वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१ पृ. ३-४
  • धर्म तुमच्या गरजा तृप्त करीत आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्म तुमच्या गरजा तृप्त करीत आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तुम्ही कशी उपासना करता याला काही अर्थ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • त्याने योग्य निवड केली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मोशे का पळून गेला
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१ पृ. ३-४

धर्म तुमच्या गरजा तृप्त करीत आहे का?

हवा, पाणी, अन्‍न, निवारा—या मानवाच्या गरजा सार्वत्रिकपणे ओळखल्या गेल्या आहेत. त्या नसल्यास तुम्ही नागवणूक व मृत्युचाही सामना करता. तथापि, बऱ्‍याच काळाआधी, इस्राएलाचा नेता मोशे याने, मानवाच्या आणखी एका गरजेकडे लक्ष केंद्रित केले. ती अन्‍न व पाण्यापेक्षाही महत्त्वाची होती. मोशेने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—अनुवाद ८:३.

मोशेने या कळकळीच्या शब्दांद्वारे आपल्या धार्मिक किंवा आध्यात्मिक गरजांना तृप्त करण्याचे महत्त्व दाखवले. त्यांना तृप्त करण्यावर आमचे जीवन अवलंबून असल्याचे त्याने सूचित केले! इस्राएल लोक त्यांच्या ४० वर्षे अरण्यातील दूरवरच्या प्रवासात अक्षरशः, ‘यहोवाच्या मुखातून येणाऱ्‍या वचनाने’ जगले. प्राणघातक ठरणाऱ्‍या अनुभवातून ते बचावले. देवाच्या आज्ञेनुसार, आकाशातून चमत्कारिकरित्या मान्‍ना म्हटलेले अन्‍न पडले. त्यांची तहान भागविण्याकरता खडकातून पाणी आले. परंतु देवाने त्यांच्या शारीरिक गरजा भागविण्यापेक्षाही त्यांची अधिक काळजी घेतली. मोशेने म्हटले: “मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] तुला शिक्षा करीत आहे.”—अनुवाद ८:४, ५; निर्गम १६:३१, ३२; १७:५, ६.

इस्राएल लोकांना नैतिक किंवा धार्मिकदृष्ट्या स्वतःसाठी चांगले किंवा वाईट ते ठरविण्यासाठी मदतीविना सोडले नव्हते. त्यांना प्रत्यक्ष देवाकडून मार्गदर्शन मिळाले. त्याने त्यांना मोशेचे नियमशास्त्र, म्हणजे उल्लेखनीय कायद्यांची संहिता दिली, ज्यामध्ये आरोग्याला पोषक आहार, स्वच्छतेचे कडक नियम, व विश्‍वसनीय नैतिक व धार्मिक तत्त्वे होती. अशाप्रकारे देवाने इस्राएलांचे आरोग्य व आध्यात्मिक हित वाढवले. ते ‘यहोवाच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाद्वारे’ जगले.

याप्रकारे, इस्राएल लोक इतर राष्ट्रांपासून पूर्णपणे वेगळे ठरले. मोशेच्या दिवसात इजिप्त, प्रथम जागतिक साम्राज्य या नात्याने शासन करत होते. तो अतिशय धार्मिक देश होता. वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीया म्हणतो: “प्राचीन इजिप्तमधील लोक, विविध दैवते, (देव व देवता) निसर्गाच्या प्रत्येक पैलूवर व मानवाच्या प्रत्येक हालचालीवर प्रभाव टाकून आहेत असा विश्‍वास करत होते. यास्तव ते अनेक दैवतांची भक्‍ती करत असत. . . . इजिप्तमधील प्रत्येक शहरात व नगरात, लोक त्यांच्या मुख्य दैवतांशिवाय त्यांच्या खास देवाची भक्‍ती करीत होते.”

या अनेक दैवतांच्या भक्‍तीने इजिप्तमधील लोकांच्या आध्यात्मिक गरजांना तृप्त केले का? नाही. इजिप्त हा देश अंधश्रद्धेत तसेच मानहानिकारक लैंगिक आचरणात बुडाला. जीवन आणि आरोग्याला हातभार लावण्याऐवजी, इजिप्तमधील जीवनाच्या मार्गाने ‘दुःखदायक व्याधिकडे’ निरवले. (अनुवाद ७:१५) यास्तव, पवित्र शास्त्र इजिप्तमधील देवांना तुच्छ लेखते व त्यांना “मातीच्या मूर्त्या” असे संबोधते यात काही आश्‍चर्याचे नाही.—यहेज्केल २०:७, ८, NW.

आजही अशाचप्रकारची परिस्थिती अस्तित्वात आहे. बहुतेक लोकांचा थोडाफार तरी धार्मिक विश्‍वास आहे; काही थोडेच स्वतःला नास्तिक म्हणतील. तरीदेखील, सामान्यपणे धर्म, मानवजातीच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यात अपयशी ठरला हे स्पष्टच आहे. लोक जर ‘यहोवाच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाप्रमाणे’ खरोखर जगले असते तर, आज युद्ध, जातीयवाद, उपासमार, आणि निर्दयी दारिद्‌य्राच्या समस्या राहिल्या असत्या का? मुळीच नाही! असे असतानाही, खूपच थोडे लोक त्यांचा धर्म बदलण्याचा विचार करतील. काही लोकांची तर धर्माबद्दल चर्चा करण्याची किंवा धर्माच्या नव्या कल्पनेकडे लक्ष देण्याची देखील इच्छा नसते!

उदाहरणार्थ, पश्‍चिम आफ्रिकेच्या घाना येथील एका मनुष्याने ख्रिस्ती सेवकाला सांगितले: “माझा विश्‍वास आहे की, यहुद्यांना जसे देवाने त्यांच्या संदेष्ट्याकरवी स्वतःला प्रकट केले, तसेच त्याने आज आम्हां आफ्रिकेतील लोकांना आमच्या शक्‍तीशाली धर्मोपदेशक आणि धर्मोपदेशिकांकरवी स्वतःला प्रकट केले आहे. आम्हा आफ्रिकेच्या लोकांतील काहीजण आमच्या धर्मोपदेशकांना ओळखत नाहीत, पण त्याऐवजी ते येशू, मुहंमद, व इतरांविषयी बोलतात हे लाजिरवाणे आहे.”

आफ्रिकेतील अनेक पारंपारिक संस्थामध्ये, ख्रिस्ती धर्माकडे तो गोऱ्‍या लोकांचा धर्म आहे अशा दृष्टिने पाहिले जाते. आफ्रिकेत आणलेल्या या धर्माने चांगले करण्याऐवजी खूपच हानी केली आहे. परंतु दुराग्रही प्रवृत्ती तुम्हाला मदत करील, किंवा ती तुमच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्याच्या प्रयत्नाला अडथळा आणील? आफ्रिकेतील एक म्हण सांगते: “भूक लागल्यामुळे जेवणाच्या वाटग्यात तुम्ही दोन्ही हात घालणार नाही.” विशेषपणे जर वाटग्यात काय आहे हे तुम्हाला माहीत नसल्यास—जेवणाची अशी सवय अशिष्ट तसेच धोकादायक आहे! तरीदेखील, अनेक जण त्यांच्या धर्माची निवड विचारपूर्वक परीक्षण करण्याऐवजी, भावनेच्या आहारी जाऊन किंवा कौटुंबिक प्रथेच्या आधारावर करतात.

तुमच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करणारी भक्‍ती, “तुमच्या तर्क करण्याच्या सामर्थ्यासह पवित्र सेवा असली पाहिजे.” (रोमकर १२:१, NW) ती जाणकार व बौद्धिक निवड असावी. तर मग आपण, आफ्रिकेतील यथार्थतेवरून एखाद्याच्या धर्माची निवड करण्याच्या विषयाचे परीक्षण करू या. परंतु, पुढे दिलेल्या गोष्टी सर्वच वाचकांना आवडीच्या वाटतील.

[३ पानांवरील चित्रं]

मोशेने आमच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्याचे महत्त्व दाखवले

[४ पानांवरील चित्रं]

आफ्रिकेतील ख्रिस्ती धर्मराज्यातील मिशनऱ्‍यांच्या अनुभवाने काहीं लोक पवित्र शास्त्रासंबंधी दुराग्रही झाले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा