तोत्रसंहिता ११९:१०५) तुमच्या धर्माने पवित्र शास्त्राची माहिती घेण्यासाठी व ते समजण्यासाठी तुम्हाला केवढ्या प्रमाणात मदत केली आहे?
खऱ्या उपासनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येशू ख्रिस्तावरील तो एक थोर संदेष्टा म्हणून नव्हे तर, देवाचा एकुलता एक पुत्र असा विश्वास ठेवणे होय. शास्त्रवचने स्पष्टपणे जाहीर करतात की, येशू हा “जीवनाचा अधिपती” आहे. (प्रे. कृत्ये ३:१५; ४:१२) अनेक लोक येशूवर विश्वास ठेवत असल्याचा दावा करतात, परंतु त्यांचा विश्वास किती खरा आहे? येशूवरील अस्सल विश्वासासाठी त्याच्या सूचनांचे पालन करणे जरुरीचे आहे. देवाने स्वतः घोषित करताना हे उत्तेजन दिले: “हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” (मार्क ९:७) खरे उपासक शक्य तेवढ्या जवळून येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात. (१ पेत्र २:२१) एक मार्ग म्हणजे, त्याने सुरवात केलेल्या जाहीर प्रचारकार्यात भाग घेण्याकरवी ते करतात. (मत्तय ४:१७; १०:५-७) तुमचा धर्म या कार्यात तुमचा वैयक्तिक भाग असण्याविषयीचे उत्तेजन देतो का?
प्रीती ही देखील खऱ्या उपासनेची एक गरज आहे. यहोवा देवाचे वर्णन प्रीतीचा उत्कृष्ट नमुना असे केले आहे. तसेच, येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले की त्यांनी आपसात दाखविलेल्या प्रीतीमुळे ते त्याचे शिष्य म्हणून ओळखले जातील. (योहान १३:३४, ३५; १ योहान ४:८) आज ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या लक्षावधी लोकांचा विचार केल्यावर, जग हे वास्तविकपणे प्रीतीने भरायला नको का? खरे पाहिले तर, आमचे जग हे प्रीतीची उणीव असलेली जागा शाबीत झाले आहे. या एकाच शतकात, युद्धाने लाखो लोकांना मृत्युमुखी पाडले आहे. गुन्हे आणि हिंसाचार सतत बळावत चालले आहेत. यास्तव, स्वतःला विचारा, ‘जर प्रत्येक जण माझ्या धर्माचा असता, तर राहण्यासाठी जग हे प्रीती असलेले ठिकाण बनले असते का?’
शेवटी, पवित्र शास्त्र दाखवते की, खऱ्या उपासकांनी देवाची ओळख नसणाऱ्या या जगापासून स्वतःला अलिप्त ठेवले पाहिजे. देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला शुद्ध उपासनेचे रक्षणकर्ते या नात्याने वेगळे ठेवले तेव्हा, त्याने त्याच्या लोकांना सभोवतालच्या अवनतीला पोहंचलेल्या राष्ट्रांबरोबरील जवळचा संबंध टाळण्याविषयी इशारा दिला. (अनुवाद ७:१-६) त्याचप्रमाणे, योहान १७:१६ मध्ये ख्रिस्त येशूने त्याच्या अनुयायांना म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” देवाच्या खऱ्या उपासकांचा राजकारणात, अनैतिकतेत, लोभी व्यापारात, किंवा देवाला नाकारणाऱ्या तत्त्वज्ञानात कोणताही भाग नाही. (योहान १८:३६; १ योहान २:१५-१७) ते रोमकर १२:२ मध्ये नमूद केलेल्या आज्ञेचे पालन करतात: “या युगाबरोबर समरूप होऊ नका.” तुमचा धर्म हेच करण्याचे उत्तेजन तुम्हाला देत आहे का?
मदत उपलब्ध आहे
होय, तुम्ही ज्याप्रकारे उपासना करता, त्याचा देवाला अर्थ वाटतो. त्याच्या दृष्टिने एकच खरा धर्म आहे. (इफिसकर ४:४-६) आमच्या संक्षिप्त चर्चेने पवित्र शास्त्राच्या शिकवणीच्या काही प्रमुख मुद्यांनाच विचारात घेतले आहे. तर मग अधिक शिकण्याचा प्रयत्न का करू नये?
तुमचे कोणत्याही धर्मात संगोपन झालेले असले तरी, यहोवाचे साक्षीदार यासंबंधाने तुम्हाला मदत करु शकतात. पवित्र शास्त्राच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांची प्रचिती सबंध विश्वामध्ये पसरली आहे. पवित्र शास्त्राची सखोल समज मिळण्यासाठी सर्व जातीच्या व धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांना मदत करण्याला ते त्यांचे कर्तव्य समजतात. (नीतीसूत्रे २:१-६) ते सखोल संशोधन केलेले पवित्र शास्त्राचे साहित्य प्रकाशित करतात.a वस्तुतः, व्यक्तिगतपणे पवित्र शास्त्र मोफत शिकवण्यासाठी ते तुमच्या घरी येतील. सर्व जगभरातील लाखो लोकांना पवित्र शास्त्राच्या शैक्षणिक कार्यक्रमापासून लाभ होत आहे. अशाचप्रकारे तुम्ही स्वतःसाठी का करु नये? खरोखर, असे करणे जरुरीचे असल्यामुळे, तुम्ही कशी उपासना करता याला अर्थ आहे.
[तळटीपा]
a त्यातील एक प्रकाशन, मानवजातीचा देवासाठी शोध (इंग्रजी) हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इकॉ. ने १९९० मध्ये प्रकाशित केलेले आहे. अनेक लोकांनी त्याची बुद्धिमत्ता व जगातील प्रमुख धर्माच्या विद्वत्तापूर्ण चर्चेची गुणग्राहकता व्यक्त केली आहे.
[५ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती धर्मजगताच्या मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माचा निव्वळ विपर्यास केला
[५ पानांवरील चित्रं]
अनेक कॅरिसमॅटिक चर्च पैसे कमावण्याची उद्दिष्ट्ये राखून आहेत
[६ पानांवरील चित्रं]
येशूवरील विश्वास खऱ्या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे
[७ पानांवरील चित्रं]
यहोवाचे साक्षीदार, मोफत गृह पवित्र शास्त्राभ्यासाद्वारे लाखो लोकांना अचूक ज्ञान घेण्यासाठी मदत करतात