वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१ पृ. १४-१९
  • तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • या जगाच्या आत्म्यास टाळणे
  • “जगाच्या आत्म्याचा” आविष्कार
  • या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार कसा करावा?
  • ‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • जगाचा नव्हे, देवाचा आत्मा मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • ‘जीवंत करणारा जो आत्मा’ त्याच्या अधीन असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तरुणांनो—जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१ पृ. १४-१९

तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?

“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.” —१ करिंथकर २:१२.

१, २. भारतातील भोपाळमध्ये विषारी वायूच्या संबंधाने कोणती दुर्घटना घडली, परंतु जगभरात कोणत्या अधिक प्राणघातक “वायू”चा श्‍वास घेतला जातो?

डिसेंबर १९८४ च्या एका थंडीच्या रात्री, भारतातील भोपाळ येथे काहीतरी धक्कादायक घडले. त्या शहरात एक रासायनिक कारखाना आहे, व त्या डिसेंबरच्या रात्री, वायू साठवलेल्या एका टाकीच्या झडपामध्ये दोष निर्माण झाला. अचानक अनेक टन मिथील आयसोसायनेट हवेत मिसळण्यास सुरवात झाली. हवेमुळे हा प्राणघातक वायू घरांमध्ये आणि झोपलेल्या कुटुंबावरून जाऊ लागला. मेलेल्यांची संख्या हजारोंवर गेली, तसेच अनेक लोक अपंग व दुर्बळ झाले. त्या काळापर्यंतच्या उद्योगातील हा अतिशय वाईट अपघात होता.

२ भोपाळविषयी ऐकल्यावर लोकांना बरेच दुःख झाले. परंतु संपूर्ण जगभरातील लोक प्रत्येक दिवशी श्‍वास घेत असलेल्या आध्यात्मिक “वायूने” मारलेल्याच्या तुलनेत, तेव्हा सुटलेल्या वायूने मेलेल्यांची संख्या अगदी कमी वाटते. पवित्र शास्त्र त्याला “जगाचा आत्मा” असे म्हणते. ते एक प्राणघातक वातावरण आहे, ज्याची तुलना प्रेषित पौलाने देवाकडील आत्म्याबरोबर केली, त्याने म्हटले: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्‍यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.”—१ करिंथकर २:१२.

३. “जगाचा आत्मा” काय आहे?

३ “जगाचा आत्मा” नक्की आहे तरी काय? द न्यू थेअर्स ग्रीक इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंट, नुसार “आत्मा” (ग्रीक, न्यूʹमा) या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ, “कोणाच्याही जीवात भरणारा व त्याला ताब्यात ठेवणारा स्वभाव किंवा प्रभाव आहे.” एखाद्या व्यक्‍तीचा चांगला किंवा वाईट आत्मा किंवा स्वभाव असू शकतो. (स्तोत्रसंहिता ५१:१०, २ तीमथ्य ४:२२) लोकांच्या समुहाचा आत्मा किंवा हक्क गाजविणारा स्वभाव देखील असू शकतो. प्रेषित पौलाने त्याचा मित्र फिलेमोन याला लिहिले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.” (फिलेमोन २५) अशाचप्रकारे—परंतु मोठ्या प्रमाणात—जगातील लोकांचा सामान्यपणे वरचढ स्वभाव आहे, व याच ‘जगाच्या आत्म्याचा’ उल्लेख पौलाने केला होता. विन्सेंटच्या वर्ल्ड स्टडीज्‌ इन द न्यू टेस्टमेंट नुसार, “वाक्‌संप्रदायाचा अर्थ, दुष्ट जग चालना देत असलेले वाईट तत्त्व असा होतो.” या जगाच्या विचारसरणीला अनुमती देत असलेली व लोक ज्याप्रकारे कार्य करतात त्यांच्यावर प्रबळपणे प्रभाव टाकणारी ही पापमय मनोवृत्ती आहे.

४. जगाच्या आत्म्याचा स्रोत कोण आहे, व मानवांवर या आत्म्याचा काय परिणाम होत आहे?

४ हा आत्मा विषारी आहे. का बरे? कारण तो या “जगाचा अधिपती,” सैतानापासून येतो. खरोखर, त्याला “अंतरिक्षातील राज्याचा [हवेचा, NW] अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा अधिपती” असे म्हटले आहे. (योहान १२:३१; इफिसकर २:२) या “हवे”तून किंवा ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांवर आता कार्य करणारा आत्मा’ यातून सुटणे कठीण आहे. मानवी समाजात तो सर्वत्र आहे. आम्ही त्याचा श्‍वास घेतल्यावर त्याच्या प्रवृत्त्या, ध्येये आपण स्वीकारु लागतो. जगाचा आत्मा ‘देहस्वभावाप्रमाणे जगण्यास,’ म्हणजे, आमच्या पापमय अपरिपूर्णतेसह जगण्यास उत्तेजन देतो. ते प्राणघातक आहे, “कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहां.”—रोमकर ८:१३.

या जगाच्या आत्म्यास टाळणे

५. भोपाळमध्ये झालेल्या विपत्तीच्या काळात एका साक्षीदाराने सुज्ञपणे कसे कार्य केले?

५ भोपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या वेळी, यहोवाचा एक साक्षीदार भोंगा, व विषारी वायूच्या, ॲक्रिटच्या वासाने जागा झाला. विलंब न लावता त्याने त्याच्या कुटुंबाला जागे केले व त्वरित रस्त्यावर आणले. वाऱ्‍याच्या दिशेचा क्षणभर अंदाज घेतल्यावर, गोंधळलेल्या लोकांच्या गर्दीमधून धडपडत त्याच्या कुटुंबाला शहराच्या बाहेरील एका टेकडीवर घेऊन गेला. तेथे ते, जवळच्या तळ्यावरून येणारी ताजी व स्वच्छ हवा घेऊ शकले.

६. जगाच्या आत्म्यापासून बचाव होण्यासाठी आम्ही कोठे जाऊ शकतो?

६ या जगाच्या विषारी “हवे”पासून आश्रय मिळण्यासारखे असे कोणते उंच ठिकाण आहे का? पवित्र शास्त्र म्हणते, तसे ठिकाण आहे. आमच्या दिवसाकडे पुढे पाहून, संदेष्टा यशयाने लिहिले: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील: ‘चला आपण परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू, कारण सीयोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून परमेश्‍वराचे [यहोवा, NW] वचन निघेल.” (यशया २:२, ३) शुद्ध उपासनेचे उच्च ठिकाण, उंच केलेला “परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मंदिराचा डोंगरच,” केवळ या जगाच्या गुदमरविणाऱ्‍या विषारी आत्म्यापासून सुरक्षित असणारे पृथ्वीवरील एकमेव ठिकाण आहे. तेथे यहोवाचा आत्मा त्याच्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांमध्ये मुक्‍तपणे वाहतो.

७. अनेक जण जगाच्या आत्म्यापासून कशाप्रकारे बचावले आहेत?

७ भोपाळमधील साक्षीदाराने जसे त्यापासून मुक्‍त झाल्याचा आनंद अनुभवला त्याप्रमाणेच, जगाच्या आत्म्याचा आधी श्‍वास घेतलेल्या अनेकांनी त्यापासून मुक्‍त झाल्याचा आनंद घेतला. या जगाच्या हवेचा किंवा आत्म्याचा श्‍वास घेणाऱ्‍या ‘आज्ञा मोडणाऱ्‍या पुत्रांबद्दल’ बोलल्यानंतर, प्रेषित पौल म्हणतो: “त्या लोकांत आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनांच्या इच्छेप्रमाणे करीत होतो, व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव, दयासंपन्‍न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केले.” (इफिसकर २:३-५) जे या व्यवस्थिकरणातील विषारी हवे शिवाय कशाचा श्‍वास घेत नाहीत ते आध्यात्मिक अर्थाने मृत आहेत. तथापि, यहोवामुळेच लक्षावधी लोक आज आध्यात्मिक उच्च ठिकाणाकडे जात आहेत व त्या प्राणघातक परिस्थितीतून स्वतःला वाचवित आहेत.

“जगाच्या आत्म्याचा” आविष्कार

८, ९. (अ) काय दाखवते की, जगाच्या आत्म्यापासून आम्ही सतत दक्ष राहिले पाहिजे? (ब) सैतानाचा आत्मा आम्हाला कशाप्रकारे भ्रष्ट करू शकतो?

८ सैतानाची प्राणघातक हवा अजूनही आमच्या सभोवती वाहत आहे. आम्ही दक्ष असले पाहिजे व कधीही कदाचित आध्यात्मिकरित्या गुदमरण्यासाठी परत जगात, खालपर्यंत वाहवत जाऊ नये. यासाठी आम्ही सतत जागृत असण्याची गरज आहे. (लूक २१:३६; १ करिंथकर १६:१३) उदाहरणार्थ, या वास्तविकतेचा विचार करा. सर्व ख्रिश्‍चनांना नैतिकतेविषयी यहोवाचे दर्जे माहीत आहेत व व्यभिचार, जारकर्म, आणि समलैंगिकता अशा घाणेरड्या सवया स्वीकारणीय आहेत याबरोबर ते कधीही सहमती दाखवणार नाहीत. तरीसुद्धा, प्रत्येक वर्षी यहोवाच्या संघटनेतून ४०,००० वैयक्‍तिकांना बहिष्कृत केले जाते. का बरे? बहुतेक प्रकरणात, याच घाणेरड्या सवयांमुळे. ते कसे घडू शकते?

९ कारण आम्ही सर्वच अपरिपूर्ण आहोत. आमचे शरीर कमजोर आहे, व आमच्या हृदयाच्या पृष्ठभागावर असलेल्या वाईट प्रवृत्तीविरूद्ध आम्हाला सतत झगडावे लागते. (उपदेशक ७:२०; यिर्मया १७:९) तथापि, जगाचा आत्मा या वाईट प्रवृत्तींची अंडी उबवतो. जगातील अनेकांना अनैतिकतेबद्दल चुकीचे काहीच दिसत नाही तसेच काहीही चालू शकते ही गोष्ट सैतानाच्या व्यवस्थिकरणातील मानसिक प्रवृत्तींचा भाग आहे. अशा विचारसरणीसाठी आम्ही स्वतःला उघड केले तर, जगाप्रमाणे विचार करू लागण्याची मोठी शक्यता आहे. लवकरच असे अशुद्ध विचार चुकीच्या इच्छा उत्पन्‍न करून त्याचे पर्यवसान, घोर पापात होईल. (याकोब १:१४, १५) आम्ही यहोवाच्या शुद्ध उपासनेच्या पर्वतावरून भरकटत जाऊन सैतानाच्या जगाच्या सखल भागात गेलेले असू. तेथे स्वेच्छेने राहणाऱ्‍या कोणालाही सार्वकालिक जीवन मिळणार नाही.—इफिसकर ५:३-५, ७.

१०. सैतानाच्या हवेचा एक आविष्कार कोणता आहे, आणि ख्रिश्‍चनांनी यास विरोध का केला पाहिजे?

१० जगाच्या आत्म्याचा प्रत्यक्षात पुरावा आमच्या सभोवती दिसत आहे. उदाहरणार्थ, अनेक लोक, थिल्लर, मर्मभेदी मनोवृत्तीचे जीवन जगतात. राजकारणातील भ्रष्ट किंवा असमर्पक पुढाऱ्‍यांच्या व अनैतिक, लोभी धार्मिक नेत्यांच्या भ्रमनिरासाद्वारे ते गंभीर गोष्टींविषयी अनादरशीलपणे बोलतात. ख्रिस्ती लोक अशा मनोवृत्तीचा प्रतिकार करतात. आमच्याजवळ हितावह विनोदबुद्धी असली तरी, मंडळीमध्ये अनादराचा मर्मभेदी आत्मा आणण्याचे आम्ही टाळतो. ख्रिश्‍चनांच्या बोलण्यातून यहोवाचे भय व हृदयाची शुद्धता प्रतिबिंबित होते. (याकोब ३:१०, ११; पडताळा नीतीसूत्रे ६:१४.) आम्ही तरूण किंवा वयस्कर असलो तरी आमचे बोलणे “सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे [आम्ही] समजावे.”—कलस्सैकर ४:६.

११. (अ) जगाच्या आत्म्याचा दुसरा पैलू कोणता आहे? (ब) हा पैलू प्रदर्शित करत असलेल्यांपासून ख्रिस्ती लोक वेगळे का आहेत?

११ जगाचा आत्मा प्रदर्शित करीत असलेली आणखी एक प्रवृत्ती, द्वेष ही आहे. हे जग, द्वेष आणि वंश, भिन्‍न भिन्‍न जाती, राष्ट्र, आणि वैयक्‍तिक मतभेद याच्यामुळे विभागले आहे. देवाचा आत्मा जेथे क्रियाशील आहे तेथे किती उत्तम गोष्टी आहेत! प्रेषित पौलाने लिहिले: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर, सर्व माणसांबरोबर तुम्हांकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे; मी फेड करीन असे प्रभु [यहोवा, NW] म्हणतो.’ उलटपक्षी, ‘तुझा शत्रु भुकेला असल्यास, त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास, त्याला प्यावयास दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्‍याची रास करशील.’ वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्‍याने वाइटाला जिंक.”—रोमकर १२:१७-२१.

१२. ख्रिस्ती लोक भौतिकवाद का टाळतात?

१२ जगाचा आत्मा भौतिकवादाला देखील उत्तेजन देतो. व्यापारी जगाने उत्तेजन दिलेली, आधुनिक साधन सामग्री, आधुनिक फॅशन, आधुनिक मोटार गाडी या गोष्टींचा अनेक लोक पिच्छा पुरवतात. ते “डोळ्यांची वासना” याचे दास बनतात. (१ योहान २:१६) अनेक लोक त्यांच्या जीवनातील यशाचे मोजमाप, त्यांच्या घराच्या आकारावरून किंवा बँक खात्यातील रक्कमेवरून करतात. शुद्ध उपासनेच्या उंच डोंगरावरून स्वच्छ आध्यात्मिक हवेचा श्‍वास घेणारे ख्रिस्ती अशा प्रवृत्तीचा प्रतिकार करतात. भौतिक गोष्टींचा पाठलाग करणे नाशकारक असू शकते हे त्यांना माहीत आहे. (१ तीमथ्य ६:९, १०) येशूने त्याच्या शिष्यांना आठवण करून दिली: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”—लूक १२:१५.

१३. या जगाच्या आत्म्याचे आणखी कोणते आविष्कार आहेत?

१३ या जगाच्या अपायकारक “हवे”चे आणखी आविष्कार आहेत. एक आहे बंडाळीचा आत्मा. (२ तीमथ्य ३:१-३) अनेक लोक आज अधिकाराला जुमानत नसल्याचे तुम्ही पाहिले आहे का? प्रापंचिक कामात जोवर कोणी नजर ठेवत नाही, तोवर लोक काम करीत नसल्याचे सर्व ठिकाणी दृष्टोपत्तीस येणाऱ्‍या प्रवृत्तीचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? नियमांना मोडणाऱ्‍या—कदाचित कर देण्यामध्ये फसवणूक करणाऱ्‍या किंवा कामाच्या ठिकाणातून काही चोरी करणाऱ्‍या अशा किती लोकांना तुम्ही ओळखता? तुम्ही अजूनही शाळेत जाणारे असाल तर, तुमचे सहविद्यार्थी विद्यालयात यश मिळवणाऱ्‍यांचा तिरस्कार करतात म्हणून चांगले करण्यापासून तुम्ही कधी निराश झाला आहात का? हे सर्व सैतानाच्या जगाच्या आत्म्याचे आविष्कार आहेत, ज्याचा ख्रिश्‍चनांनी प्रतिकार केला पाहिजे.

या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार कसा करावा?

१४. कोणत्या मार्गात, ख्रिस्ती लोक, ख्रिस्तेत्तरांपासून वेगळे आहेत?

१४ जगात रहात असतानाही आम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार कसा करू शकतो बरे? आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की, आम्ही शारीरिकरित्या जगात कोठेही राहत असलो तरी, आध्यात्मिकरित्या या जगाचे भाग नाहीत. (योहान १७:१५, १६) आमची ध्येये, या जगाची ध्येये नाहीत. आमचा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही आध्यात्मिक लोक आहोत, आमचे बोलणे आणि विचारसरणी “मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी [आहे, NW], आम्ही आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.”—१ करिंथकर २:१३.

१५. आम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार कसा करू शकतो?

१५ एखाद्या व्यक्‍तीला विषारी वायूने प्रदुषित असलेल्या प्रदेशात असल्याचे कळल्यावर तो काय करील? तो कदाचित शुद्ध हवेच्या साठ्याला जोडलेला मुखवटा घालील, किंवा शारीरिकरित्या तो त्या ठिकाणाहून निघून जाईल. सैतानाच्या हवेला टाळण्यासाठी या पद्धतींना एकत्र जोडले पाहिजे. आमच्या विचारसरणीवर सैतानाच्या आत्म्याचा कोणताही प्रभाव पडू नये म्हणून, शारीरिकपणे तेथून स्वतःला वेगळे करण्याचा आम्ही होता होईल तेवढा प्रयत्न करतो. याप्रकारे आम्ही चुकीची संगती टाळतो व हिंसाचार, अनैतिकता, भूतविद्या, बंडाळीला वाढवणाऱ्‍या कोणत्याही मनोरंजनासाठी किंवा इतर कोणत्याही देहाच्या कर्माला आम्ही स्वतःला उघड करत नाही. (गलतीकर ५:१९-२१) परंतु, आम्ही जगात राहात असताना, या गोष्टींपुढे उघड होण्याचे पूर्णपणे टाळू शकत नाही. यास्तव, आम्ही आध्यात्मिक शुद्ध हवेचा साठा जोडलेला असेल तर सुज्ञपणे कार्य करु शकतो. आम्ही आमच्या आध्यात्मिक फुप्फुसांना, जगू काय सभांना नियमित उपस्थिती, वैयक्‍तिक अभ्यास, ख्रिस्ती कार्य व संगती, तसेच प्रार्थना याद्वारे भरतो. अशा रीतीने, सैतानाची कोणतीही हवा आमच्या आध्यात्मिक फुप्फुसात शिरल्यास, तिचा प्रतिकार करण्यासाठी देवाचा आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो.—स्तोत्रसंहिता १७:१-३; नीतीसूत्रे ९:९; १३:२०; १९:२०; २२:१७.

१६. देवाचा आत्मा असण्याचा पुरावा आम्ही कसा देऊ शकतो?

१६ देवाचा आत्मा एखाद्या ख्रिश्‍चनाला, तो या जगाचे भाग असलेल्यांपासून उल्लेखनीयरित्या वेगळा असण्यामध्ये बदल करतो. (रोमकर १२:१, २) पौलाने म्हटले: “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.” (गलतीकर ५:२२, २३) देवाचा आत्मा ख्रिश्‍चनाला, गोष्टींची गहन समज देखील देतो. पौलाने म्हटले: “देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही.” (१ करिंथकर २:११) सामान्यपणे, “देवाच्या गोष्टी”मध्ये, खंडणी यज्ञार्पण, येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली असणारे देवाचे राज्य, सार्वकालिक जीवनाची आशा, आणि या दुष्ट जगाचे लगेच निर्मूलन या सत्य गोष्टींचा समावेश होतो. देवाच्या आत्म्याच्या साहाय्यामुळे या गोष्टीं सत्य आहेत हे ख्रिश्‍चनांना माहीत असून ते त्याचा स्वीकार करतात, व हे, जीवनाच्या बाबतीत त्यांच्या दृष्टिकोनाला जगातील लोकांपासून वेगळे करते. सदासर्वकाळ यहोवाची सेवा करण्याच्या भवितव्यासह, त्याची सेवा आता करण्यात त्यांना आनंद मिळत असल्यामुळे ते समाधानी आहेत.

१७. जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण कोणी मांडले, आणि कसे?

१७ या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करणाऱ्‍यांसाठी येशू सर्वोत्कृष्ट आदर्श होता. येशूच्या बाप्तिस्म्यानंतर लगेच, सैतानाने तीन मोह दाखवण्याद्वारे यहोवाची सेवा करण्यापासून त्याला दूर करण्याचा थेट प्रयत्न केला. (मत्तय ४:१-११) शेवटल्यात मोहात, सैतानाची उपासना करण्याचे केवळ एक कृत्य करून दाखविण्याद्वारे संपूर्ण जगावर येशूला प्रभुत्त्व मिळू शकले असते, हे समाविष्ट होते. येशू असा तर्क करू शकला असता: ‘मी उपासनेचे एक कृत्य करील, आणि मग मला जगाचे प्रभुत्त्व मिळाल्यावर, मी पश्‍चात्ताप करीन आणि यहोवाची उपासना परत करेन. मग मी आता नासरेथच्या सुतारापेक्षा जगाचा शासक या नात्याने, मानवजातीच्या फायद्यासाठी चांगल्या पदावर असेन.’ येशूने अशारितीने तर्क केला नाही. यहोवाने त्याला जगाचे प्रभुत्त्व देईपर्यंत तो थांबण्यास इच्छूक होता. (स्तोत्रसंहिता २:८) त्या प्रसंगी, तसेच त्याच्या जीवनातील इतर सर्व प्रसंगात, त्याने सैतानाच्या हवेच्या विषारी प्रभावाचा प्रतिकार केला. याप्रकारे त्याने आध्यात्मिकरित्या प्रदुषित झालेल्या जगावर विजय मिळवला.—योहान १६:३३.

१८. आम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार केल्याने देवाची महिमा कशी होते?

१८ प्रेषित पेत्राने म्हटले की, आम्ही येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे. (१ पेत्र २:२१) आमच्यासाठी यापेक्षा चांगला कोणता आदर्श असला असता? जगाच्या आत्म्याने प्रभावित झालेल्या या शेवटल्या दिवसात, मानव नीतिभ्रष्टतेच्या अधिक रसातळाला जात आहेत. अशा या जगामध्ये, यहोवाच्या उपासनेचे उंच ठिकाण शुद्ध आणि स्वच्छ आहे ही किती अद्‌भुत गोष्ट आहे! (मीखा ४:१, २) लक्षावधी लोक उपासना स्थळी येत आहेत, सर्वत्र पसरलेल्या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करत आहेत व यहोवाचा आदर व महिमा करत आहेत या सर्वांतून देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य दिसून येते! (१ पेत्र २:११, १२) यहोवाचा अभिषिक्‍त राजा जोवर दुष्ट जगाला काढून टाकत नाही तसेच दियाबल सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना अगाधकुपात बंद करत नाही, तोवर उंच ठिकाणी राहण्याचा आपण सर्वच जण निश्‍चय करू या. (प्रकटीकरण १९:१९–२०:३) त्यानंतर या जगाचा आत्मा राहणार नाही. तो किती आशीर्वादित काळ असेल!

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

▫ जगाचा आत्मा काय आहे?

▫ जगाच्या आत्म्याचा वैयक्‍तिकांवर काय प्रभाव होतो?

▫ जगाच्या आत्म्याचे काही आविष्कार कोणते आहेत, आणि त्यांना आम्ही कसे टाळू शकतो?

▫ आम्हाजवळ देवाचा आत्मा आहे हे आम्ही कसे दाखवू शकतो?

▫ जगाचा आत्मा टाळणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

[१६ पानांवरील चित्रं]

जगाचा आत्मा सैतानाकडून आहे

[१७ पानांवरील चित्रं]

जगाचा आत्मा टाळण्यासाठी, यहोवाच्या उपासनेच्या उंच स्थळी पळून जा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा