वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१ पृ. ८-१३
  • यहोवाचे गुणगान करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे गुणगान करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही यहोवाचे गुणगान गाण्याचे मार्ग
  • पवित्र शास्त्र काळात यहोवाचे गुणगान
  • यहोवाचे गुणगान करणे—आमच्या उपासनेतील महत्त्वपूर्ण भाग
  • गायन करण्याद्वारे यहोवाच्या चांगुलपणासाठी गुणग्राहकता दाखवा
  • हर्षाने यहोवाची स्तुती करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवाची गायनाने स्तुती करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आधुनिक उपासनेतील संगीताचे स्थान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१ पृ. ८-१३

यहोवाचे गुणगान करा

“मला यहोवाचे गीत गाऊ द्या. कारण तो प्रतापाने विजयी झाला आहे.”—निर्गम १५:१, NW

१. यहोवाची कोणती वैशिष्ट्ये व गुण आम्हाला त्याचे गुणगान करण्यासाठी कारण पुरवतात?

स्तोत्रसंहिता १५०, तेरा वेळा यहोवाचे किंवा याहचे गुणगान करण्याची आज्ञा देते. शेवटचे वचन घोषित करते: “प्रत्येक प्राणी—परमेशाचे [याह, NW] स्तवन करो. परमेशाचे [याह, NW] स्तवन करा.” यहोवाचे साक्षीदार या नात्याने हे आम्हाला माहीत आहे की, यहोवा आमच्या स्तुतीला पात्र आहे. तो विश्‍वाचा सार्वभौम प्रभु, परात्पर, अनंतकाळचा राजा, आमचा निर्माणकर्ता, आमचा दाता आहे. तो अनेक मार्गात अद्वितीय, असामान्य, अतुल्य, अप्रतीम आहे. तो सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान, न्यायात निष्णात, व प्रीतीचा उत्कृष्ट आदर्श आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो चांगला आहे; तो निष्ठावान आहे. (लूक १८:१९; प्रकटीकरण १५:३, ४) तो आमचे गुणगान मिळवण्याच्या योग्यतेचा आहे का? अगदी निश्‍चितच!

२. यहोवाला कृतज्ञता व्यक्‍त करण्याची कोणती कारणे आम्हाजवळ आहेत?

२ यहोवा, आम्ही त्याची करत असलेली उपासना व गुणगानाच्या योग्यतेचाच नव्हे तर, त्याने आमच्यासाठी जे काही केले आहे त्यासाठी कृतज्ञता व आभाराच्याही योग्यतेचा आहे. तो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा आहे. (याकोब १:१७) तो सर्व जीवांचा झरा, उगम आहे. (स्तोत्रसंहिता ३६:९) मानवजातीचे सदस्य या नात्याने आम्ही आनंद घेत असलेल्या सर्व गोष्टी त्याच्यापासून आहेत, कारण तो आमचा महान निर्माणकर्ता आहे. (यशया ४२:५) त्याचप्रमाणे तो, त्याचा आत्मा, त्याची संघटना, त्याचे वचन याकरवी येणारा सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देणारा देखील आहे. त्याने पुरवलेल्या त्याच्या पुत्राच्या खंडणीच्या आधारावर आम्हाला आमच्या पापाची क्षमा होते. (योहान ३:१६) आम्हाला, ‘ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वीच्या’ राज्याची आशा आहे. (२ पेत्र ३:१३) आम्हाला सहख्रिश्‍चनांची उत्तम संगती आहे. (रोमकर १:११, १२) आम्हाला त्याचे साक्षीदार असण्याचा आशीर्वाद व बहुमान वाटतो. (यशया ४३:१०-१२) शिवाय आम्हाला प्रार्थनेचा विशेष हक्क आहे. (मत्तय ६:९-१३) खरोखर, यहोवाचे आभार मानण्यासाठी आमच्याजवळ अनेक कारणे आहेत!

आम्ही यहोवाचे गुणगान गाण्याचे मार्ग

३. कोणत्या विविध मार्गांकरवी आम्ही यहोवाचे गुणगान व त्याला आमची कृतज्ञता व्यक्‍त करु शकतो?

३ यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आम्ही त्याचे गुणगान व त्याला आमची कृतज्ञता कशी प्रदर्शित करू शकतो? ख्रिस्ती सेवेत भाग घेण्याद्वारे ते आम्ही करु शकतो—घरोघरचे साक्षीकार्य, पुनर्भेटी, गृह पवित्र शास्त्र अभ्यास, व रस्त्यावरील साक्षीकार्यात भाग घेण्याकरवी. त्याचे गुणगान आम्ही संधी मिळते तेव्हा अनौपचारिक साक्षीकार्य करण्याद्वारे देखील करू शकतो. शिवाय, आमच्या चांगल्या वर्तनाद्वारे आम्ही त्याचे गुणगान करू शकतो. तसेच, विनयशील पेहराव व केशभूषा करण्याद्वारे देखील आम्ही त्याचे गुणगान करु शकतो. यहोवाचे साक्षीदार या बाबतीत उदाहरणशील असल्यामुळे अनेकदा त्यांची प्रशंसा केली जाते. आणखी, आम्ही यहोवाचे गुणगान आमच्या प्रार्थनेत त्याचे आभार मानण्याकरवी करु शकतो.—पाहा १ इतिहास २९:१०-१३.

४. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे गुणगान करण्यासाठी एक सर्वात सुंदर मार्ग कोणता आहे?

४ यासोबतच, आमच्या स्वर्गीय पित्याचे गुणगान करण्याचा आणखी एक सुंदर मार्ग म्हणजे, आपण त्याची स्तुती व सद्‌गुण मंजूळ राज्य गीतांद्वारे करु शकतो. मानवी आवाज अधिक सुंदर संगीत वाद्य आहे, असे अनेक संगीतकार व रचनाकार कबूल करतात. शास्त्रीय संगीतात प्रावीण्य मिळवलेल्यांना संगीतिका लिहिण्याची प्रेरणा मिळाली कारण, गाताना मानवाचा आवाज ऐकण्यात अधिक समाधान मिळते.

५. कोणत्या कारणांसाठी आम्ही राज्याच्या गीतांचे गायन गंभीरपणे घेण्यास हवे?

५ मानव जेव्हा गुणगानाचे व कृतज्ञतेचे गीत गातात तेव्हा ते ऐकण्यात यहोवाला किती आनंद होत असेल! यास्तव, आम्ही राज्य गीतांच्या गायनाकडे आमच्या विविध मेळाव्यात, उदाहरणार्थ, मंडळीच्या सभा, विभागिय संमेलने, खास संमेलन दिवस, प्रांतीय अधिवेशने, व आंतरराष्ट्रीय अधिवेशने याकडे निश्‍चितच गंभीर दृष्टिने पाहिले पाहिजे. आमचे गायनाचे पुस्तक खरोखर मनोहर ध्वनीमाधुर्याने भरलेले असल्यामुळे, बाहेरील लोकांनी वारंवार त्याच्या सुंदरतेबद्दल प्रशंसा केली आहे. आम्ही राज्य गीत गायनाच्या जोमात जितके समरस होऊ, तितकाच इतरांना तसेच आम्हा स्वतःला अधिक आनंद आणू.

पवित्र शास्त्र काळात यहोवाचे गुणगान

६. इस्राएल लोकांची तांबड्या समुद्रातून मुक्‍तता झाल्यावर याची गुणग्राहकता त्यांनी कशी व्यक्‍त केली?

६ देवाचे वचन पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, मोशे आणि बाकीच्या इस्राएल लोकांनी तांबड्या समुद्रातून फारोच्या सैन्यापासून मुक्‍त झाल्यावर विजयाने गीत गायिले. त्यांचे गीत या शब्दांनी सुरू झाले: “मला यहोवाचे गीत गाऊ द्या. कारण तो प्रतापाने विजयी झाला आहे; घोडा व त्याचा स्वार त्याने समुद्रात टाकला आहे, याह माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे; तो माझा देव आहे, आणि त्याची स्तुति मी करीन.” (निर्गम १५:१, २, पंडिता रमाबाई भाषांतर) आम्ही इस्राएल लोकांच्या झालेल्या चमत्कारिक मुक्‍ततेनंतर ते गात असलेल्या शब्दांचा आवेश व आनंदाची चांगल्याप्रकारे कल्पना करू शकतो!

७. इस्राएल लोक गायनात यहोवाचे गुणगान करीत असल्याच्या कोणत्या उल्लेखनीय प्रसंगाना इब्री शास्त्रवचनात नमूद केले आहे?

७ १ इतिहास १६:१, ४-३६ मध्ये आपण वाचतो की, दाविदाने यरूशलेमात कोश आणला तेव्हा गायन व संगीताचे वाद्य वाजविण्याद्वारे यहोवाचे गुणगान केले गेले. तो खरोखर एक आनंदाचा प्रसंग होता. शलमोन राजाच्या काळात त्याने यरुशलेमातील मंदिराचे समर्पण केले तेव्हा, संगीताच्या वाद्यांद्वारे यहोवाचे गायन करुन गुणगान केले गेले. आम्ही २ इतिहास ५:१३, १४ मध्ये वाचतो: “कर्णे वाजविणारे व गाणारे एका सुराने परमेश्‍वराची [यहोवा, NW] स्तुति व धन्यवाद करु लागले, आणि कर्णे झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्‍वराची [यहोवा, NW] स्तुति ते उच्चस्वरे करु लागले; ती अशी तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समयी परमेश्‍वराचे [यहोवा, NW] मंदिर मेघाने व्यापिले. त्या मेघामुळे याजकास सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] तेजाने देवमंदिर भरुन गेले.” ती गोष्ट काय दाखवते? हेच की यहोवा ध्वनीमाधुर्याचे गुणगान ऐकत होता, व त्यामुळे तो संतुष्ट झाला. याचे प्रमाण त्याने अलौकिक मेघाद्वारे प्रदर्शित केले. त्यानंतर, नहेम्याच्या दिवसात यरूशलेमेतील कोटाच्या समर्पणावेळी, दोन समुहांचे गायन झाले.—नहेम्या १२:२७-४२.

८. इस्राएल लोकांनी गायनाकडे गंभीर दृष्टिने पाहिले होते, हे कशावरून दिसते?

८ वस्तुतः, गायन हा मंदिरातील उपासनेमध्ये इतका महत्त्वाचा भाग होता की, संगीताच्या सेवेकरता ४,००० लेव्यांना बाजूला काढण्यात आले होते. (१ इतिहास २३:४, ५) यांना गायकही साथ देत असत. उपासनेमध्ये संगीत, विशेषपणे गायकांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. ते खासकरुन नियमशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टी बिंबवण्याकरता नव्हते तर, उपासनेसाठी योग्य उत्साह पुरवण्याकरता होते. त्याने यहोवाची उत्साही मार्गाने उपासना करण्यासाठी इस्राएल लोकांना मदत केली. या वैशिष्ट्यासाठी बारीक सारीक गोष्टीची तयारी, त्यासाठी दिलेले लक्ष, याला विचारात घ्या: “ते व त्यांचे भाऊबंद परमेश्‍वराप्रीत्यर्थ [यहोवा, NW] गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते.” (१ इतिहास २५:७) यहोवाचे गुणगान करण्याला त्यांनी किती गंभीरपणे घेतले हे लक्षात घ्या. ते गाण्यात तरबेज व निपुण होते!

९. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात गायनावर कोणता जोर दिला आहे?

९ आमच्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकात आल्यावर, आम्हाला काय दिसते? येशूचा विश्‍वासघात होणाऱ्‍या रात्री, अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या मनात होत्या. असे असताना देखील, त्याने वल्हांडण सणाची व त्याच्या मृत्युचे स्मरण ठेवण्याच्या प्रस्थापनेची समाप्ती यहोवाचे गुणगान करण्याद्वारे केली. (मत्तय २६:३०) तसेच आम्ही वाचतो की, पौल आणि सीला यांना फटके मारुन बंदिशाळेत टाकल्यावर, “मध्यरात्रीच्या सुमारास . . . प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान्‌ त्यांचे ऐकत होते.”—प्रे. कृत्ये १६:२५.

यहोवाचे गुणगान करणे—आमच्या उपासनेतील महत्त्वपूर्ण भाग

१०. देवाचे गुणगान गीतात करण्याविषयी त्याचे वचन कोणती आज्ञा देते?

१० राज्य गीताचे गायन करण्याकडे मनःपूर्वक लक्ष देणे इतके महत्त्वाचे नाही, असे तुम्हाला कदाचित वाटते का? यहोवा देव आणि येशू ख्रिस्त गुणगान करण्याच्या गोष्टीला महत्त्व देतात तर तुम्ही या गोष्टीचे परत मूल्यमापन करु नये का? देवाचे स्वतःचे वचन, यहोवाचे गुणगान करण्याकरता व त्याच्या स्तुतीचे गायन करण्याच्या आज्ञेने भरलेले आहे! उदाहरणार्थ, यशया ४२:१० मध्ये आपण वाचतो: “अहो, समुद्रावर पर्यटन करणारे व त्यांत राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाश्‍यांसह परमेश्‍वराला [यहोवा, NW] नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.”—स्तोत्रसंहिता ९६:१; ९८:१ हेही पाहा.

११. प्रेषित पौल गायनाविषयी कोणता सल्ला देतो?

११ गायन आमच्या आत्म्याला उभारी आणू शकते हे प्रेषित पौलाला माहीत असल्यामुळे, याविषयी तो आम्हाला दोनदा बोध करतो. आम्ही इफिसकर ५:१८, १९ मध्ये वाचतो: “आत्म्याने परिपूर्ण व्हा; स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंतःकरणात प्रभूला [यहोवा, NW] गायनवादन करा.” तसेच कलस्सैकर ३:१६ मध्ये आम्ही वाचतो: “ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो; परस्परांस सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा.”

१२. आमची गीते आम्हाला शिकण्यासाठी तसेच एकदुसऱ्‍यांना सल्ला देण्यासाठी मदत करणारी असल्याची कोणती उदाहरणे आम्हाजवळ आहेत?

१२ पौलाने जेव्हा ‘स्तोत्रे, देवाला गीते, आध्यात्मिक गायन, तुमच्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे’ यांचा उल्लेख केला तेव्हा, त्याने प्रत्येक प्रसंगात गाण्याविषयी पुनःपुन्हा उल्लेख केला याकडे लक्ष द्या. तसेच, कलस्सैकरांना द्यावयाच्या आपल्या अभिप्रायाची सुरवात, तो असे म्हणून करतो की, याद्वारे आपण “परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण देऊ व बोध” करु शकतो. हेच आपण करतो, व आमच्या विविध गीतांच्या शीर्षकांवरून हे दिसून येते. उदाहरणार्थ, “सर्व निर्मिती, यहोवाचे गुणगान करो!” (क्रमांक ५), “स्थिर, व अढळ व्हा!” (क्रमांक १०), “राज्य आशेमुळे आनंदित व्हा!” (क्रमांक १६), “त्यांना भिऊ नका!” (क्रमांक २७), “आमचा देव यहोवाची स्तुती करा!” (क्रमांक १००).

१३. गायन आमच्या उपासनेचा भाग असण्याच्या महत्त्वाला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ कसे दाखवले आहे?

१३ या आज्ञेच्या अनुषंगाने, ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ अशी योजना केली आहे की आमचे मेळावे—मंडळीच्या सभा, विभागिय संमेलने, खास संमेलन दिवस, प्रांतीय अधिवेशने, आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने—यांचा आरंभ व समारोप राज्य गीते गाण्याद्वारे व्हावा. (मत्तय २४:४५) यासोबतच, अशा मेळाव्या दरम्यान इतर वेळा देखील गीते गाण्याचा आराखडा केला आहे. आमच्या सभेचा आरंभ नेहमीप्रमाणे राज्य गीत गायनाद्वारे होत असल्यामुळे, उपासनेच्या या भागात सहभाग घेण्यासाठी आम्ही वेळेवर येऊ नये का? तसेच सभेचा समारोप गीत गाऊन होत असल्यामुळे, सभेच्या समारोपाला होणारे गीत व प्रार्थना याकरता आम्ही थांबू नये का?

१४. आमच्या कार्यक्रमाला अनुलक्षून असणाऱ्‍या गीतांची निवड करण्याबद्दल कोणती उदाहरणे आमच्याजवळ आहेत?

१४ आमच्या सभेच्या गीतांची निवड कार्यक्रमासोबत मेळ घालण्यासाठी काळजीपूर्वकपणे केलेली असते. उदाहरणार्थ, “ईश्‍वरी शिक्षण” या १९९३ मध्ये झालेल्या प्रांतीय अधिवेशनात, सैतान, जग, व पतित शरीर यावर तीन भाषणांची चर्चा केल्यानंतर लगेच गीत क्रं. १९१, ज्याचे शीर्षक “सत्य आत्मसात करा,” हे होते गायिले गेले. त्याप्रमाणे पालकांसाठी असलेल्या बोधाने विपुल भरलेले गीत क्रमांक १६४, “मुले—देवाची अमोल दाने,” मुलांना शिक्षण देण्याच्या पालकांच्या जबाबदारीला एका भाषणाने स्पष्ट केल्यानंतर लगेच गायिले गेले. गीत क्रमांक ७०, “यिर्मयासारखे व्हा,” यिर्मयाच्या भविष्यवाणीवर आधारित असलेल्या भाषणांची शृखंला झाली यानंतर लगेच झाले. मग आमच्या राज्य सेवेच्या विविध पैलूंच्या परिसंवादानंतर, सेवेला केंद्रित असणारे गीत क्रमांक १५६, “माझी इच्छा आहे,” हे होते. अशाचप्रकारची काळजी टेहळणी बुरुज अभ्यासाची, सेवा सभेची, व ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची गीते निवडताना घेतली जाते. यास्तव, हीच गोष्ट, वडील जाहीर भाषण देण्यापूर्वी कार्यक्रमाची सुरवात ज्या गीताने करावी असे सुचवतात ते त्यांच्या भाषणाच्या विषयास लागू होणारे निवडावे हे उचित आहे.

१५. सभेचे अध्यक्ष, गायन केल्या जाणाऱ्‍या गीताची गुणग्राहकता कशी वाढवू शकतात?

१५ अध्यक्ष, गीत गाण्याचे सांगताना गाण्याचा विषय किंवा शीर्षक सांगण्याद्वारे गीताची गुणग्राहकता वाढवू शकतात. आम्ही गीतांच्या संख्येचे नव्हे तर शास्त्रवचनीय शीर्षकांचे गायन करतो. तसेच शीर्षकाखाली दिलेले शास्त्रवचन यावर लक्ष दिल्यास मंडळीला त्या गीताची अधिक गुणग्राहकता बाळगण्यास मदत होऊ शकते. पुन्हा एकदा हे सांगणे उचित ठरेल की, सर्वांनी गाण्याच्या उत्साहात समरुप झाले पाहिजे.

गायन करण्याद्वारे यहोवाच्या चांगुलपणासाठी गुणग्राहकता दाखवा

१६. आमच्या गीताच्या उत्साहात आम्ही कसे समरूप होऊ शकतो?

१६ आमच्या राज्य गीतांच्या ओळी अर्थपूर्ण असल्यामुळे, गाताना आम्ही त्यातील शब्दांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आम्ही प्रत्येक गाण्याच्या उत्साहात समरुप झाले पाहिजे. जसे की, काही गीते प्रीती, आत्म्याची फळे, याविषयी असल्यामुळे ती खरी आहेत. (गलतीकर ५:२२) ती गीते आम्ही सखोलतेने व कळकळीसह गातो. इतर हर्षदायक असल्यामुळे आम्ही त्यांचे आनंदाने गायन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, आणखी काही गीते जोमदार व कार्य करायला लावणारी असल्यामुळे, त्यांचे गायन आम्ही आवेशाने व पूर्ण आत्मविश्‍वासाने केले पाहिजे. आमच्या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत, आमच्या सादरतेत उबदारपणा आणि प्रेमळभावना प्रकट करण्याविषयी आम्हाला सल्ला दिला जातो. गीतांचे गायन करताना देखील उबदारपणा, प्रेमळभावना, आणि आवेश प्रदर्शित करणे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

१७. (अ) अविश्‍वासू इस्राएल लोकांना दिलेला कोणत्या दोषारोपाला आम्ही आमच्या गायनाच्याबाबतीत लागू करू नये? (ब) आमच्या गीतात दिलेल्या सल्ल्याकडे गंभीर दृष्टिने पाहिल्यास कोणता परिणाम होऊ शकतो?

१७ आमच्या मनात दुसऱ्‍याच काही गोष्टी ठेवून आम्ही राज्य गीत गात असलो तर, आम्हाला त्याच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजणार नाही. असे असेल तर आम्ही वाग्दंड दिलेल्या त्या अविश्‍वासू इस्राएल काही अंशी लोकांसारखे ठरणार नाही का? त्यांनी ओठांनी देवाचा सन्मान केला पण त्यांचे अंतःकरण त्याच्यापासून दूर ठेवले होते. (मत्तय १५:८) राज्याची गीते आम्ही ज्याप्रकारे गातो याबाबतीत तोच दोषारोप लागू न होण्याचे आम्हाला वाटत नाही का? आमची राज्य गीते गाताना आम्ही गुणग्राहकता दाखवली तर, केवळ स्वतःलाच नव्हे तर आमच्या सभोवती असणाऱ्‍या तरुणांसहित सर्वांना, उत्तेजन देऊ. होय, राज्य सभागृहात गाणाऱ्‍या सर्वांनी या गीतात असलेला सल्ला गंभीरतेने घेतला तर, त्यामुळे आमच्या सेवेत आवेशी राहण्यास तसेच पातक करण्याच्या मोहास टाळण्यासाठी ते एक शक्‍तीशाली उत्तेजन ठरेल.

१८. एका स्त्रीवर राज्य गीतांच्या गायनाचा काय परिणाम झाला?

१८ आम्ही गात असलेल्या राज्य गीतांमुळे, वारंवार बाहेरील लोक आश्‍चर्यचकीत झालेले आहेत. वॉचटावरने एकदा हा विषय प्रकाशित केला होता: “[आमचे] गायन, लोकांना यहोवा देवाचे ज्ञान घेण्याची देखील मदत करु शकते हे एका स्त्रीच्या अनुभवावरून दिसून येते. तिचा बाप्तिस्मा न्यूयॉर्क शहरातील यांकी स्टेडियमवर १९७३ मध्ये ‘ईश्‍वरी विजय’ अधिवेशनात झाला. ती स्वतःच स्थानिक राज्य सभागृहात आली व दोन्ही सभा होईपर्यंत राहिली. मंडळीने ‘प्रतीफळावर दृष्टी ठेवा!’ हे गीत गायिले तेव्हा, त्यातील शब्द व ज्याप्रकारे ते गायिले गेले यामुळे तिला फारच आश्‍चर्य वाटले. तिने ठरविले की, तिला हवे असलेले हेच ठिकाण आहे. त्यानंतर ती एका साक्षीदाराकडे गेली व पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा केली. त्यानंतर यहोवाची ख्रिस्ती साक्षीदार होण्यापर्यंत [तिने] प्रगती केली.”

१९. आमच्या राज्य गीतांचे गायन पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी शेवटी कोणते उत्तेजन दिले आहे?

१९ आमच्या बहुतेक सभांमध्ये, श्रोत्यांना त्यांच्या भावना व गुणग्राहकता व्यक्‍त करण्याची संधी फारच कमी असते. परंतु आम्हाला यहोवाच्या चांगुलपणाबद्दल कसे वाटते हे आम्ही सर्व जण राज्य गीतांचे हृदयःपूर्वक गायन करण्याद्वारे व्यक्‍त करू शकतो. त्याशिवाय, आम्ही एकत्र भेटतो तेव्हा, चांगल्या उत्साहात नसतो का? तेव्हा, आम्हाला गायन करण्याची इच्छा झाली पाहिजे! (याकोब ५:१३) खरोखर, जितके आम्ही यहोवाच्या चांगुलपणाची व विपुल दयेची गुणग्राहकता बाळगू तितके आम्ही त्याचे गुणगान पूर्ण जीवाने गीत गाण्याकरवी करु!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ यहोवाचे गुणगान करण्यासाठी कोणती दोन मूलभूत कारणे आहेत?

▫ आम्ही यहोवाचे गुणगान कोणत्या विविध मार्गांनी करु शकतो?

▫ यहोवाचे गुणगान आणखी कोणत्या एका सुंदर मार्गाकरवी आम्ही करु शकतो?

▫ यहोवाचे गुणगान गीतात करण्याबद्दलची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आम्हाजवळ आहेत?

▫ आम्ही आमच्या राज्याच्या गीताच्या गायनाला कसा योग्य न्याय देऊ शकतो?

[८, ९ पानांवरील चित्रं

इस्राएल लोकांची तांबड्या समुद्रातून मुक्‍तता झाल्यावर त्यांनी त्यांचा आनंद गीतात व्यक्‍त केला

[१- पानांवरील चित्रं]

हर्षदायक गीते आज ख्रिस्ती उपासनेचा भाग आहेत

[११ पानांवरील चौकट]

त्या गीतांचा आनंद घ्या!

असे दिसते की काहींना, पुष्कळ गीते शिकण्यासाठी थोडीशी अडचण भासली. तथापि, काही मंडळ्यांना यातील बहुतेक गीते गाताना तेवढे कठीण वाटले नाही. सुरवातीला अपरिचित असणारे (गीत) शिकण्यासाठी थोड्याफार प्रयत्नांचीच जरुरी असू शकते. एकदा का अशी गीते माहीत झाली, मग मंडळी ज्यांना शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत त्या गीतांपेक्षा यांची अधिक प्रशंसा करतात. मग, मंडळीतील सर्वजण ती गीते आत्मविश्‍वासाने गाऊ शकतील. होय ते त्या गीतांचा आनंद घेऊ शकतील!

[१२ पानांवरील चौकट]

सामाजिक मेळाव्यात राज्य गीते गा

आमच्या राज्याच्या गीतांचे गायन केवळ राज्य सभागृहापुरतेच मर्यादित असू नये. पौल आणि सीला यांनी तुरुंगात असताना यहोवाचे गुणगान केले. (प्रे. कृत्ये १६:२५) तसेच शिष्य याकोबाने म्हटले: “कोणी आनंदात आहे काय? त्याने देवाला स्तोत्रे गावी.” (याकोब ५:१३) सामाजिक मेळाव्यात प्रत्येकजण आनंदात असतो. तर मग राज्य गीते का गाऊ नयेत बरे? गायनासोबत जर पियानो किंवा सतारची साथ असेल तर ते अधिकच आनंददायक होऊ शकते. नाहीतर, राज्य गीतांना पियानोने ध्वनिमुद्रित केलेल्या टेपचे अल्बम आमच्या पुष्कळ साक्षीदारांच्या कुटुंबाजवळ आहेत. त्यामुळे गायनात त्यांची केवळ मदतच होणार नाही तर, ते सुंदर पार्श्‍वभूमीच्या संगीताकरता उत्कृष्ठ असेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा