वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ४/१ पृ. १६-२२
  • ‘जीवंत करणारा जो आत्मा’ त्याच्या अधीन असा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘जीवंत करणारा जो आत्मा’ त्याच्या अधीन असा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीभेचा सदुपयोग
  • अन्‍न, पेय आणि मनोरंजन
  • वंश अभिमान—एक दुरात्मिक वारे
  • जीवन—पुरविणाऱ्‍या “हवेचा” श्‍वास घेत राहा
  • या जगाच्या आत्म्याचा, “हवेचा” श्‍वास घेणे प्राणघातक आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तरुणांनो—जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ४/१ पृ. १६-२२

‘जीवंत करणारा जो आत्मा’ त्याच्या अधीन असा

“जीवंत करणारा तो आत्माच आहे; देहापासून काही लाभ होत नाही.”—योहान ६:६३.

१. (अ) या जगाच्या “हवेचा” प्रभाव टाळण्यांत यहोवा आपल्या लोकांचे कसे सहाय्य करतो? (ब) देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती उत्कर्षित करणे हे आमचे उचित विचारसरणी राखण्यात कसे सहाय्य करते?

यहोवा देवाचा पवित्र आत्मा, याची आम्हास जर आम्ही या जगाच्या “हवे”चा किंवा रोखाचा प्रतिकार करू इच्छितो तर, निकडीने गरज आहे. (इफिसकर २:१, २) याशिवाय, ज्यात पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवाचे विचार लिखीत आहेत त्या पवित्र शास्त्राचीहि गरज आहे. सोबतच विनम्र ख्रिस्ती वृत्तिची गरज आहे, जिचे संगोपन देवाच्या आत्म्याची फलप्राप्ति—“प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” याद्वारे होते. प्रेषित पौलाने आग्रहाने विनविले: “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही कारण देहवासना आत्म्याविरूद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरूद्ध असते. त्या परस्पराविरूद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही.”—गलतीकरांस ५:१६, १७, २२, २३.

२. देवाच्या आत्म्याकरवी जे काही उत्पादीत होते ते जगाच्या आत्म्याकरवी जे काही अनुसरले जाते त्याच्या परिणामाच्या विरूद्धतेत असते ते कसे?

२ पौल लिहितो: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” (१ करिंथकर २:१२) या जगाची “हवा” किंवा चित्तवृति ठार करते, पण जे काही देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारा देतो त्याच्या स्विकार करणाऱ्‍यास सार्वकालीक जीवनाची प्राप्ति होते. येशूने म्हटले: “जीवंत करणारा तो आत्माच आहे, देहापासून काही लाभ होत नाही; मी जी वचने तुम्हास सांगितली आहेत ती आत्मा व जीवन आहेत.” (योहान ६:६३) जर “देहापासून काही लाभ होत नाही” तर पापावर विजय मिळविण्यास व जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्यास आम्हास ईश्‍वरी मदतीची गरज आहे.

३, ४. (अ) हांव ही काय आहे, आणि ‘आत्म्याचा अधिपति’ कशाप्रकारे जडवादीय वस्तुंच्या अभिलाषांशी खेळी करतो? (ब) हांवरी व्यक्‍ति मूर्तिपूजक असते ती कशी?

३ या आधीच्या लेखांत, आम्ही या जगाच्या “हवे”च्या दोन भयानक स्वरूपांची—अनीतीच्या गोष्टींशी खेळी आणि वेश आणि केशभूषांचे अयोग्य प्रकार यांची चर्चा केली. अद्याप असले अनेक प्रकार बाकी आहेत. उदाहरणार्थः या जगाच्या वातावरणास संपृक्‍त करणारी हांव, म्हणजेच जडवादीय फायदे व वस्तुंकरिता असलेली स्वार्थी अभिलाषा. “आत्म्याचा (हवेचा) अधिपति” याकडे लक्ष पुरवून आहे की, या जगातील प्रकार व जाहीरातबाजी तुम्हास सतत भासवीत राहील की ज्या सर्व भौतिक वस्तु तुम्हापाशी आहेत त्या अपुऱ्‍याच आहेत. जगाच्या ‘हवेचा’ हा गुण तुम्हास या भ्रमांत ठेवितो की या सर्व जीवनांतील आवश्‍यक वस्तु आहेत. या जडवादाच्या “हवे”चा तुम्हावर परिणाम झालेला आहे का?

४ पवित्र शास्त्र म्हणते: “जारकर्मी, अशुद्ध कृति करणारा किंवा लोभी, हा मूर्तिपूजक आहे, असल्या कोणासहि ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.” (इफिसकर ५:५) हे लक्षात घ्या की, हाव बाळगणारा प्रत्यक्षात मूर्तिपूजक आहे. तुम्ही कदाचित म्हणाल ‘मूर्तिपूजक बनेपर्यंतची मजल मी गाठणारच नाही.’ पण मूर्तिपूजा काय असते? यहोवा आणि त्यांची भक्‍ति याऐवजी कोणा दुसऱ्‍यास ते स्थान देणे व देव आणि त्याची सेवा यांचे पेक्षा अधीक लक्ष त्याकडे पुरविणे, हेच ना? हांव मध्ये कदाचित धनाची व त्याच्या शक्‍तिच्या वरपांगी भक्‍तिचाहि समावेश असू शकेल. शिवाय नवीन मोटार, व्हिडीओ, तसेच इतर जडवादी वस्तु घेण्याची तुमची इच्छा यहोवाच्या सेवेतील नेमणूका, मिळविण्याच्या संधीवर मात करणारी असल्यास हे सुव्यक्‍त आहे का की या जगाची “हवा” तुम्हावर हानीकारक अपाय करीत आहे? जडवादी वस्तू तुम्हाकरिता मूर्तिसमान बनत नाहीत का?

५. कोणकोणत्या मार्गी या जगाची “हवा” धनिक लोभाने भरलेली असते?

५ तुम्ही जर उच्च शिक्षणामागे किंवा लठ्ठपगारी नौकरी शोधण्यामागे असाल तर ते तुम्हास जरूर त्यापेक्षा अधीक धन तसेच अधीक ऐहिक फायदे मिळविता यावे याकरता असते ना? शीघ्रतेत धनीक व्हा अशा कोणा योजनेत गुंतलेले आहात का? ह्‍या जगाची “हवा” संपत्तिच्या स्वार्थी अभिलाषा आणि कराबाबत सरकाराला हुलकावण्या देण्याच्या पळवाटांनी खच्चून भरलेली आहे. या वातावरणात जुगार आणि त्या सारख्या भूमिगत हालचाली बहरतात. अशा मोहांना बळी पडू नका. जे या जगाच्या हांवसक्‍त “हवे”च्या प्रभावास चुकवतात त्यांना हे कळते की जे आहे त्यात तृप्त राहिल्याने व राज्य आस्थेस प्रथम स्थान दिल्याने खरी सौख्यता लाभते.—मत्तय ६:२५–३४; १ योहान २:१५–१७.

जीभेचा सदुपयोग

६. ख्रिस्ती असतांहि, या जगाच्या बोलण्याच्या संवयी आम्हावर कोणता परिणाम करू शकतात?

६ बोलण्याच्या सवंयाबाबत काय? अभद्र भाषण, क्रोधिष्ठ शब्द आणि लबाडी—अशा मलिन भाषेने या जगाची “हवा” संपूर्ण प्रदुषित आहे. असे असताहि, ख्रिस्ती मंडळ्यांशी संबंधीत असलेल्यापैकी काहीचे बोलणे काही वेळा असभ्य, व शिवाय अभद्राआशीष्ठ असते. शिष्य याकोबाने आम्हास जोर देऊन म्हटले आहे: “एकाच तोंडातून स्तुति व शाप निघतात. माझ्या बंधुनो, अशी गोष्ट व्हावी हे उचीत नाही. झऱ्‍याच्या एकाच छिद्रातून गोड व कडू पाणी निघते काय?” (याकोब ३:१०, ११) या जगाच्या हेंगाड्या किंवा अश्‍लील भाषेची सवंय तुम्हास जडलेली आहे का? तुमचे बोलणे दोन प्रकारांतील आहे का, एक ख्रिस्तीजनांच्या सोबतीतील आणि दुसरे इतरत्र? पौलाने लिहिले: “तुमच्या तोंडावाटे कोणतेहि अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्‍नतीकरिता जे काही उपयुक्‍त तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकरून ऐकणाऱ्‍यास कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९) याचकरिता सर्व वेळी उचीत, शुद्ध बोलणे केवढ्या महत्वाचे आहे बरे!

७. ‘असत्याचा त्याग करून सत्य बोला’ यांत काय काय समाविष्ठ आहे?

७ आम्ही सर्व वेळी सत्य बोलावे. याचीहि दक्षता बाळगणे अवश्‍य आहे. जबाबदारी टाळता यावी म्हणून वक्रदृष्टी असणे किंवा जाणूनबुजून इतरांचे चुकीचे मार्गदर्शन करणे म्हणजेच लबाडी समान आहे. यास्तव पौलाच्या उपदेशाकडे जरूर लक्ष द्या: “यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्‍याबरोबर सत्य बोला. कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.”—इफिसकर ४:२५; नीतिसुत्रे ३:३२.

८. (अ) क्रोधाविष्ठ झाल्यावर काही जगीक लोक कसे वागतात? (ब) आम्ही जर रागाने संतापलो, तर आम्ही काय करावे?

८ क्रोध अनावर होऊ देणे हा एक या जगाच्या आत्म्याचा गुण आहे. जगीकांपैकी असे अनेक आहेत जे अगदी सहज आपल्या संयमनावरील ताबा गमावितात. ते भडकतात, आणि थोड्याच वेळात क्षमा मागत म्हणतात थोड्याशा वायुला मोकळीक दिली. पण, पौलाने असा सल्ला दिलेला नाही, त्याने आपल्या लिखाणात म्हटले: “सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणासुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो.” (इफिसकर ४:३१) पण तेच आम्ही, आत्मसंयमानासह देवाच्या आत्म्याची इतर फळेहि विकसित करीत असता राग अनावर होत असला तर काय? “तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका,” असे पौल लिहितो: “तुम्ही रागावला असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिसकर ४:२६, २७) याचकरिता, आम्ही जरी रागावलो तरी ते प्रकरण, दिवस संपण्याआधी मिटवावे. नाहीतर कटुत्व आणि द्वेष ही हृदयात घर करू लागतील व त्यांना उपटणे मुष्कीलीचे असते. या जगाच्या “हवे”तील क्रोध, आकसखोर वृत्तीचा श्‍वासोच्छ्‌वास घेण्यास स्वतःस परवानगी देऊ नका.—स्तोत्रसंहिता ३७:८.

९. कामगारापैकी काहींचे मनाचे सर्वसाधारण कल कसे असतात, आणि आम्ही आमच्या काम करण्याच्या संवया का पडताळाव्यात?

९ तुमच्या कार्य करण्याच्या संवयाबद्दल काय? कामावर असता इकडेतिकडे हिंडून गप्पात वेळ काढणे व धन्याच्या वस्तुंची चोरी करणे हे आज सर्वसाधारण आहे. अशी “हवा” तुम्हीहि शोषून आहात का? “सर्वच करतात तर” हा रोख तुम्हालाहि चाटलेला आहे का? याचा कधीहि विसरपडू देऊ नका की ज्या प्रकारे आम्ही आमची कामे करतो ती ख्रिस्ती म्हणून यहोवा आणि त्यांची खरी भक्‍ति यावर प्रतिक्षेपीत करतात. तुम्हास असे व्हावेसे वाटते का की कामावरील तुमच्या वागणूकीमुळे कोणी, त्याच्या दारावर आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांकडिल सत्यास स्पष्ट नकार देतो? “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा अगदी चोरी करू नये,” असे पौल म्हणतो, “तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून . . . ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.”—इफिसकर ४:२८.

१०. नौकरीवर असतांना, या जगाच्या स्वार्थी “हवे”ने आम्ही झपाटलेलो नाहीत हे कसे दाखवू शकतो?

१० जरी, पहिल्या शतकातील धनी–कामगार मधील नातेसंबंध आज आढळून येत नसले तरी, इफिसमधील ख्रिस्ती दासांना जे काही लिहिले त्याकडून ख्रिस्ती कामगार पुष्कळसे शिकू शकतात. या कामगारांना इफिसकर ६:५–८ मध्ये म्हटले: ‘ज्यांचे ते काम करितात त्यांचा हुकूम माना. मनुष्यास खुष करणाऱ्‍या लोकांसारिखा नव्हे तर ख्रिस्ताच्या दासासारिखा तो माना.’ यास्तव कोणाहि ख्रिस्ती व्यक्‍तिने संपूर्ण दिवसाचे काम करण्याचे किंवा कोणताहि माल किंवा इतर कामे पूर्ण करण्याचे कोणाहि बहाण्याने चुकवू नये. आम्ही जर सर्व काही “यहोवाकरिता” करीतो तर आपणाठायी योग्य तीच चितवृती राखू आणि या जगाच्या “हवे”तील स्वार्थ, आळस यांचा आम्हास संसर्ग होऊ देणार नाही.

अन्‍न, पेय आणि मनोरंजन

११. पवित्र शास्त्र काळात यहोवाच्या लोकांतील काहींच्यावर खाणे आणि पिणे याबाबतीत जगीक वृत्तीचा कसा परिणाम झाला होता?

११ अन्‍न व पेय यांचे उपयोगांतील जगीक अमर्यादेचा तुम्हावर परिणाम झाला का? “चला आपण खाऊं, पिऊं कारण उद्या मरावयाचे आहे,” असा त्यांच्या मनाचा कल आहे. आणि या आत्म्याने देवाच्या सेवकांपैकी काहीवर या काळीच नव्हे तर पुरातन काळापासून परिणाम केलेले आहे. अरण्यावासांतील तो प्रसंग आठवा जेव्हा की इस्राएल लोक: “खायला प्यायला बसले आणि उठून खेळू लागले.” (निर्गम ३२:६) त्या “खेळीने” त्यांना स्वैराचरणाच्या व मूर्तिपूजेच्या मार्गी लाविले, ज्यायोगे यहोवाचा क्रोध त्यांजवर भडकला. आम्ही त्यामार्गी कधीहि स्वतःस जाऊ देऊ नये.—१ पेत्र ४:३–६.

१२. आमच्या खाणे आणि पिणे यांच्या संवयांकडे लक्ष देण्याची गरज भासली तर आम्ही काय करावे?

१२ यहोवाने आम्हास असंख्य चवींचे, रंगांचे व सकस अन्‍न, तशींच पेये दिली आहेत. पण त्यांना आम्ही प्रमाणबद्धतेत उपयोगात आणावे हेच तो इच्छितो. आधाशीपण आणि दारूबाजी यांना पवित्र शास्त्रांत धिक्कारले आहे. (नीतिसुत्रे २३:२०, २१) तर प्रमाणिकतेत स्वतःस विचारा: माझ्या खाण्या आणि पिण्याच्या संवयीत काट मारून सुधारणा होईल का? याबाबतीत जरी आत्मसंयमन करण्यात अधीक निराग्रही व्हावे लागले तरी ही आठवण असू द्या की या वाईट संवयींवर मात करण्यास देवाच्या आत्म्याच्या सहाय्याची जी याचना करितो त्याच्या एकवाक्यतेत आहे. “द्राक्षारसाने मस्त होऊ नका; त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण” व्हा असे पौल म्हणतो. (इफिसकर ५:१८) होय, या जगाच्या बेताल आत्म्याचे भक्ष्य बनण्याऐवजी देवाच्या आत्म्याने भरलेले असा. “यास्तव तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) तथापि, या समस्या जर दिर्घकाल असाध्य वाटल्या तर मंडळीत जे आध्यात्मिकतेत प्रौढ असतील अशांची मदत घ्या.—गलतीकर ६:१; याकोब ५:१४, १५.

१३. (अ) आज उपलब्ध असलेल्या बहुतांशी मनोरंजनास दियाबलाने भ्रष्टाविलेले आहे याचा पुरावा काय? (ब) या जगाचा मनोरंजनाप्रतचा कल आम्ही कसा टाळू शकतो?

१३ हे जग क्रिडा, संगती आणि विविध प्रकारातील मनोरंजनात गढलेले आहे. जोवर शास्त्रवचन तत्वांचा मोड होत नाही तोवर त्यात काही वावगे नाही. पण समस्या ही आहे की, सैतान जो “आत्म्याचा अधिपती,” त्याने आज उपलब्ध असलेल्या मनोरंजनातील बहुतेक भाग भ्रष्टाविलेला आहे. (इफिसकर २:२) वारंवर त्यात अनीतीस प्रोत्साहन, दांडगाई, बलात्कार यांना माफी व फसवणूक, धोकेबाजी याचा विजय आणि खुनाचेहि प्रदर्शन होते. आम्ही असे चित्रपट, खेळ पाहताना, अशा त्याज्य वृतिंना आमच्या विचारात खोलवर रूजवीत असतो आणि त्यांचे विषारी परिणाम आम्हावर झाल्याविना राहत नाही. तसेच, काही ठिकाणी विशिष्ठ प्रकारातील मनोरंजन जरी शास्त्र वचनानुसार आक्षेपार्ह नसले तरी त्यांची संवय लागण्याचा धोका असतो. आणि आध्यात्मिक गोष्टींना फारच थोडा वेळ उरतो. यास्तव आम्ही निवडक असणे बरे! जी आरोग्यदायी आणि फायदेकारक व प्रमाणबद्ध करमणूक ठरेल तिला काही वेळ द्यावा पण जगासारखी अतिरेकता टाळावी. या जगाची “हवा,” वरून सुगंधीत किंवा जहाल जरी असली तरी प्रदुषित व प्राणघातक आहे!—नीतिसुत्रे ११:१९.

वंश अभिमान—एक दुरात्मिक वारे

१४. सामाजिक समस्याबाबत पाहता, या जगाच्या “हवे”चा आम्हावर कसा प्रभाव पडू शकतो?

१४ या जगाच्या “हवेचा” एक फसवा गुण आहे तो वंश आणि राष्ट्राभिमान. काहीं जन आपल्या या कल्पनेस नेहमीच उंचावत असतात की, अमुक एक वंश उच्च आणि दुसरा कनिष्ठ आहे. यामुळे प्रत्यक्षात अनेकांना मुळ मानवी हक्कांना व गरजांना इतरांच्या स्वार्थ द्वेषभावामळे, मुकावे लागते. शिवाय संताप व काही वेळा दंगे उसळतात. अनेक मिळून बंड उभारतात व अनेक सामाजिक समस्या सोडवू या उमगेने कायदा आपल्या हाती घेतात. आम्ही जर त्यात दक्ष राहिलो नाही तर प्रभावीत होण्याचा संभव असतो. आम्ही कदाचित आमची तटस्थ भूमिका सोडून त्यांच्यात सहभागी होऊ. (योहान १५:१९) याहिपेक्षा अधीक गंभीर, आम्ही कदाचित, जबरदस्तीने बदल घडवून आणण्यात त्यांच्या निरोधनात, मोहिमेत किंवा दंडेलीच्या निर्णायक उपायात सहभागी होऊ.

१५. जेव्हा आम्हास ‘सुड उगवावासा’ वाटतो तेव्हा पवित्र शास्त्र कोणता मार्ग अनुसरण्याची शिफारस करते?

१५ वंशिक किंवा राष्ट्रीयत्वाची भावना राखल्याने मंडळीच्या आत्म्यावर हानीकारक परिणाम होतील. (प्रे. कृत्ये ६:१–७ पडताळा.) पण तेच आम्ही जर उपदेशाकडे लक्ष पुरविले तर आम्हाठायी उचीत आत्म्याची प्रेरणा असेल: “साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणांकडून शांतीने राहा. प्रिय बंधुनो, सूड उगवूं नका, तर (देवाच्या) क्रोधाला वाट द्या; कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, असे यहोवा म्हणतो.” (रोम १२:१८, १९) सर्व वंश मूळ एकाच जोडप्याकडून असल्यामुळे, आणि देव पक्षपाती नसल्यामुळे ख्रिस्ती मंडळीत वंशिक किंवा राष्ट्रीय मोठेपणाला स्थान नाही.—प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १७:२६; रोमकर १०:१२; इफिसकर ४:१–३.

जीवन—पुरविणाऱ्‍या “हवेचा” श्‍वास घेत राहा

१६. आम्हावर, या जगाच्या आत्म्याचा होत असलेला प्रभाव टाळण्यात कशापासून मदत होईल?

१६ आम्ही, या जगाच्या “हवे”तील किंवा आत्म्याच्या मुख्य प्राणघातक गुणांची चर्चा केली. ते आम्हास घेरून आहेत आणि आम्हावर एवढे दबाव सारखे आणतात की आमच्या आध्यात्मिकतेत छोटीशी पोकळी जरी उद्‌भवू दिली तर ती भरण्यास ही अमंगळ “हवा” चटकन धाव घेते. तिचा प्रतिकार करण्यातील यश यावरच विसंबून आहे की आम्ही जे पवित्र, निर्मळ आणि नीतिमान याबद्दल केवढे प्रेम बाळगून आहोत व जे सर्व अपवित्र, अमंगळ आणि अधार्मिक त्याचा केवढा वीट आहे. यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनास होकार देऊन आम्ही जर सतत सात्विक वृतीची वाढ करीत राहिलो तर आम्ही उचीत “हवेचे” श्‍वसन करीत राहू.—रोमकर १२:९; २ तिमथ्यी १:७; गलतीकर ६:७, ८.

१७. या जगाच्या “हवे”चा रोख आमच्या दिशेने वाहात असल्याचे दिसताच तत्काळ काय करावे?

१७ या जगाच्या अमंगळ “हवे”च्या कोणाहि प्रकारच्या वासास कधीहि खचीतपणे मनास आनंदविणारा वाढू देऊ नका. या “हवेचा अधिपती” हे चांगले जाणतो की ज्ञानेंद्रियांस भूलविणारे काय असू शकेल की ज्याद्वारा अशी ओढ त्याप्रत निर्माण होईल जी हमखास पापांत पाडेल. (याकोब १:१४, १५) जे “धुम्रपान निषेध” कक्ष, यहोवाकडिल आध्यात्मिक नंदनवन, त्यातच स्वतःस टिकवून ठेवा. कोणाहि वेळी या जगाच्या “हवे”ची झुळूक तुमच्या दिशेने वाहत असल्याचे कळेल, तत्काळ तिला टाळा. जसे कोणा प्राणघातक विषारी वायूच्या धुराळ्या पासून चटकन बाजूला व्हाल तसेच दूर व्हा. “तुम्ही अज्ञान्यासारिखे नव्हे, तर ज्ञान्यांसारिखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधि साधून घ्या कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. तर यहोवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या.”—इफिसकर ५:१५–१७.

१८. ज्यांना शुद्ध केलेल्या पृथ्वीवरील जीवनाचा हक्क मिळेल त्यांचा आत्मा कोणत्या प्रकारचा असेल?

१८ सचोटीत टिकून त्याची सेवा करीत राहावे हीच देवाची इच्छा आहे. असे केल्याचा अर्थ, अगदी नजीक येऊन ठेपलेल्या नवीन व्यवस्थिकरणात जीवन प्राप्ति होय, त्या काळी आम्ही जो श्‍वास घेऊ तो केवढी हुशारी आणणारा असेल. प्राणघातक प्रदुषण राहणार नाही तर केवळ जीवन टिकविणारी शुद्ध हवा वाहत असेल. हे जसे भौतिक हवेच्या बद्दल खरे असेल तसेच अधीक म्हणजे ज्यांना शुद्ध केलेल्या पृथ्वीवर जीवन जगण्याचा हक्क प्राप्त होईल त्यांच्या आत्म्याबाबत अधीक महत्वाने खरे ठरेल. त्यांच्याठायी आज्ञाधारक, नम्र आणि सहानुभूतीची चितवृति असेल. या जुन्याजगाची ही, बंडखोरपणा, भ्रष्टता आणि अधार्मिकतेने भरलेली “हवा” कायमची जाणार.—प्रकटीकरण २१:५–८.

१९. यहोवाकडिल नवीन व्यवस्थीकरणात कोण बचावून जाईल?

१९ जेव्हा यहोवा, प्रदुषण आणि भ्रष्टाचाऱ्‍यांना हर्मगिदोनात नष्ट करील त्यावेळी आम्ही, जे या व्यवस्थिकरणाच्या “हवे”चा श्‍वासोच्छ्‌वास करणारे असतील त्यांचे सोबतीत खचीतच असू इच्छिणार नाही. जेव्हा जुने जग नष्ट झालेले असणार तेव्हा केवढी मोठी सुटका वाटेल बरे! केवळ यहोवावर प्रेम करणारे व जे शुद्ध, सभ्य आणि नीतिमान याचीच आवड बाळगणारे तेथे असतील. त्यांनी तेथे असावे असे यहोवा इच्छितो व आपल्या आत्म्याद्वारा तो त्यांचे सहाय्य करील. तो त्यांना शुद्ध आणि आरोग्यदायी नवीन व्यवस्थिकरणात सार्वकालीक जीवन देणार. यास्तव, या जुन्या व्यवस्थिकरणाच्या प्राणघातक “हवे”चे श्‍वसन करून तो अमूल्य हक्क गमवू नका. (w87 9/15)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ कोणत्या मार्गी हांवरी व्यक्‍ति मूर्तिपूजक बनते?

◻ जगाची “हवा” आमच्या बोलण्याच्या संवयीवर कसा परिणाम करते?

◻ प्रापंचिक नौकरीवर ख्रिस्ती कामगाराने कसला आत्मा प्रदर्शित करावा?

◻ अन्‍न, पेये आणि मनोरंजन यांचेबाबत या जगाच्या मनाचा कल कसा चुकवाल?

◻ वंश आणि राष्ट्रीयत्व यांच्या कसल्या आत्म्यास ख्रिस्ती मंडळीत प्रवेश नसावा?

[१८ पानांवरील चित्रं]

या जगाच्या ‘हवे’चा प्रतिकार करण्यासाठी तुमचे कुटुंब आध्यात्मिक दृष्ट्या बळकट आहे का?

[१९ पानांवरील चित्रं]

आम्ही सर्व गोष्टी “यहोवासाठी” करीत आहोत तर या जगाची स्वार्थी व आळशी “हवा” आम्हाला लागणार नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा